बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला The body of a missing youth was found

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथून मंगळवारपासून बेपत्ता असलेल्या जालिंदर सोमनाथ पवार (वय ३०) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी १२ वाजता कोपरगाव बेट भागात गोदावरी नदीपात्रात आढळला. नदीपात्रात सुमारे सहा हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थळ पंचनामा करत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला. दरम्यान, हा तरुण नदीपात्रात … Read more

भिंत अंगावर कोसळून दोन चिमुरड्यांचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,19 जून 2020 :  श्रीरामपूर येथे घराचं बांधकाम सुरू असताना ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने भिंत कोसळली. यात दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला. बेलापूर गावातील बोंबले वस्तीवर ही हृदयद्रावक घटना घडली. ॠतूजा बाळासाहेब गांगुर्डे व श्रृतीका बाळासाहेब गायकवाड (वय ५ वर्षे) असे मृत मुलींचे नावे आहेत. वस्तीवर राहणारे बाळासाहेब गांगुर्डे यांच्या घराचं बांधकाम सुरू होते. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 7 कोरोना रुग्ण वाढले, एकूण रुग्णांचा आकडा झाला @276!

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज सातने वाढ झाली आहे, आज संध्याकाळी कोरोनाचे चार रुग्ण वाढले असून सकाळी तीन रुग्ण आढळले होते.   त्यामुळे आज अखेर जिल्ह्याची एकूण कोरोना ग्णसंख्या २७६ झाली असून ऍक्टिव्ह केसेस ४५ झाल्या आहेत. जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत  सायंकाळी o४ ने वाढ पुण्याहून निमगाव पागा (संगमनेर) येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :   शिवसेना उपनेते तथा माजी आमदार अनिल राठोड यांना चीनच्या विरोधात आंदोलन करणे चांगलेच महागात पडले आहे. जिल्हाधिकार्याच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह शिवसेनेच्या २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. भगवान फुलसौंदर, बाळसाहेब बोराटे, योगीराज गाडे,अभिषेक कळमकर , सुरेश तिवारी ,विक्रम राठोड यांचा यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिला अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल, तहसीलदार झाले फिर्यादी!

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्हा बंदीचे आदेश आहेत. यासाठी शासकीय नियमावली तयार करण्यात आली आहे. परंतु या नियमावलीला हरताळ फासत अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता गवांदे यांनी दररोज पुणे-अहमदनगर-पुणे प्रवास केल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक बाब लक्षात आल्यानंतर श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने कविता गवांदे यांना पुणे-नगर प्रवास … Read more

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता गवांदे यांना तहसीलदारांनी घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्हा बंदीचे आदेश आहेत. यासाठी शासकीय नियमावली तयार करण्यात आली आहे. परंतु या नियमावलीला हरताळ फासत अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता गवांदे यांनी दररोज पुणे-अहमदनगर-पुणे प्रवास केल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक बाब लक्षात आल्यानंतर श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने कविता गवांदे यांना पुणे-नगर प्रवास … Read more

अखेर या रेल्वे मार्गास अखेर मंजुरी !

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  नाशिक – पुणे – मुंबईच्या विकासात व औद्योगिकीकरणात मोलाची भर टाकणाऱ्या नाशिक -पुणे रेल्वे मार्गास अखेर मंजुरी मिळाली आहे. यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सतत पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे. महाराष्ट्राच्या विकासात महत्वाच्या ठरणार्‍या मुंबई-पुणे -नाशिक हा कॅरिडोअर अत्यंत महत्त्वाचा असून नाशिक, पुणे रेल्वे ही … Read more

महाराष्ट्रात वाढत्या जातीय अत्याचाराचा निषेध

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  महाराष्ट्रात वाढत्या जातीय अत्याचाराच्या घटनांचा भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर निषेध नोंदवण्यात आला. तर जातीय द्वेषातून घडलेल्या युवकांच्या हत्या प्रकरणात काय कारवाई केल्याची माहिती देण्याची व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शहर जिल्हा महासचिव सुनील शिंदे, संदीप गायकवाड, सागर भिंगारदिवे, … Read more

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अर्धनग्न आंदोलन

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :जातीय द्वेषातून मागासवर्गीय युवकांची हत्या होत असल्याच्या निषेधार्थ सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. प्रारंभी मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात … Read more

कर्जत-बारामती रस्त्याच्या कामाला लागले ग्रहण

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : कर्जत तालुक्‍यातील खेड येथील कर्जत-बारामती राज्यमार्गाची प्रचंड दुर्दशा झाली असून,या ठिकाणाहून प्रवास करणे म्हणजे एक मोठे दिव्यच म्हणावे लागेल. पावसामुळे या रस्त्यावरील दगड-गोटे उघडे पडले असून खड्ड्यांत पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे या राज्यमार्गाची तत्काळ दुरुस्ती करावी.अशी मागणी केली जात आहे. तसेच काही दिवसांपासून … Read more

ऑगस्टला शाळेची घंटा वाजणार !

