Investment Tips : सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत ज्यात तुम्ही पैसे गुंतवू शकता. जरी सर्व प्रकारच्या गुंतवणुकीवर परतावा मिळतो, पण असे काही पर्याय आहेत जिथून तुम्हाला दुप्पट परतावा मिळतो, आज आपण त्याच पर्यायांबद्दल जाणून घेणार आहोत. या योजनांमध्ये पैशांची सुरक्षितता देखील मिळते. कोणते आहेत हे पर्याय पाहूया.
बँक एफडी
सध्या, बँक एफडीवरील व्याजदर वाढले आहेत आणि अनेक बँका 8 ते 9 टक्क्यांपर्यंत व्याज देतात. हे व्याज पाहिल्यास तुमचे पैसे 9 वर्षांत दुप्पट होतील. तसेच तुम्हाला 5 लाखांपर्यंत सुरक्षितता देखील मिळते.
PPF
PPF मध्ये वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज दिले जात आहे. येथे तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी 10.14 वर्षे लागतील. या योजनेत तुम्ही दीर्घकाळात उत्तम कमाई करू शकता.
सुकन्या समृद्धी योजना
या योजनेत जानेवारीपासून व्याज 8.2 टक्के झाले आहे. या यायोजनेतून तुम्ही तुमचे पैसे ८.७ वर्षांत दुप्पट करू शकता. ही योजना खास मुलींसाठी तयार करण्यात आली आहे.
किसान विकास पत्र
या सरकारी योजनेत 7.5 टक्के व्याज उपलब्ध आहे. या योजनेत तुम्हाला 9.6 वर्षात दुप्पट परतावा मिळेल. सध्या ही योजना त्याच्या परताव्यामुळे लोकप्रिय होत आहे.
NSC
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये सध्या 7.7 टक्के व्याज उपलब्ध आहे. या व्याजदरानुसार तुमचे पैसे 9.3 वर्षांत दुप्पट होतील.
NPS
राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये सरासरी 10 ते 11 टक्के व्याज मिळते. जर तुम्ही सरासरी 10.5 टक्के व्याज पाहिले तर तुमचे पैसे 6.8 वर्षांत दुप्पट होतील.