संगमनेर शहरातील ‘हा’ भाग ७ मे पर्यंत अत्यावश्यक सेवांसह सर्व बंद

संगमनेर :- शहरातील रहेमत नगर, जमजम कॉलनी, भारतनगर, अलका नगर, कोल्‍हेवाडी रस्‍ता, वाबळे वस्‍ती, उम्‍मद नगर, एकतानगर, शिंदेनगर नाईकवाडापुरा हा भाग हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आला असून त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. दिनांक २३ एप्रिल रोजी संगमनेर शहरातील या भागात ०४ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात … Read more

शिवभोजन थाळींच्या संख्येत ५० हजारांची वाढ

मुंबई, दि.२३ :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी दि. २८ मार्च २०२० पासून शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला आहे. दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत ५ रुपये थाळी याप्रमाणे १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत होते. लॉकडाऊनमुळे यामध्ये वाढ करुन शिवभोजन … Read more

राज्यात ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे

मुंबई,  दि. २३  :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत रेशन धान्य वाटप करताना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या दि.१९ एप्रिल २०२० पर्यंत राज्यातील एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ८७ रेशन दुकानांचे निलंबन तर एकूण ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच स्वस्त धान्य दुकानांमध्ये काळा बाजार, वाटप … Read more

उपनेते अनिलभैया राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कौतुकास्पद उपक्रम, 28 दिवसांपासून सातत्याने दररोज 3000 लोकांपर्यंत अन्नवाटप

अहमदनगर :- देशात सध्या कोरोना विषाणूमुळे दहशत पसरली आहे. त्यावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनचा निर्णय घेत जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. नगर शहर शिवसेनेच्या वतीने संचारबंदी काळात गोरगरीब आणि गरजू आहेत, विविध ठिकाणी अडकलेले आहेत अशांसाठी अन्नछत्र मोबाईल व्हॅन तर्फे मोफत अन्न पोहोचवण्याचं काम शिवसैनिक करत आहेत. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषणे समाज माध्यमातून पोहचली कोट्यवधींपर्यंत

मुंबई , दि. २३ :- महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी आणि व्यापक असे प्रयत्न करत आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच राज्यातील जनतेला समाज माध्यमावरून थेट संबोधित करण्याचे पाऊल उचलले. कोरोनाच्या अनुषंगाने थेट संपर्क टाळून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून केलेला हा समाज माध्यमाचा वापर प्रभावी आणि उपयुक्त ठरला आहे. विशेषतः थेट प्रसारणानंतर … Read more

अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये

मुंबई, दि. २३ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या एकूण २ लाख ७४ हजार इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, ग्रामविकास विभागांतर्गत सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवसरात्र … Read more

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यासह ५ योजनांसाठी १२५७ कोटी ५० लाख रुपये मंजूर

मुंबई, दि. २३ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन अशा पाच योजनेच्या बाबतीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यांतर्गत राज्यातील … Read more

कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर – आरोग्यमंत्री

मुंबई, दि.२३ : राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही. मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, … Read more

परप्रांतीय मजूरांसाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी

मुंबई, दि. 23 : केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत दि. 3 मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर बांधव आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची व त्यामुळे गर्दी उसळून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने,  रेल्वे मंत्रालयाने मुंबई व पुणे येथून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात व त्यासाठीचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या गोष्टी सुरु, कोणत्या बंद जाणून घ्या ही महत्वाची माहिती

अहमदनगर : कोरोना प्रसार रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. त्यामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कृषी, सामाजिक क्षेत्र, वन, मत्स्य उत्पादन व पशुसंवर्धन, वित्तीय क्षेत्र, मनरेगा, सार्वजनिक सोयी सुविधा आदींना चालना मिळावी, यासाठी सोशल डिस्टंटचे पालन बंधनकारक करीत परवानगी दिली आहे. कॅन्टोंमेंट झोन यातून वगळण्यात आला आहे. या आदेशातील निर्देशांचे … Read more

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात उतरली तरुणाई

नंदुरबार दि.23 : कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था प्रशासनाला सहकार्य करीत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनीदेखील मदतकार्यात पुढाकार घेतला आहे. विविध भूमिकांमध्ये हे विद्यार्थी प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. विशेषत: कपड्याचे घरगूती मास्क तयार करून त्याचे वाटप करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय सेवा योजनचे जिल्हा समन्वयक डॉ.माधव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी … Read more

मुकेश अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ; संपत्तीमध्ये ‘इतकी’झाली वाढ

मुंबई :- मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अलिबाबाचे संस्थापक जैक मा यांनाही त्यांनी मागे पाडले आहे. अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ आणि मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबुकमधील भागीदारीनंतर अंबानी यांनी हा पल्ला गाठला आहे. फेसबुकशी झालेल्या डील नंतर अंबानींची संपत्ती 4 अब्ज डॉलर्सने वाढून 49.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 3.77 लाख कोटी रुपये) … Read more

तर रेशन दुकानदारांवर कारवाई करा : आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24  :- संकटाच्या काळात प्रत्येकाने माणुसकी जपण्याचे काम केले पाहिजे. नागरिकांना सांभाळण्याचे काम सरकारचे आहे. सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन प्रत्येक रेशनदुकानदाराने केले पाहिजे. सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत प्रत्येक रेशनदाराने आपले दुकान उघडे ठेवले पाहिजे. प्रत्येकाने माणुसकीचे भान ठेवून वागावे. चुकीचे काम केल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल. प्रत्येक माणसाला शासनाने दिलेला अन्नधान्याचा साठा … Read more

राज्‍यात कोरोना संकट, माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24  :- राज्‍यात कोरोना संकटाचे सावट गडत होत असतांना जनतेला दिलासा देण्‍यासाठी निर्णय प्रक्रीया अधिक गतीमान होण्‍याची आवश्‍यकता असल्‍याने राज्‍य सरकारने विविध क्षेत्रातील अनुभव संपन्‍न लोकांचा समावेश असलेली सर्वपक्षीय उच्‍चाधिकार समिती स्‍थापन करुन राज्‍याच्‍या हितासाठी सकारात्‍मक पाऊल टाकावे, अशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात आ.विखे पाटील म्‍हणाले … Read more

महत्वाची बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील हे शहर हॉटस्पॉट केंद्र जाहीर, प्रतिबंधाची मुदत आता ०६ मेपर्यंत वाढवली

अहमदनगर :- जामखेड शहर हे यापूर्वीच हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. दिनांक २२ एप्रिल रोजी जामखेड शहरात ०२ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात दिनांक ६ मे, २०२० पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या क्षेत्रातील सर्व … Read more

१४ दिवसापूर्वी तपासणी केली तेव्हा निगेटिव्ह, नंतर आले रिपोर्ट्स पॉझिटिव्ह ! वाचा संगमनेर मधील धक्कादायक बातमी …

अहमदनगर :- नेपाळ येथून संगमनेर येथे आलेल्या १४ व्यक्ती पैकी ०४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता ३७ वर गेली आहे. दिनांक ०४ एप्रिल रोजी या व्यक्तींना एका इमारतीतून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, १४ दिवसानंतर १० जणांचे अहवाल … Read more

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी महाविकासआघाडीकडून राजकारण सुरू !

अहमदनगर Live24  :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आज भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे,28 मे पर्यंत उद्धव ठाकरे यांना धोका नाही. आमचा त्यांना विरोध नाही किंवा त्याला हरकत देखील नाही. मात्र महाविकासआघाडीकडून राजकारण सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला.चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.  ‘आमदारकीच्या पेचप्रसंगातून … Read more

कोण आहे किम जोंग उनची पत्नी ? जाणून घ्या ही माहिती

अहमदनगर Live24 :- मागील काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांची तब्येत बिघडल्याची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. परंतु अद्याप याची अधिकृतपणे खातरजमा झालेली नाही. आपल्या खास राजकीय शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या किम जोंग उन यांच्या अशा परिस्थितीत असणाऱ्या अनुपस्थितीबद्दलही वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. किम जोंग उन यांचे राजकीय जीवन, त्यांचे … Read more