आर्थिक

Zero Investment Business Idea: एक रुपयाही खर्च न करता सुरू करा ‘हे’ व्यवसाय आणि कमवा लाखो रुपये महिना! वाचा ए टू झेड माहिती

Zero Investment Business Idea:- व्यवसाय म्हटले म्हणजे व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला गुंतवणूक करावी लागते व गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला पैसा लागतो. व्यवसायाच्या स्वरूपानुसार लागणारी गुंतवणूक म्हणजेच पैशांचे स्वरूप ठरत असते. तुमचा व्यवसाय जितका मोठ्या स्वरूपामध्ये तुम्ही सुरू करणार असाल तितक्या जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला पैशाची गरज गुंतवणुकीसाठी लागते.

छोट्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर कमीत कमी प्रमाणामध्ये तुम्हाला पैसा लागतो. परंतु व्यवसाय सुरू करण्याची इच्छा बऱ्याच जणांच्या मनामध्ये असते. परंतु गुंतवणुकी करता लागणारा पैसा मात्र प्रत्येकाकडेच असतो असे नाही.

अशा परिस्थितीमध्ये  नोकरी नसल्यामुळे व्यवसायाकडे वळण्याची इच्छा असलेल्या तरुणांना व्यवसाय देखील उभारता येत नाही व बेरोजगारी वाढते. परंतु असे काही व्यवसाय आहेत. जे तुम्हाला सुरू करण्यासाठी फक्त तुमच्यात असलेल्या कौशल्याची गरज असते.

एक रुपयाही गुंतवणूक न करता तुम्ही आरामात हे व्यवसाय घरी बसून सुरू करू शकतात व लाखो रुपये महिन्याला कमवू शकतात. अशा व्यवसायांमध्ये तुमचे कौशल्य, धोरणात्मक आणि व्यवस्थित नियोजन केले तर तुम्ही महिन्यांमध्ये चांगले उत्पन्न या माध्यमातून मिळवू शकतात.

 शून्य गुंतवणुकीत सुरू करता येणारे व्यवसाय

1- फ्रीलांसिंग हा व्यवसाय एक उत्तम पद्धतीचा व्यवसाय असून त्याची सुरुवात तुम्ही तुमच्या घरातून करू शकतात. आजकाल फ्रीलान्स रायटिंग, डिजिटल मार्केटिंग किंवा ग्राफिक डिझाईनिंग ला खूप मागणी असून लोकांना देखील मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये रस आहे.

या प्रकारामध्ये तुम्ही तुमच्या कौशल्याचा वापर करून चांगले पैसे मिळवू शकतात. हा व्यवसाय सुरू करण्याकरिता फ्रीलांसिंग प्लॅटफॉर्म जसे की, फ्रीलान्सर, अपवर्क, Fiverr इत्यादीचा वापर करू शकतात

आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तुम्ही काम सुरू करून सहजपणे या व्यवसायात चांगला जम बसवू शकतात. या व्यवसायामध्ये तुम्ही तुमच्यात असलेले प्रतिभा आणि कौशल्याचे रूपांतर हे स्वयंरोजगारांमध्ये करू शकतात.

2- ऑनलाइन ट्युशन तुम्हाला अभ्यासाची आणि शिकवण्याची आवड असेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन शिकवणी म्हणजेच ट्युशन सुरू करू शकतात. हा देखील एक शून्य गुंतवणुकीत सुरू करता येणारा व्यवसाय असून यामध्ये तुम्ही चेग, हबस्पॉट इत्यादी सारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे तुम्ही तुमचे कौशल्य शेअर करू शकतात

व या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकतात. त्यासाठी तुम्ही तुमचे प्री रेकॉर्ड केलेले व्हिडिओ तसेच ग्रुप क्लास देऊ शकतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने ज्ञान मिळू शकेल व ई लर्निंग मुळे तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगले करिअर करू शकतात.

3- वेब डिझानिंग वेब डिझाईनिंग हे एखाद्या वेबसाईटचे संपूर्ण स्वरूप किंवा स्ट्रक्चर तयार करण्याची प्रक्रिया असून त्याला वेब डिझाईनिंग व्यवसाय म्हणून ओळखले जाते. या व्यवसायामध्ये वेबसाईट साठी आकर्षक लेआउट आणि महत्वाचे डिझाईन तयार करतात.

यामध्ये तुम्ही तुमच्या कौशल्यांचा वापर करून महत्त्वाकांक्षी उद्योजकांसाठी एक उत्कृष्ट,वापरण्यासाठी सोपी आणि अनुकूल वेबसाईट तयार करू शकता. हा एक उत्तम करिअर ऑप्शन असून तुम्ही याला चांगला व्यावसायिक किंवा करिअर सोल्युशन मध्ये बदलू शकतात.

4- फिटनेस कोचिंग तुम्ही जर फिटनेसशी संबंधित कोणत्याही कोर्स मधून डिप्लोमा घेतला असेल किंवा तुम्हाला चांगल्या प्रकारे फिटनेसची आवड असेल तर तुम्ही फिटनेस कोचिंग द्वारे व्यवसाय सुरू करू शकतात.

हा देखील शून्य गुंतवणुकीत सुरू करता येणारा व्यवसाय असून यामध्ये तुम्ही व्हर्च्युअल कोचिंग सुरू करून तुमच्या ग्लोबल क्लायंट बेस वाढवत शारीरिक तंदुरुस्ती आणि पोषण मार्गदर्शन प्रदान करण्याचा प्रवास सुरू करू शकतात व या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकता.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts