शेतकऱ्यानं विष प्राशन करुन केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील शेतकऱ्यानं विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अशोक तात्याबा आदिक वय ४६ असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. आदिक यांच्या आईच्या नावे पतसंस्था तसेच इतर बॅक व हातउसने, असे मिळून एकूण १६-१७ लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा त्यांच्यावर होता. तसेच मागील वर्षी … Read more

मोटारसायकल घसरल्याने युवक ठार

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :अकोले तालुक्यात मोटारसायकल घसरल्याने झालेल्या अपघातात युवक ठार झाला आहे. शुक्रवारी २७ जून रोजी सकाळी हा अपघात झाला आहे. राजू भाऊराव उघडे (वय २१, रा. पांजरे) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. राजू उघडे हे शुक्रवारी सकाळी मोटारसायकलवर वीरगाव येथे चालले होते. तांभोळ गावच्या शिवारात बसस्टँडजवळ मोटारसायकल रस्त्याच्या … Read more

अहमदनगर शहराची वाटचाल पुन्हा एकदा ’लॉकडाउन’ दिशेने ?

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : नगरमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अशा रेड झोनमधून येणार्‍यांची संख्याही वाढत आहे. त्यातच आता नगर शहरातील रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे महापालिका प्रशासन चिंतेत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला भाग सील केल्यानंतरही रुग्णवाढीचा वेग कमी झाला नाही, तर वेळप्रसंगी नगर शहर काही दिवस बंद ठेवण्याबाबतचा विचारही समोर आला आहे. महापालिका प्रशासनाने … Read more

शाहू महाराज जयंतीस अमेरिकेतील छत्रपती शाहू प्रेमींचा सहभाग

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  स्मायलिंग अस्मिता कष्टकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आज छत्रपती शाहू महाराजांची 146 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी साई हॉस्पिटलचे संचालक डॉ.किरण कर्डिले अध्यक्ष तर गिरीश भांबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून व्हिडिओ कॉलव्दारे सहभागी झाले होते. अध्यक्ष पदावरून बोलताना डॉ.किरण कर्डीले यांनी सांगितले की, छत्रपती शाहू महाराजांनी काळाची पावले … Read more

14 वर्षाची मुलगी घरातुन निघुन गेली,पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याची केली नोंद

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : घरात कोणाला काहीही एक न सांगता 14 वर्षाची मुलगी घरातुन कोठेतरी निघुन गेली आहे. ती अद्याप परतली नाही. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, कायनेटिक चौकातील 14 वर्षीय विद्यार्थिनी घरात कोणालाही काहीही न सांगता कोठेतरी निघुन गेली. ती अद्याप परतली … Read more

अहमदनगरची संपूर्ण बाजारपेठ बंद नाही !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :अहमदनगर शहरातील एका भागातील व्यापाऱयांनी आपली दुकाने तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संपूर्ण बाजारपेठेशी संबंधित नाही. कापड बाजार, मोचीगल्ली, सारडा गल्ली, गंज बाजार इत्यादी प्रमुख बाजारपेठ नेहमीप्रमाणेच सकाळी ९ ते सांयकाळी ५ ह्या वेळेत सुरू राहणार आहे. या भागातील वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान व सर्व … Read more

घरात एकटी असताना अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :   नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे अल्पवयीन मुलीवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. ती घरात एकटी असताना हा हल्ला झाला असून या जखमी मुलीवर नगर येथील सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. अज्ञात हल्लेखोर घरात प्रवेश करून मुलीवर धारदार शस्त्राने वार करून पसार झाला.  मुलीने आरडाओरड केल्याने नातेवाईकाने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोहिनूरमधील दोन कर्मचारी कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  अहमदनगर शहरातील कापड बाजारातील कोहिनूर वस्त्रदालनातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी कोहिनूर दुकान शनिवारी दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दुकानात काम करणार्‍या सर्वच कर्मचार्‍यांची तपासणी केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर दुकान सुरू अथवा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. … Read more

१०२ वर्षांच्या पायी वारीत खंड, प्रथमच चारचाकीतून पादुकांचे पंढरपूरकडे प्रस्थान !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  वारकरी साप्रंदायातील थोर उपासक राष्ट्रसंत ऐश्वर्य संपन्न श्रीसंत भगवानबाबा यांनी श्रीक्षेत्र भगवान गडाच्या स्थापनेपूर्वी श्रीक्षेत्र नारायण गडाहून सन १९१८ मध्ये सुरू केलेल्या पायी पढंरपूर दिंडी सोहळ्याला यावर्षी कोरोनामुळे १०२ वर्षांनंतर खंड पडला आहे. संत भगवानबाबा यांच्या पादुकांचे आषाढी एकादशीनिमित्त चारचाकी वाहनातून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यंदाच्या प्रस्थान सोहळ्यासाठी पाश्चात्य … Read more

