‘हे’ नऊ राज्य झाले संक्रमण मुक्त 

नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. या लढाईत भारताला मोठं यश आलं आहे. देशातली ९ राज्य आणि केंद्र शासित प्रदेश कोरोना संक्रमणातून मुक्त झाले आहेत. त्रिपुरा, गोवा, अरुणाचल प्रदेश, मणीपूर, नागालँड, सिक्कीम, दीव-दमण, दादरा नगर हवेली आणि लक्षद्वीप हे भाग कोरोनामुक्त झाले आहे. या भागामध्ये आता कोरोनाचा एकही रुग्ण नाही. जगाच्या तुलनेत … Read more

BS-6 महिंद्रा स्कॉर्पियोचे करा बुकिंग अवघ्या 5 हजार रुपयांमध्ये

बहुप्रतिक्षेनंतर महिंद्राच्या लोकप्रिय एसयूव्ही स्कॉर्पियोच्या बीएस-6 मॉडेलचे ऑनलाईन बुकिंग सुरू झाले असून अवघ्या 5 हजार रुपयांमध्ये कंपनीच्या वेबसाईटद्वारे बुकिंग करता येणार आहे. या व्यतिरिक्त कंपनी महिंद्रा एक्सयूव्ही 500, बोलेरो, केयूव्ही100 एनएक्सटी आणि अल्ट्रास जी 4 च्या बीएस-6 मॉडेल्सची बुकिंग सुरू केली आहे. महिंद्राने नवीन बीएस-6 स्कॉर्पियोची माहिती वेबसाईटवर दिली आहे. मात्र अद्याप किंमतीचा खुलासा केलेला … Read more

पुरुषांच्या बाबतीत राष्ट्रीय गुन्हे विभागाने दिली ‘ही’ धक्कादायक माहिती 

नवी दिल्ली : राज्यात महिलांच्या आत्महत्येचे प्रमाण असले तरी राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने नुकतीच विवाहित पुरुषांच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आणली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की महिलांच्या तुलनेत विवाहित पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट आहे.  तसेच  पत्नीचा मृत्यू झाल्यास किंवा तिच्यापासून घटस्फोट झाल्यास पुरुषांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण बरेच कमी झाले असल्याचे या अहवालात नमूद आहे. … Read more

महाराष्ट्राच्या आर्थिक पॅकेजसंदर्भात  खा. शरद पवारांनी केली ही मागणी 

मुंबईः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. यासाठी महाराष्ट्राला आर्थिक मदत देण्याची मागणी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्र सरकारने सध्याच्या संकटाच्या काळात आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी केंद्राकडे अतिरिक्त अनुदानाची विनंती केली आहे. याचा विचार होण्याची गरज आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं … Read more

मुंबईचे पोट भरणाऱ्या डब्बेवाल्यांवर उपासमारीची वेळ

मुंबई : आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईचे श्वास असणारे डब्बेवाले बाराही महिने आपली सेवा देत पोट भरत असतात. अविरत सेवेद्वारे मुंबईकरांना ऊर्जा देण्याचे काम करण्याऱ्या डब्बेवाल्यांवर लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे उपासमारीची वेळ अली आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचे पगार झाले नाहीत. काही प्रमाणात डब्बेवाले गावी गेले आहेत. परंतु, काही डब्बेवाले मात्र मुंबईत अडकून पडले आहेत. त्यामुळे अडकून पडलेल्या डबेवाल्यांची … Read more

प्रत्येक वेळी कोरोना बदलवतोय रूप; शास्त्रज्ञांपुढे आव्हान

नवी दिल्ली :- चीनमध्ये उद्रेक झालेल्या कोरोनाव्हायरसने संपूर्ण जगाला आपले लक्ष्य केले आहे. या व्हायरसवर वॅक्सीन शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. परंतु या 3-4 महिन्यांत या विषाणूने आपले स्वरूप खूप वेळा बदललेले दिसून येत आहे. त्यामुळे शास्त्रज्ञही चिंतेत पडले आहेत. अमेरिकेतल्या एका अभ्यासानुसार कोविड-19 हा आजार वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतो. सुरुवातीला फक्त … Read more

