आर्थिक

Post Office : फक्त व्याजातूनच व्हाल श्रीमंत; पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक!

Post Office : पोस्ट ऑफिसची एक योजना सध्या लोकांना श्रीमंत बनवण्याचे करत आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही जवळ-जवळ 4 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळवू शकता. पोस्टाच्या या योजनेत तुम्हाला उच्च व्याजदरासह कमाई करण्याची उत्तम संधी मिळते. जर तुम्हाला या योजनेबद्दल जाणून घ्यायचे असेल तर बातमी शेवटपर्यंत वाचा.

सध्या पोस्ट ऑफिसची ही योजना ग्राहकांना 6.90 टक्के ते 7.50 टक्के व्याजदराचा लाभ देतआहे.

पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये लोकांना खूप जास्त व्याजदराचा लाभ दिला जात आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमचे पैसे गमावण्याचा कोणताही धोका नसतो. याशिवाय सरकार पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीवर परताव्याची पूर्ण हमी देते.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम तुम्हाला वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची संधी देते आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कालावधी निवडू शकता. या योजनेतील व्याजदर देखील कालावधीनुसार बदलतात. तुम्ही या पोस्ट ऑफिस योजनेत एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही जर एका वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला पोस्ट ऑफिसकडून 6.90 टक्के व्याजदराचा लाभ दिला जात आहे आणि याशिवाय तुम्ही दोन वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.90 टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे.

याशिवाय तुम्ही एखाद्या योजनेत तीन वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला पोस्ट ऑफिसकडून 7.10 टक्के दराने व्याज मिळत आहे आणि जर तुम्ही पाच वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.50 टक्के दराने लाभ दिला जातो आहे. पाच वर्षाच्या गुंतवणुकीसाठी येथे उत्तम परतावा दिला जात आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts