धक्कादायक! महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार करून जाळले !

हैदराबाद :-  तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये एका महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून जाळून मारल्याची घटना घडली आहे. पशुवैद्य असलेली ही तरूणी बुधवारपासून बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत शादनगर परिसरामध्ये पोलिसांना अढळून आला. बुधवारी रात्री तिची गाडी शहराच्या एका शांत भागामध्ये पंक्चर झाली. तिने घरी फोन करून तशी कल्पनाही दिली. रात्री बराच उशीर … Read more

आ. रोहित पवार यांच्याऐवजी आ.संग्राम जगताप यांना मंत्रीपद ?

अहमदनगर :- राज्यात नव्याने येऊ घातलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये नगर जिल्ह्याला किती मंत्रिपदांचा लाभ होणार, याची उत्सुकता जिल्हाभरात आहे.  मंत्रिपदांच्या या शर्यतीत ज्येष्ठ नेते व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादीचे युवा नेते व कर्जत-जामखेडचे नवे आमदार रोहित पवार  तसेच शिवसेनेला पाठिंबा देणारे नेवाशाच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांची नावे आघाडीवर आहेत. … Read more

आरेतील एकही पान आम्ही तोडू देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: वृक्षतोडीमुळे गाजलेल्या ‘आरे’ कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी हा पहिला निर्णय घेतल्याचे मंत्रालयातील पत्रकार कक्षात बोलताना सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ते म्हणाले, राज्य शासनाचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही. परंतु वैभव गमावून विकास कामे होणार नाहीत. आरे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर शिवसेनेत फुट !

अहमदनगर :- राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर अहमदनगर मध्ये मात्र शिवसेनेत दोन गट पडल्याचे समोर आले आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या वेग वेगळ्या गटांनी दोन स्वतंत्र जल्लोष साजरे केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच माजी शहरप्रमुख संभाजी कदम, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे, संजय शेंडगे यांच्यासह काही … Read more

तृतीयपंथीय व्यक्तीला झालेल्या मारहाणीत मृत्यू

श्रीरामपूर ;- बाजार समिती परिसरातील जगदंबा सर्व्हिस या दुकानाच्या गाळ्यासमोर तृतीयपंथीय व्यक्तीला झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला असून श्रीरामपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. १७ ऑक्टोबर रोजी अश्विनी नुरजहाँ शेख (वय ४५, रा. श्रीरामपूर) तृतीयपंथीयाला अज्ञात व्यक्तीकडून मारहाण केली होती. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या … Read more

भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल !

अहमदनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करुन महाराष्ट्राचा लढवय्या इतिहास देशाला, जगाला दाखवून दिला आहे. याच महाराष्ट्राने अहंकारी दिल्लीवाल्या भाजपचा अहंकार उतरविला. महाराष्ट्र राज्य कोणा समोरही झुकणार नाही. भाजपवाल्यांनी शिवसेनेचे बोट धरुन महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढविला आणि आम्हाला संपवायला निघाले. भाजपने शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यामुळे त्यांना याची मोठी किंमत मोजावी … Read more

नवरा व सासऱ्याकडून विवाहितेचा दुचाकी, चारचाकीसाठी छळ !

नगर – जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण तसेच पुणे येथे सासरी नांदत असताना विवाहित तरुणी नंदिनी प्रविण खंदारे, वय ३० हिला नवरा व सासऱ्याने तुझा पगार आमच्याकडे दे, तुझे एटीएम आम्हाला दे, तुझी दुचाकी आम्हाला दे,  तुझ्या आई वडिलांकडून माहेरी चारचाकी गाडी घेण्यासाठी ५ लाख रुपये घेवून ये, असे म्हणून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून … Read more

नगर जिल्ह्यात एकाच दिवसात या पाच जणांचा मृत्यु

नगर –  भिंगार, धनगरवाडी (ता. नगर), खातगाव टाकळी (ता. पारनेर) व आंबड (ता. अकोले) येथील वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच  जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमध्ये नगर जिल्ह्यासाठी ब्लॅक फ्राय-डे ठरला आहे. भिंगार येथे पती-पत्नीने आत्महत्या केली आहे. आसमा वाल्मिक ऊर्फ बबली (वय १९) व शुभम हरिश वाल्मिक ऊर्फ बादल (वय २६) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नींचे नावे … Read more

BREAKING – ग्रामपंचायत कार्यालयातच महिला सरपंचाच्या साडीसोबत केले ‘हे’ कृत्य

नगर –  नगर तालुक्यातील एका गावच्या ग्रामपंचायत कार्यालयातच महिलेच्या साडीचा पदर ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. याप्रकरणी आरोपी बाळासाहेब शंकर शेळके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील एका गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात एक ४२ वर्षाची विवाहित महिला सरपंच असून तेथे काल ९. ३० च्या सुमारास सदर सरपंच महिला कार्यालयात कामकाज करत असताना … Read more