केस कापल्याने 6 जणांना कोरोनाची लागण

देशभरात कोरोनाने थैमान घालायला सुरवात केली आहे. व्हायरसचा संसर्ग वेगानं वाढत असून विविध माध्यमातून त्याची लागण होताना दिसत आहे. राजस्थानमध्ये एटीएममधून कोरोनाचं संक्रमण झाल्याची घटना ताजी असतानाच आता सलूनमधून कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बडगावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनाच्या काळात सलूनमध्ये जाऊन केस कापल्याने 6 जणांना … Read more

आता केवळ चेहरा पाहूनच होणार कोरोनाची तपासणी

एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही यासाठी सार्वजनिक ठिकाणी सुरुवातीला त्या व्यक्तीचं तापमान तपासलं जातं. परंतु यात एखादा धोका असा असतो कि, एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित असेल तर ताप तपासणाऱ्या व्यक्तीलाही त्याची लागण होण्याचा धोका असतो. परंतु शास्त्रज्ञांनी आता यावरही उपाय शोधला आहे. आता केवळ चेहरा पाहून ताप आहे किंवा नाही हे समजणार … Read more

कोरोनाशी लढत मृत्यूलाही हरवले; घरच्यांनी केली होती अंत्यसंस्काराची तयारी

कोरोनाने सध्या अमेरिकेत हाहाकार माजवला आहे. परंतु काही सकारत्मक गोष्टीही त्याठिकाणी घडत आहे, 29 वर्षांचा एका तरुणाने कोरोनाशी कडवी झुंज देत मृत्यूच्या दारातून माघारी आल्याची घटना घडली आहे. हा तरुण कोव्हिड पॉझिटिव्ह निघाला. 8 दिवस तो व्हेंटिलेटरवर असल्याने घरच्यांनी आशा सोडली होती. परंतु अशा परिस्थितीतून कोरोनाशी यशस्वी लढा देत तो ठीक झाला आहे. प्लाझ्मा थेरेपीसाठी … Read more

धक्कादायक! आधी चिरला बापाचा गळा नंतर दातानं तोडलं गुप्तांग

नागपूर: हुडकेश्वरमधील नंदलाल चौकातील विघ्नहर्ता कॉलनी मध्ये शनिवारी रात्री धक्कादायक प्रकार घडला. २८ वर्षीय मुलाने बापाचा धारदार चाकूने गळा चिरून खून केला. एवढ्यावरच न थांबता त्याने दाताने वडिलांचे गुप्तांगही तोडले. इंजेक्शन आणि स्टेरॉइड पावडर न मिळाल्याने मुलाने असे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. विजय पिल्लेवार (वय ५६) असे मृताचे, तर रोहित ऊर्फ विक्रांत पिल्लेवार … Read more

कोरोनाचा जामखेडमध्ये धुमाकूळ, कर्जत तालुक्यास धोका

अहमदनगर Live24 :- कर्जत आणि जामखेड यांचा पूर्ण संपर्क तोडण्यात यावा, नगर-कर्जत संपर्काचे प्रमाण वाढत असल्याने कर्जत तालुक्यास करोनाचा धोका संभवतो आहे. याची दखल प्रशासनाने तातडीने घ्यावी, असी मागणी जोर धरू लागली आहे. कर्जत तालुक्याच्या सर्वात जवळचा तालुका जामखेड आहे. या दोन्ही तालुक्यांचा मिळून एक विधानसभा मतदारसंघ आहे. करोना आजाराने जामखेडमध्ये धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील … Read more

धक्कादायक : सर्व्हेत आढळले ‘सारी’चे दोन रुग्ण !

