अहमदनगर ब्रेकिंग : गोळीबारात एका युवकाचा मृत्यू !

राहता :- तालुक्यातील लोणी गावात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. फरदीन अब्बु कुरेशी (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबार करणारे आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. फरदीन हा श्रीरामपूर शहराचा रहिवासी होता. रविवारी … Read more

नगर- दौंड रोडवर बर्निंग कारचा थरार

श्रीगोंदे – दि.1 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता दौंड कडून नगरकडे जाणार्‍या फोर्ड कंपनीच्या कारने अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली.  या घटनेत कोणतीही जीवित हानी नाही. मात्र लाख मोलाची कार जळली असताना याबाबात साधी खबर देखील बेलवंडी पोलिसात स्टेशनला दिली नसल्याने घटने बाबत संशय वाढला आहे. नगर-दौंड रस्त्याचे काम झाले आहे. मात्र अनेक … Read more

वीज दुरुस्तीचे काम करत असतानाच अधिकाऱ्याला मारहाण

श्रीरामपूर – महावितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र पंढरीनाथ जगताप यांना वीज दुरुस्तीचे काम करीत असताना नगरसेवकाने शिवीगाळ व मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत महावितरणचे एमआयडीसी ऑफिस श्रीरामपूर येथे कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र पंढरीनाथ जगताप यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले … Read more

Jio ग्राहकांसाठी मोठी बातमी, ग्राहकांना बसेल मोठा झटका !

वृत्तसंस्था :- एअरटेल, व्होडाफोननंतर आता रिलायन्स जिओने आपल्या दरात तब्बल ४० टक्के वाढ केली आहे. ‘रेट्स ऑल इन वन प्लान्स’मध्ये ही दरवाढ होणार असल्याचे जिओने सांगितले आहे. कंपनीनं रविवारी एक पत्रक जारी केलं. त्या पत्रकात कंपनीनं म्हटलं की, सर्व नेटवर्कवर मोबाइल सर्व्हिस रेट्स ऑल इन वन प्लान्सच्या अंतर्गत वाढवले जातील. जिओ लवकरच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग … Read more

आरक्षण रद्द करण्याचा मोदी सरकारचा डाव !

नवी दिल्ली – मोदी सरकार संवेदनाहीन आणि मूकबधिर आहे. हे सरकार सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण करून आरक्षण रद्द करण्याचा डाव आखत आहे. त्यामुळेच या सरकारच्या धोरणांच्या विरोधात जनआंदोलनाची गरज आहे, असे मत अनुसूचित जाती-जमाती संघटनेचे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार उदित राज यांनी रविवारी व्यक्त केले आहे. देशाच्या विविध भागांतून येथील रामलीला मैदानात जमा झालेल्या … Read more

महाविकास आघाडीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार

अहमदनगर :- राज्यातील महाविकास आघाडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात बैठक पार पडली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी राष्ट्रवादी कार्यालयाला भेट देऊन जिल्ह्यातील राजकीय सद्यस्थितीवर चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेत तिन्ही पक्षाच्या ताकदीवर महाविकास आघाडीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार असल्याचे राजेंद्र फाळके यांनी सुतोवाच केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, … Read more

कारच्या धडकेत दोन महिलांचा जागीच मृत्यू

नगर : नेवासा तालुक्यातील नगर-औरंगाबाद महामार्गवर देवगड फाट्यानजीक रस्ता ओलांडणाऱ्या दोन महिलांना कारने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . ताराबाई संतोष वणवे (वय ५३, रा.आडगाव, जि. जळगाव) व मंगल सुनिल काळे (वय ४५, रा.निपाणी वडगाव, ता.श्रीरामपूर) अशी मृत महिलांची नावे आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणीवडगाव येथील लग्नाचे वऱ्हाड औरंगाबाद जिल्ह्यातील लासूरजवळील भानवाडी … Read more

पाणीपुरवठा नियमित व मुबलक कसा होईल यासाठी प्रयत्नशील – खा. डॉ. सुजय विखे पाटील

नगर : “भिंगार गावचा पाणीपुरवठा नियमित व मुबलक कसा होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून येथील जनतेला न्याय देऊ,” असे आश्वासन भाजप खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. भिंगार बँकेच्या कार्यालयात खा.विखे यांची भिंगारच्या समस्यांबाबत पहिली बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी भिंगार बँकेचे चेअरमन गोपाळराव झोडगे यांनी तर भिंगार भाजपतर्फे महेश नामदे … Read more

