अहमदनगर ब्रेकिंग : एकाच दिवशी एकाच तालुक्यातील 3 कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवशी एकाच तालुक्यातील ३ महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर अली आहे. या तीनही महिला संगमनेर तालुक्यातील आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात आता कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे. या तीनही कोरोनाबाधीत महिलांचा नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा येथील ६३ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना बधित मृतांची संख्या सातवर जाऊन पोहचली आहे. आज मंगळवार ९ रोजी सकाळी या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. संगमनेर शहरात आतापर्यंत ६० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले असून आता मृतांचे प्रमाण ही वाढतच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी तीन व्यक्ती कोरोना बाधित

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : जिल्ह्यात आणखी तीन व्यक्ती कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 226 झाली आहे. संगमनेर शहरातील मोमीनपुरा येथील तीस वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव. मुंबईहून संगमनेर येथे आलेला 18 वर्षीय युवक कोरोना बाधित. नगर शहरातील पांचपीर चावडी माळीवाडा येथील 23 वर्षे युवकाला कोरोनाची बाधा. अहमदनगर Live24 वर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज जिल्ह्यात ०६ नवीन रुग्ण !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  आज अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या 223 झाली आहे. संगमनेर शहरातील तिघांना कोरोनाची लागण. मदिनानगर येथील तेवीस वर्षीय महिला बाधित. पुनानाका नाईकवाडपुरा येथील ३५ वर्षीय व्यक्ती बाधित. यापूर्वीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने लागण. मदिना नगर येथील ५२ वर्षीय व्यक्तीला लागण. … Read more

आमदार संग्राम जगताप म्हणाले युवकांनी आपले…

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोना संसर्गजन्य विषाणूवर मात करण्यासाठी देशामध्ये सलग तीन महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना खासगी नोकरी, व्यवसाय गमावावे लागल्यामुळे त्यांच्यावर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. संकटाच्या काळात संकटावर मात करुन आपले जीवन पूर्ववत करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. या काळात प्रत्येकाला मदत व्हावी, यासाठी प्रामाणिक … Read more

वीस रुपयांसाठी तरुणाला लावला पंधरा हजारांचा चुना !  

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  नोकरी अर्ज भरताना वीस रुपये चार्ज भरण्याचा मेसेज आला. ओटीपी देताच तरुणाच्या बैंक खात्यातून परस्पर पंधरा हजार रुपये  काढले. याप्रकरणी कुकाणे येथील तरुणाने सायबर सेल पोलिसांकडे तक्रार केली. येथील राजन पांडुरंग देशमुख हा दि.२ जून रोजी एका संकेतस्थळावरून नोकरीसाठी अर्ज भरताना वेबसाईटकडून एसएमएस चार्जेससाठी २० रुपये अदा करण्यास सांगितले. … Read more

माजी आ.कर्डिले यांची ऊर्जामंत्री ना.तनपुरे यांच्यावर टीका, म्हणाले त्यांना…

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  कोरानाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी मदत केली. मात्र, मी करत असलेल्या मदतीला सत्ताधार्‍यांनी आक्षेप घेत समाजकार्य करण्यातही खोडा घातला. सत्ताधार्‍यांना आमच्या चांगल्या कामाचे भय वाटते, अशी टीका माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता केली. चिचोंडी शिराळ (ता.पाथर्डी) येथे गरजूंना माजी आ.कर्डिले यांच्या हस्ते … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तहसीलदारांनी दिला कोरोनापासून बचावाचा मंत्र !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना किमान १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवल्यास  इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्यापासून आपण वाचवू शकतो. मुंबईतून येणाऱ्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून येते आहे. त्यांच्यापासूत इतर नागरिकांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता आहे.  त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्यांना  किमान १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवावे असे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे म्हणाले. … Read more

अखेर त्या प्रकरणात आईच झाली फिर्यादी पोलिसांत दिली तक्रार…

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  पाथर्डी शिरापुर येथे बापानेच अकरा वर्षे वयाच्या मुलीचा साखरपुडा पंचवीस वर्षे वयाच्या पुरुषाबरोबर करुन बालविवाह लावण्याचा प्रयत्न केला. शनिवारी शिरापुर येथे साडेपाच वाजता हा प्रकार घडला. याबाबत मुलीच्या आईने पोलिसात तक्रार नोंदविली आहे. मुलीचा बाप, विवाह करणारा मुलगा, त्याचा भाऊ व वडील अशा चौघाविरुद्ध पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यासह विविध … Read more

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने उपायुक्तांना निवेदन

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमध्ये अडीच ते तीन महिन्यापासून कापड बाजार येथील पथारी व फेरीवाले यांचे व्यवसाय बंद असून, पथारी व फेरीवाल्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असताना त्यांना व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांना निवेदन देण्यात … Read more

खाजगी फायनान्सवर गुन्हे दाखल करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : शहरासह उपनगर भागातील बचत गटाच्या महिलांनी खाजगी फायनान्सकडून कर्ज घेतले असताना, लॉकडाऊन काळात उत्पन्नाचे साधन नसल्याने त्याचे हप्ते भरण्यात आलेले नाही. महिलांकडून कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी खाजगी फायनान्सवाले गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून दमबाजी करीत असून, या खाजगी फायनान्स धारकांवर गुन्हे दाखल करावे व लॉकडाऊन काळातील व त्यापुढील तीन महिन्यांचे कर्जाचे हप्ते … Read more

अहमदनगर करांसाठी आजच्या दोन आनंदाच्या बातम्या …

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोना संकटात अहमदनगर जिल्ह्यात आज दोन चांगल्या बातम्या आल्या आहेत आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही व सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज जिल्ह्यातील आणखी ०५ व्यक्ती कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन आज घरी परतल्या आहेत. या व्यक्तींना वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला … Read more

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर कापड बाजार येथील नाल्यांची सफाई करावी

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : पावसाळा सुरु झाला असून, शहरातील मुख्य बाजरपेठ असलेल्या कापड बाजार येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या नाल्यांची सफाई करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष अजीम राजे यांनी मनपा आयुक्तांना सदर मागणीचे निवेदन दिले. पावसाळ्यात नाले, गटारी तुंबून वसाहतींमध्ये घरात पाणी शिरण्याच्या घटना वारंवार घडत असतात. कापड … Read more

शाळा सुरु करुन इस्त्रायल सारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू नये !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोनाचे संक्रमण दिवसंदिवस वाढत असून, इस्त्रायल सारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू नये यासाठी शाळा जून महिन्यात सुरु करण्याचा शासनाने अट्टाहास करु नये. तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने कोरोनाचे संक्रमण अटोक्यात आल्यास शाळा सुरु करण्याचा विचार करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली. या मागणीचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : त्या महिलेचा खूनच…शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  निंबळक बायपासजवळील लामखडे पेट्रोलपंप परिसरात मृतदेह आढळून आलेल्या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. याबायत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी निंबळक बायपासजवळील काटवनात ‘एका ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात … Read more

एकाच कुटुंबातील पाच जण झाले कोरोनातून मुक्त !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथील पाच जण कोरोनातून मुक्त झाले आहे. हे सर्व एकाच कुटुंबातील असून कोरोनाच्या आजाराने बरे झाले आहेत. रविवारी तिघांना तर सोमवारी दोघांना नगर येथील बुथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. यासर्वांना घर सोडण्यात आले असून त्यांना विलनिकरण लक्षात सात दिवसांसाठी ठेवण्यात येणार आहे, अ शी माहिती तालुका … Read more

वर्ष वाया गेले तरी चालेल..पण मुलांना शाळेत पाठवणार नाही !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोना व्हायरस च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरु केल्या आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सामाईक अंतर राखणे जमले नाही, तर संकट ओढवेल, अशी भीती पालकांना आहे. शिवाय पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोकाही पालकांना वाटत आहे. म्हणून कोरोनाचा धोका कमी होईपर्यंत शाळा सुरू करू नयेत, असे काही पालकांना वाटत आहे. … Read more

….तर अविनाश आदिक लवकरच आमदार !

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ जागा लवकरच रिक्त होत असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवले तर श्रीरामपूरचे युवा नेते अविनाश आदिक लवकरच आमदार होवू शकतील ,अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ सदस्यांपैकी १० सदस्यांची मुदत ५ जूनला … Read more