आर्थिक

LIC Scheme: एलआयसीच्या ‘या’ योजनेमध्ये एकदा पैसे गुंतवा आणि महिन्याला 12000 रुपये पेन्शन मिळवा! वाचा या प्लॅनची संपूर्ण माहिती

LIC Scheme:- आपणास तरुणपणी जो काही पैसा नोकरी आणि व्यवसायाच्या माध्यमातून कमवतो त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच आता याबाबत बरेच जण जागृत झाले असून आयुष्याच्या उतारवयामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक दृष्टिकोनातून त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले जात आहे.

जर तुम्ही देखील अशाप्रकारे पैसे गुंतवण्यासाठी विचार करत असाल तर तुमच्यासाठी एलआयसी आणि पोस्ट ऑफिस हे दोन पर्याय उत्तम आहेत. कारण या दोन्ही ठिकाणी जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जोखीम घ्यावी लागत नाही आणि परतावा आणि फायदे देखील चांगले मिळतात.

पैसे गुंतवण्यासाठी बरेच गुंतवणूकदार हे सेवानिवृत्ती योजनेची निवड करतात. कारण सेवानिवृत्तीनंतर खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम जमा होते व त्यामुळे उतारवयात आर्थिक सुरक्षितता मिळते. याकरिता एलआयसीची सरल पेन्शन योजना तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

 एलआयसीची सरल पेन्शन योजना नेमकी काय आहे?

एलआयसीची सरल पेन्शन योजना ही एक महत्त्वाची योजना असून तुम्हाला निवृत्त झाल्यानंतर दरमहा पेन्शनची हमी या योजनेच्या माध्यमातून मिळते. या प्लॅनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला एकदाच गुंतवणूक करावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर पेन्शन मिळत राहते.

प्रत्येक महिन्याला निश्चित रक्कम पेन्शन म्हणून देणारी ही योजना निवृत्तीनंतरच्या गुंतवणुकीच्या नियोजनात पूर्णपणे बसते. समजा एखादा व्यक्ती खाजगी क्षेत्रामध्ये किंवा सरकारी विभागात काम करत असेल आणि त्याच्या पीएफ फंडातून मिळालेली रक्कम आणि ग्रॅच्युईटीची रक्कम निवृत्तीपूर्वी गुंतवले तर त्याला आयुष्यभर दर महिन्याला पेन्शनचा लाभ या माध्यमातून मिळत राहील. तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाईट वरून देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने खरेदी करू शकतात.

 एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेमध्ये कोणाला गुंतवणूक करता येते?

विशेष म्हणजे या एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेमध्ये 40 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्तीला गुंतवणूक करता येत नाही. यापुढे तुम्ही 80 वर्षापर्यंत कधीही गुंतवणूक करू शकतात. या पॉलिसीमध्ये मासिक आधारावर एक हजार रुपये वार्षिक, तिमाही आधारावर किमान 3000 रुपये आणि सहामाही आधारावर 6000 रुपये आणि वर्षाला 12000 रुपये गुंतवणे गरजेचे आहे.

जर एलआयसीच्या कॅल्क्युलेटर  नुसार बघितले तर 42 वर्षाच्या कोणत्याही व्यक्तीने 30 लाख रुपयांची वार्षिक खरेदी केली तर अशा व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 12388 रुपये पेन्शन मिळते.

तसेच पती-पत्नी मिळून देखील ही योजना तुम्ही घेऊ शकतात. विशेष म्हणजे पॉलिसी धारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यानंतर पॉलिसी केव्हाही सरेंडर करण्याची सुविधा देखील यामध्ये मिळते. इतकेच नाही तर बेनिफिट म्हणजेच मृत्यू लाभ अंतर्गत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास गुंतवणुकीची रक्कम त्याच्या नॉमिनीला  परत केली जाते.

 या प्लॅनमध्ये तुम्हाला कर्ज देखील घेता येऊ शकते

एलआयसीच्या सरल पेन्शन पॉलिसी अंतर्गत तुम्हाला कर्ज घेता येऊ शकते व यामध्ये पॉलिसी घेतल्यानंतर सहा महिन्यानंतर कर्ज सुविधा मिळते.कुटुंबातील कोणीही गंभीर आजारी असल्यास तुम्ही पॉलिसी सरेंडर देखील करू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts