धक्कादायक! ‘हा’ पूल कोसळण्याच्या मार्गावर

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत येणाऱ्या टाकळी रस्त्यावरील घोड कॅनलवरील पुलाचे कठडे ढासळले असून त्याच्या दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे. जर योग्यवेळी याची दुरुस्ती केलीनाही तर हा पूल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पूल त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या रस्त्यावरील साधारणतः दहा किलोमीटर … Read more

काय सांगता! श्रीगोंद्यात ‘त्याने’ थेट झाडावर बसविला गणपती

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  सध्या कोरोनाच्या सावटाखाली अनेक सण आणि उत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे यंदा अधिकाधिक आकर्षक सजावट न करता सामान्यपणेच बाप्पांचे पूजन होत आहे. परंतु यातही काही नवखे असे श्रीगोंदे तालुक्‍यातील कोरेगाव येथील तरुणाने केले आहे. त्याने झाडावर मंदिर बनवून गणेश … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ६२१ रुग्णांना डिस्चार्ज मनपा२४५ संगमनेर१५ राहाता३५ पाथर्डी२५ नगर ग्रा.७९ श्रीरामपूर२५ कॅन्टोन्मेंट१५ नेवासा२९ श्रीगोंदा२६ पारनेर२३ अकोले१५ राहुरी२० शेवगाव१४ कोपरगाव२२ जामखेड२६ कर्जत६ इतर जिल्हा १ बरे झालेले एकूण रुग्ण:१५६३६ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

दुष्काळी भागात निळवंड्याचे पाणी जाईल तो जीवनातील सर्वोच्च दिवस !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- महात्मा गांधीजींच्या विचारांचा जागर करणाऱ्या आजोबांपासून घरात काँग्रेसची विचारधारा रुजली. पक्षाशी निष्ठा ठेवून काम केल्याने आमदारकीपासून प्रदेशाध्यक्षापर्यंतचा प्रवास घडला. सगळ्या पदांचा वापर करुन निळवंडे धरणाचे काम पूर्णत्वाला नेता आले, याचे समाधान आहे. ज्या दिवशी धरणाचे पाणी कालव्यांद्वारे दुष्काळीभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तो दिवस जीवनातील सर्वोच्च आनंद देणारा ठरेल, असे … Read more

सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात गहू होणार कमी आणि मिळणार मका !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-श्रीरामपूर तालुक्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात पुढच्या महिन्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असलेल्या कुटुंबांना गव्हासोबत मकाही दिली जाणार आहे. मात्र मका हे आपले अन्न नसल्याने मकाचे प्रमाण कमी करून गहू देण्याची मागणी आमदार लहू कानडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मध्यंतरी सरकारने शेतकर्‍यांची मका खरेदी केली. तीच मका आता … Read more

चोवीस तासात कोरोनामुळे सात जणांचा बळी

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात बुधवारी ८१० कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल २० हजारांचा टप्प्या ओलांडण्याच्या दिशेने सुरू झाली आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे सात जणांचा बळी गेला असून, बळींची एकूण संख्या २६७ झाली आहे. नगर शहरात नवे ३२८ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात २१ जूनपासून सातत्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात शुक्रवारपासून पुन्हा चार दिवस लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. गुरुवारी नागरिकांनी आवश्यक भाजीपाला, किराणा व इतर सामान खरेदी करावे, असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे. २८ ते ३१ ऑगस्ट असे चार दिवस लॉकडाऊन असेल. या काळात वैद्यकीय सेवा, औषध दुकाने आणि दूध, बँक … Read more

जुगार खेळणाऱ्या त्या” प्रतिष्ठितांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- संगमनेर तालुक्यात तिरट खेळणाऱ्या २३ जणांना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. ४ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री जय जवान चौकात करण्यात आली. आरोपीत अनेक प्रतिष्ठितांचा समावेश आहे. गणेशोत्सवात शहरात अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू आहेत. मं‌गळवारी मध्यरात्री नगरच्या गुन्हे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुण शिक्षिकेला बदनामीची धमकी देत बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :- राहुरी परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षं वयाच्या शिक्षिकेला बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर राहुरीत घरात बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. विशेष म्हणजे सदर तरूण शिक्षिकेला आरोपी धीरज रामराव नाईकवाडे, रा. अहमदपूर, ता.अहमदपूर, जि. लातूर याने वेळोवेळी तुझा भाऊ, तुझी आई, बहीण यांना जीवे ठार मारीन अशी धमकी देऊन … Read more