अहमदनगर Live24 :- नेवासा तालुक्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेवासा नगरपंचायत व तालुक्यातील 130 गावांची घरोघर तपासणी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तीन लाखांहून अधिक नागरिकांचा सर्व्हे झाला आहे. या तपासणीत सारीचे दोन संशयित तर करोनाचा प्रादुर्भाव असल्याचे कोणीही आढळून आलेले नाही. तालुक्याची आरोग्य तपासणीची पहिली फेरी उद्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी … Read more

कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरास सोसायटीत नाकारला प्रवेश; गुन्हा दाखल

कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या एका महिला डॉक्टरला निवासी अपार्टमेंट सोसायटीतील काही नागरिकांनी सोसायटीत प्रवेश नाकारल्याची घटना घडली आहे. ही महिला तिच्या भावास भेटण्यासाठी सोसायटीत गेली होती. ही महिला डॉक्टर हैदराबादमधील कोविड -१९ रुग्णालयात कार्यरत आहे. या लोकांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत महिला डॉक्टरने असा दावा केला आहे की, बुधवारी अपार्टमेंट रेसिडेन्ट असोसिएशनच्या … Read more

कोरोना:मृत्यूआधी ‘त्याने’ पत्नीसाठी लिहिले काळीज पिळवटून टाकणारे पत्र

कोरोना आजाराने मृत्यू होण्याआधी, एका 32 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीला आणि मुलांना एक काळीज पिळवटून टाकणारे पत्र लिहिले होते. या युवकाच्या मृत्यूनंतर जेव्हा पत्नी पतीचे सामान चेक करत होती तेव्हा तिला मोबाइल फोनमध्ये त्याने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीमध्ये त्याने लिहिले होते, ‘मी तुम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करतो. तू मला उत्तम आयुष्य दिलेस मी खूप … Read more

आमदार ऐन संकटात नागरिकांना वार्‍यावर सोडून निघून गेल्याने गोरगरीब हवालदिल

अहमदनगर Live24 :- कोणीही उपाशी राहणार नाही, अशी गर्जना करणार्‍या आमदार लहू कानडे यांचा दावा खोटा ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदारांचे श्रीरामपूर संपर्क कार्यालय व निवासस्थान बंद असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भैया भिसे यांनी केला आहे. भिसे म्हणाले की, करोनाच्या संकटाने गोरगरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत आमदार लहू कानडे यांनी दानशूर संस्था, … Read more

व्होडा-आयडियाच्या ‘या’ प्रोग्रॅम मध्ये दरमहा 5 हजार कमविण्याची संधी

व्होडाफोन- आयडिया आणि पेटीएम यांनी नवीन प्रीपेड वापरकर्त्यांसाठी ‘रिचार्ज साथी’ प्रोग्रॅम  सुरू केला आहे. या प्रोग्रॅममुळे वापरकर्त्यांना आणि छोट्या व्यापाऱ्यांना  महिन्याला ५ हजार रुपयांपर्यंत कमाई करता येऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे. या प्रोग्रॅमच्या साहाय्याने कोणताही पेटीएम ग्राहक आयडिया वोडाफोनचे रिचार्ज करू शकतो आणि पैसे कमावू शकतो. युजर्सने केवळ पेटीएम अ‍ॅप डाउनलोड करून, नोंदणी … Read more

धक्कादायक : शेतकऱ्याची गोळी घालून हत्या !

उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यातील भूपगढी गावात शुक्रवारी सकाळी शेतीच्या वादातून शेतकऱयाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली. शेतीच्या वादातून शेजारी राहणाऱ्या पिता पुत्रांनी या शेतकऱ्याची गोळी झाडून हत्या केली. हत्येची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. भूपगढी येथील 52 वर्षीय संजय पुत्र कृष्णपाल शुक्रवारी सकाळी गावाबाहेर आपल्या … Read more

चुकीच्या राजकीय निर्णयामुळे श्रीरामपूरकर हवालदिल !

अहमदनगर Live24 :- करोनाच्या संकटकाळात गोरगरिबांचे हाल होत असताना श्रीरामपूर मतदारसंघाचे नेतृत्व आधार देण्याऐवजी लोकांकडून सामान गोळा करून स्वतःचे स्टिकर लावण्यात व्यस्त आहे. या मतदारसंघात झालेल्या चुकीच्या राजकीय निर्णयामुळे नागरिकांना हवालदिल होण्याची वेळ आल्याचा आरोप भाजयुमोचे सरचिटणीस अक्षय वर्पे यांनी केला आहे. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. वर्पे म्हणाले, वाढत्या लॉकडाऊनमुळे नागरिकांचे दोन वेळच्या जेवणाचे … Read more