गावठी कट्ट्यांसह त्या दोघा जणांना अटक

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : श्रीरामपूर शहर पोलिसांनी अशोकनगर भागात शुक्रवारी रात्री १० वाजता दोघांकडून जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा हस्तगत केला असून याबाबत दोघांना अटक करण्यात आली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल किशोर सुभाष जाधव यांनी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे. शुक्रवारी ५ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास अशोकनगर भागात कारेगावकडून … Read more

महाविकास आघाडी सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यातील अनेक भागात झालेल्या शेती पिकांसह इतर नुकसानीची पाहणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या आहेत. नुकसानग्रस्तांना जास्तीची मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन मंत्री थोरात यांनी या वेळी दिले. तालुक्यातील आंबीखालसा, तांगडी, पाणसवाडी आदिंसह … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  विद्युत प्रवाहाचा शॉक लागून तेजस चंद्रकांत येणारे (वय १७, रा. डिग्रस) या युवकाचा मृत्यू झाला. वादळी वाऱ्याने पडझड झालेल्या विद्युत खांब व वाहिन्यांचा तेजस हा राहुरी तालुक्यातील गरीब युवक बळी ठरला. तालुक्यातील वाघाचा आखाडा येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी राहुरी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. … Read more

कोरोनाबाबत सरकार विरोधी पक्षालाही विश्वासात घेत नाही

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर पुन्हा सत्ता स्थापन करण्याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा मी घेणार नाही, तर तो पक्षातील वरिष्ठ नेतेच घेतील, असे स्पष्टीकरण राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी देतानाच कोरोना उपाययोजना करण्याबाबत राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला. नगरमध्ये शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार सुजय … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या पत्रकाराचा कोरोना अहवाल निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : जिल्ह्यातील एका दैनिकाच्या वार्ताहरास कोरोनाच्या संशयावरून घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे स्राव तपासणीसाठी पाठवले असता, त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. निमोण येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील संगमनेरातील नवघर गल्ली येथील एका बाधिताच्या संपर्कात पत्रकार आल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांना तपासणीसाठी नेले होते. शहरात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आणखी 03 नवे कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : जिल्हा रुग्णालयातील सकाळी प्राप्त अहवालानुसार 09 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असतानाच आज दुपारी पुन्हा 03 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे नगर मधील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दुपारी तीन वाजेपर्यंत 12 झाली आहे.जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 207 झाली आहे. कोपरगाव येथील डॉक्टर महिलेचा तसेच संगमनेर येथील 02 व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. याची … Read more

कोपरगावमध्ये जोरदार पावसाची हजेरी

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 :शुक्रवारी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. कोपरगाव शहरासह तालुक्यात दमदार सारी बरसल्या तर तुलनेत नगर शहरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर गुरुवारी काही प्रमाणात कमी झाला असला तरीदेखील शुक्रवारी सायंकाळी शहर व परिसरात काहीसा पावसाचा … Read more

बेलापूरात साडेचार लाखांचा गुटखा जप्त

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 :श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुरातील झेंडा चौकात सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा कारवाई करत पकडण्यात आला. बुधवारी ३ जून रोजी रात्री १.३० वाजता अन्न व औषध प्रशासन विभागाने सदर कारवाई केली. यात एकास अटक केली आहे. त्यांच्याकडून हिरा पानमसाला, रॉयल ७१७ तंबाखूचे असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल … Read more

२० वर्षांनंतर ‘या’ चारींमधून वाहिले पाणी

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : श्रीरामपूर-गोंडेगाव परिसरातील चारी क्रमांक १९ व २० मधून मागील २० ते २५ वर्षांपासून पाणी वाहने बंद आहे. या चारीवर असणारी सिंचन सुविधा बिघडल्याने पाणीही बंद होते. परंतु आमदार लहू कानडे यांच्या प्रयत्नाने ते पुन:श्च सुरू झाल्याने २० वर्षानंतर या चरीतून पाणी वाहिले. यामध्ये प्रामुख्याने मातुलठाण, नायगाव, गोंडेगाव, जाफराबाद या गावांना … Read more

अन्यथा अहमदनगर जिल्ह्यात सुध्दा मुंबई व पुण्यासारखी कोरोनाची स्थिती !

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती सध्या तरी नियंत्रित आहे. पण तरीही येथील प्रशासकीय व वैदयकीय अधिका-यांनी वेळीच सावध होऊन पूर्णपणे खबरदारी घेण्याची गरज आहे अन्यथा येथे सुध्दा मुंबई व पुण्यासारखी कोरोनाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे अहमदनगरमध्ये करण्यात आलेल्या संस्थात्मक क्वारांटाईनची स्थिती योग्य पध्दतीने हाताळावी लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन विधानपरिषदेचे … Read more

घरोघरी जाऊन कोरोनाच्या चाचण्या करण्याची मागणी

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : माळीवाडा भागात कोरोनाचे रूग्ण आढळून आल्यामुळे हा भाग कॅन्टोन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. या भागातील प्रभाग १२ मध्ये कोरोनाच्या चाचण्या करण्यात आलेल्या नाहीत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घरोघर जाऊन थर्मल स्क्रिनिंगद्वारे चाचण्या घ्याव्यात, अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आयुक्तांकडे केली आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी … Read more

महाविकास आघाडी सरकारच्या हलगर्जीपणामुळे जनतेचा नाहक बळी !

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 :कोरोनासंदर्भात उपाययोजना राबविण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. राज्यात कोरोनासंदर्भातील उपाययोजना अंमलबजावणीचा पुरता बोऱ्या उडाला आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे जनतेचा नाहक बळी जात असल्याची घणाघाती टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकावर केली आहे. आज जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विरोधी पक्षनेते दरेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना … Read more

पिकअपने चार वर्षाच्या बालकाला चिरडले

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 :शुक्रवारी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रूक – कोतूळ रस्त्यावर एका पिकअपने चार वर्षांच्या बालकाला चिरडल्याने त्या बालकाचा करुण अंत झाला. त्यानंतर पिकअपचा चालक फरार झाला. साई सतीश शिंदे असे या मृृत बालकाचे नाव आहे. या रस्त्याने आपल्या घराकडे जात असलेल्या साईला शिंदे या बालकाला भरधाव वेगातील पिकअप (एमएच- १७ बीवाय ५६४७) … Read more

‘त्या’ महिलेच्या संपर्कातील नातेवाईकांना घरातच केले क्वारंटाईन

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : पुणेवाडी येथील २८ वर्षीय कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या ७ नातेवाईकांना गुरुवारी रात्री उशिरा माघारी पाठवण्यात आले. त्या सर्वांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांच्यामध्ये कोरोना सदृश्य कोणतीही लक्षण आढळून आली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असून त्यांना १४ दिवसांसाठी त्यांच्याच घरात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या दरम्यान जर काही लक्षणे आढळून … Read more

फरारी असणाऱ्या आरोपीचा वाढदिवस साजरा !

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : फरार आरोपीचे बर्थडे सेलिब्रेशन निघोज पोलिस दूरक्षेत्रात विविध गंभीर गुन्ह्यांत फरारी असणाऱ्या आरोपीचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी लोकजागृती सामाजिक संस्थेच्या वतीने पोलिस अधीक्षकांकडे केली. काही दिवसांपूर्वी गुन्हेगारांशी सलगी ठेवण्याचा आरोप असणाऱ्या शिवाजी कावडे या पोलिस कर्मचाऱ्याची … Read more

रिक्षाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : श्रीरामपूर मधील नांदूर भागात ॲपे रिक्षाने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. संकेत दिनकर शिंदे (रा. नांदूर) असे या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक प्रल्हाद शिंदे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, ७ मे रोजी संकेत शिंदे हा रोडवर बाजूला उभा होता. … Read more

‘येथील महिला डॉक्टरला कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : सध्या कोरोनारुग्णांच्या संपर्कात आल्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. आता कोपरगाव शहरातील एका महिला डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सदर महिला डॉक्टर कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले. शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेत लिपिक म्हणून काम करणारे लोणी येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीला काही … Read more

‘येथील’ दहा महिन्यांच्या बाळानं कोरोनावर केली मात

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संक्रमणात वाढ होत असून ही चिंतेची बाब बनली आहे. परंतु यात रिकव्हरीचे प्रमाण चांगले असल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील श्रीगोंदे फॅक्टरी येथील दहा महिन्यांच्या बाळाने कोरोनावर मात केली. यासह आणखी चार जण कोरोना मुक्त झाले. शुक्रवारी देखील नगर शहरासह जिल्ह्यातील ७२ जणांच्या … Read more