धक्कादायक : शेतकऱ्याची गोळी घालून हत्या !

उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील भूपगढी गावात शुक्रवारी सकाळी शेतीच्या वादातून शेतकऱयाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली. शेतीच्या वादातून शेजारी राहणाऱ्या पिता पुत्रांनी या शेतकऱ्याची गोळी झाडून हत्या केली. हत्येची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. भूपगढी येथील 52 वर्षीय संजय पुत्र कृष्णपाल शुक्रवारी सकाळी गावाबाहेर आपल्या … Read more

चुकीच्या राजकीय निर्णयामुळे श्रीरामपूरकर हवालदिल !

अहमदनगर Live24 :- करोनाच्या संकटकाळात गोरगरिबांचे हाल होत असताना श्रीरामपूर मतदारसंघाचे नेतृत्व आधार देण्याऐवजी लोकांकडून सामान गोळा करून स्वतःचे स्टिकर लावण्यात व्यस्त आहे. या मतदारसंघात झालेल्या चुकीच्या राजकीय निर्णयामुळे नागरिकांना हवालदिल होण्याची वेळ आल्याचा आरोप भाजयुमोचे सरचिटणीस अक्षय वर्पे यांनी केला आहे. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. वर्पे म्हणाले, वाढत्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे दोन वेळच्या जेवणाचे … Read more

पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई दि २६ : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील दोन पोलीस बांधवांचा मृत्यू झाला, ही अत्यंत दुःखद व दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्र शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दोघांच्याही कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत व योग्य ती शासकीय नोकरी तसेच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल. पोलिसांना तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष … Read more

कोरोना अनुमानित तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर Live24 :- सांगलीमध्ये कोरोना अनुमानित तरुणाने सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ उडाली. संबंधित तरुणाची मन:स्थिती ठीक नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिली. सांगलीच्या कुपवाड रोडवरील लक्ष्मीनगरच्या एका ३० वर्षीय तरुणावर कोरोना अनुमानित म्हणून सातारा जिल्हा रुग्णालयातील क्वॉरंटाइन वॉर्डमध्ये काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी साडेबाराच्या … Read more

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज

अहमदनगर, दि. २६ : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस विभागाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कौतुकास्पद आहे. त्यामुळे आपण रुग्णांपर्यंत पोहोचू शकलो, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. औरंगाबादहून मुंबईकडे जाताना श्री.टोपे हे नगरमध्ये थांबले होते. येथेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या … Read more

सावधान ! विनाकारण फिरणाऱ्यांची रुग्णालयात रवानगी …

अहमदनगर Live24 : पहिल्यांदा दांडक्याचा प्रसाद, त्यानंतर दंडात्मक कारवाई, भररस्त्यात उठबशा आदी मार्गांचा अवलंब केल्यानंतरही विनाकारण फिरणाऱ्यांना लगाम बसत नसल्याने अखेर शिर्डी पोलिस व वाहतूक शाखेने संयुक्त मोहीम हाती घेत दंडात्मक कारवाई करतानाच संबंधितांना रुग्णवाहिकेत टाकून आरोग्य तपासणीसाठी साई संस्थानच्या रुग्णालयात पाठवले. या कारवाईचा शहरात मोकाट फिरणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. काहीजण विनाकारण फिरत असल्याने … Read more

कोरोनाचा मुकाबला : अहमदनगर जिल्ह्याचे काम चांगले …वाचा काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे

अहमदनगर :- कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलिस विभागाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कौतुकास्पद आहे. त्यामुळे आपण रुग्णांपर्यंत पोहोचू शकलो, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. औरंगाबादहून मुंबईकडे जाताना मंत्री टोपे हे नगरमध्ये थांबले होते. येथेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हिडिओ … Read more

मालेगावातील एकाच वेळी तीन रुग्णांची कोरोनामुक्ती दिलासादायक – कृषिमंत्री दादाजी भुसे

मालेगाव, दि. २६ : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील मन्सुरा रुग्णालयातील तीन कोरोनाबाधित रुग्ण हे उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा देवून आज घरी सोडण्यात आले, मालेगाव शहरातून प्रथमच एकाच वेळी तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांचा आरोग्य प्रशासनावरील विश्वास वाढून नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. ​मन्सुरा हॉस्पिटलमधून … Read more