मजुरीचे पैसे मागितल्याचा राग आल्याने ठेकेदाराने गवंड्यास बेदम मारले

संगमनेर- फोन करून मजुरीच्या पैशाची मागणी केल्याने  राग येऊन ठेकेदाराने दुचाकीवर बसवून पळवून नेऊन लाकडी दांड्याने व लोखंडी गजाने बेदम मारहाण जखमी केले. ही घटना  संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे घडली.  सविस्तर माहिती अशी की, सुरेश जगन्नाथ शेळके हे आरोपी प्रदीप आनंदा दशिंग, रा. लोहारे, ता. संगमनेर याच्याकडे गवंडी म्हणून कामास होते. शेळके यांचे मजुरीचे … Read more

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

शिरसगाव – देणेदारांना आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शिरसगाव येथील अण्णासाहेब अर्जुन दौंड या ३८ वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.  विशेष म्हणजे मुंबईला बहिणीकडे निघून राहुरीत उतरुन या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे खळबळ उडाली असून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अवस्थेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, अण्णासाहेब दौड हे … Read more

उपनेते अनिल राठोड यांना विधानपरिषदेवर घेऊन पालकमंत्री करा – जगताप

नेवासा : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच नेवासा शहरात शिवसैनिकांनी पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना विधानपरिषदेवर घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री करावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे … Read more

घरात घुसलेल्या चोरट्यांचा प्रतिकार केल्याने चोरट्यांनी केला कुऱ्हाडीने हल्ला

श्रीगोंदे – घराचा दरवाजा तोडून घरात घुसलेल्या चोरांवर प्रतिकार केल्याने चोरट्यांनी डोक्यात कुर्हाडीचा जबरी घाव घालून जखमी केले. ही घटना श्रीगोंदा परिसरात मांडवगण रोड, तरटे वस्ती, शाडूचा मळा येथे घडली. सविस्तर माहिती अशी की,  भगवान तरटे यांच्या बंगल्यात रात्री १. ४५ च्या सुमारास तोंडाला फडके गुंडाळलेले चोरटे घराचा दरवाजा तोडून घरात घुसले. घरात सामानाची उचकापाचक … Read more

चार तासांत लंडनहून न्यूयॉर्कला घेऊन जाईल हे विमान

वॉशिंग्टन : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासा व बूम सुपरसोनिक कंपनी विमान प्रवाशांचे एक मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लवकरच सुमारे ६ हजार किलोमीटरचे अंतर अवघ्या ३ ते ४ तासांमध्ये पूर्ण केले जाईल. नासाने एका सुपरसोनिक विमानाची निर्मिती केली असून ते ते ताशी ९४० किलोमीटरच्या वेगाने उड्डाण करू शकते. थोडक्यात सांगायचे तर लंडन … Read more

शिर्डीत रेल्वेरुळावर महिलेचा मृतदेह आढळला

शिर्डी ( प्रतिनिधी ) – शिडीं परिसरात रेल्वे रुळावर काल एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेचे वय ५५ ते ६० वर्षाचे आहे.   याप्रकरणी पो.कॉ. वेताळ यांच्या खबरीवरुन शिडी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  सदर महिला कोण ? तिचा मृत्यूकसा झाला? काही घातपात आहे का ? याचा पुढील तपास हे.कॉ पवार हे करीत … Read more

ग्रामसेवकाने दोन ग्रामपंचायतीत तब्बल ९३ लाखांना चुना लावला!

संगमनेर – अकोले तालुक्यातील आंबेवंगण ग्रामपंचायत व शेणीत ग्रामपंचायत या दोन ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून काम करताना आरोपी भाऊसाहेब महादेव रणशिंग याने तब्बल ९३ लाखाहुन जादा रकमेचा अपहार केला. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.  पहिली फिर्याद काशीनाथ धोंडिराम सरोदे, धंदा नोकरी, रा. श्रद्धा कॉलनी, गुंजाळवाडी, संगमनेर यांनी राजूर पोलिसांत दिल्यावरुन आरोपी ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव … Read more

दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आल्याने ट्रकला लागली आग

नगर : दुचाकीस्वार ट्रकला ओव्हरटेक करत होता. ट्रक आणि दुचाकीस्वाराचा वेग बरोबरच. यातच ट्रकच्या मागील चाकाखाली दुचाकी सापडली. या अपघातात दुचाकीस्वार दुचाकीवरून लांब फेकला गेला. त्यामुळे सुदैवाने वाचला. परंतु दुचाकी ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून त्या घर्षणाने ट्रकला आग लागली. क्षणात ट्रक आणि त्याखाली सापडलेली दुचाकी जळून खाक झाला. या प्रकाराने नगर-पुणे रोडवरील वाहतूक दोन तास … Read more

बिकट परिस्थितीत संघाला विजयी करू शकलो नाही

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. त्या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीपासूनच कर्णधार विराट कोहलीच्या संघाला विश्वचषक स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून अनेकांनी पसंती दिली होती. पण स्पर्धेच्या अंतिम टप्प्यावरच भारतीय संघाला मायदेशी परतावे लागल्यामुळे असंख्य भारतीय क्रीडा शौकिनांना दु:ख झाले. आपला संघ नेहमीच विजयी ठरावा, असे … Read more