अहमदनगर ब्रेकिंग : पोटच्या मुलीवर बापाने केला बलात्कार; पोलिसांनी केली अटक !

अहमदनगर : जन्मदाता बापानेच स्वताच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास सुरु आहे आरोपीची पत्नी आणि मुलगा शेजारी मामाच्या घरी गेले असताना रात्री घरी असणारी १५ वर्षाची पोटची पोरगी एकटी पाहून ३५ वर्षाच्या नराधम बापाने तिच्यावर अमानुष पणे दोन वेळा बलात्कार केला. सकाळी तिची … Read more

महाराष्ट्रात जिल्हांतर्गत हालचालींना सुरुवात … वाचा काय म्हणाले उद्धव ठाकरे Live Updates

महाराष्ट्रात 1 लाख 8972 चाचण्या, त्यापैकी 1 लाख 1162 नमुने निगेटिव्ह आले आहेत वरळीतील परिस्थिती हाताळल्याबद्दल केंद्राकडून कौतुक मुंबईत कंन्टोन्मेंट झोन कमी होत आहेत कोरोनाग्रस्तांसाठी मुंबईत ठिकठिकाणी केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यासाठी खासगी दवाखाने, डॉक्टर यांना सरकारकडून पूर्ण मदत मिळेल कोरोना नसणाऱ्यांची गैरसोय होत आहे सर्व वयाचे कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होत आहेत. पण त्यासाठी लवकरात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी 3 कोरोना रुग्ण वाढले जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या @43

अहमदनगर :- जामखेड येथील कोरोना रुग्णाच्या संख्येत आज आणखी ०३ व्यक्तींची भर पडली. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दोन पुरुष तर एक महिला आहे. त्यामुळे एकट्या जामखेड शहरातील बाधीत रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे तर जिल्ह्यातील बाधीतांची संख्या ४३ झाली आहे. नागरिकांनी विनाकारण … Read more

झाडावर आढळला मृत बिबट्या !

सोनई :- बेल्हेकरवाडी येथे शनिवारी सकाळी एका शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास झाडावर मृत आवस्थेत बिबट्या आढळला. त्याच्या पायात एक खटका आढळून आला असून हा शिकारीचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. झाडावर बिबट्या आढळल्यानंतर शेतकऱ्यांनी नेवासे येथे वनविभागाचे वनपाल दशरथ झिंजुर्डे यांना कल्पना दिली. त्यांनी घटनास्थळी पथकासह येऊन पाहणी केली. रानडुकरे पकडण्याचा खटका बिबट्याच्या … Read more

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज राहा – पालकमंत्री अनिल देशमुख

गोंदिया, दि. २५(जिमाका) : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. कोणीही समाजात कोरोनाबाबत अफवा पसरवित असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून चांगले काम करावे, असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यात … Read more

उद्योग व्यापाराच्या समस्यांबाबत शासन गंभीर-पालकमंत्री

नागपूर, दि. 25 :   लॉकडाऊनमुळे उद्योग व  व्यापार क्षेत्राला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या लढाईत सर्वांचे योगदान महत्त्वाचे शासनाने उद्योग व व्यापार सुरू करण्यास काही प्रतिबंधात्मक उपायानंतर परवानगी दिली आहे. उद्योगाच्या अडचणी सोडविण्यासाठी  निश्चित पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. नितीन राऊन यांनी दिली. चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री … Read more

अवैध दारू विक्रीची माहिती पोलिसांना दिल्याने नवऱ्यानेच केले बायकोसोबत हे धक्कादायक कृत्य

अहमदनगर Live24 :-  अवैध दारू विक्रीची माहिती गावकरी व पोलिसांना दिल्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीला धारधार हत्याराने भोकसून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना लुक्यातील म्हाळादेवी (ता. अकोले) येथे शुक्रवारी घडली. जखमी महिलेस उपचारासाठी अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु महिलेची प्रकृती नाजूक असल्यामुळे पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका २४ वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पहाटेच्या देवळाली प्रवरा परिसरातील गांधीवाडी येथे घडली. कोमल प्रदीप वाघ हे मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. शनिवारी पहाटे साडेपाच वाजता गांधीवाडी (देवळाली प्रवरा) येथील कोमल वाघ राहत्या … Read more