तरुणाचा बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

नगर : संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या वर्गात शिकणारा सोमनाथ उर्फ वैभव अशोक अभंग (वय १८) हा विद्यार्थी मित्रांबरोबर गावातीलच बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला होता. पण बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे चंदनापुरी गावावर शोककळा पसरली आहे. सोमनाथ … Read more

सिक्युरिटी कंपनीत कामाला लावतो असे सांगून ७४ तरुणांना गंडा

नगर : सिक्युरिटी कंपनीत कामाला लावतो म्हणून तालुक्यातील कळस बुद्रुक येथील ७४ तरुणांना सुमारे सात लाख रूपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी पुणे येथील दाम्पत्याविरुद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अकोले पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नितीन महाजन याने बालाजी कंपनीत ७४ तरूणांची सिक्युरिटीसाठी निवड केली. प्रत्येकाला ड्रेससाठी ३२४० रूपये याप्रमाणे … Read more

या राशींच्या लोकांना हा आठवडा जाणार आनंदात, जाऊन घ्या साप्ताहिक राशीभविष्य 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल हा आठवडा ? जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य… मेष :- पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलू नका – तुम्ही प्रेम करीत असलेल्या व्यक्ती दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्या. अनोख्या … Read more

ग्राहकांच्या खिशावर ताण वाढणार, मोबाइल बिल वाढणार

नवी दिल्ली : १ डिसेंबर २०१९ पासून अनेक नियमांत बदल होत असून याचा बोजा ग्राहकांच्या खिशावर पडू शकतो. रविवारपासून कॉलसोबत इंटरनेटचा वापर महाग होऊ शकतो. वास्तविक, रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल दरवाढीच्या तयारीत असून यात नेमकी किती वाढ होईल याबाबत कोणत्याही कंपनीने स्पष्टीकरण दिलेले नाही. याशिवाय विमा हप्ताही महाग होऊ शकतो. ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या … Read more

झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ६२.८% मतदान ; नक्षल्यांनी पूल उडवला 

रांची : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तुरळक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. ६ जिल्ह्यांमध्ये १३ जागांसाठी ६२.८७ टक्के मतदान झाले. हे मतदारसंघ अत्यंत संवेदनशील असल्याने सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत मतदानाची वेळ होती. दरम्यान, अतिरिक्त पोलिस महासंचालक मुरारी लाल मीणा यांनी सांगितले की, नक्षल्यांनी गुमला जिल्ह्यात विष्णुपूर भागात एक पूल स्फोटकांनी उडवला. यात कोणतीही … Read more

चोरीचे वीज कनेक्शन तोडल्याने वायरमनला मारहाण 

नगर:  बेकायदेशीरपणे घेतलेले वीज कनेक्शन तोडल्याचा राग आल्याने दोघांनी वायरमनला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बोल्हेगाव येथील भारत बेकरीच्या मागे शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुनील नारायण तांबे व नीरज सुनील तांबे अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनी घरात चोरून वीज कनेक्शन घेतले होते. महावितरणचे … Read more

उद्या आमदार निलेश लंकेंचा जनता दरबार 

पारनेर : गेल्या महिन्यात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे आमदार नीलेश लंके यांचा जनता दरबार सोमवारी ११ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दत्ता आवारी यांनी दिली. आ. लंके हे सध्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनानिमित मुंबईत असून त्यांच्या वतीने राहुल झावरे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांना जनता दरबाराच्या आयोजनासंदर्भात पत्र दिले आहे. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात … Read more

दोन लाचखोर पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल; मागितली ४० हजारांची लाच

कोपरगाव : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात आपल्याला अटक करू नये यासाठी ४० हजारांची लाच मागणारे शिर्डी पोलिस ठाण्याचे दोन पोलिस शिपायांविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानेश्वर पाराजी सुपेकर व विशाल पी. मैद अशी आरोपींची नावे आहेत. कोपरगाव येथील सागर मेहमूद सय्यद यांचे येवला रस्ता कोपरगाव या ठिकाणी विविध कंपनीच्या दुचाकी खरेदी-विक्रीचे दुकान … Read more

अवैधरित्या मुरूम उपसा; जेसीबी पोकलेनसह जप्त

पारनेर : रस्त्याच्या कामासाठी अवैधरित्या मुरूम उपसा करणारी दोन यांत्रिक उपकरणे ताब्यात घेऊन तहसीलदार ज्योती देवरे यांनी ठेेकेदार महेश गुंदेचा यांची मुरूम चोरी उघडकीस आणली. सध्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून वनकुटे ते तास या रस्त्याचे काम सुरू असून या कामाच्या दर्जाबाबत अनंत तक्रारी करण्यात येत आहेत. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या मुरुमाची रॉयल्टी भरण्यात आली नसल्याची तक्रार … Read more