Loan Information:- आपल्याला जेव्हा अचानकपणे पैशाची गरज भासते आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला पैसा जेव्हा आपल्याकडे नसतो तेव्हा मात्र आपली खूप धावपळ उडते. अशावेळी आपण कर्जाचा पर्याय अवलंबतो किंवा मित्र तसेच नातेवाईक इत्यादी कडून हात उसने पैसे घेतो. परंतु या व्यतिरिक्त जर आपण बँकेच्या माध्यमातून किंवा इतर वित्तीय संस्थांकडून वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन घेऊन आपली पैशांची गरज भागवण्याचा प्रयत्न करतो व आपल्याला बँकेकडून बऱ्याचदा अशा प्रकारचे पर्सनल लोन मिळते.
परंतु या सगळ्या लोनचे हप्ते आपल्याला दर महिन्याला भरणे गरजेचे असते. त्यामुळे बऱ्याचदा आपले महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडते. परंतु या व्यतिरिक्त एक असे कर्ज आहे जे घेतल्याने आपल्या आर्थिक गरज पूर्ण होतेच.परंतु त्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारचा महिन्याला हप्ता म्हणजेच ईएमआय भरण्याची आवश्यकता नसते. त्याच कर्जाविषयीची पूर्ण माहिती आपण या लेखातून घेऊ.
एलआयसी पॉलिसी घेतली असेल तर बनेल काम
आजकाल प्रत्येक जणांच्या एलआयसी पॉलिसी असतात म्हणजे एलआयसीच्या माध्यमातून एखादी पॉलिसी आपण घेतलेली असते. तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही या एलआयसी पॉलिसी वर देखील कर्ज घेऊ शकतात. तुम्ही बँकेकडून जर पर्सनल लोन घेतले तर त्यापेक्षा एलआयसी कडून घेतलेले हे कर्ज खूप स्वस्त असते आणि त्याचे परतफेड करणे देखील खूप सहज आणि सोपे असते.
एलआयसी पॉलिसी वर घेतलेल्या कर्जाचे हप्ते दर महिन्याला भरण्याचे टेन्शन तुम्हाला राहत नाही. तुमची आर्थिक आवक आणि सोयीनुसार तुम्ही अशा प्रकारच्या कर्जाची परतफेड करू शकतात. म्हणजेच तुमची बचत देखील संपत नाही आणि तुमच्या गरजा देखील पूर्ण होतात व आर्थिक बजेट देखील विस्कळत नाही.
एलआयसी पॉलिसीवरील कर्ज असते सुरक्षित श्रेणीचे
कर्जाचे असुरक्षित आणि सुरक्षित असे दोन प्रकार असतात. यामध्ये पर्सनल लोन हे असुरक्षित श्रेणीत येते. तर पॉलिसीवर घेतलेले कर्ज हे सुरक्षित कर्जाच्या श्रेणीमध्ये येते. यामुळे तुम्हाला या कर्जासाठी जास्त कागदपत्र देण्याची गरज भासत नाही आणि कर्ज देखील लवकर मिळते. या माध्यमातून तुम्हाला कर्जाची रक्कम केवळ तीन ते पाच दिवसाच्या कालावधीत मिळते.
एलआयसी पॉलिसी वरील कर्जाचा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला तुमची पॉलिसी देखील यामध्ये सरेंडर करण्याची गरज भासत नाही. म्हणजेच एकाच पॉलिसीतून तुम्ही तुमचे पैशांची गरज देखील भागवू शकतात आणि विमा पासून मिळणारे फायदे देखील संपत नसतात. हे कर्ज वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त असून याकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क द्यावे लागत नाही.
एलआयसी पॉलिसीवरील कर्ज परतफेड करण्यासाठीचे तीन महत्त्वपूर्ण पर्याय
1- एलआयसी पॉलिसीवर जर तुम्ही कर्ज घेतले तर ते परतफेड करण्यासाठीचे तीन पर्याय तुमच्याकडे असता तो यातील म्हणजे तुम्ही संपूर्ण मुद्दल रक्कम व्याजासह परत करू शकतात.
2- दुसरे म्हणजे विमा पॉलिसीच्या मुदत संपण्याच्या वेळी दाव्याच्या रकमेसमोर रक्कम सेटल करू शकतात. यावेळी तुम्हाला फक्त व्याजाची रक्कम भरावी लागते.
3- यातील तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही व्याजाची रक्कम दरवर्षी भरू शकतात आणि मूळ रक्कम स्वतंत्रपणे परत करू शकतात.
एलआयसी पॉलिसी वरील कर्जासाठीचे महत्वाचे नियम
1- विमा पॉलिसीवर कर्ज फक्त पारंपारिक आणि एडोंवमेंट पॉलिसी सारख्या काही निवडक पॉलिसींवर उपलब्ध आहे.
2- तुमच्या पॉलिसीचे जे काही सरेंडर मूल्य असेल त्यानुसार कर्जाची रक्कम ठरवली जाते. तुमच्या सरेंडर मूल्याच्या जवळपास 80 ते 90 टक्के रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून मिळू शकते.
3- कर्ज पॉलिसीचा व्याजदर हा पॉलिसी धारकाच्या प्रोफाईलवर अवलंबून असतो व सहसा तो दहा ते बारा टक्क्यांपर्यंत असतो.
4- जेव्हा विमा कंपनी तुम्हाला तुमच्या पॉलिसीवर कर्ज देते तेव्हा तुमची पॉलिसी गहाण ठेवली जाते.
5- जर कर्जाची परतफेड तुमच्याकडून झाली नाही अशा परिस्थितीत तुमच्या थकीत कर्जाची रक्कम जर तुमच्या पॉलिसीच्या सरेंडर मुल्यापेक्षा जास्त असेल तर पॉलिसी रद्द करण्याचा अधिकार देखील कंपनीला असतो.
6- समजा कर्ज परतफेड करण्याअगोदरच तुमची विमा पॉलिसी मॅच्युअर्ड म्हणजे परिपक्व झाली असेल तर विमा कंपनी तुमच्या रकमेतून कर्जाची रक्कम वजा करू शकते.
एलआयसी पॉलिसीवरील कर्जसाठी अर्ज कसा करावा?
याकरिता साधारणपणे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला एलआयसी ई सेवांसाठी नोंदणी करावी लागेल व खात्यामध्ये लॉग इन करून पुढची ऑनलाइन प्रक्रिया करावी लागते व ऑफलाईन जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या एलआयसी कार्यालयात जाऊन केवायसी कागदपत्रांसह कर्जासाठी अर्ज करू शकतात.