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध – आरोग्यमंत्री

औरंगाबाद, दि. 26 (जिमाका) : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. सर्व यंत्रणांच्या सहाय्याने ह्या परिस्थितीचा सामना करणे गरजेचे आहे.  औरंगाबाद शहरातील सध्या असलेल्या कंटेटमेंट झोन परिसरातील आरोग्य विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना PPE kit (personal Protection Equipment) अधिकाधिक उपलब्ध करून देण्यात … Read more

जाणून घ्या राज्यासह तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स

मुंबई :- आज राज्यात कोरोनाबाधीत ४४० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८०६८ झाली आहे. आज ११२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६५३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख १६ हजार ३४५ नमुन्यांपैकी … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांना श्रद्धांजली

मुंबई दि. २६ : समाजातील उपेक्षित, वंचित वर्गाच्या वेदनांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे केले. त्यांच्या निधनाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा साहित्यिक वारसा पुढे नेणारा महान साहित्यिक हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तम तुपे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात … Read more

अहमदनगरकर आता तरी सावध व्हा : फक्त एका व्यक्तीमुळे दहा जणांना झालाय कोरोना !

अहमदनगर : कोरोनाचा सामुदायिक प्रसार कसा झपाट्याने होऊ शकतो, याचे उदाहरण जामखेडमध्ये पहायला मिळाले आहे. जामखेड तालुक्यात एका बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दहा जणांना लागण झाल्याचे आतापर्यंत उघड झाले आहे.  एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे जामखेडमध्ये तबलिगी लोकांमुळे प्रथम करोनाचा शिरकाव झाला. सुरुवातीच्या टप्प्यातील रुग्ण बरे होऊन घरी गेले. मात्र, … Read more

मालेगावातील एकाच वेळी तीन रुग्णांची कोरोनामुक्ती

 मालेगाव येथील मन्सुरा रुग्णालयातील तीन कोरोना बाधित रुग्ण हे उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा देवून आज घरी सोडण्यात आले, मालेगाव शहरातून प्रथमच एकाच वेळी तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांचा आरोग्य प्रशासनावरील विश्वास वाढुन नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. मन्सुरा हॉस्पिटल … Read more

राज्यात ६५ लाख ९५ हजार ४८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई, दि. 26 : राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 26 एप्रिल 2020 या सव्वीस दिवसात राज्यातील 1 कोटी 53 लाख 64 हजार 769 शिधापत्रिकाधारकांना तब्बल 65 लाख 55 हजार 480 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली … Read more

महात्मा बसवेश्वर यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. २६ : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी पुष्पहार अर्पण करुन मंत्रालयात आज अभिवादन केले. यावेळी सचिव अंशु सिन्हा, उपसचिव नितीन खेडकर, अवर सचिव महेश वाव्हळ यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यांनीही अभिवादन केले.

अहमदनगर ब्रेकिंग : सारीसदृश आजाराने एकाचा मृत्यू

अहमदनगर :- पारनेर तालुक्यातील हंगे येथील शेतमजुराचा काल सारीसदृश आजाराने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गणेश वासू (मूळ रा. वाशिम) असे मृत्यू झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. नगर येथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. पारनेर तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. मात्र, तालुक्यात सारीचा प्रवेश झाला आहे. मूकबधिर असलेला गणेश वासू हा आजारी पडल्याने त्याला पारनेर येथील ग्रामीण रूग्णालयात … Read more

३ मे नंतर लॉकडाऊनचे काय होणार ? पहा काय म्हणाले मुख्यमंत्री …

मुंबई, दि. २६ : ३ मे नंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. उद्या (सोमवारी) पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्येदेखील यादृष्टीने चर्चा होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्वधर्मियांनी देशाप्रती कर्तव्य आणि माणुसकीची भावना दाखवून जो संयम पाळला तसाच तो पुढे देखील पाळला तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्चित जिंकूत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी … Read more

महात्मा बसवेश्वरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

मुंबई, दि २६ : लोकशाही मुल्यांचे अग्रणी पुरस्कर्ते, जाती अंतासाठी, स्त्री उत्थानासाठी आणि कर्मकांड विरहित समाज निर्मितीसाठी आयुष्य वेचणारे महात्मा बसवेश्वर यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले. तसेच अक्षय्यतृतीयेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री श्री.ठाकरे संदेशात म्हणतात, महात्मा बसवेश्वर यांनी अनुभवमंटप संकल्पनेतून लोकशाही मुल्यांना अधिष्ठान प्राप्त करून दिले. समाज कर्मकांड विरहित असावा. स्त्रियांनाही बरोबरीचे … Read more