संपूर्ण शहरात एलईडी दिवे लावण्याचा प्रस्ताव

नगर : महापालिकेच्या पथदिव्यांच्या वीजबिलावर होणारा खर्च कमी करण्यासाठी संपूर्ण शहरात एलईडी दिवे बसवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. असा प्रकल्प राबवलेल्या राज्यातील इतर महापालिकांची माहिती घेण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी विद्युत विभागाला दिले आहेत. शहरातील पथदिव्यांबाबतच्या वारंवार येणाऱ्या तक्रारींसंदर्भात महापौर वाकळे यांनी शुक्रवारी सायंकाळी विद्युत विभागाची बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनील त्र्यंबके, … Read more

प्रियंका यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या

अहमदनगर: डॉ. प्रियंका रेड्डी या युवतीवर सामुदायिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.  आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आले. हैदराबाद येथील डॉ. रेड्डी या युवतीवर काही नराधमांनी सामुदायिक बलात्कार करुन, तिची हत्या केली. तर सदर युवतीच्या प्रेतास जाळण्यात आले. आरोपींनीच केली … Read more

ज्या निलेश लंकेंची सेनेतुन हकालपट्टी केली त्यांच्याच मताने उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री !

अहमदनगर :- महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आज (शनिवार) विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडली. गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारसाठी ही मोठी अग्निपरीक्षा असणार होती. दुपारी २ वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर तासाभरात ही चाचणी पार पडली आणि या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे-पाटील कामकाज पाहिले. Ahmednagar … Read more

कन्या विद्यालयात रंगला नवसिताऱ्यांचा सन्मान सोहळा

श्रीगोंदा:अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंद्यातील राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयात आयोजीत केलेल्या सोहळ्यात एम पी एस सी परिक्षेत यश व राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत झेंडा रोवणाऱ्या नव सिताऱ्यांचा सन्मान केला. आणि मुलींना गणवेश व सायकल भेट दिली भाग्यश्री फंड हर्षद जगताप धनश्री फंड पल्लवी हिरवे कोमल हिरडे पल्लवी पोटफोडे सोनल नवले शितल कांगुणे निकीता काटे … Read more

माजी आ. नरेंद्र घुलेंना विधानपरिषदेवर घेण्याचे मागणी !

शेवगाव :- राष्ट्रवादीची स्थापना करताना सर्वात प्रथम स्व.मारुतराव घुले पाटलांनी समर्थन दर्शवत शरद पवाराना पाठिंबा दर्शविला, आतापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहात घुले यांनी पवारांची साथ सोडली नाही. जिल्ह्याची वाताहत होत असताना घुले बंधुंनी २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत आघाडीसाठी महत्वाची भूमिका बजावत जिल्ह्यात १२ /० चे गणित बदलवत ३/९ करुन पक्ष संघटनेचा पाया मजबुत केला. याच दरम्यान … Read more

१ लीटर दुधात बादलीभर पाणी टाकून ८० विद्यार्थ्यांना पाजले 

वृत्तसंस्था :- उत्तरप्रदेशातील एका शाळेत माध्यान्ह भोजन कार्यक्रमांतर्गत एक लीटर दुधात बादलीभर पाणी टाकून ते ८० मुलांना देण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेत शिक्षकमित्राला निलंबित केले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. सोनभद्र जिह्यातील कोटा ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या बनवा प्राथमिक विद्यालयातील बुधवारची ही घटना आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल … Read more

शिर्डीत रेल्वे रुळावर आढळला महिलेचा मृतदेह !

शिर्डी :- शहरातील साईनगर रेल्वे स्टेशन परिसरात ५५ वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिलेबाबत काही माहिती असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बालविवाह झालेल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार ! 

कोटा : राजस्थानमध्ये बालविवाह झालेल्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्यासोबत लग्न करणाऱ्या युवकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हा नराधम फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नववीच्या वर्गात शिकणारी ही १५ वर्षीय मुलगी बुधवारी शाळेतून परत येत होती. त्यावेळी एका व्हॅनमधून आलेल्या काही व्यक्तींनी तिचे अपहरण केले. या लोकांमध्ये पीडितेसोबत बालविवाह करणाऱ्या २० … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायतीत रंगणार निवडणुकीची रणधुमाळी !

अहमदनगर : येत्या वर्षातील जुलै ते डिसेंबर दरम्यानच्या कालावधीत जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू राहील. यात मुदत संपत असलेल्या आणि नव्याने झालेल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायतींची संख्या लक्षात घेत प्रभागरचना, आरक्षण प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने काल शुक्रवार रोजी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी … Read more

महापौरांच्या प्रभागातच मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट ! 

