सहा महिन्यांत वाळूतस्करांकडून एक कोटीचा ऐवज जप्त !

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- सहा ते सात महिन्यात अकोले पोलीस ठाण्याने अवैध वाळूउपसा करणाऱ्या १८ तस्करांवर कारवाई करीत सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिन्यात या कारवाया करण्यात आल्या. या मध्ये ४२ हजार रुपयांच्या वाळूसह ९५ लाखापेक्षा जास्त किमतीची वाळू वाहतूक करणारी … Read more

अतिशय सावधतेने पाऊले टाकणार- मुख्यमंत्री

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली असून टाळेबंदीसंदर्भात ३ मे नंतर काय करायचे याचा निर्णय परिस्थिती पाहून अतिशय सावधतेने, सतर्कता बाळगून करावा लागणार आहे. रेड झोन मध्ये आता मोकळीक देणे राज्याच्या हिताचे नाही, रेड झोन मधील नियम अधिक कडकपणे पाळावे लागतील परंतू … Read more

भीषण अपघातात वाघ्या – मुरळी दाम्पत्य जागीच ठार

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इरिकेशन बंगल्याजवळ झालेल्या कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात बिरोबावाडी येथील वाघ्यामुरळी दाम्पत्य जागीच ठार झाले. गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर कारचालक कार सोडून फरार झाला. या अपघाताबाबत माहिती अशी,कार राहुरीफॅक्टरी कडून देवळालीच्या दिशेने भरधाव वेगात जात होती. याचवेळी वाघापुरे हे दाम्पत्य … Read more

हॉटेल सुरू ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत नाशिक-शिर्डी रोडवर असलेल्या सावळिविहीर फाट्याजवळील हॉटेलवर शिर्डी पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत शिर्डी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २९ रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना शिर्डी नाशिक रोडवर … Read more

श्रीगोंदा पोलिसांची अवैध व्यवसायांवर कारवाई

श्रीगोंदा पोलिसांनी बुधवारी दिवसभरात तालुक्यातील वेगवेगळ्या भागात छापे टाकून गावठी दारूनिर्मिती हातभट्ट्या व चोरट्या वाळू वाहतुकीवर कारवाई केली. श्रीगोंदा पोलिसांनी काल दुपारी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास लिंपणगाव शिवारातील हातभट्टीवर कारवाई केली होती. त्यानंतर गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकाने निमगाव खलू शिवारातील भीमानदीच्या काटवनात सुरू असलेल्या हातभट्टीवर दि.२९रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकत त्याठिकाणी तयार … Read more

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

सातारा दि. 1 (जि.मा.का.) : महाराष्ट्र दिनाच्या 60 व्या वर्धापनदिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांगणात  पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी महराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहणा प्रसंगी  गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्राचे … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

अलिबाग, जि.रायगड, दि.1 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाली असून या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे  यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते ध्वजारोहण

बुलडाणा, दि.1 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा अत्यंत साधेपणाने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात 1 मे 2020 रोजी पार पडला.  यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील–भुजबळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन यांची उपस्थिती होती. … Read more

मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न

बीड, दि. १ मे : महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.  यावेळी श्री.मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.  संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करत कामगार चळवळीतील प्रत्येकाच्या योगदानाचेही यावेळी संस्मरण केले. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आजचा समारंभ अत्यंत साधेपणाने … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन

सिंधुदुर्ग, दि. 01  : महाराष्ट्र दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री व मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज ध्वजवंदन … Read more

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई दि 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाले असून या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन केले. या ध्वजारोहण समारंभाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,आमदार भाई … Read more

महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते राजभवनात ध्वजारोहण

मुंबई, दि. १ – महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत झाले व राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहण कार्यक्रमाला राजभवनातील अधिकारी व कर्मचारी, मुंबई पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते. राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांचा संदेश बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या साठाव्या वर्धापन … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे ध्वजारोहण

पुणे,दि.१ : महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६० वर्ष पूर्ण झाले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन कार्यक्रम संपन्न झाला. Maha Info Corona Website जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड चे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, … Read more

परराज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित कामगार, पर्यटक आणि विद्यार्थी लवकरच स्वगृही परतणार

मुंबई,दि.  ३० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परराज्यात अडकलेले विशेषतः आंध्रप्रदेश, तेलंगणात अडकलेले मजूर तसेच राज्यातील विद्यार्थी यांना स्वगृही आणण्यात यावे,  अशी वारंवार मागणी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार  यांनी  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अप्पर मुख्य  सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडे केली होती. तसेच आपत्ती व्यवस्थापन … Read more

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन

मुंबई, दि. 29 : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२०–२१ या चालू आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारीत वेतन न देता त्यांना निश्चित किमान वेतन देण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. गावांमधील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना चालू वर्षी करवसुलीशी निगडीत वेतन न देता किमान वेतन देण्याचा … Read more

पुणे विभागात ३२ हजार ७९१ क्विंटल अन्नधान्याची आवक

पुणे, दि.30 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 32 हजार 791 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 49  क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 2 हजार 418 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक 17 हजार 350 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक … Read more

कामगार नोंदणी नूतनीकरणाची अट शिथील करण्याची वनमंत्री संजय राठोड यांची मागणी

मुंबई  दि. ३० :  यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. यातील बहुतांश बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड १ जून २०१८ पासून नूतनीकरण करण्यात आलेले नाही.  त्यामुळे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या नोंदणी कार्ड  नुतनीकरणाची अट शिथिल करण्यात यावी  व यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम मजुरांना दिलासा द्यावा, अशी विनंती राज्याचे वने, भूकंप पुनर्वसन मंत्री तथा यवतमाळ … Read more

राज्यात आज ५८३ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १० हजार ४९८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. ३० : राज्यात आज कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. आज १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १७७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ८२६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ४५ … Read more