पारनेर तालुक्यातील नेत्यांवर गुन्हे दाखल करा !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील विविध पक्षांचे नेते २०० ते ५०० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये मोठ्या मोठ्या राजकीय सभा घेत असून यामुळे जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या जमाबंदी आदेशाचे व कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे या कायद्याचे उल्लंघन करणे व कोव्हिड सारख्या भयंकर आजाराचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या या विविध राजकीय … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हे धरण ओव्हरफ्लो; शेतक-यांनी केला जल्लोष

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनरेखा समजले जाणारे घोड धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाभक्षेत्रातील युवा शेतकऱ्यांनी धरणावर जाऊन या जलपूजन केलं. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून धुव्वाधार पाऊस सुरू असून घोड धरण ओव्हरफ्लो झाले. तर काहींनी सोशल मीडियावर जल्लोष केला आहे. श्रीगोंदा, … Read more

ह्या तालुक्यात कोरोनाचा कहर, एकही आमदाराचे नाही लक्ष….

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  गेल्या काही महिन्यांपासून नगर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र,अद्यापही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. नगर तालुका हद्दीत सर्वांधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात नगर शहरापाठोपाठ नगर ग्रामीणला कोरोना बाधितांची संख्या इतर तालुक्यांपेक्षा अधिक आहे. महापालिका हद्दीमध्ये … Read more

आमदार निलेश लंके यांच्याबद्दल नामादार बाळासाहेब थोरात म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- के. के. रेंज प्रश्नांवर बुधवारी मंत्रालयात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. याप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी लवकरच महसूल व पुनर्वसन विभागाच्या सचिवांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आमदार निलेश लंके यांच्या कामाचं कौतुक करत सुजय विखे यांच्यावर … Read more

खासदार सुजय विखे यांनी केली भविष्यवाणी

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- महाविकासआघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचे समोर आले होतं. राज्याचं नगर विकास खातं निधी वाटप करताना भेदभाव करत असून काँग्रेसच्या आमदारांना जाणूनबूजून निधी देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप काँग्रेस आमदारांनी केला होता. यावरून त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. यावरून आता भाजपचे खासदार सुजय विखे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सुजय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज आढळले तब्बल 810 रुग्ण, वाचा जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-   अहमदनगर जिल्ह्यात आज ४८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५ हजार १५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ७९.७४ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (मंगळवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८१० ने वाढ … Read more

डॉक्टरच म्हणतायेत आम्हीही माणूसच; आम्हालाही एमबीएस डॉक्‍टर द्या

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-   सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मार्च महिन्यापासून जिल्हाभरातील वैद्यकीय सुविधा तैनात आहे. शिर्डीमध्येही हीच परिस्थिती आहे. परंतु सलग ३ महिने कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देणारे डॉक्टरही त्रासले आहेत. डॉक्‍टर असलो, तरी आम्ही शेवटी माणसेच आहोत. आता तरी आमच्या मदतीला तालुक्‍यातील सरकारी सेवेतील 12 एमबीएस डॉक्‍टर धाडावेत. … Read more

‘के. के. रेंज’ संदर्भात महसूलमंत्री थोरातांचे महत्वपूर्ण वक्तव्य ; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी …

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. राहुरी, पारनेर येथे लष्करी अधिकार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. या २३ गावांमध्ये पुन्हा खळबळ … Read more

‘त्या’ शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा ; शेतात झालंय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर मधील संगमनेर तालुक्याच्या आंबीखालसा गावातील जोठेवाडी येथील एका शेतकऱ्याने आत्महत्येचा इशारा विद्युत महामंडळास दिला आहे. कारण त्याच्या शेतामध्ये वीजवाहक तारा लोम्बकळत आहेत. त्याने जीवास धोका निर्माण झाला आहे. आणि या तारा काढण्यासाठी गेल्या वर्षभरापासून घारगाव वीजमंडळाच्या कार्यालयास अर्ज या शेतकऱ्याने दिला आहे. परंतु मागील वर्षभरापासून त्याची दखल … Read more