अहमदनगर जिल्ह्यातील ६२ रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील ६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  यात अकोले ०७, नगर ग्रामीण ०८,मनपा १४,नेवासा ०१, पारनेर ०४ राहाता ०२,संगमनेर १५, शेवगाव ०६,श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर येथील ०३ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. दरम्यान आतापर्यंत कोरोनातून बरे झालेले एकूण रुग्ण ७२८ असून सध्या ३२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. … Read more

‘येथील’ प्रसिद्ध व्यापार्‍याच्या एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. शिर्डी शहर कोरोनमुक्ती कडे वाटचाल करत असतानाच त्या ठिकाणी पुन्हा कोरोनाने आपली मुळे रोवली आहेत. शिर्डीतील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या कुटुंबातील तब्ब्ल सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड होताच शहरात खळबळ उडाली. शहरातील कोरोना बाधितांची संख्या … Read more

माजी आमदार राठोड झाले आक्रमक म्हणाले ज्यांचे हात बरबटले त्यांच्याच माथी हे पाप….

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- दुरवस्था झालेल्या तपोवन रस्त्याचे काम होण्यासाठी शिवसेनेने वेळोवेळी आंदोलन करून पाठपुरावा केला. त्यामुळे मुख्यमंत्री निधीतून हा रस्ता मंजूर होऊन साडेतीन कोटींचा निधी मंजूर झाला. या निधीतून दर्जेदार काम होणे अपेक्षित होते, परंतु, ठेकेदाराने कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केला. गैरव्यवहाराने ज्यांचे हात बरबटले त्यांच्याच माथी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकासह सहा कोरोनाचे रुग्ण आढळले

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- संगमनेर शहरासह तालुक्यात एकुण सहा रुग्ण मिळून आले आहेत. यात कुरण येथेल एकाचा रिपोर्ट जिल्हा रुग्णालयातून आला आहे तर शहरातील दोन रिपोर्ट खाजगी तपासणीतून आले आहेत. त्याच बरोबर तीन जणांची तपासणी अ‍ॅन्टीजन टेस्टनुसार करण्यात आली होती. त्यात गुंजाळवाडी येथील एक, सिन्नर तालुक्यातील एक तर तळेगाव येथील एक असे तीन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रस्त्यावर आढळला तरुणाचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ शिवारात वनकुटे रस्त्यावर २२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अजय रावसाहेब मदने असे या मृताचे नाव असून तो बोकनकवाडी, वासुंदे येथील रहिवासी आहे. पोलिसांनी अजय याच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. पूर्ववैमनस्यातून अजयचा घात करण्यात आला असल्याची प्राथमिक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वधू- वरासह आठ जणांना कोरोना ची लागण !

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :-  अहमदनगर शहरातील तारकपूर येथील एका व्यापाऱ्याच्या मुलाचे 28 तारखेला लग्न झाले. ते लग्न तारकपूर येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये झाले लग्न समारंभ झाल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. ते तपासणीला गेले असता वर-वधू सह आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे आता लग्न समारंभात आलेल्या सर्व लोकांची तपासणी करावी लागणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील व सध्या पोलिस खात्यात एपीआय असणाऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. समजलेल्या माहितीनुसार अमिता हनुमंत देवकाते (वय अंदाजे २५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिलेने आज दुपारी घरातील फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला.त्यांचे पती ठाणे येथे सेवेत आहेत. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मनोरुग्ण तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघा नराधमांना अटक !

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :- नेवासा खुर्द परिसरात एका मनोरुग्ण तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रकार उघड झाला आहे.  सदर तरुणी गर्भवती राहिल्याने हा भयंकर प्रकार समोर आला आहे.दरम्यान, नेवासा पोलिसांनी पाच आरोपींपैकी चोघा आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी नेवासा परिसरात राहणारे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नेवासा खुर्द परिसरात एका कुटुंबातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लॉकडाऊन बद्दल फेक मॅसेज व्हायरल करणाऱ्या सुहास मुळेवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :- काल अहमदनगर जिल्ह्यातील काही Whatsapp ग्रुपवर जनता कर्फ्यू बाबत खोटा मॅसेज व्हायरल केल्याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक योगेश खामकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरू सुहास मुळे याच्या वर कोतवाली पोलीस ठाण्यात अहमदनगर शहरात 16 जुलै पासून जनता कर्फ्यू लागू होणार आहे अश्या विषयाचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ४१ नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 (7.32 PM) :  जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या २२ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३८४ इतकी झाली आहे तर बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या … Read more

रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते विश्‍वासाचे ! कोरोनावर मात केलेल्या 11 वर्षीय मुलाच्या आईची भावनिक पोष्ट

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : माझी व बहिणीची मुले, बहिण व भाउ मुंबईवरून भाळवणीत आले,दोन दिवसानंतर मुंबईत सासूबाईंची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. मी मुंबईत कॉरंटाईन झाले, गावी आलेल्यांची कोराना चाचणी करण्यात आल्यानंतर माइ-या 11 वर्षाच्या लहानग्यालाही कोराची बाधा झाल्याचा अहवाल आला. मी मुंबईत कॉरंटाईन, सासू हॉस्पिटलमध्ये व 11 वर्षांचा मुलगा नगरच्या बुथ हॉस्पिटलमध्ये दाखल … Read more

कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात वाढले ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या तुमच्या परिसरातील माहिती

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : जिल्ह्यात आज आणखी १७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत मुकुंदनगर १, गवळी वाडा (नगर) १, दिल्ली गेट १, आंबेडकर चौक (नगर) २, नागापूर (नगर) १ रुई छत्रपती (ता. नगर) १, मंगल गेट १, समतानगर २, पाईपलाईन रोड १, चिंभळा (ता. श्रीगोंदा) १, मांडवगण (ता. श्रीगोंदा) १, नगर शहर १, … Read more

— अशी वेळ कुणावरही येऊ नये ! आमदार कानडे झाले भावूक!

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : करोनाची लागण झाल्याने आम्ही पती-पत्नी हॉस्टिलमध्ये राहून त्याच्याशी संघर्ष करतो आहोत. तुम्हीही बाहेर नियम पाळून करोनाशी संघर्ष करा. तज्ज्ञांचा सल्ला आणि शास्त्रीय पद्धतीने मुकाबला केल्याशिवाय हे संकट हटणार नाही. मात्र अशी दुर्दैवी वेळ कुणावरही येऊ नये’ अशी अपेक्षा करत श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार लहू कानडे हे भावुक झाले आहेत. आ. … Read more

या गावात जनता कर्फ्यू पाळून संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय!

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : करोना संसर्गापासून जनतेला दूर ठेवण्यासाठीच खबरदारीचा उपाय म्हणून नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीने दि. १५ ते १८ जुलै या चार दिवसांच्या कालावधीत जनता कर्फ्यू पाळून संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या चार दिवसांमध्ये नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडल्यास, तोंडाला मास्क न लावता सार्वजिनिक ठिकाणी फिरल्यास अथवा थुंकल्यास … Read more

निम्म्यापेक्षा अधिक नगर लॉकडाऊन …

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : नगर शहरात करोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने चितळेरोड आणि सावेडीतील भिस्तबाग चौकात नव्याने कंटेनमेंट झोन घोषित केलाय. चितळेरोडच्या कंटेनमेंट झोनची मुदत दि. २५ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत, तर भिस्तबाग येथील कंटेनमेंची मुदत दि. २६ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असेल. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत कंटेन्मेंट झोनमुळे निम्म्यापेक्षा अधिक नगर शहर लॉकडाऊन झाले … Read more

— माझ्या नवर्‍यानेच माझ्या मुलाचा घात केला आहे. काळजाचा तुकडा हिरावला …

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :  अपघातात जखमी झाल्याचा दावा केला जात असलेल्या तरुणाचा मृत्यू हा त्याच्या वडिलांनीच केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. शेतजमिनीच्या वाटपावरून वाद झाल्याने करण्यात आलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असल्याची फिर्याद त्याच्या पत्नीने दिली आहे. त्यानुसार त्याच्या वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मयत तरुणाची मृताची पत्नी रोहिणी … Read more

नागरिकांनी नियमित मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : प्रवरा परिसरात वाढता कोरोनाचा प्रसार पाहताना नागरिकांनी मास्कचा वापर नियमित करणे, तसेच कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे. प्रवरा परिसरातील लोणी, कोल्हार, चंद्रापूर, दाढ येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर तसेच परिसरातील एका बँकेतील एक व एका … Read more

हॉटेलचे गोदाम फोडून दारूची चोरी !

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 : हॉटेलचे गोदाम फोडून चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन चोरट्यांना जेरबंद केले आहे. पोलिसांनी या चोरट्यांकडून २ लाख ५० हजार रुपये किंमतीची पिकअप, ५० आणि ३० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी असा एकूण ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. संगमनेर तालुक्यातल्या निमगावजाळी शिवारात असलेल्या लोणी -संगमनेर रस्त्यालगतच्या हॉटेल … Read more