खत टाकण्यावरुन भावाने फोडले भावाचेच डोके !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील शेतकरी ज्ञानेश्वर रावसाहेब यादव , वय ४० धंदा शेती हे त्यांच्या शेतात खत टाकण्यासाठी ट्रॅक्टर घेवून आले तेव्हा दोघा आरोपींनी शेतात खत टाकायचे नाही , असे म्हणत विरोध केला. तेव्हा शेत आमचे आहे मी खत टाकणार , असे म्हटल्याने ज्ञानेश्वर रावसाहेब यादव यांना लाकडी … Read more

गर्भपात कर म्हणत विवाहितेचा छळ

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर परिसरात सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी मुस्कान रेहान शेख , वय २० हिचा सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी माहेरुन क्रूझर गाडी घेण्यासाठी १ लाख रुपये घेवून ये तसेच गर्भपात केला तरच तुला घरात घेऊ , अशी धमकी देवून तिचा नवरा आरोपी रेहान शेख याचे बाहेरख्याली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नवरा दारू पिल्यामुळे पत्नीने मुलांसह घेतले विष !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- दारूची दुकाने सुरू झाल्यानंतर नगरमध्ये तुफान दारूविक्री झाली. परंतु केडगावमध्ये एका रिक्षाचालकाने दारु पिल्याने त्याच्या पत्नीने मुलांसह विष प्राशन केले. सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. या महिलेची प्रकृती गंभीर असून मुलांची प्रकृती सुधारत आहे. केडगावच्या एकनाथ नगर येथील एका रिक्षाचालकाने मंगळवारी रात्री मद्यपान केले. त्यानंतर भाजी करण्यावरून त्याचा … Read more

‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस्’!

जळगाव (जिमाका) दि. 6 : ‘बठ्ठा, डॉक्टर मना मायबाप शेतस्’! अशा शब्दात कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंगसे, ता. अमळनेर येथील 60 वर्षीय महिलेचे 14 दिवसांच्या उपचाराअंती शेवटचे दोनही अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना आज घरी पाठविण्यात आले. कोरोनावर मात करणाऱ्या त्या जिल्ह्यातील दुसऱ्या तर पहिल्याच महिला रुग्ण ठरल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुंगसे … Read more

राज्यात केवळ दोन दिवसात कोरोनाचे ७०० रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. ६: राज्यात गेल्या दोन दिवसात कोरोनाच्या सुमारे ७०० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० आणि ३५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दोन दिवस एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असून सुमारे सव्वा महिन्यात २८१९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात ९ मार्चला पहिले रुग्ण आढळून आल्यानंतर २५ … Read more

राज्यात आयसीयू बेड्सची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावी

मुंबई दि ६: गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करीत असून विविध उपाययोजना करीत या साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेगही लक्षणीयरित्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे मात्र नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य शासनाने रेल्वे, मुंबई पोर्ट … Read more

धक्कादायक : राज्यात आज १२३३ कोरोना रुग्ण आढळले वाचा काय आहे तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. आज १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. Maha Info Corona Website आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ … Read more

पुणे विभागातील ६७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे : विभागातील ६७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २ हजार ५७४ झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण १ हजार ७६४ आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण १३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ९३ रुग्ण  गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. यापैकी पुणे जिल्ह्यातील २ हजार २८७ बाधित रुग्ण असून ६०८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन … Read more

अहमदनगर मधील ‘तो’ भाग हॉटस्पॉट केंद्र जाहीर , प्रतिबंधाची मुदत आता 10 मेपर्यंत वाढवली !

