विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दात केला निषेध

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नागपूर : राज्यात अवकाळी पावसामुळे ९३ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता २३०० कोटींची तरतूद करणे आवश्यक आहे. मात्र, राज्य सरकारने केवळ ७५० कोटींची तरतूद अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केली याचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर शब्दात निषेध केला आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची मालिका सुरू झाली असून राज्य … Read more

निर्भायाचे वडील म्हणतात चारही आरोपींना डोळ्यासमोर फाशीवर चढताना पाहायचेय !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- निर्भया चे वडील म्हणतात की जर तुरुंग प्रशासन परवानगी देणार असेल तर ज्या ठिकाणी या चौघांना फाशी देण्यात येणार आहे त्या ठिकाणी मला उपस्थित राहायचय. आम्ही त्या नराधमांना फासावर लटकताना पाहायच आहे. ते सांगतात की जेल चे कायदे काय आहेत याबाबत मला पूर्ण माहिती नाही मात्र जर जेल प्रशासन मला … Read more

थंडीच्या दिवसात वाढतो हार्ट अटॅकचा धोका मॉर्निंग वॉकला जाणे ठरू शकते घातक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यामध्ये पारा खाली जाताच थंडी जोर धरू लागते. अशामध्ये डॉक्टरांनी आरोग्याबाबत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टर म्हणतात की थंडीच्या दिवसांमध्ये हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे जास्तकरून हृदयाच्या आजारांशी निगडित आहेत त्यांना जास्त सावध राहण्याची गरज आहे. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणे धोक्याचे ठरू शकते. हार्ट केअर फाउंडेशन … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर: तालुक्यातील तळेगाव दिघे येथील एका १६ वर्षे ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीस धमकी देत पळवून नेवून बळजबरीने अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी सोनू उर्फ सुधीर संपत मोकळ (वय २१, रा. पारेगाव खुर्द) याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, … Read more

अभिनेत्री राणी मुखर्जी साईचरणी !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी : सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री राणी मुखर्जी यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शन घेताना त्या भावूक झाल्या डोळ्यात आलेले अश्रू पुसत त्या साईचरणी नतमस्तक झाल्या. साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा साईबाबांची मूर्ती देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व जयश्री मुगळीकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, … Read more

जि. प. सदस्या दराडे यांचा उपोषणाचा इशारा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : अकोले तालुक्­यातील गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना हाताशी धरून गैरव्यवहार केलेला आहे. या प्रकरणी त्वरीत चौकशी व्हावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने रजेवर पाठवावे अन्यथा दि.१९ डिसेंबरपासून आपण जिल्हा परिषदेसमोर उपोषण करणार आहे. असे निवेदन जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना … Read more

राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करणे पडले महागात

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन सोमवारी (दि. १६) दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रांत कार्यालयासमोरकेले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भाजपचे ३१ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले ‘अच्छे दिन’ कधी येतील ते आधी सांगा ?

अहमदनगर लाईव्ह टीम / नागपूर : : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे आश्वासन शिवसेनेने दिले होते आणि ते आम्ही पूर्ण करणार आहे. आम्हाला स्मृतिभ्रंश झाल्याचे समजून आठवण करून देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले ‘अच्छे दिन’ कधी येतील ते आधी सांगा आणि नोटाबंदीचे काय झाले याचे उत्तर देशाला द्या, असा ‘ठाकरी’ पलटवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला. … Read more

अयोध्येत चार महिन्यांत भव्य राममंदिर उभे राहील

अहमदनगर लाईव्ह 24 टीम: अयोध्येत चार महिन्यांत भव्य राममंदिर उभे राहील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केला. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाकूड येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. राममंदिराच्या मुद्यावरून काँग्रेसला लक्ष्य करताना शहा म्हणाले की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आता … Read more

मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्व्वोचपदी विराजमान !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नवी दिल्ली : ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे भारतीय सैन्याचे नवे लष्करप्रमुख होणार आहेत. नरवणे यांच्या रूपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्व्वोचपदी विराजमान होणार आहे. सध्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. नरवणे हे मूळचे पुण्याचे आहेत. ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेल्या मनोज नरवणे यांनी एनडीएमधील प्रशिक्षणानंतर डेहराडून … Read more

