विकासात तडजोड करू नका : आमदार पाचपुते

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :   गावचा विकास करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून जास्तीत – जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र गावात होणारी कामे ही दर्जेदार व्हावीत, तसेच विकासकामात कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका, असे आमदार बबनराव पाचपुते म्हणाले. श्रीगोंदा येथील एक कामाचे भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. आमदार पाचपुते म्हणाले, गावातील विकास कामासाठी … Read more

विरोधीपक्षनेते असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे पाय धरले ! महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा विखे पाटलांना टोला

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :   ते विरोधीपक्षनेते असताना त्यांना मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना आम्ही पाहिले आहे. त्यामुळॆ त्यांनी माझ्यावर टीका करू नये,असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना आज लगावला. विखे पाटील यांनी काॅंग्रेस सत्तेसाठी लाचार आहे. काॅंग्रेसच्या मंत्र्यांना कोणी विचारीत नसून, सत्तेसाठी ऐवढे लाचार प्रदेशाध्यक्ष मी प्रथमच पाहिले, अशा शब्दांत … Read more

‘त्या’ तब्लिगींना जामीन परंतु निकाल लागेपर्यंत जिल्हाबंदी कायम !

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :   त्या २९ परदेशी तबलिगी नागरिकांना अहमदनगर व नेवासा कोर्टाने तब्बल दोन महिन्यानंतर जामीन दिला. मात्र जो पर्यंत या खटल्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत देश तर नाहीच पण अहमदनगर जिल्हा देखील सोडून जाता येणारं नसल्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती या नागरिकांचे वकील राजेंद्र शेलोत यांनी दिली. कोरोना सारख्या … Read more

बस चालकाचे येथेही प्रसंगावधान… मात्र भेटणाऱ्यांमुळे गाव लॉकडाऊन!

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  कायम प्रसंगावधान राखणाऱ्या या चालकाने येथेही प्रसंगावधान राखत थेट विलगीकरण कक्ष गाठला होता. मात्र त्यांना पोटाचा त्रास असल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी जाताना त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबत दोघांनी प्रवास केला. शिवाय एकजण त्यांना भेटण्यासाठी गेला. मात्र येथे या व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण भावीनिमगाव गाव दि.२९ जूनपर्यंत लॉकडाऊन … Read more

अजमेरच्या सुफी संतबद्दल बेताल वक्तव्य करणार्‍या देवगनचा निषेध

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  अजमेर येथील सुफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या बद्दल अमिश देवगन याने अपशब्द वापरुन धार्मिक भावना दुखावल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर देवगनवर गुन्हे दाखल करुन सदर प्रकार प्रेक्षेपण करणार्‍या वृत्त वाहिनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी … Read more

चीनच्या राष्ट्रपतींच्या प्रतिमेसह चायना मालाचे दहन

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :   भारतीय सिमेत घुसखोरी करीत विश्‍वासघात करुन भारतीय जवानांवर हल्ला करणार्‍या चीनचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भिंगार येथे निषेध नोंदविण्यात आला. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या प्रतिमेसह चायना मालाची होळी करण्यात आली. प्रारंभी अमर रहे.. अमर रहे शहीद जवान अमर रहे!…, चायना मुर्दाबाद…, भारत माता की जय… च्या घोषणा … Read more

जिल्ह्यातील कुस्तीगीरांचे मानधन जिल्हा क्रीडा कार्यालयात जमा

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :   अहमदनगर जिल्ह्यातील 2019-20 या वर्षासाठी कुस्तीगीरांचे सहा महिन्याचे व वर्ष भराचे सुमारे साडेतीन लाख रुपयाचे मानधन क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने जिल्हा क्रीडा कार्यालयास अदा करण्यात आले आहे. कुस्तीगीरांनी जिल्हा क्रीडा कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे, खजिनदार तथा संघ व्यवस्थापक … Read more

राष्ट्रवादीच्या वतीने शहीद जवानांना श्रध्दांजली

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  चीनने भारतीय सिमेवर घुसखोरी करुन भारतीय जवानांवर हल्ला केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तर या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक गणेश भोसले, अजिंक्य बोरकर, साधना बोरुडे उपस्थित होते. शहरातील आयुर्वेद महाविद्यालय येथे फिजीकल डिस्टन्स व … Read more

या तालुक्यात कोरोनानंतर आता ‘सारी’चा सर्व्हे !

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :   कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राहुरी शहर व तालुक्यात सारी या आजाराचा सर्वे सुरू करण्यात आला आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा अधिकारी आमिषा मित्तल, तहसीलदार शेख यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेसाठी आलेल्या नगरपालिका ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, तसेच शिक्षकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार … Read more

‘या’ गावात घरफोडी; दीड लाखाचा ऐवज लंपास !

