या तालुक्यात सलग चौथ्या दिवशी आढळला कोरोना रुग्ण

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : श्रीरामपूर शहरात काल सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ११ झाली आहे. गोंधवणी परिसरातील बाधीत महिलेच्या मुलाचा कोरोना अहवाल काल पाॅझिटीव्ह आला. कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाने शहरात सर्वेक्षण सुरु केले आहे. गोंधवणी येथे तीन दिवसांपूर्वी ५५ वर्षीय महिलेला करोनाची … Read more

साईबाबांच्या दर्शन घेणार्या त्या महिलेवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : लाँकडाऊनचे उल्लंघन करत साईबाबांच्या चावडी जाऊन दर्शन घेतले. व समाज माध्यमांवर फोटो अपलोड केल्याप्रकरणी एका महिलेवर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाविकांना दर्शनासाठी जाण्याची परवानगी नाही, असे असताना शिवप्रिया कौशिक या महिलेने २५ जुनला दुपारी सुरक्षा रक्षक व मंदिर विभागाचे ड्युटीस असलेले चार कर्मचारी यांची … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या कोरोना चाचणी लॅबला परवानगी

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :संगमनेर येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयास इंडियन कउंसील ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व एम्सने कोरोना तपासणी लॅबला परवानगी दिली आहे. संगमनेर शहरासह तालुक्यातील कोरोना बाधितांच्या आकड्याने शंबरी गाठली असून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयास करोना तपासणी लॅब सुरु झाल्यास वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. ट्रनॅट मशीन व आरटीपीसीआर तंत्रज्ञानाद्वारे संशयित रुग्णांचे … Read more

ब्रेकिंग : ‘त्या’ मुलाच्या आईसह महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : महिला कर्मचाऱ्याच्या घरात घुसून दोन वर्षांपासून बळजबरी मद्यपान करत असलेल्या महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात अखेर आज गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलाचा छळ करणारे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ़ अनिल बोरगे व अग्नीशमन विभागाचा प्रमुख शंकर मिसाळ यांच्यासह महापालिकेतील एक कर्मचारी व सदर अल्पवयीन मुलाची आई यांच्याविरोधात आज संध्याकाळी तोफखाना … Read more

शेतकऱ्यांची अडवणूक सहन करणार नाही – खासदार सदाशिव लोखंडे

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : शेतकऱ्यांंची पिक कर्जासाठी अडवणूक करू नये, शेतकऱ्यांना बांधावर खते, बी-बियाणे देण्यात यावी. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक सहन करणार नाही, अशी तंबी खासदार सदाशिव लोखंडे यांनी तालुक्यातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांना दिली. अकोले येथे जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर … Read more

कृषी विकासात अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे मोठे योगदान – महसूलमंत्री

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून राज्यात ओळखला जातो. सहकारासह विविध क्षेत्राच्या विकासासाठी अर्थपुरवठा करण्याचे काम जिल्हा बँक करते. शिस्त व काटकसर हे बँकेचे वैशिष्ट्य असून कृषी क्षेत्रासह जिल्ह्याच्या विकासात अहमदनगर जिल्हा बँकेचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. संगमनेर येथे नगरपालिकेसमोर जिल्हा बँकेच्या नवीन इमारतीचे … Read more

दवाखान्याच्या बिलावरून केले कुऱ्हाडीने वार !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :अपघातामुळे झालेल्या हॉस्पिटलच्या बीलाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून तेलंगशी या ठिकाणी एक जणावर कुर्‍हाडीने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोघाजणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तेलंगशी येथील ज्ञानेश्वर केरबा ढाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तानाजी विठ्ठल पांडुळे व विठ्ठल खेमा पांडुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा कोरोना बाधीत रुग्ण आढळले ! दिवसभरात झाले २५ पॉझिटिव्ह …

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : जिल्ह्यात आज सायंकाळी पुन्हा १३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. आज सायंकाळी एकूण १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये नगर शहरातील तोफखाना भागातील ०५, ढवण वस्ती येथील एक, पाइप लाइन पद्मा नगर येथील एक,आडते बाजार येथील ०५ आणि भिंगार येथील एक रुग्ण बाधित आढळून आले … Read more

खासदार सुजय विखे पाटलांनी लुटला पेरणीचा आनंद !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : खासदार सुजय विखे पाटलांनी आज जामखेड चुंबळी गावातील शेतकऱ्याच्या बांधावर जावून शेतकर्यांंशी संवाद साधला.यावेळी त्यांनी शेतात पेरणी करण्याचा आनंदही लुटला.  राज्यात अनेक ठिकाणी बोगस कृषी निविष्ठा मुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली असून आधीच आसमानी संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारच्या हलगर्जीपणामुळे सुलतानी संकटाला सुद्धा तोंड द्यावे लागत आहे. उच्च … Read more

बापरे ! ते चक्क होम क्वॉरन्टाईनचा शिक्काच मारायचा विसरले

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव तपासणी करून जरी त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले तरी त्यांच्या हातावर होम क्वॉरन्टाईनचा शिक्का मारला जातो. व त्यांना घरात वेगळे ठेवले जाते. मात्र अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात संशयिताच्या हातावर होम क्वॉरन्टाईनचा शिक्काच मारायचा विसले असल्याचा गलथानपणा उघकीस आला आहे. नगर शहरात कोरोना बाधितांची संख्या … Read more

विखे – कर्डिले वाद खा. सुजय विखे म्हणतात…..

