अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढला !

अहमदनगर/ नालेगाव- अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढत बर्‍याच अंतरावर ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत सोमवारी (दि.२) उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.  परिसरातील काही तरुणांनी पुन्हा या अर्धवट जळालेला मृतदेहाचा दहनविधी केला. अमरधाम स्मशानभूमीत रविवारी (दि.१) दिवसभरात सुमारे १३ ते १४ अंत्यविधी झाले. दहन ओट्यांची संख्या कमी असल्याने काही अंत्यविधी … Read more

वाडिया पार्कचे नाव छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुल होणार?

नगर – वाडिया पार्क व व्यापारी संकुलाचे छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुल असे नामकरण करावे, असा प्रस्ताव महापालिकेने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अवर सचिवांना पाठवला आहे.  १६ जुलैला झालेल्या महासभेत तसा ठराव घेण्यात आला होता. वाडिया पार्क क्रीडा व व्यापारी संकुलाचे छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुल नामकरण करण्याचा ठराव २६ मे २०१२ रोजी महासभेने … Read more

श्रीगोंद्यात माजी सरपंचाचा अपघातात मृत्यू

श्रीगोंदा :- काष्टीचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य असलेले शिवनेरी उद्योग समुहाचे अध्यक्ष पोपटराव विलासराव माने यांचे अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघाती निधन झाले. ते ३५ वर्षांचे होते. एक डिसेंबरला रात्री दहा वाजता माने आपल्या शिवनेरी हॉटेलचे कामकाज संपवून समोरच असलेल्या घरी जात असताना रस्ता ओलांडताना दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची त्यांना जोराची धडक बसली. माने … Read more

कांद्याच्या दराने ओलांडली शंभरी,सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी !

अहमदनगर :- नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला. चांगल्या दर्जाचा गावरान कांदा, तसेच लाल कांद्याला विक्रमी १०० ते १३० रुपये किलो भाव मिळाला. गतवर्षीचा दुष्काळ आणि यावर्षीची अतिवृष्टी यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. गेल्या महिन्यापासून कांद्याची आवक … Read more

राहुरी भाजपचा तालुकाध्यक्ष कोण होणार?

राहुरी : राहुरी तालुका भाजपाची यावेळच्या अध्यक्ष निवडीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहिले जात आहे. कारण सन २००४ पासून राहुरी विधानसभा मतदार संघात पक्षाचे आमदार होते. यावेळी माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव झाल्याने आता तालुकाध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार,याबाबत उत्सुकता आहे.  राहुरी तालुका भाजपाचे विद्यमान अध्यक्ष विक्रम तांबे पदावर असताना २००९ मध्ये शिवाजीराव कर्डिले विजयी ठरले होते. सध्या तेच … Read more

आमदार तनपुरेंना मंत्रिपद मिळाल्यास दुधात साखर पडल्यासारखे होईल !

तिसगाव : राहुरी -नगर -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांची नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस, या तीन पक्षांनी एकत्र येत नव्याने स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये यांची वर्णी लावावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह तनपुरे समर्थकांकडून करण्यात आली आहे.  मतदारसंघाला विकासात्मक दृष्टिकोन असणारे तरुण व कार्यक्षम नेतृत्व म्हणून प्राजक्त तनपुरे यांच्या रुपाने … Read more

घटस्फोट झाला असेल तर अकाली मृत्यू येऊ शकतो !

वॉशिंग्टन : घटस्फोटानंतर लोकामध्ये धूम्रपान करण्याची वा व्यायामाला पुरेसा वेळ न देण्याची प्रवृत्ती बळावण्याची शक्यता वाढते. धूम्रपान व आणि व्यायामाचा अभाव या दोन्ही गोष्टी अकाली मृत्यूसाठी कारणीभूत ठरतात. एका नव्या अध्ययनातून हे समोर आले आहे.  शास्त्रज्ञांनी घटस्फोटाचा संबंध खराब आरोग्यासोबत जोडला असून त्यात वेळेआधीच मृत्यूच्या जास्त जोखमीचा संबंध आहे. अर्थात घटस्फोट व खराब आरोग्य यांच्यातील … Read more

तीन तासांतच जन्मलेले बाळ तिने गमवले, मंग अंगावरच्या दुधाचे ती दान करू लागली…

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या विस्कॉसिन प्रांतातील एका महिलेने छोट्या बाळांचे आयुष्य वाचविण्यासाठी स्वत:च्या अंगावरचे दूध (ब्रेस्टमिल्क) दान करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या अडीच महिन्यांत तिने जवळपास १५ किलो ब्रेस्टमिल्क एनआयसीयू बँकेला दान केले आहे.  नेल्सविलेमध्ये राहणाऱ्या या महिलेचे सिएरा स्ट्रँगफेल्ड असे नाव असून ५ सप्टेंबरला तिने शस्त्रक्रियेद्वारे सात महिन्याच्या अपुरी वाढ झालेल्या बाळाला जन्म दिला … Read more

आश्चर्यकारक ! 21 वर्षीय या तरुणीला चक्क पाण्याची आहे ॲलर्जी, पाणी पिल्यानेही…

वॉशिंग्टन : पाण्याबिगर आपण जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. मात्र एखाद्याला चक्क पाण्याचीच ॲलर्जी आहे, असे कधी तुम्ही ऐकलेय का? आंघोळ तर दूरची गोष्ट साधे पाणी पिणेही असह्य वेदना देते. एवढेच नाही तर घाम व डोळ्यांतून अश्रू निघाले तरी शरीरावर चट्टे पडतात आणि ताप व डोकेदुखी सुरू होते.  अमेरिकेतील टेसा हॅनसन स्मिथ नावाची २१ वर्षीय … Read more

रोज नऊ तास झोपण्यासाठी ही कंपनी देईल एक लाख रुपये 

रोज तेच तेच काम करून अनेकजण पार कंटाळून जातात. एवढे नोकरी सोडून द्यावी, अशीही त्यांची बऱ्याचदा इच्छा होते. नोकरी सोडून काहीतरी वेगळे करावे, असेही वाटत असते. अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यातही झोप प्रिय असलेल्या लोकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आता अशा एका नोकरीची ऑफर आली आहे, ज्यात तुम्हाला फक्त झोप काढण्याचे काम … Read more

फरार आरोपीस सापळा रचुन शिताफीने पकडले! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर : न्यायालयाने फरारी घोषित केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सुनिल राजेंद्र पालवे (वय २९, रा.मेहेकरी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोठला परिसरात सापळा रचुन शिताफीने पकडले.  सुनिल पालवे याच्याविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात न्यायालयाने त्यास जामीनावर सोडले होते. जामीनावर सुटल्यानंतर कोर्ट कामाकरीता सुनील पालवे हा न्यायालयात हजर झाला नाही. … Read more

शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून जबर मारहाण

अहमदनगर : बांध का कोरला अशी विचारणा केल्याच्या कारणावरून शेतकऱ्यास शिवीगाळ करून लोखंडी पाईपणे जबर मारहाण केली. या मारहाणीत अमोल महादेव दिवटे हे जखमी झाले असून, याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की,श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील अमोल महादेव दिवटे यांनी माझ्या शेताचा बांध का कोरला अशी विचारणा केल्यावरून त्यांना … Read more

मोबाईल क्रमांकासाठी ग्राहकांचा चेहरा स्कॅन करवून घेणे अनिवार्य

बीजिंग : चीनच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने देशातील सर्वच मोबाईल कंपन्यांना नवा मोबाईलक्रमांक देण्यासाठी मोबाईल ग्राहकांचा चेहरा स्कॅन करवून घेणे अनिवार्य करण्याचे निर्देश दिलेत. याद्वारे चीनचा देशातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचा मानस असल्याचे सांगण्यात येत असले तरी नागरिकांवर पाळत ठेवण्याचा यामागे हेतू असल्याचा आरोप होत आहे. चीनकडून जनगणनेसाठी फेशियल रिकॉग्नेशन टेक्नॉलॉजी अर्थात चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात … Read more

मोदी व शहा हे गुजरातहून दिल्लीत आलेले घुसखोर आहेत !

दिल्ली –  ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ अर्थात ‘एनआरसी’च्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरत दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे घुसखोर आहेत, असा तीक्ष्ण प्रहार काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधिर रंजन चौधरी यांनी रविवारी केला आहे.  देशावर सर्वांचा हक्क आहे. भारत कोणत्याही एका व्यक्तीच्या मालकीचा देश नाही. सर्वांना समान हक्क मिळाले असून, ‘एनआरसी’मुळे सामाजिक सौहार्द … Read more

गोव्यात राजकीय भूकंप घडविण्याचे वृत्त राष्ट्रवादीने फेटाळले ! 

पणजी : महाराष्ट्रात नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर ‘शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी’ने एकत्रितपणे सरकार बनवीत नवा सत्ताप्रयोग केला आहे; परंतु महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप गोव्यात घडणार नाही, असा दावा करीत या संबंधित वृत्त राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल अलेमाओ यांनी रविवारी फेटाळून लावले आहे. गोव्यात भाजपने घोडेबाजार करून सरकार बनविले आहे. लवकरच हे सरकार कोसळेल, अशी भविष्यवाणी शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी … Read more

खंडणी मागितल्याप्रकरणी अभिनेत्री सारा श्रवणला अटक

पुणे : ‘रोल नंबर १८’ या चित्रपटातील अभिनेत्याविरुद्ध विनयभंगाची खोटी तक्रार देऊन, ती मागे घेण्यासाठी खंडणी उकळल्याप्रकरणात अभिनेत्री सारा श्रवण ऊर्फ सारा गणेश सोनवणे (३२, रा. सध्या दुबई, मूळ रा. मुंबई) हिला गुन्हे शाखेचा युनिट २ ने मुंबईतून अटक केली आहे. हा गुन्हा गंभीर असल्यामुळे तिने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. अटकपूर्व … Read more

‘माझ्या मुलाला फाशी द्या, किंवा त्याने त्या मुलीला जाळले तसे त्यालाही जाळून टाका’ !

हैदराबाद : पशुवैद्यक महिला डॉक्टरची सामूहिक बलात्कारानंतर जाळून निघृर्ण हत्या करणाऱ्या ४ पैकी एका आरोपीच्या आईने आपल्या मुलालाही जिवंत जाळून टाकण्याची मागणी केली आहे.  ‘त्याला फाशी द्या,  किंवा त्याने त्या मुलीला जाळले तसे त्यालाही जाळून टाका,’ असे त्यांनी म्हटले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पीडित कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देत या प्रकरणाची … Read more

पंकजा मुंडे देणार भाजपला सोडचिठ्ठी ?

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि सत्तास्थापनेत अपयश आल्याने भाजपाच्या राज्यातील नेतृत्वावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बोचरी टीका केली असतानाच आता माजी मंत्री पंकजा मुंडे राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.  रविवारी पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर कार्यकर्त्यांना भावनिक पोस्ट लिहीत १२ डिसेंबर रोजी पुढील वाटचालीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. पंकजा मुंडेंच्या या … Read more