छताला दोरीने गळफास घेऊन त्याने जीवन संपवले …

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-कोपरगाव तालुक्यातील हनुमाननगरमधील तरुणाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. सागर राजू पाटील (वय २२) असे त्याचे नाव आहे. राहत्या घराच्या छताला दोरीने गळफास घेऊन त्याने जीवन संपवले. शेजारी राहणाऱ्या आकाश राजू मोरे यांनी शहर पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. सागर गवंडी … Read more

अखेर पाचपुते यांचा राजीनामा !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- श्रीगोंदे बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते यांच्यावर अविश्वास ठराव दाखल होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे मंगळवारी दिला. अविश्वास ठरावासंदर्भात प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली २९ जुलैला बैठक बोलवण्यात आली होती. अविश्वास ठराव संमत होणार अशी खात्री झाल्याने पाचपुते यांनी आधीच राजीनामा दिला. राजीनामा मंजूर … Read more

धक्कादायक : एकाच कुटुंबात ‘इतक्या’ लोकांना झाला कोरोना !

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- नेवासे तालुक्यातील कुकाण्यातील बाधिताच्या कुटुंबातील आणखी सात सदस्य पाॅझिटिव्ह निघाले. शिरसगाव येथील त्यांचा नातलगही बाधित निघाला.  सोमवारी सायंकाळी जीमचालक बाधित निघाला. त्याचे वडील गेल्या रविवारी बाधित आढळले. कुकाण्यातील ही साखळी तब्बल सात रूग्णांनी वाढली. गेल्या चार महिन्यांत कुकाण्यात एकही रूग्ण नव्हता, परंतु मागील तीनच दिवसांत रुग्णसंख्येने उसळी घेतली. जीममध्ये … Read more

कोरोना बाधीत अहवाल आल्याच्या बातम्या चुकीच्या: जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. मुरंबिकर यांचे स्पष्टीकरण

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :-  आपण कोरोना बाधीत असल्याबाबत काही ठिकाणी चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. हे अतिशय दुर्दैवी आणि कोणतीही खातरजमा न करता केलेले कृत्य आहे.  याबाबत कोणीही माझ्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून न घेता एकतर्फी आणि चुकीच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमाातून प्रसारित केल्या.  त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या गोष्टीवर अथवा अफवांवर कोणीही … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : २४ तासात वाढले १६१ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६१ ने वाढ झाली.  यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९०, अँटीजेन चाचणीत २६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या ४५ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४५२ इतकी झाली आहे. … Read more

श्रीगोंदा ब्रेकिंग : सलग दुसर्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच काल आणि आज पुन्हा एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवसांत दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल तालुक्यातील बेलवंडी येथील एका तीस वर्षीय तरुणाचा कोरोनाशी लढतांना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच … Read more

खा. सुजय विखे म्हणतात, रोहित पवारांनी ‘हे’ थांबवले पाहिजे

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- खा. सुजय विखे हे जिल्हा परिषदमध्ये एका बैठकीच्या निमित्ताने आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. यावेळी त्यांनी राम मंदिर भूमिपूजनवरून भाजपवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले अहमदनगर जिल्ह्यात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे रोज भूमिपूजन व उद्घाटन करून गर्दी … Read more

‘राष्ट्रवादीने आधी स्वतःच पाहावं’; खा. सुजय विखे यांचा खा. शरद पवारांना टोला

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- राम मंदिर उभारण्याचा मुहूर्त अखेर ठरला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. शरद पवारांच्या या टीकेनंतर भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील शरद पवारांनी केलेल्या राम … Read more

भंडारदरा परिसरातील सौंदर्य बहरले,पण….

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यास वरदान ठरणाऱ्या भंडारदरा धरण पाणलोटात जोरदार पाऊस सुरु असल्याने दोन दिवसांत हे धरण निम्मे भरण्याची शक्यता आहे. सर्वत्र अधूनमधून वाहणारे धबधबे, खळखळणारे ओढे नाले यामुळे भंडारदरा परिसरातील सौंदर्य बहरले आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊन असल्याने पर्यटकांविना हा परिसर सुनासुना आहे. याठिकाणी लाखो पर्यटक भेटी देत असतात. … Read more

बिग ब्रेकिंग : माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह चौघांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- माजी आमदार अनिल राठोड यांच्या कुटुंबातही करोनाचा शिरकाव झाला आहे. श्री. राठोड यांच्यासह कुटुंबातील चौघांना करोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा उपद्रव वाढत चालला आहे. शहराचा मध्य भाग असलेल्या चितळे रोड, नेता सुभाष चौक परिसरातही करोना रुग्ण … Read more

‘ह्या’ तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच..

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही.  काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका  कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत. मागील 3 दिवसात 20 कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने … Read more

सहकार क्षेत्रातील बड्या नेत्याचे कुटुंब कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही.  काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या एका बड्या नेत्याच्या कुटूंबातील 4 सदस्यांना घरातील एका कामगारामुळे … Read more

रीडिंग न घेताच ग्राहकांना नेहमीपेक्षा दुप्पट व चारपट जादा वीजबिल !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये अनेकांची वीजबिले भरायची राहिल्याने आणि आता अवाजवी बिल आल्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरला आहे. शिर्डी शहरातही महावितरण कंपनीने रीडिंग न घेताच ग्राहकांना नेहमीपेक्षा जास्त वीजबिल आकारले असून या वीज बिलाचा चांगलाच झटका ग्राहकांना बसला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर यांनी ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांना … Read more

नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा बट्ट्याबोळ

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु झालेल्या नाहीत. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्याची सुविधा सुरु करण्याचे आदेश आल्यानंतर अनेक शाळांमधून ऑनलाईन शिक्षणास सुरुवात झाली. इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईलच नाहीत. काहींकडे अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल आहेत, त्यांना नेटवर्क मिळत … Read more

‘त्या’ आरोपीचा तिसर्‍या दिवशीही सुगावा नाही,पोलीस निरीक्षक म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला मुठेवाडगाव खून प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सचिन काळे रूग्णालयात उपचार घेऊन येताना फरार झाल्याची घटना नुकतीच घडली होती. परंतु आता तीन दिवस उलटूनही पोलिसांना याचा सुगावा लागला नाही. गंगापूर, पैठण,औरंगाबाद परिसरात तपास सुरु असून त्याला पकडण्यात यशस्वी होऊ असे पोलीस निरीक्षक मसूद खान यांनी म्हटले … Read more

‘ह्या’ मोठ्या गावात कोरोनाचा शिरकाव,तीन दिवस संपूर्ण लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील विविध गावांत कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या पुणतांबा गावात कोरोनाने शिरकाव केल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून 3 दिवस … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत ५४ रुग्णांची नव्याने भर

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३४६ इतकी झाली आहे. दरम्यान, आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २४१८ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट … Read more

श्रीरामपुरात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 189 वर जावून पोहोचला !

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. श्रीरामपुरात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 189 वर जावून पोहोचला आहे. यामुळे आता सर्वसामान्यांबरोबर प्रशासनाची चिंता वाढली आहे. काल पुन्हा नव्याने 19 जणांचे अहवाल … Read more