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : एकीकडे बंद पडलेला, अवसायानात निघू शकणारा शेतकर्‍यांचा मालकीचा कारखाना वाचवण्यासाठी धडपडणार्‍या माजी आमदार शिवाजी कर्डिले व विद्यमान संचालक मंडळास जाब विचारणे म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ दिल्यासारखे आहे. त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेच्या कारवाईला विखे- कर्डिले वादाचे स्वरूप देऊ नये. सभासद व कामगारांच्या हितासाठी विखे व कर्डिले दोघेही कटिबद्ध … Read more

चोरीचा अनोखा फंडा …चक्क शेतातील दीड लाखाचे डाळिंब चोरले !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :   कोरोनाने अवघ्या जगला वेड लावले आहे. यात अनेकांचे संपूर्ण जीवन बदलून टाकले आहे. कोरोनाने संपूर्ण आर्थिक घडी विस्कटून गेली आहे.त्यामुळे चोरट्यांनी देखील चोरीची नवीन पद्धत शोधली आहे. चोर आता रोख रक्कम चोरण्याऐवजी किमती माल चोरून तो विकत आहेत. असा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. संगमनेर तालुक्यातील माळवदवाडी (आंबी … Read more

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांधा ! भावात मोठी घसरण; आर्थिक अडचणीत वाढ

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :   कोरोनाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतमाल शेतातच खराब झाला.त्यामुळे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आता परत कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणीत वाढल्या आहेत. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेला शेतकऱ्यांनी आता बाजार सुरळीत झाल्याने कांदा विक्रीसाठी आणला आहे. बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये … Read more

निवडी रखडल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते झाले सैरभैर

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  श्रीरामपूर तालुका व शहरा काँग्रेस समितीची कार्यकारिणी घोषित झालेली नाही. त्यामुळे पक्षांतर्गत कार्यक्रम, आंदोलने, मोर्चे आदींना निमंत्रणे देता येत नाहीत. परिणामी निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून अनेक कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. तालुका व शहर काँग्रेस समितीच्या पदाधिकारी निवडी अनेक दिवसांपासून रखडल्या आहेत. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसून येत … Read more

नगरपरिषदेच्या दुर्लक्षाने दोन कोटींचा खर्च पाण्यात

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  कोपरगाव नगरपरिषदेने भाजीपाला विक्रीसाठी शहरातील बाजारतळ परिसरात जवळपास दोन कोटी रुपये खर्च करून अद्ययावत शेडसह आठवडे बाजार ओट्यांची निर्मिती केली. मात्र या ओट्याच्या तळावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने विक्रेत्याना बसण्यास अडचणी यात आहेत. परिणामी हा खर्च पाण्यात गेला आहे. कोपरगाव नगरपरिषदेने भाजीपाला विक्रीसाठी शहरातील बाजारतळ परिसरात … Read more

बाधित महिलेच्या मुलालाही कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :   श्रीरामपूर येथील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी केली असता तिच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या सहवासात आलेल्या लोकानाही तपासणीसाठी पाठवण्यात आले असून श्रीरामपुरातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या नऊवर पोहोचली. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. निपाणी वडगाव येथील एका ३८ वर्षीय इसमाचा कोरोना … Read more

महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न तथाकथित समाज सेवकांनी केला !

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची खोटी माहिती देऊन महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न तथाकथित समाज सेवकांनी केला असल्याची तक्रार शनिवारी संगमनेर शहर पोलिसात निवेदनाद्वारे केली. अ‍ॅड. गोरक्ष कापकर, राहुल भोईर, सुदाम ओझा, सुनील खरे, दिनेश जाधव यांनी या संदर्भात निवेदनातून म्हटले आहे की, राज्य सरकारच्या … Read more

तहसीलदार व आमदारांचे संभाषण झाले व्हायरल राजकीय क्षेत्रात खळबळ…

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  अकोल्यातील राजूर गावातील बाजारपेठेत ग्रामपंचायत कार्यालयाकडून त्यांच्या पातळीवर कधीही लॉकडाऊन करण्याचे निर्णय घेण्यात येतात. मात्र, यासंदर्भात व्यवसायधंद्यातील लोकांंचे मला फोन येतात. तेव्हा राजूर ग्रामपंचायतीला हे अधिकार आहेत काय? तसे अधिकार ग्रामपंचायत प्रशासनाला नसतील, तर तुम्ही त्यांना कायदेशीर कारवाई करण्याबाबत नोटीस बजावून गुन्हे दाखल करावेत, असे आदेशच अकोल्याच्या लोकप्रतिनिधींकडून … Read more