अखेर त्या प्रकरणात आईच झाली फिर्यादी पोलिसांत दिली तक्रार…

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  पाथर्डी शिरापुर येथे बापानेच अकरा वर्षे वयाच्या मुलीचा साखरपुडा पंचवीस वर्षे वयाच्या पुरुषाबरोबर करुन बालविवाह लावण्याचा प्रयत्न केला. शनिवारी शिरापुर येथे साडेपाच वाजता हा प्रकार घडला. याबाबत मुलीच्या आईने पोलिसात तक्रार नोंदविली आहे. मुलीचा बाप, विवाह करणारा मुलगा, त्याचा भाऊ व वडील अशा चौघाविरुद्ध पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यासह विविध … Read more

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने उपायुक्तांना निवेदन

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमध्ये अडीच ते तीन महिन्यापासून कापड बाजार येथील पथारी व फेरीवाले यांचे व्यवसाय बंद असून, पथारी व फेरीवाल्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असताना त्यांना व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांना निवेदन देण्यात … Read more

खाजगी फायनान्सवर गुन्हे दाखल करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : शहरासह उपनगर भागातील बचत गटाच्या महिलांनी खाजगी फायनान्सकडून कर्ज घेतले असताना, लॉकडाऊन काळात उत्पन्नाचे साधन नसल्याने त्याचे हप्ते भरण्यात आलेले नाही. महिलांकडून कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी खाजगी फायनान्सवाले गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून दमबाजी करीत असून, या खाजगी फायनान्स धारकांवर गुन्हे दाखल करावे व लॉकडाऊन काळातील व त्यापुढील तीन महिन्यांचे कर्जाचे हप्ते … Read more

अहमदनगर करांसाठी आजच्या दोन आनंदाच्या बातम्या …

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोना संकटात अहमदनगर जिल्ह्यात आज दोन चांगल्या बातम्या आल्या आहेत आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही व सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज जिल्ह्यातील आणखी ०५ व्यक्ती कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन आज घरी परतल्या आहेत. या व्यक्तींना वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला … Read more

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर कापड बाजार येथील नाल्यांची सफाई करावी

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : पावसाळा सुरु झाला असून, शहरातील मुख्य बाजरपेठ असलेल्या कापड बाजार येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या नाल्यांची सफाई करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष अजीम राजे यांनी मनपा आयुक्तांना सदर मागणीचे निवेदन दिले. पावसाळ्यात नाले, गटारी तुंबून वसाहतींमध्ये घरात पाणी शिरण्याच्या घटना वारंवार घडत असतात. कापड … Read more

शाळा सुरु करुन इस्त्रायल सारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू नये !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोनाचे संक्रमण दिवसंदिवस वाढत असून, इस्त्रायल सारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू नये यासाठी शाळा जून महिन्यात सुरु करण्याचा शासनाने अट्टाहास करु नये. तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने कोरोनाचे संक्रमण अटोक्यात आल्यास शाळा सुरु करण्याचा विचार करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली. या मागणीचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या महिलेचा खूनच…शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  निंबळक बायपासजवळील लामखडे पेट्रोलपंप परिसरात मृतदेह आढळून आलेल्या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. याबायत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी निंबळक बायपासजवळील काटवनात ‘एका ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात … Read more

एकाच कुटुंबातील पाच जण झाले कोरोनातून मुक्त !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथील पाच जण कोरोनातून मुक्त झाले आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असून कोरोनाच्या आजाराने बरे झाले आहेत. रविवारी तिघांना तर सोमवारी दोघांना नगर येथील बुथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. यासर्वांना घर सोडण्यात आले असून त्यांना विलनिकरण लक्षात सात दिवसांसाठी ठेवण्यात येणार आहे, अ शी माहिती तालुका … Read more

वर्ष वाया गेले तरी चालेल..पण मुलांना शाळेत पाठवणार नाही !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोना व्हायरस च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरु केल्या आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सामाईक अंतर राखणे जमले नाही, तर संकट ओढवेल, अशी भीती पालकांना आहे. शिवाय पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोकाही पालकांना वाटत आहे. म्हणून कोरोनाचा धोका कमी होईपर्यंत शाळा सुरू करू नयेत, असे काही पालकांना वाटत आहे. … Read more

….तर अविनाश आदिक लवकरच आमदार !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ जागा लवकरच रिक्त होत असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवले तर श्रीरामपूरचे युवा नेते अविनाश आदिक लवकरच आमदार होवू शकतील ,अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांपैकी १० सदस्यांची मुदत ५ जूनला … Read more