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : संगमनेर तालुक्यातील आंबी खालसाजवळील तांगडी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून १ लाख ५२ हजार रूपयांचा ऐवज रोख रक्कमेसह लांबविल्याची घटना घडली. याबाबत घारगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तांगडी येथे पूजा प्रवीण तांगडकर यांच्या घरी (दि.३ जून) सायंकाळी पाच ते मंगळवारी (दि. १६ जून) रोजी … Read more

तरुणांनो व्यापार युद्धातून सैन्याला साथ द्या…!

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  केंद्र सरकारनं कसलंही राजकारण न करता भारतीय सैन्याला पाठबळ देण्याची गरज असून, ‘कोणत्याही परिस्थितीत देशाचं रक्षण करण्याची क्षमता आपल्या तिन्ही सैन्यदलांमध्ये आहे. भारतीय म्हणून आपण स्वदेशीचा नारा देत व्यापार युद्धातून सैन्याला साथ देऊ,’ असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तरुणांना केलं आहे. भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात १५ जूनच्या … Read more

या तालुक्यात परत कोरोनाची एन्ट्री!

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  मुलीवर उपचारासाठी पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये गेलेल्या राशीन येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या राशीनमध्ये परत एकदा कोरोनाची एन्ट्री झाली आहे. या व्यक्तीने राशीनला येण्यापूर्वी श्रीगोंद्यात काही काळ वास्तव्य केल्याने दोन्ही ठिकाणी संपर्कात आलेल्या १७ व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. राशीनमधील या व्यक्तीची मुलगी श्रीगोंद्यात आहे. … Read more

…तर ‘त्यांनी’ सरकारमधून बाहेर पडावे

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  ‘सध्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना कोणी विचारत नाही. या सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांनाही विचारले जात नाही. तरीही काँग्रेस सत्तेसाठी सरकारमध्ये आहे. सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत. त्यांच्यामध्ये थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी सत्ता सोडून सरकारमधून बाहेर पडावे. असे आव्हान माजी मंत्री तथा भाजपचे नेते राधाकृष्ण विखे … Read more

माजी आमदार म्हणतात; मी रणांगण सोडणार नाही !

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : अनेकवेळा दिग्गज मंत्र्यांनाही निवडणुकीत पराभव पत्करावा लागतो. त्यामुळे मी पराभूत झालो असलो तरी कोणाविषयी माझ्या मनात वैमनस्य नाही. मी केवळ निवडणुकीत पराभूत झालो आहे. मात्र मी रणांगणही सोडणार नाही. असे मत माजी आमदार विजय औटी यांनी व्यक्त केले. पारनेर तालुक्यात एका कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, … Read more

ढगफुटी सदृश पाऊस कोसळला, अवघ्या दीड तासातच…

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  श्रीरामपूर तालुक्‍यात गोदाकाठ परिसरातील भामाठाण येथे बुधवारी ढगफुटी सदृश पाऊस कोसळला. अवघ्या दीड तासातच गावातील ओढे, नाले दुथडी वाहू लागले. पावसाच्या पाण्यामुळे गावातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने काही काळ परिसरातील सर्व सेवा बंद झाली, तसेच अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले. गोदाकाठच्या कमालपूर ते मातुलठाणपर्यंतच्या भागात मृग नक्षत्राच्या बुधवारी झालेल्या … Read more

पुण्याहून प्रवास करून आलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : वैद्यकीय कारणाने पुण्याहून प्रवास करून आलेल्या राशीन येथील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती प्रशासन घेत असल्याचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी सांगितले. कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. राशीन येथील व्यक्तीला लक्षणे दिसत असल्याने स्वॅब घेण्यात आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने तत्काळ … Read more

बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला The body of a missing youth was found

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथून मंगळवारपासून बेपत्ता असलेल्या जालिंदर सोमनाथ पवार (वय ३०) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी १२ वाजता कोपरगाव बेट भागात गोदावरी नदीपात्रात आढळला. नदीपात्रात सुमारे सहा हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थळ पंचनामा करत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला. दरम्यान, हा तरुण नदीपात्रात … Read more

भिंत अंगावर कोसळून दोन चिमुरड्यांचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  श्रीरामपूर येथे घराचं बांधकाम सुरू असताना ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने भिंत कोसळली. यात दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला. बेलापूर गावातील बोंबले वस्तीवर ही हृदयद्रावक घटना घडली. ॠतूजा बाळासाहेब गांगुर्डे व श्रृतीका बाळासाहेब गायकवाड (वय ५ वर्षे) असे मृत मुलींचे नावे आहेत. वस्तीवर राहणारे बाळासाहेब गांगुर्डे यांच्या घराचं बांधकाम सुरू होते. … Read more