अन्यथा जिनिंगवर कडक कारवाई करा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीच शासनाकडून हमीभाव जाहीर होत असतो. या हमीभावाने शेतमालाची खरेदी हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. शेतकऱ्यांचा कापूस सध्या घरात आहे. या कापसाची तात्काळ खरेदी केली तर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हाती पैसे येतील. त्यामुळे कापूस खरेदी करण्यासाठी जिनिंगला निर्देश देण्यात यावे. अन्यथा चालढकल करणाऱ्या जिनिंगवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी … Read more

कोरोनाच्या प्रभावी उपाययोजनासाठी सहकार्य करा – पालकमंत्री

नागपूर, दि. २९ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून जीवितहानी टाळण्यासाठी कठोर निर्बेंध लागू करण्यात आले आहेत. संकटाच्या या परिस्थितीत सर्व जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. नागपूर शहरातील मुफ्ती, मौलाना, समाजसेवक व बुद्धीजिवी यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते … Read more

कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास बँकांविरूद्ध एफआयआर – पालकमंत्री

अमरावती : खरीप पीक हंगामासाठी शेतकरी बांधवांना पतपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. एकही शेतकरी वंचित राहता कामा नये. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखा. कर्ज मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी आल्यास खपवून घेतले जाणार नाही. कर्जपुरवठ्यात हयगय केल्याचे आढळल्यास बँकांवर एफआयआर दाखल करण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. जिल्हा खरीप हंगाम २०२०-२१ नियोजन बैठक पालकमंत्री श्रीमती … Read more

चित्रपट सृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, इरफान खान यांच्यात गुणी अभिनेत्याबरोबरच उत्तम व्यक्तिमत्व सामावले होते. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड हा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना एक वस्तूपाठ ठरेल असाच आहे. … Read more

तडफदार तरुण नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २९ : नाविद अंतुले यांच्या आकस्मिक  निधनामुळे एक तरुण तडफदार नेतृत्व आपल्यातून गेले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाविद अंतुले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, नाविद यांच्या आकस्मिक निधनाची बातमी कळाली आणि धक्का बसला. वडील माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे पुत्र अशी त्यांची ओळख असली तरी … Read more

अभिनेते इरफान खान रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 29 : अभिनेता इरफान खान यांचं निधन हे भारतीय चित्रपटसृष्टी, कलाजगतासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या अकाली निधनानं एक दमदार अभिनेता, संवेदनशील माणूस, लढाऊ व्यक्तिमत्वं आपण गमावलं आहे. सहजसुलभ अभिनयातून साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांमुळे इरफान खान कायम रसिकांच्या स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली. अभिनेता म्हणून इरफान खान निश्चितच महान … Read more

कोरोनामुक्तीचा अध्याय लिहिला दोन योद्ध्यांनी!

फक्त दहा महिन्याचं बाळ… आज कोरोना मुक्त झालं… त्याला माहितही नसेल तो आज केवढं मोठं संकट लिलया पेलून सुखरूप बाहेर पडला… आई – वडिलांची हिम्मत धरून मागचे दोन आठवडे ज्या धीरोदत्तपणे काढले…  त्यांच्या आनंदाला आज पारावार राहिला नसेल. 12 एप्रिलला 10 महिन्याचे बाळ पॉझिटिव्ह आल्याची बातमी आली.. त्यावेळी जिल्ह्याच्या मनात धस्स झालं… बाळ बरं व्हावं असे … Read more

कोटा येथे अडकलेले २७ विद्यार्थी व ७ पालक सुखरुप परत

अलिबाग, जि. रायगड, दि.28 :  राजस्थान येथील कोटा येथे आय.आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थीही गेले होते. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री कु.आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी … Read more

इरफान खान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

मुंबई, दि. २९ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. इरफान खान यांचे निधन धक्कादायक आहे. इरफान खान हे सामाजिक जाण असणारे प्रतिभावंत कलाकार होते. आपल्या सशक्त अष्टपैलू अभिनयामुळे त्यांनी अनेक चित्रपट तसेच मालिकांमधील भूमिका संस्मरणीय केल्या. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीचे नुकसान झाले आहे. त्यांच्या … Read more

‘हरहुन्नरी’ अभिनेता गमावला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि २९ : एक कलाकार म्हणून प्रत्येक सिनेमात अभिनयाचा दर्जा वाढविणाऱ्या इरफान खान यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने ‘हरहुन्नरी’ अभिनेता गमावला असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली. अमित देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, इरफान खान यांच्या डोळ्यातील चमक, सहज अभिनय, पडद्यावरचा सुंदर वावर यामुळेच त्यांनी प्रत्येक सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली. टि.व्ही पासून … Read more

अहमदनगर मध्ये होतेय चक्क रुग्णवाहिकेतून दारूची विक्री !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- अहमदनगर शहरात लॉकडाऊनमध्ये चक्क रुग्णवाहिकेतून दारूची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  शहरातील सरकारी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या एका ग्णवाहिकेतून दारू जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी कारवाई करून रुग्णवाहिका जप्त केली असून, तिघांना ताब्यात घेतलं आहे.राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू असल्याने दारूची दुकानेही सध्या बंद आहेत. मात्र, छुप्या मार्गानं दारूविक्री सुरूच असल्याच्या … Read more

जीवनावश्यक वस्तुंच्या किराणा किटचे मोफत वाटप

मुंबई, दि. २९ : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ऊसतोडणी करून जिल्ह्यात परतलेल्या मजुरांसाठी महत्त्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून आता जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना २८ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीसाठी म्हणून जीवनावश्यक किराणा साहित्य मोफत वाटप करण्यात येणार आहे. बीड जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून यासाठी प्राथमिक स्वरूपात १ कोटी ४३ लाख रुपये … Read more

माहितीचे संरक्षण, चांगले इंटरनेट नेटवर्क यांच्या पूर्ततेचे मोठे आव्हान – राज्यमंत्री सतेज पाटील

मुंबई, दि. २९ : कोरोनामुळे भविष्यात निदान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तरी घरातूनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) ही नित्याची गोष्ट होवून जाईल. त्यामुळे राज्यातील माहितीचे संरक्षण आणि सुरक्षा, चांगले इंटरनेट नेटवर्क यांची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान असेल. या सर्वांचा विचार करुन यासंदर्भातील पायाभूत सुविधा उभारणे व घरातून काम करण्याच्या नियमांची चौकट तयार करण्यावर भर दिला … Read more

‘या’ कारणामुळे महिलांनी मानले लॉकडाऊनचे आभार

लॉकडाऊनच्या काळात दारू तर नाहीत, तंबाखूही मिळेनासी झाली आहे. त्यामुळे अनेक व्यसनाधीन लोक निर्वसनी बनले आहेत. त्यामुळे हौशी लोकं नाराज असले, तरी त्यांच्या घरचे मात्र निवांत झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये स्टॉकवाल्याची मजा तर घेणारांच्या खिशाला सजा, अशी परिस्थिती आहे. तल्लफ महागल्याने व्यसनामुळे जोडल्या गेलेल्या मैत्रीच्या अतूट गट्टीत तंबाखूचा विडा, मद्याचा पेला, सिगारेटचा झुरका, गुटख्याची पुडी, माव्याचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जुगार खेळताना १३ जण पकडले

अकोले तालुक्यातील बेलापूर येथे तिरट नावाचा जुगार खेळताना १३ जण आढळून आले. दोन चारचाकी व नऊ मोटरसायकल असा ५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल अकोले पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबतची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, अकोले तालुक्यातील बेलापूर (भोसलदरा) गावात पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, उपनिरीक्षक दिपक ढोमणे, पोलीस नाईक विठ्ठल शरमाळे, कॉन्स्टेबल कुलदीप परबत यांच्या पथकाने … Read more

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करण्याची मागणी

महाविद्यालयात प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मागील सत्रातील गुणांच्या सरासरीतून थेट पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा, तसेच त्यांची परीक्षा फी परत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश गोंदकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पाठविलेल्या पत्रात प्रकाश गोंदकर यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे देशापुढे मोठे संकट उद्भवले … Read more

कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष काम करा – जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी फक्त कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष काम करावे, अशी तंबी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे. नेवासा तालुक्याची खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक ना. गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी बी-बियाणे, खते, पीक विमासह कृषी क्षेत्रातील विविध योजनांचा आढावा घेतला. बी-बियाणे, … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्‍हयातील सर्व भाजीपाला बाजार ‘तो’ पर्यंत राहणार बंदच !

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून जिल्‍हयातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी जिल्‍हयातील सर्व भाजीपाला बाजार दिनांक ०३ मेपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.तसेच भाजीपाला विक्री करणारे लोकांना फेरीद्वारे किंवा एखाद्या ठिकाणी बसून (फक्‍त एकाच भाजीपाला विकेत्‍यास गर्दी … Read more