कौतुकास्पद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ‘कोविड रुग्णालया’चे लोकार्पण !

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उद्या अर्थात सोमवारी दि. २७ जुलै रोजी ५० बेड्सच्या ‘कोविड रुग्णालया’चे पारनेरमध्ये लोकार्पण होणार आहे. याप्रसंगी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक राजेश गवळी आदी उपस्थित राहणार आहेत, अशी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ रुग्णालयात तातडीने कोरोना रुग्णालय सुरु करण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात तातडीने कोरोना रुग्णालय सुरु करण्याचे आदेश अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ देणार आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. साईबाबा संस्थान आणि राज्यशासनाच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत कोविड केअर सेंटर उत्तमपणे सुरु आहे. मात्र आता वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर या सेंटरवरच न थांबता कोविड रूग्णालय सुरु … Read more

माजी पालकमंत्री प्रा. शिंदे यांची घेतली ‘या’ मंत्रिमहोदयांनी भेट!

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- राज्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे शिवाजीराव देसाई यांनी माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी शनिवारी सांत्वनपर भेट घेतली. माजीमंत्री प्रा. शिंदे यांचे वडील शंकरराव शिंदे यांचे गत पंधरवाड्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी चौंडी येथे माजी मंत्री राम शिंदे यांच्या निवासस्थानी दुपारी … Read more

प्रेमाच्या आणाभाका घेऊनही ‘त्याने’ ‘तिला’ फसविले! अखेर प्रेयसीने संपविली जीवनयात्रा!

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वसाहतीत आपल्या आत्याकडे राहत ‘त्या’ तरुणीचं जामखेड तालुक्यातल्या जवळे येथे असलेल्या अहमदनगर जिल्हा बँकेच्या शाखेत कॅशियर असलेल्या विवाहित प्रियकरावर मोबाईलवर सूत जुळले. प्रेमात आंधळ्या झालेल्या ‘त्या’ तरुणीने त्याचे चारित्र्य असे काहीच न पाहता त्याच्या खोट्या प्रेमाचा तिने स्विकार केला. धनंजय विष्णुपंत कांबळे असे त्या खोटारड्या प्रियकराचे … Read more

कोरोना संकटकाळात १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी … Read more

हिरडगावात दरोडा: सात लाखाचे रोकड व दागिने लंपास

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  हिरडगाव ता. श्रीगोंदा येथील भुजबळ वस्तीवर भास्कर आबासाहेब भुजबळ यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ६ लाख ८२ हजार १६७ रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यामध्ये २ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम व १३ तोळे ६६० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. रविवार २६ जुलै २०२० च्या रात्री बारा ते पहाटे … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही.

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही. सरकारमध्ये फक्त संशय कल्लोळ सुरू असून सरकारचा रिमोटही दुसऱ्याच्या हातात आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेते आणि माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. इंदोरीकर महाराजांची भेट घेतल्यानंतर आ. विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ.विखे-पाटील म्हणाले, आघाडी सरकारने राज्यातील … Read more

हिवरे बाजार येथे होणार भारतीय संविधानाचे पारायण

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  आदर्शगाव हिवरे बाजार येथे भारतीय संविधानाचे वाचन दररोज एक तास ग्रामपंचायत कार्यालयासमोर कोरोनाच्या सर्व नियमांचे व अटींचे पालन करून करण्यात येणार आहे. संविधानाच्या पारायणातून ग्रामस्थांना नियमांची माहिती विस्तृतपणे होईल. हिवरे बाजारामध्ये हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असून त्यात हनुमान, राम, लक्ष्मण, सीता, श्री.विठ्ठल, रुक्मिणी, श्री.संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या … Read more

सुट्ट्यांमुळे ऑगस्टमध्ये बँका राहतील खूप दिवस बंद; वाचा यादी…

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- ऑगस्ट महिना एका आठवड्यानंतर सुरू होतो आहे. ज्यांना बँकेच्या संदर्भात काही कामे असतील तर त्यांनी ती लवकर आटोपून घ्यावी. याचे कारण असे की पुढच्या महिन्यात बँकांना खूप साऱ्या सुट्या आहेत. त्यामुळे बँका बराच दिवस बंद राहणार आहेत. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी दुकाने व कार्यालये बंद केली असली तरी बँका सातत्याने सुरू … Read more

हातातोडांशी आलेले पीक गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून बळीराजा विवंचनेत सापडला आहे. कोरोना महामारीने शेतकऱ्यांना कोलमडून टाकले आहे. त्याच्या पाठीशी लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. आता जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील मातुलठाण, नायगाव परिसरात शुक्रवारी रात्री वार्‍यासह … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज दुपारपर्यंत ६४ नव्या रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या मध्ये ही सर्वाधिक संख्या आहे. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता १९४५ झाली आहे.  दरम्यान (शनिवार) सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण रुग्ण संख्येत ६४ रुग्णांची भर पडली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता … Read more

‘त्या’ पिता पुत्रांवर एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील अमृता नदीच्या पुरात वाहून गेलेले कृष्णा घोरपडे यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा प्रथमेश याचाही मृतदेह आज सापडला. या पिता पुत्रांवर शोकाकुल वातावरणात एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील जोरदार पावसामुळे नदीला पूर आला आहे. या नदीच्या पुरात कृष्णा घोरपडे व त्यांचा एक मुलगा व मुलगी वाहून … Read more

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली माजी मंत्री पिचड यांची भेट

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- राज्याचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल राजूर येथे जाऊन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे त्यांकडून सांगण्यात आले आहे. परंतु ही सदिच्छा भेट होती की राजकीय भेट होती याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड व जिल्हा सहकारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १९४५ झाली आहे. आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांत मनपा २७९, संगमनेर ३३, राहाता २९, पाथर्डी ०४, नगर ग्रा.१५, श्रीरामपूर २४, कॅन्टोन्मेंट ३,नेवासा १५,  श्रीगोंदा १७, पारनेर १२, अकोले ६, राहुरी ११, शेवगाव ८, कोपरगाव ३, जामखेड १, कर्जत … Read more

संगमनेरात 11 जणांना कोरोना,एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. काल दिवसभरात संगमनेर तालुक्यात नव्याने ११ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता तालुक्याची एकूण संख्या 490 झाली आहे . तर मृतांची एकूण संख्या १८ झाली आहे. काल शहरातील … Read more

कोरोना रूग्णांची संख्या वाढती असल्याने चिंतेचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत. संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत. आता राहुरी तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. राहाता व साकुरीत कोरोना रूग्णांची संख्या वाढती असल्याने चिंतेचे वातावरण पसरले असून राहात्यात तीन जण तर साकुरीत तीन असे सहा रूग्णांचा … Read more

आता याला काय म्हणाव ?दीड लाखांचे दागिने घेवून नववधू झाली प्रियकरासोबत फरार,नंतर केले लग्न !

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात एक धक्कादायक घटना घडली आहे, घरातील तब्बल दीड लाखाचे दागिने घेऊन प्रियकरासोबत नववधूने धूम ठोकली आहे. अंगावरील दीड लाखांचे दागिने चोरत प्रियकरासोबत धूम ठोकली आणि आळंदी येथे जाऊन त्या दोघांनी लग्न केले. ही फिर्याद श्रीगोंदा पोलिसात पतीने दिली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बाबूर्डी गावातील ही घटना … Read more

राहुरी तालुक्यात एका दिवसात वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत. संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत. आता राहुरी तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. राहुरी तालुक्यात शनिवारी दिवसभरात 7 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले. त्यामुळे तालुक्यात बाधितांची संख्या 65 झाली आहे. यापैकी 22 रुग्ण पूर्ण … Read more