अहमदनगर : प्रभाग क्र. १ मधील सिद्धिविनायक कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, एका श्­वानास मागील काही महिन्यांपासून त्वचेचा विकार व जखमा झाल्या आहेत. या श्­वानामुळे आरोग्याचा प्रश्­न ऐरणीवर येऊन नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. महापौरांच्या प्रभागातील सदर प्रश्­न त्यांना सांगून देखील उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सिद्धिविनायक कॉलनीत एका श्­वानाला काही … Read more

वेबसाईटवर खोटी माहिती देऊन फसवणूक

अहमदनगर : हॉटसअप, मेल आयडीवर कुरकुंभ येथील एमआयडीसीतील मोठ्या कंपनीत ६० सिक्युरिटी गार्डची आवश्यकता असल्याची खोटी माहिती देवुन, फसवणूक केल्याची ब्रजेश प्रेमशंकर तिवारी यांनी हरीषचंद्र गोपाळ बेलवले याच्याविरूध्द जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, बेलवले याने फिर्यादी तिवारी यांच्या मेलआयडी वर कुरकुंभ येथील एमआयडीसीतील एका मोठ्या कंपनीत ६० सिक्युरिटी गार्ड … Read more

लष्करात खोटी कागदपत्रे देवून सैन्यदलाची फसवणूक

अहमदनगर : लष्करात भरतीच्यावेळी खोटी कागदपत्रे सादर करुन सैन्यदलाची फसवणूक केल्याप्रकरणी कोमलप्रसाद पन्नालाल शर्मा रा.बिसारा जि.सीतापूर,उत्तरप्रदेश याच्या विरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत पोलिस सुत्राकडून समजलेली माहिती अशी की,एमआयआरसी सेंटर येथे दि.१ जुलै ते दि. २८ नोव्हेंबर २०१९ दरम्यान कोमलप्रसाद शर्मा याने लष्करात भरतीच्यावेळी रहिवासाची खोटी कागदपत्रे सादर करुन … Read more

दारूची तलफ कमी करायची असेल तर हे नक्की वाचा !

लंडन : दारूची तल्लफ कमी करण्याचे नवीन पद्धत शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. एका ताज्या अध्ययनाआधारे त्यांनी असा दावा केला आहे की, दररोज व जास्त प्रमाणत मद्यसेवन करणाऱ्या लोकांना केटामाइन औषधाचा एक डोस देऊन त्यांची मद्याची तल्लफ उल्लेखनीय रुपात कमी केली जाऊ शकते. नेचर कम्युनिकेशन नियतकालिकामद्ये प्रसिद्ध झालेल्या या अध्ययनानुसार, केटामाइनच्या एका डोसामुळे अति जास्त प्रमाणात … Read more

सोशल मीडिया वाढवितोय किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य !

लंडन : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आयुष्यात नुकसानकारक ठरते. सध्याच्या आधुनिक काळात सोशल मीडिया, संगणक आणि टीव्हीने लोकांचे जीवन अतिशय सुलभ केले आहे. दुसरीकडे त्यांचा जास्त प्रमाणातील वापर आजारांना आमंत्रण देणारा ठरत आहे. एका अध्ययनात शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, चार वर्षांच्या कालावधीत सोशल मीडिया, टीव्ही आणि संगणकाचा अति वापर केल्यामुळे नैराश्य आणि चिंतेची लक्षणे … Read more

आरोपींनीच केली स्कुटी पंक्चर,ट्रकमागे केला बलात्कार प्रियंका रेड्डी हत्याप्रकारणाबाबत धक्कादायक माहिती समोर !

वृत्तसंस्था :- हैदराबादमध्ये प्रियंका रेड्डी या 26 वर्षीय डॉक्टरवर बलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. या  हत्येप्रकरणी साईराबाद पोलिसांनी ट्रक ड्रायव्हर सहित क्लीनर अशा चार लोकांना ताब्यात घेतले आहे. मोहम्मद पाशा नावाचा मुख्य  संशयित आरोपी सुद्धा पकडला गेला आहे. पाशा हा … Read more

राजकारणातील बुलंद तोफ ढाकणे यांचे राष्ट्रवादी पूनर्वसन करणार का?

पाथर्डी :- तालुक्याच्या राजकारणातील बुलंद तोफ आणि पक्ष व कार्यकर्त्यांसाठी संघर्षशील नाउमेद नेतृत्व म्हणून ओळख असलेले केदारेश्वरचे चेअरमन ॲड.प्रताप ढाकणे. यांचे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी पूनर्वसन करणार का? अशी चर्चा आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ढाकणे समर्थकांमध्ये सुरु आहे. ॲड.ढाकणे यांचा राजकीय प्रवास सुरुवातीपासूनच संघर्षमय ठरलेला आहे. सन १९९५,९६ ला त्यांनी राजकारणात सक्रिय होत तिसगाव गटातून … Read more

कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; दोन जागीच ठार 

सुपा: नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील पळवे फाटा येथील हॉटेल जगदंब जवळ कारच्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर) सकाळी  ७.१५ वाजता घडली. पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, पुण्यावरून अहमदनगर कडे जाणाऱ्या महामार्गावरील पळवे फाटा हॉटेल जगदंब जवळ एम एच-०४,बी वाय-९६२२ हुंडाई कंपनीच्या कारवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले. पुलाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत उडी घेऊन पती-पत्नीने जीवन संपविले !

अहमदनगर :- भिंगार येथे शेतातील विहिरीत उडी घेऊन पती-पत्नीने आपले जीवन संपविले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२९) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बादल हरिचंद्र वाल्मिकी (वय २६), बबली बादल वाल्मिकी (वय १९) असे या दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाल्मिकी दाम्पत्य हे भिंगार … Read more