कोरोनाची लागण झालेल्या ‘त्यांची’ रवानगी न्यायालयीन कोठडीत

अहमदनगर Live24 :- व्हिसाचा गैरवापर करत नगरमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या २६ परदेशी नागरिकांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तबलिगी जमातसाठी आलेले परदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन करून नगर जिल्ह्यात राहिले. त्यातील चार जणांना कोरोनाची लागण झाली. इतरांनाही क्वारंटाइन … Read more

राज्यात कोरोना बाधित १०७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले

मुंबई, दि. २५ : आज राज्यात कोरोनाबाधीत ८११ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ७६२८ झाली आहे. आज ११९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १०७६ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६२२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८ हजार … Read more

मांडवजाळी येथील भिल्ल वस्तीवर पोहचले पाणी

बीड, दि.२५ : बीड शहरापासून जवळच असलेल्या डोंगराळ भागात मांडवजाळी येथे २३ कुटुंबांची भिल्ल समाजाची वस्ती आहे या वस्तीवर राहणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याची माहिती मिळताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी या वस्तीवर ७००० लिटरचे पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहे. Maha Info … Read more

खाजगी रुग्णालये ,शैक्षणिक संस्था व हॉटेलचे अधिग्रहण करा

पुणे,दि. 25- पुणे शहराची कोरोना संदर्भातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. प्रशासनाने गाफील न राहता पूर्वतयारी म्हणून शहरातील खाजगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल त्यांनी मागील आढावा बैठकीत चिंता व्यक्त करून आठ दिवस लॉकडाऊन कडक … Read more

पुणे विभागात कोरोना बाधित १२०० रुग्ण – विभागीय आयुक्त

पुणे दि.25 :- विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1200 झाली असून विभागात 184  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 939 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण  77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 42 रुग्ण  गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. विभागात 1200  बाधित रुग्ण असून  77 … Read more

वाढदिवसानिमित्त चिमुकलीची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

नागपूर, दि. 25 :    वाढदिवस म्हणजे मौज मस्ती, छान छान कपडे, पदार्थ, मित्र मैत्रिणी यांची चंगळ. मात्र चिमुकल्या सांज संजय सोमकुंवर हिने  10 व्या वाढदिवसाच्या दिवशी मोठ्यानांही लाजवेल असा निर्णय घेऊन आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. तिने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कोवीड 19 करीता दहा हजार रुपयांचा धनादेश आणि पिगी बँक पालकमंत्री डॉ.नितीन राऊत आणि जिल्हाधिकारी … Read more

कोरोनासंदर्भातील परिस्थिती नियंत्रणात – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर दि. 25: कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या संख्येत देशात तसेच राज्यात सातत्याने वाढ होत असतानाच प्रशासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे तुलनेने प्रमाण नियंत्रणात आहे. सध्या ते 14 दिवसांवर आले असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बैठकीत दिली. हे जिल्हा प्रशासनाचे यश आहे. सद्यस्थितीत नागपुरातील कोरोना रुग्णांची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. पशुसंवर्धन … Read more

आयात-निर्यातदारांकडून होणारी शुल्क वसुली थांबवावी

मुंबई, दि. २५ : कोवीड-१९ च्या अनुषंगाने लॉकडाऊनमुळे निर्यात व आयातदार आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे आयात-निर्यातदारांकडून खासगी कंटेनर फ्रेट स्टेशनमध्ये वसूल केली जाणारी नजरबंदी, भू भाडे व विलंब शुल्क माफ करण्याची विनंती राज्याचे बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांनी एका पत्राद्वारे केंद्रीय नौकानयन व जहाजबांधणी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री. मनसुख मांडविय यांना केली आहे. मंत्री … Read more

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ६९ हजार गुन्हे दाखल

मुंबई, दि.२५ : राज्यात सर्वत्र  सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २४ एप्रिल या कालावधीत कलम १८८ नुसार ६९,३७४ गुन्हे दाखल झाले असून १४,९५५ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ६३ लाख (२ कोटी ६३ लाख) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात … Read more

लॉकडाऊनच्या काळात सायबरचे २९४ गुन्हे दाखल

मुंबई दि. २५ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २९४ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये … Read more