२१ वर्षीय मुलाने विहिरीत पडलेल्या आईला मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  नुकतेच पोहण्यास शिकलेल्या अवघ्या एकवीस वर्षीय मुलाने विहिरीतील पाण्यात चार तास मोठ्या धिराने आईला वाचवत मृत्यूच्या दाढेतून परत आणले.त्याच्या या धाडसाचे बोधेगाव परिसरातून कौतुक होत आहे. बोधेगाव येथील मीराबाई आबासाहेब घोरतळे (वय अंदाजे ५०) या बुधवारी दिवसभर स्वतःच्या शेतातील ऊस पिकांची खुरपणी करत होत्या. सायंकाळी साडे पाच-पावणेसहाच्या सुमारास … Read more

आ. निलेश लंके यांच्या प्रेमात पवार कुटुंबीय पडले… आ.लंकेंच्या रुपात दुसरे आर.आर. आबा !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  आमदार निलेश लंके यांच्या प्रेमात पवार कुटुंबीय पडले असुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी शुक्रवारी पारनेर दौरा करून आ.निलेश लंके यांची राजकीय व सामाजिक काम करण्याची पध्दत त्यांनी समजावुन घेतली. पार्थ पवार यांनी दि. 26 जून रोजी अचानक दुपारी पारनेरला येऊन आमदार लंके यांच्या … Read more

जमिनीच्या वादातून तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : जमिनीच्या वादातून तरुणाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून जीवे मारण्याचा तर त्याच्या आई वडीलांना दंडक्याने व लाथा बुक्क्यांने मारहाण केली. ही घटना संगमनेर तालुक्यात घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की,जमिनीच्या वादातून शांताराम यशवंत घोगरे, शिवाजी उर्फ शिवनाथ लहानू फटांगरे, सविता शांताराम घोगरे, चैतन्य शांताराम घोगरे, धिरज शांताराम घोगरे (सर्व … Read more

दोन दिवसात दोन कामगारांच्या आत्महत्या,एक माजी मंत्र्याच्या कारखान्यातील कामगार !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : राहाता तालुक्यातील प्रवरानगर (लोणी खुर्द )येथे दोन दिवसांत दोनजणांनी आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, बुधवारी (दि.२४)रात्री मोहन शिवाजी शिरसाठ (वय ४५ वर्ष) यांनी आपल्या राहात्या घरात गळफास घेतला. शिरसाठ हे लोणी येथील चित्रालय चौकात मध्ये एका गँरेजमध्ये काम … Read more

आमदार रोहित पवार यांनी जनतेची माफी मागावी !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :   महापुरुषांच्या स्मारकासाठी मंजूर केलेला निधी आमदार रोहीत पवार यांनी गटार कामावर वळवून थेट महापुरुषांचाच अवमान केला आहे. राजकारणासाठी अशा बाबीचा वापर करू नका आम्ही आमच्या सरकारच्या काळात हा निधी मिळविला होता, तो पाठविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. खरंच विकासाचा पुळका असेल तर आपल्या सरकार कडून निधी मिळविण्याची धमक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोस्त दोस्त ना रहा; दोन मित्रांनीच केला ‘त्या’ मित्राचा खून !

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :   दोन मित्रांकडून दारू पिताना झालेल्या भांडणातून एका मित्राचा खुन झाल्याची घटना शिरुर तालुक्यातील आमदाबाद येथील एका मंदिराच्या मागे घडली.मृत मित्र आणि त्याचा खून केलेले दोघे पारनेर तालुक्यातील जवळा येथील रहिवासी आहेत. हे तिघे जण नेहमी कामासाठी एकत्रित या भागात येत होते.गुरुवारी, दि.26 रोजी एकनाथ दत्तात्रय जाधव,वय 37, वामन … Read more

‘या’ गावातील हॉस्पिटलच केले १४ दिवसांसाठी सील

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :   पारनेर तालुक्‍यातील सुपा येथे कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाल्याने गावातील सर्व व्यवहार दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता बँका, पतसंस्थाही तीन दिवस बंद राहणार आहेत. तसेच या कोरोना याधित व्यक्‍तीने उपचार घेतलेले ख्यासगी हॉस्पिटल देखील १४ दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. आतापर्यंत बाधित व्यक्‍तीच्या संपर्कातील ३३ … Read more

‘त्या’ अभिनेत्रीचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्या

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरणारी अभिनेत्री एकता कपूर हिचा श्रीगोंद्यातील आजी, माजी सैनिकांनी निषेध केला. श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर सैनिकांनी एकता कपूरच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून तिचा निषेध केला.त्रिदल सैनिक संघटनेच्या पदाधिका-यांनी अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांना विविध मागण्याचे निवेदन दिले.   अभिनेत्री एकता कपूरने सैनिकांच्या पत्नीबाबत अपशब्द वापरून … Read more

आशा वर्कर व गटप्रवर्तकांच्या माधनात वाढ सरकारच्या निर्णयाचे कौतूक

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :  राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन अवघे आठ महिने झाले. या कार्यकाळात संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट कोसळले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याबरोबरच राज्याचे अर्थकारणावरही विपरित परिणाम होत आहे. तरीसुद्धा महाविकास आघाडीने कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना धीर देण्याचे काम केले. तसेच विविध निर्णय घेऊन जनतेला … Read more