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्यापूर्वी कोणती कामे कोणी करायची याचा आराखडा तयार करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने सुरु आहे. आगामी महिन्यापासून माध्यमिक विभागाचे नववी, दहावी आणि बारावीचे तर ऑगस्टपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे सहावी, सातवी व आठवीचे वर्ग सुरु होणार आहेत. यंदाचे शैक्षणिक वर्ष तीन टप्प्यात सुरु करण्याचा … Read more

पोलिसांशी वाद घालने मायलेकाच्या आले अंगलट !

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  विनामास्क एकाच दुचाकीहून जाणाऱ्या दोघांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांशी वाद घालने मायलेकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. आई व मुलाने पोलिसांशी वाद घालत कारवाईला विरोध केल्या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखन मारुती शिंदे ( वय २१), सुमनबाई प्रारुती शिंदे … Read more

‘त्या’ मुलीची पोलिसांनी केली सुटका

अहमदनगर Live24 ,18 जून 2020  पारनेर तालुक्‍यातील वाळवणे येथील फूस लावून अपहरण केलेल्या एका अल्पवयीन मुलीची सुपा पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, सोनू किसन आंग्रे. (वय २६) व धिरज निलेश शिंदे (वय २०, दोघे रा.वाळवणे, ता.पारनेर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. लग्न करण्याचे आमीष दाखवून या दोन दोघांनी … Read more

भाविकांना लागली साई दर्शनाची आस !

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद केले. या घटनेला बुधवारी (दि.१७) तीन महिने पूर्ण झाले आहेत. तिरुपतीसारखी देशातील अन्य मंदिरे आता खुली झाल्याने साई भक्तांसह शिर्डीकरांनाही साई दर्शनाची आस लागली आहे. साईनगरीत देश-विदेशातील भाविकांचा वावर लक्षात घेता कोरोनाचा प्राथमिक उद्रेक सुरू होताच संस्थानने १७ मार्चला मंदिर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत आज 3 ने वाढ

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण आज कोरोनातून बरा होऊन गेला घरी. संगमनेर येथील रुग्णाला मिळाला डिस्चार्ज. कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या २२० जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत आज ०३ ने वाढ पुण्याहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण. कांदिवली (मुंबई) येथून प्रवास करून पारनेर तालुक्यातील भाळवणी … Read more

‘या’ कारणामुळे ग्रामीण भागात पसरला कोरोना ; माजी पालकमंत्री राम शिंदे यांचा आरोप

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  कोरोनाच्या बाबतीत ठाकरे सरकारचे नियोजन ढिसाळ आहे. त्यांच्या अयोग्य नियोजनामुळे शहरातील कोरोना ग्रामीण भागांत पसरला. असा आरोप करत श्रीमंतांना शहरात महागडे उपचार घेतात येतात, ग्रामीण भागातील गरीब नागरिकांनी काय करायचं? असा सवाल माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी उपस्थित केला आहे. पुणे- मुंबईपर्यंतच मर्यादित असलेला कोरोना सर्वदूर पसरत चाललाय. … Read more

धक्कादायक! समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्याची माती चोरल्याप्रकरणी ‘गायत्री’च्या विरोधात तक्रार

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे कामकाज सुरु आहे. परंतु या दरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कामासाठी परिसरातील शेतकऱ्याच्या शेतातून माती व मुरुमाची चोरी केल्याची घटना घडली असून त्यासंदर्भात कंत्राटदार कंपनी गायत्री कन्स्ट्रक्शन्स विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी : दीपक मुनोत … Read more

भाजीपाला घेऊन मुंबईला गेला आणि येताना कोरोनामुक्त तालुक्यात कोरोना आणला !

अहमदनगर Live24 ,18 जून 2020 :  अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील रुग्ण बरा होतो न होतो तोच अकोले तालुक्यास दुसरा झटका बसला आहे. तालुक्यातील समशेरपूर येथील कल्याण-मुंबई येथे भाजीपाला घेवून गेलेला ५० वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे यांनी याबाबत माहिती दिली. अकोले तालुक्यात कोरोनाचा शिरकाव २३ मे रोजी … Read more