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- जामखेड शहर हे यापूर्वीच हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तू विक्री इत्‍यादी दि. 6 मे 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यत बंद ठेवण्‍याबाबत आदेश देण्‍यात आले होते. दिनांक 26 एप्रिल रोजी … Read more

बोगस बियाणे, खते व कीटकनाशक कंपन्यावर कारवाई करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

भंडारा : शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन काही कंपन्या  बोगस बियाणे देतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊन नुकसान सहन करावे लागते. अशा बोगस बियाण्यांच्या कंपन्यांवर कृषी विभागाने  तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. शेतकऱ्यांना योग्य उत्पादनक्षम बियाणे, खते व कीटकनाशके देऊन त्यांना मदत करण्याचे दायित्व कृषी विभागाचे आहे. शेतकऱ्यांचे … Read more

सध्याच्या संकटकाळात तथागत गौतम बुद्धांची शिकवण अंगीकारणे गरजेचे

अमरावती, दि. 6 : तथागत गौतम बुद्ध यांनी समस्त जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश दिला. सध्याच्या काळात जगापुढे कोरोनाचे महासंकट उभे राहिले असताना मानवजातीच्या हितासाठी  सर्वांनीच शिस्त, संयम, धैर्य याचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांचे विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी … Read more

सहकारी संस्थांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रु.२५ कोटीची भरीव आर्थिक मदत

मुंबई, दि. ६ कोविड – १९  या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाय योजना करत आहे. राज्यातील सहकारी संस्थांनी आतापर्यत २५ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊन भरीव आर्थिक मदत केली आहे.  सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून राज्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करावी, असे आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. श्री.पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सहाय्यता … Read more

शिर्डी ​ येथून विशेष रेल्वेने १२५१ प्रवासी लखीमपूरकडे रवाना

 शिर्डी,दि.6: कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे शिर्डी आणि परिसरात अडकून पडलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील 1251 कामगार व त्यांचे कुटुंबीय यांना आज दुपारी शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने टाळयांच्या गजरात उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्हयाकडे रवाना करण्यात आले. गुरुवारी, दिनांक 7 मे रोजी सायंकाळी सात वाजेपर्यत सदरहू रेल्वे लखीमपूर येथे पोहोचेल. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने … Read more

विद्यार्थ्यांना स्वगृही परतण्यासाठी शासन मदत करणार

चंद्रपूर, दि. 6  : लॉकडाऊन मध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात विशेषत: मुंबई-पुणे व अन्य प्रमुख शहरात हजारो विद्यार्थी अडकून आहेत. या विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये पोचविण्याची व्यवस्था राज्य शासन करणार आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार … Read more

उपाययोजनांमध्ये अधिक सुसूत्रता आणा

सोलापूर दि. 6 : सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी  उपाययोजनांमध्ये अधिक सुसूत्रता आणा,  अशा सूचना  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज  येथे दिल्या. सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांचा डॉ. म्हैसेकर यांनी आज आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी या सूचना दिल्या. शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, … Read more

श्रमिक ट्रेनला पालकमंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी

वर्धा :  लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यात बिहारमधील ७०० मजूर अडकले होते. या मजुरांना घेऊन जाणारी विशेष श्रमिक ट्रेन वर्धेतून पाठवण्यासाठी रवाना झाली. या ट्रेनमध्ये एकूण १ हजार १९ प्रवासी होते. पालकमंत्री सुनील केदार,  खासदार रामदास तडस, आमदार रणजीत कांबळे  यांनी ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून मजुरांना टाळ्यांच्या कडकडाटात  निरोप दिला. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी देशात व राज्यात लॉकडाऊन झाल्यामुळे … Read more

अडीच हजार नागरिक विशेष रेल्वेने उत्तर भारताकडे रवाना

नंदुरबार : सतत दुसऱ्या दिवशी प्रशासनातर्फे बिहारला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. या गाड्यांनी अररिया येथे १२१० आणि पुर्णिया येथे १२९० नागरिक आपल्या गावाकडे रवाना झाले. कालप्रमाणेच आजही चोख पोलीस बंदोबस्तात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बियरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात, तळीरामांची चांदी झाली

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- राहुरी तालुक्यातील गुहा येथे बियरची वाहतूक करणारा टेम्पो पलटी झाला आहे.रांगा लावून दारू घ्यावी लागत असताना राहुरीच्या तळीरामांची चांदी झाली आहे. राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात नगर मनमाड मार्गावर बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बियरची वाहतूक  करणारा  आयशर टेम्पो पलटी झाल्याने तळीरामांची चंगळ झाली. वेळीचपोलिस दाखल झाल्याने बियर मिळण्या ऐवजी … Read more