आर्थिक

Post office : पोस्टाच्या ‘या’ योजनेतून मिळतील 7 लाख रुपये, बघा कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी लागेल?

Post office : छोट्या गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसच्या योजना सर्वात उत्तम आहेत. गुंतवणुकीच्या बाबतीत या योजना नेहमीच आघाडीवर आहेत. देशातील लाखो लोक यामध्ये गुंतवणूक करून उत्कृष्ट परतावा कमवत आहेत. आज आपण पोस्टाची अशीच एक योजना जाणून घेणार आहोत जी सर्वोत्तम परतावा ऑफर करत आहे.

आजच्या काळात, नोकरी असो किंवा कोणताही व्यवसाय, प्रत्येकजण आपल्या रोजच्या कमाईतून काही रक्कम वाचवतो आणि ही रक्कम पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवतो जेणेकरून भविष्यात अडचणीच्या काळात त्यांच्या हातात मोठी रक्कम असेल.

पोस्ट ऑफिसद्वारे अशीच एक स्कीम चालवली जात आहे, ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला 5 वर्षात 7 लाख रुपयांचा परतावा सहज मिळू शकतो. पोस्ट ऑफिसची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इथे श्रीमंत असो की गरीब, सर्वांना समान व्याजदराचा लाभ दिला जातो.

आजच्या या लेखात आपण ज्या योजनेबद्दल बोलणार आहोत, ती योजना आज देशातील करोडो लोकांच्या पसंतीस पडत आहे. चला या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

आम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीमबद्दल बोलत आहोत. ही एक बचत योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला ठराविक कालावधीसाठी तुमचे पैसे गुंतवावे लागतात. आणि त्यावर पोस्ट ऑफिसकडून तुम्हाला व्याजदराचा लाभ दिला जातो. या योजनेत तुम्हाला तुमचे पैसे 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवावे लागतील आणि 5 वर्षानंतर संपूर्ण पैसे तुम्हाला व्याजासह परत केले जातील.

याशिवाय, तुम्ही पोस्ट ऑफिसची ही योजना मॅच्युरिटी तारखेच्या आधी 5 वर्षांसाठी वाढवू शकता आणि तुमची गुंतवणूक पुढेही सुरू ठेवू शकता. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मॅच्युरिटीपूर्वी एक फॉर्म भरावा लागेल आणि त्यानंतर तुमची योजना समान व्याजदरासह 5 वर्षांसाठी वाढवली जाईल. यामध्ये तुम्हाला पुढील 5 वर्षे संपल्यानंतर परताव्याचा लाभाही दिला जातो.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts