महत्वाची बातमी : रेशन धान्य खरेदीचा तो फॉर्म खोटा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मीडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ ०२ बाधित रुग्णाच्या संपर्कातील इतर व्यक्तींचे रिपोर्ट्स निगेटीव्ह !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  काल नगर जिल्ह्यात सापडलेल्या कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील  एकूण २३ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत . दोन व्यक्तीसह १४ जणांचा ग्रूप मॉरिशस येथून दिल्ली येथे आला होता. हा ग्रुप २ आठवडे दिल्लीत थांबला. नंतर त्यांनी मुंबई, चेन्नई आणि पुन्हा दिल्ली असा प्रवासह केला. विविध ठिकाणांना भेटी … Read more

अबब…या तालुक्यातील तब्बल पाच हजार नागरिक झाले होम क्वारंटाईन !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शेवगाव तालुक्यात काल अखेर पुणे, मुंबई व देशांतर्गत जोखिमग्रस्त भागातून 10 हजार 893 व्यक्ती तालुक्यात आल्या आहेत. त्यापैकी 5 हजार 40 नागरिकांच्या हातावर होम क्वॉरन्टाइनचे शिक्के मारले आहेत. तर परदेशातून 7 नागरिक येथे आलेले आहेत. त्यांच्या सर्व तपासण्या झालेल्या असून त्या निगेटीव्ह आल्या आहेत. आज अखेर तालुक्यात एकही करोनाबाधीत रुग्ण नाही. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात 4 करोनाबाधीत !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना पेशंट्स ची संख्या आता चार झाली आहे नगरमध्ये आढळलेले करोनाचे दोन्ही नवे रुग्ण हे विदेशी नागरिक आहेत. एक व्यक्ती फ्रान्सचा तर दुसरा आयव्हरी कोस्टचा आहे. काल हे दोन रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील नागरिक पुन्हा भयभीत झाले आहेत. पहिला रुग्ण ‘करोना’मुक्त झाल्याचा आनंद सकाळी प्रशासनाने घेतला, पण दुपारी आणखी दोन नवे … Read more

श्रीगोंदेकरांवर कोरोना व्हायरसचे ‘संकट’

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- बारामतीच्या ‘त्या’ कोरोना बाधित व्यक्तीच्या श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील तीन जण संपर्कात आले होते. त्यांची नगर येथील सरकारी रुग्णालयात सोमवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. काल रविवारी बारामती येथील एक आणि नगरच्या दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सगळीकडे खळबळ उडाली. बारामती आणि … Read more

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काय करावे आणि काय नाही ?

हे करा (DO’s) ■ घरीच रहा. घरी येणाऱ्या कोणत्याही पाहुण्यांच्या किंवा अभ्यागतांच्या भेटी घेणे टाळा. भेटणे अगदीच आवश्यक असेल तर बोलताना किमान एक मीटरचे अंतर राखा. ■ थोड्या-थोड्या वेळाने आपला चेहरा आणि हात साबणाने स्वच्छ धुवा. ■ खोकताना किंवा शिंकताना आपल्या शर्टची बाही, हातरूमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करून तोंड झाका. खोकून किंवा शिंकून झाल्यांनतर … Read more

प्रवरा मेडिकल ट्रस्ट सहा दिवसात उभारणार कोरोना व्हायरसच्या पेशंट्ससाठी १०० खाटांचे नवीन हॉस्पिटल !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात आलेल्या कोरोना व्हायरस या संकटाच्या विरोधात आता ग्रामीण भागही लढाईसाठी सज्ज झाला पाहिजे या हेतूने प्रवरा ग्रामीण रुग्णालय व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ हे लोणी येथे आधुनिक सुविधांनी युक्त १०० खाटांचे हॉस्पिटल पुढील सहा दिवसात स्थापन करीत आहे अशी माहिती संस्थेचे प्र कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी दिली. प्रवरा … Read more

जेष्ठ नेते यशवंतराव गडाखांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ लाखांची मदत !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैयक्तिक म्हणून पाच लाखांची मदत जाहिर केली आहे. या रकमेचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यावर जमा केला आहे. सध्या संपूर्ण देशाला चिंतेत टाकणाऱ्या कोरोना या व्हायरसच्या आजाराशी लढण्यासाठी सरकारला मोठ्या निधीची गरज लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्री निधीसाठी यथाशक्ती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे ते पेशंट्स राहिले तो शहरातील परिसर पूर्णपणे बंद !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर शहरात नव्याने सापडलेले कोरोनाचे पेशंट्स  मुंकूंदनगर परिसरात वास्तव्यास होते. त्यामुळे हा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच औरंगाबादमार्गे जाणारी वाहतूक आज सकाळीच बंद करण्यात आली आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने औरंगाबाद महामार्गावरील पंचवटी हॉटेलपासून मुंकूदनगरकडे जाणारे रस्ते बॅरिकेट टाकून बंद करण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी बांबू बांधून रस्ते बंद करण्यात … Read more

‘या’ निर्णयाने विखे पाटील, पाचपुते यांच्यासह भाजपला धक्का !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्हा सहकारी बँकेसाठी सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने मतदार प्रतिनिधी म्हणून संस्थेचे संचालक, माजी अध्यक्ष भगवानराव पाचपुते यांचा केलेला ठराव रद्द करण्यात आला आहे. या निर्णयाने खासदार डॉ. सुजय विखेपाटील, आमदार बबनराव पाचपुते यांच्यासह भाजपला राजकीयदृष्ट्या धक्का बसला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती … Read more

धक्कादायक : कोरोनामुळे आलेले संकट पाहून अर्थमंत्र्यांची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोनामुळे झालेलं अर्थव्यवस्थेचं नुकसान पाहून जर्मनीतील हेसे राज्याचे अर्थमंत्री थॉमस शाफर यांनी आत्महत्या केली आहे.  थॉमस शाफर हे गेल्या काही दिवसांपासून चिंताग्रस्त होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारख टोकोचं पाऊल उचललं आहे. धक्कादायक म्हणजे आज शाफर यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला आहे.    कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे, हे पाहून त्यांना खूप त्रास … Read more

धक्कादायक : त्या दोन कोरोना पेशंट्सने मॉरिशसहून दिल्ली आणि नंतर अहमदनगर शहरात येवून केला जिल्ह्यातील ह्या भागात प्रवास …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे पुण्याच्या एनआयव्हीने दिलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. या व्यक्ती परदेशी नागरिक असून त्यातील एक फ्रान्स तर दुसरी व्यक्ती आयव्हरी कोस्ट येथील आहे. या व्यक्तीसोबत असणार्‍या इतर व्यक्तींनाही ताब्यात घेतले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध आता पोलीस आणि आरोग्य यंत्रणेने सुरु केला … Read more

धारवाडी चिचोंडी परिसरात पावसाने घरांचे आणि पिकांचे प्रचंड नुकसान

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ मार्च रोजी वादळवाऱ्यांसह झालेल्या पावसाने घरांचे आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पत्र्यांची घरे अक्षरशः उन्मळून पडले ,जीवितहानी झाली नसली तरी संसार मात्र उघड्यावर आले आहेत. संचारबंदी च्या काळात ही घटना घडल्याने करोनाच्या भीतीने घरात बसलेले शेतकरी निसर्गाच्या कोपाने हवालदिल झाले आहेत. सुरेश धोकरट यांचे घर वादळाने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये आणखी दोन कोरोना बाधित व्यक्ती आढळले !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर शहरात पुन्हा दोन कोरोना बाधित व्यक्ती आढळले आहेत. दरम्यान; हे दोघेही परदेशी नागरिक असून यामधील एक व्यक्ती फ्रान्स तर दुसरा आयव्हरी कोस्टचा असल्याची माहिती मिळते आहे. त्यांच्याशी संबंधित 09 व्यक्तींनाही ताब्यात घेण्यात आले आहे, या सर्वांचे स्त्राव चाचणीसाठी पुण्याला पाठवले आहे. तसेच या व्यक्ती ज्यांच्या संपर्कात होत्या त्या संबंधित व्यक्तींचा … Read more

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पास

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- सध्या देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस यंत्रणेमार्फत ई-पास देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून covid19.mhpolice.in या लिंकवर जाऊन संबंधितांना अर्ज करता येईल. सध्या लागू असलेल्या लॉकडाऊन कालावघीत भाजीपाला, अन्नधान्य, औषधे, दुध इत्यादी विविध प्रकारच्या जीवनावश्यक सामग्रीच्या वाहतुकीस मान्यता देण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा ‘तो’ पहिला रुग्ण कोरोनामुक्त पण …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. त्या रुग्णाला आता आरोग्य यंत्रणेच्या तपासणी नंतर उद्या घरी सोडण्यात येणार आहे. त्याला घरीच आणखी 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेच्या योग्य उपचारामुळे हा रुग्ण लवकर बरा होऊ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील युवा वैज्ञानिकाचा अटकेपार झेंडा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ‘अणुऊर्जा क्षेत्रातील विविधता’ (Diversity in Nuclear) या विषयावर आधारित असणारी आंतरराष्ट्रीय अणुविद्युत युवा परिषद (International Youth Nuclear Congress) IYNC-2020 नुकतीच सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे ८-१३ मार्च दरम्यान पार पडली. ही परिषद प्रत्येक दोन वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवली जाते. सिडनी येथे झालेल्या परिषेमध्ये जगभरातील तब्बल चाळीसहून अधिक देशांनी आपला सहभाग नोंदवला. भारतातील सात … Read more

सुजयदादा अभिमान आहे आम्हाला तुमच्यासारखा खासदार भेटला !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर देशात संपूर्णपणे लॉकडाऊन आहे. यामुळे अहमदनगर लोकसभा मतदार संघातील संघातील विद्यार्थी, नागरिक इतर राज्यात अडकलेले आहेत.त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्यांचे आप्तस्वकीय मुळे तिकडे चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर इतर राज्यात असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळावा त्यांची व्यवस्थित सोय व्हावी या हेतूने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी … Read more