कोरोना रुग्ण आढळून आल्याने ‘हा’ भाग कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : राहाता तालुक्यातील लोणी खुर्द व प्रवरानगर येथे कोरोना रुग्ण आढळून आल्याने हा भाग कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. कारखाना रोडच्या पूर्वेचे पंचवटी क्षेत्र, शांतीनाथ मंगल कार्यालय परिसर, आहेर वस्ती, पाथरे रोड व कोल्हार बुद्रूक गावातील प्रवरानगर पंचवटी भागात नागरिक व वाहनांच्या येण्या-जाण्यावर प्रतिबंध लावण्यात आले. पाथरे रोड हे … Read more

नर्तिकेसह अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत मारहाण

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : नर्तिकेच्या बहिणीच्या मुलीस पोलिसांच्या मदतीने एकाच्या ताब्यातून सोडवून स्नेहालयात पाठवले, याचा राग येऊन पाच जणांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी अॅट्रोसिटी व विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला. याबाबत नर्तिकेने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे. त्यात … Read more

त्या जावयाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : जावयाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने निघोजकरांना दिलासा मिळाला. मूळचा पारनेर येथील, मात्र मुंबईत स्थायिक असलेल्या निघोज येथील जावयाला श्वसनाचा त्रास झाल्याने शनिवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घशातील स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. रविवारी रात्री अहवाल निगेटिव्ह आला. ही व्यक्ती ३० मे रोजी मुंबईहून पत्नी मुलगी व मुलासह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नायब तहसीलदारांनाच कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  कोरोनाच्या महामारीत युद्ध पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्यामुळे संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्याचे नायब तहसीलदार असलेल्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कोरोना काळात आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी पुण्याला गेले असता त्याठिकाणी हि लागण झाली असल्याचे बोलले जात आहे. काल … Read more

राज ठाकरेंच्या ‘या’ मागणीला यश; सरकार ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या मार्गावर ?

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :   सध्या लॉक डाऊनमुळे अनेक परप्रांतीय मजुरांनी स्थलांतर केले. ते त्यांच्या राज्यामध्ये निघून गेले. परंतु येथील उद्योगधंदे सुरळीत झाले की, परप्रांतीय मजूर पुन्हा राज्यात येतील तेव्हा त्यांची स्थलांतरित कायद्यांतर्गत नोंद करण्यात यावी, अशी आग्रही मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. राज ठाकरेंच्या या मागणीनंतर राज्य सरकार परराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत … Read more

ठाणे येथून आलेल्या ‘त्या’ मुलीस कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  कोपरगाव तालुक्‍यातील धोत्रे येथील १४ वर्षीय मुलीस कोरोनाची बाधा झाली असून. कोपरगावात हा कोरोनाचा दुसरा रुण आढळला आहे. मुलीवर कोपरगाव येथील कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये उपचार आहेत. कोपरगावातील १७ पैकी १ अहवाल निगेटिव्ह तर एक पॉझिटिव्ह आला. कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या १ जणांचे तसेच ठाणे येथून आलेल्या दोन मुलींना धोत्रे … Read more

२५ वर्षाच्या मुलाशी अवघ्या ११ वर्षे वयाच्या मुलीचा बालविवाह होणार होता पण …

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : शेवगाव तालुक्यात २५ वर्षाच्या मुलाशी अवघ्या ११ वर्षे वयाच्या मुलीचा बालविवाह होणार होता मात्र पोलिसांना याची माहिती कळताच या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शेवगाव तालुक्यातील हसनापूर येथील नवरदेव आहे. तो २५ वर्षे वयाचा आहे. तर मुलगी शिरापूर (ता.पाथर्डी) येथील आहे. मुलीचे वय … Read more

कोरोना बाधित असल्याची अफवा पसरवल्याने ‘त्यांना’ सहन करावा लागला मनस्ताप !

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  शेवगाव तालुक्यातील बोधेगावातील एक ७ वर्षीय चिमुरडीला लक्षणे नसताना केवळ संशयित म्हणून तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. मात्र अहवाल येण्याआधीच गावातील काहीनी संबंधित चिमुरडी बाधित असल्याची अफवा गावभर पसरवली. यामुळे संबंधित कुटुंबासह त्यांच्या संपर्कात असलेल्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. शेवगाव तालुक्‍यातील राणेगाव येथे कल्याणहून आलेल्या कोरोना बाधिताच्या संपर्कातील … Read more