RBI Rule For Credit Card Block:- तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि ते तुम्ही वापरत नसाल व तुम्हाला ते बंद करायचे असेल तर ते तुम्ही बंद करू शकतात. क्रेडिट कार्डच्या संदर्भात जर बघितले तर अनेकदा बँकांच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड बंद करायला टाळाटाळ केली जाते.
बऱ्याचदा आपण बँकांकडे क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी विनंती करतो परंतु अशा प्रकारचे विनंती किंवा अर्ज बँक लवकर स्वीकारत नाहीत व अशा परिस्थितीत काही समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियम माहिती असणे गरजेचे असते.
म्हणजे जर बँक तुमचे क्रेडिट कार्ड बंद करत नसेल तर तुम्ही रिझर्व बँकेच्या नियमाचा हवाला देऊन कार्ड बंद करण्यास त्यांना सांगू शकतात.
जर आपण क्रेडिट कार्ड बाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियम बघितले तर समजा तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे व एखाद्या बँकेने ते बंद केले नाही किंवा उशीर केला तर बँकेला दररोज पाचशे रुपये दंड भरावा लागतो.
काय आहेत रिझर्व बँकेचे यासंबंधीचे नियम?
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड जारी करणे आणि बंद करणे याबाबत काही स्पष्ट नियम केले आहेत. आरबीआयच्या नियमानुसार बघितले तर जर एखादा ग्राहक आणि त्याचे क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज केला तर बँकेला सात दिवसांच्या आत त्यावर काम सुरू करावे लागते.
परंतु बँक किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रक्रिया सुरू केली गेली नाही तर पुढील सात दिवसानंतर संबंधित बँक किंवा वित्तीय संस्था त्यांना संबंधित ग्राहकाला प्रतिदिन पाचशे रुपये दंड द्यावा लागतो.
परंतु यामध्ये तुम्ही वापरत असलेल्या क्रेडिट कार्डची कुठेही थकबाकी नसावी. जर क्रेडिट कार्डवर काही थकबाकी असेल तर मात्र बँक तुमची विनंती नाकारू शकते.सर्वप्रथम तुम्हाला थकबाकी भरण्यास सांगितले जाईल. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून 2022 मध्येच हा नियम लागू केला गेला होता.
क्रेडिट कार्ड बंद करण्याची इतर मार्ग
1- ग्राहक सेवा केंद्राशी बोलणे- तुमच्याकडे ज्या बँकेचे क्रेडिट कार्ड आहे त्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुम्ही तुमचे कार्ड बंद करण्याची विनंती करू शकतात.
2- एसएमएसच्या माध्यमातून- तुम्ही काही बँकांमध्ये एसएमएसच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड ब्लॉक करू शकतात. परंतु या सुविधेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या त्या बँकेतील खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे.
3- नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲप- तुम्ही नेट बँकिंगमध्ये तुमच्या खात्यात लॉगिन करावे व क्रेडिट कार्ड वर क्लिक करा आणि ब्लॉक क्रेडिट कार्ड पर्याय निवडावा. याशिवाय तुम्ही तुमच्या बँकेच्या मोबाईल ॲप द्वारे क्रेडिट कार्ड बंद करण्याची विनंती देखील करू शकतात.
क्रेडिट कार्ड बंद करण्याआधी या गोष्टींकडे लक्ष द्या
1- क्रेडिट कार्डधारकांना त्यांच्या कार्ड वरील सर्व देणी यामध्ये परत करावे लागतील. यामध्ये ईएमआय, शिल्लक हस्तांतरण इत्यादीचा समावेश आहे व सर्व देय रक्कम न भरल्यास बँक तुमचे क्रेडिट कार्ड बंद करणार नाही. तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद करायचे तर संपूर्ण थकबाकी भरणे गरजेचे आहे.
2- रिवार्ड पॉईंट वापरा- जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार करतात तेव्हा रिवार्ड पॉईंट क्रेडिट कार्डवर जमा होतात. रिवार्ड पॉईंट कार्डधारकाने वापरणे गरजेचे आहे. कार्ड बंद केल्यानंतर तुम्हाला हे रिवाईड पॉईंट वापरता येत नाहीत.
3- ब्लॉक केल्यानंतर त्याचा वापर बंद करा- क्रेडिट कार्ड ब्लॉक केल्यानंतर ते वापरू नका. तुम्हाला ज्या तारखेला क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे त्या तारखेच्या एक महिना आधी त्यावर कुठल्याही प्रकारचा व्यवहार करू नका.
यामुळे बँक तुमचे कार्ड तपासेल आणि ते ब्लॉक करेल. व्यवहार शिल्लक असेल नंतर बँक ते कार्ड ब्लॉक करत नाही किंवा बंद करत नाही.