आर्थिक

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा मिळतील 20,500 रुपये, बघा कोणती?

Post Office Yojna : तुमच्या पगाराप्रमाणे तुमची बचतही तुम्हाला दर महिन्याला पैसे देत राहावी अशी तुमची इच्छा आहे का? जर होय, तर आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका स्कीमबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला दरमहा 20,500 रुपये मिळतील. तुम्हाला पूर्ण 5 वर्षांसाठी 20,500 रुपये मासिक उत्पन्न मिळेल.

या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला मासिक खर्चाचे टेन्शन राहणार नाही. या पोस्ट ऑफिस योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे. या पोस्ट ऑफिस योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना दरमहा निश्चित उत्पन्न मिळते.

पोस्ट ऑफिसची ही योजना 60 वर्षे वयाच्या लोकांना लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावे. ही योजना व्हीआरएस (Voluntary Retirement Scheme) घेतलेल्यांसाठीही आहे. या योजनेवर सरकार सध्या 8.2 टक्के दराने व्याज देत आहे. या योजनेत, या योजनेत ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रितपणे 15 लाख रुपये जमा केल्यास ते प्रत्येक तिमाहीत 10,250 रुपये कमवू शकतात. 5 वर्षात योजनेत तुम्हाला फक्त व्याजातून 2 लाख रुपये मिळतील.

जर तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीचे पैसे म्हणजे जास्तीत जास्त 30 लाख रुपये यामध्ये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी 2,46,000 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला मासिक आधारावर 20,500 रुपये आणि तिमाही आधारावर 61,500 रुपये मिळतील.

कर लाभ

पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये तुम्ही किमान 1000 ची गुंतवणूक सुरू करू शकता. गुंतवणूकदार यामध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. या योजनेत दरमहा मिळणारे पैसे किंवा व्याज हे तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून असते. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 80C अंतर्गत सूट मिळेल.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे फायदे :-

ही बचत योजना भारत सरकार चालवत आहे. म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि खात्रीशीर उत्पन्न मिळेल. यामध्ये, आयकर कायदा कलम 80C अंतर्गत, गुंतवणूकदारांना दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळते. दरवर्षी 8.2 टक्के दराने व्याज मिळते. यामध्ये दर 3 महिन्यांनी व्याजाचे पैसे मिळतात. दर वर्षी एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीच्या पहिल्या दिवशी खात्यात व्याज जमा केले जाते.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts