अहमदनगर ब्रेकिंग : घरावर छापा टाकत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- श्रीगोंदा पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाया एका घरावर छापा टाकत ३ महिला, ३ पुरुष तसेच व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. श्रीगोंदे शहरातील श्रीगोंदे नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या मागिल बाजूस चालू असलेल्या वेश्या व्यवसायावर श्रीगोंदे पोलिसांनी बुधवारी  छापा टाकला व आरोपीवर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी … Read more

क्वारंटाईन केलेले रात्री घरी झोपायला जातात,अहमदनगरच्या ‘या’ नेत्याने केले विधान

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- क्वारंटाईन केलेले लोक फक्त म्हणण्यापुरतेच क्वारंटाईन झालेले आहेत. प्रत्यक्षात रात्री ते झोपायला आपापल्या घरी जातात, असे विधान खासदार सुजय विखे यांनी केले. कर्जत तालुक्यातील राशीन येथे आयोजित आढावा बैठकीत डॉ. विखे बोलत होतो. त्यांनी डॉक्टर म्हणून सल्ला देत असल्याचे सांगत त्यांनी प्रशासकीय गोष्टींवरही भाष्य केले. कोल्हापूरमध्ये बाहेरून आलेल्या लोकांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी 5 व्यक्तींना कोरोनाची लागण ! वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी 5 कोरोना बाधित व्यक्तींची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील जिल्ह्यात आलेल्या अशा एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 99 झाली आहे. दरम्यान परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी स्वतःला विलगीकरण करून घ्यावे तसेच सार्वजनिक संपर्क टाळावा आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह व इतर आजार आहेत त्यांनी सर्दी, … Read more

कोरोना : कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून १० लाख रुपयांची मदत

जळगाव, दि. 27 (जिमाका) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून 10 लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत गृहमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदार अनिल पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा पोलीस … Read more

लॉकडाऊन शिथिल करताना विषाणूचा पाठलाग अधिक गांभीर्याने करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि २७:  आज ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, स्थलांतरित आणि लॉकडाऊन शिथिल केल्याने प्रवास करीत असलेल्या नागरिकांमुळे ज्या जिल्ह्यांत रुग्ण नव्हते तिथेही प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एकीकडे राज्याचे अर्थचक्र सुरु करीत असलो तरी त्यामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते आहे हे लक्षात घेऊन विषाणूचा पाठलाग जास्त गांभीर्याने करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

कापूस खरेदीला वेग देण्याचे पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे निर्देश

अमरावती : कापूस खरेदीला वेग देण्यासाठी ८ खरेदी केंद्रांवरील जीनची संख्या १८ वरून २५ पर्यंत वाढली असून त्यासाठी राज्य कापूस पणन महासंघाला जिल्हा प्रशासनाकडून पर्यवेक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदी प्रक्रियेला वेग येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर योग्य ती दक्षता घेऊन कापूस खरेदी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी … Read more

कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली माहिती

पुणे – विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या, प्रतिबंधित क्षेत्र सद्यस्थिती, रुग्णसंख्या लक्षात घेता बेड क्षमता नियोजन व सोलापूर जिल्ह्यातील रुग्णवाढ व उपचार व्यवस्था, संस्थात्मक विलगीकरण व्यवस्था तसेच प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी सविस्तर माहिती दिली. राज्यातील कोरोना बाबत शासनाच्या वतीने सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात पुन्हा आढळला कोरोनाचा रुग्ण …

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आज सायंकाळी आला आहे. हा व्यक्ती हिवरे कोरडा येथे 1८ मे रोजी हा रूग्ण आपल्या पत्नी व दोन मुलीसह ठाण्यावरून तो गावी आला होता. हा पुरूष ४८ वर्षीय असुन तो कुटुंबासह गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आठ दिवस विलगीकरण … Read more

इंटरनेट, वेबसाईट हाताळताना सावधानता आवश्यक

मुंबई दि २७:- सध्या लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात आपली फसवणूक होऊ नये यासाठी सर्वांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केले आहे. अनेक जण बऱ्याचदा चुकून किंवा अन्य कुतूहलापोटी पोर्नोग्राफिक वेबसाईटवर क्लिक करतात व कालांतराने त्यांना एक मेसेज वा धमकीवजा ई-मेल येतो की, ज्यात … Read more

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यात डॉक्टरच कोरोना बाधित

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी परिसरात एका डॉक्टरच कोरोना बाधित झाल्याचे लक्षात आला आहे. या डॉक्टरांना नाशिक येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट संगमनेर प्रशासनाला आज दि. 27 रोजी प्राप्त झाला आहे. त्यामुळे, शहरात पुन्हा प्रशासनाने सावध भुमिका घेतली असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आता शोध सुरु केला आहे. या … Read more

लॉकडाऊनच्या काळात ४३३ सायबर गुन्हे दाखल; २३४ जणांना अटक

मुंबई दि.२७-लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबरसंदर्भात ४३३  गुन्हे दाखल झाले असून २३४ व्यक्तींना अटक केली आहे़, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली. राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४३३ गुन्ह्यांची (ज्यापैकी २६ N.C आहेत) … Read more

पावसाळा सुरु होण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांची कापूस खरेदी करा

वर्धा : आणीबाणीच्या  काळात शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण शासन अवलंबित असून लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा बराच कापूस शिल्लक राहिलेला आहे. हा सर्व कापूस पावसाळा सुरु होण्यापुर्वी विक्री होणे आवश्यक आहे. यासाठी कापूस खरेदी केंद्राने रोज किमान १०० शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा. पणन महासंघाने ग्रेडर उपलब्धता वाढवून संकलन केंद्रावर असलेल्या कापूस गाठी व सरकीची उचल करावी, अशा सूचना पालकमंत्री … Read more

महाराष्ट्रातून ६९६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय कामगार स्वतःच्या राज्यात

मुंबई दि.२७- महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई मध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दि.२७ मे पर्यंत जवळपास ९ लाख ८२  हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले.  यासाठी ६९६ विशेष श्रमिक ट्रेन  महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. विविध राज्यात गेलेल्या विशेष श्रमिक ट्रेन … Read more

मजूरांना रोहयोची कामे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा

यवतमाळ : अडकलेल्या नागरिकांना स्वगृही जाण्याची परवानगी मिळाल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरिक आले आहेत. यात मजूरांचाही समावेश आहे. ‘ मागेल त्याला काम’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तसेच बाहेरून आलेल्या मजूरांना रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी आतापासून योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मग्रारोहयोच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. … Read more

खते, बियाणे थेट बांधावर उपलब्ध करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अकोला –  खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात खते, बियाणे व अन्य कृषी निविष्ठांची उपलब्धता करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधापर्यंत ह्या निविष्ठा पोहोच करण्यासाठी शेतकरी गटांमार्फत यंत्रणेने पोहोच करुन द्यावी,  शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत बियाणे खतांची कमतरता भासू देऊ नका, असे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यंत्रणेला दिले. अकोला येथे खरीप हंगाम २०२० च्या विभागीय जिल्हा … Read more

कृषी निविष्ठा थेट बांधावर

अकोला – कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अकोला अंतर्गत कोरोना विषाणूच्या संकटकाळी ‘कृषी विभाग थेट शेतकऱ्यांच्या दारी’ या ब्रीद वाक्यानुसार,  शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे कृषी निविष्ठा थेट पुरवठा बाबत खते व बियाणे वाटप राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कृषी  निविष्ठा वाहनास कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे कृषी निविष्ठा थेट पुरवठा … Read more

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख १५ हजार गुन्हे दाखल

मुंबई दि.२७- राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २५४ घटना घडल्या. त्यात ८३३ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २६ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख १५ हजार ७२३ गुन्हे नोंद … Read more

राज्यात मे महिन्यात आतापर्यंत २८ लाख ३७ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

मुंबई,दि.२७ :-  राज्यात १ ते २६ मे पर्यंत ८३० शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे २८ लाख ३७ हजार ७९४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून १ ते २६ मेपर्यंत  राज्यातील १ कोटी ४६ लाख १५ हजार १७० शिधापत्रिका धारकांना ६७ लाख ४५ हजार ४००  क्विंटल … Read more