दृष्टिकोन बदलल्याशिवाय महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबणार नाही – आ. राजळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शेवगाव: देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना समाजात महिला सुरक्षित नाहीत, स्त्रीमुक्तीचा जागर झाला असला तरी समाजाची महिला भगिनींकडे बघण्याची मानसिक्ता आणि दृष्टिकोन बदलल्याशिवाय महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. शेवगावच्या राजीव राजळे प्रतिष्ठानच्या वतीने विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल आ. राजळे … Read more

पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी शिर्डीत सर्वपक्षीय बैठक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- शहरात वाढती गुन्हेगारी, मोठ्या प्रमाणावर साईभक्तांचे होणारे शोषण, साईभक्तांना होणारा वाहतूक पोलिसांचा त्रास, आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या टोळ्या या विषयावर पोलीस प्रशसानाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, माजी नगराध्यक्ष कैलासबापु कोते, रज्जाक शेख व सर्वपक्षिय शिर्डी ग्रामास्थांची बैठक पार पडली. यावेळी ग्रामस्थ, राजकिय पदाधिकारी, माजी नगरसेवक, … Read more

महापालिकेकडून ‘अब की बार, थ्री स्टार’चा नारा

अहमदनगर – अहमदनगर महानगरपालिकेकडून स्वच्छता विषय उपाययोजनांसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छतेची जनजागृती व प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच भाग म्हणून महापालिकेच्या उत्कृष्ट सफाई कर्मचार्‍यांचा व शहरातील शाळा, शासकीय कार्यालये, हॉस्पिटल व हॉटेल या आस्थापनांना स्वच्छता पुरस्कारांचे वितरण सोमवारी (दि.16) शानदार सोहळ्यात करण्यात आले. महापौर बाबासाहेब वाकळे व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्वांना शुभेच्छा देतांनाच ‘अब … Read more

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर :- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करताना बीएड अथवा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. नोटीस पाठवलेल्या १३३ जणांवर कारवाईची टांगती तलवार असून, या शिक्षकांकडून पुराव्यासह लेखी खुलासा प्रशासनाच्या वतीने मागवण्यात आला आहे. पदोन्नती, वेतनश्रेणीत वाढ होण्यासाठी शिक्षकांना बीएड, पदवीची आवश्यकता असते. अनेकदा शिक्षक त्यासाठी मुक्त विद्यापीठ … Read more

त्याने तरुणीचा विनयभंग केला आणि म्हणाला ‘मी उद्या पुन्हा येईल’!

अमरावती :- विधानसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईल ह्या विधानाने चांगलीच गाजली, फडणवीस यांचे हेच वाक्य चक्क एका तरुणाने विनयभंग करताना वापरलेय. याबाबत सविस्तर माहिती अशी कि  कपडे धुणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेची छेड काढून ‘मी उद्या पुन्हा येईल’ अशी धमकी देणाऱ्या एका २८ वर्षीय युवकाविरुद्ध माहुली पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून रविवार, … Read more

संतापजनक : आई आणि मुलीवर दहा जणांकडून सामूहिक बलात्कार !

अमरावती ;- हैदराबादमध्ये एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची जाळून हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशभरात निषेध नोंदवला जात असताना अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय.  अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेसह तिच्या २१ वर्षीय मुलीवर दहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या तक्रारीवरून अंजनगाव सुर्जी पोलिसांनी रविवारी (दि. १५) दहा जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा … Read more

शेतमजुरीचे नियम आणि दर पत्रक ठरवणारे पहिले गाव

अहमदनगर :- कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजापुढे आता एक नवी समस्या उभी ठाकली आहे ती म्हणजे शेतीकामासाठी शेतमजूर मिळणे. हिच समस्या सोडविण्यासाठी टाकळीमियॉ येथील शेतकर्यांनी एक शकल लढविली परंतू यामधे शेतकरी अन् शेतमजुर यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या ग्रामीण भागात सर्वत्र शेतमजूर आणि त्यांच्या मोबदल्याचा प्रश्न गंभीर … Read more

नेवाशाच्या नगराध्यक्षपदासाठी सरळ लढत

नेवासा – नेवासाच्या नगराध्यक्षपदाची उद्या बुधवारी निवड होणार आहे.  काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने भाजपा- काँग्रेस व अपक्षांच्या नगरपंचायत विकास आघाडी व आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील क्रांतीकारी शेतकरी पक्षात सरळ लढत होणार आहे. भाजपच्या डॉ. सौ. प्रमिला सांगळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्या … Read more