उपनेते अनिल राठोड यांना विधानपरिषदेवर घेऊन पालकमंत्री करा – जगताप

नेवासा : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच नेवासा शहरात शिवसैनिकांनी पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना विधानपरिषदेवर घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री करावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे … Read more

घरात घुसलेल्या चोरट्यांचा प्रतिकार केल्याने चोरट्यांनी केला कुऱ्हाडीने हल्ला

श्रीगोंदे – घराचा दरवाजा तोडून घरात घुसलेल्या चोरांवर प्रतिकार केल्याने चोरट्यांनी डोक्यात कुर्हाडीचा जबरी घाव घालून जखमी केले. ही घटना श्रीगोंदा परिसरात मांडवगण रोड, तरटे वस्ती, शाडूचा मळा येथे घडली. सविस्तर माहिती अशी की,  भगवान तरटे यांच्या बंगल्यात रात्री १. ४५ च्या सुमारास तोंडाला फडके गुंडाळलेले चोरटे घराचा दरवाजा तोडून घरात घुसले. घरात सामानाची उचकापाचक … Read more

चार तासांत लंडनहून न्यूयॉर्कला घेऊन जाईल हे विमान

वॉशिंग्टन : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासा व बूम सुपरसोनिक कंपनी विमान प्रवाशांचे एक मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लवकरच सुमारे ६ हजार किलोमीटरचे अंतर अवघ्या ३ ते ४ तासांमध्ये पूर्ण केले जाईल. नासाने एका सुपरसोनिक विमानाची निर्मिती केली असून ते ते ताशी ९४० किलोमीटरच्या वेगाने उड्डाण करू शकते. थोडक्यात सांगायचे तर लंडन … Read more

शिर्डीत रेल्वेरुळावर महिलेचा मृतदेह आढळला

शिर्डी ( प्रतिनिधी ) – शिडीं परिसरात रेल्वे रुळावर काल एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेचे वय ५५ ते ६० वर्षाचे आहे.   याप्रकरणी पो.कॉ. वेताळ यांच्या खबरीवरुन शिडी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  सदर महिला कोण ? तिचा मृत्यूकसा झाला? काही घातपात आहे का ? याचा पुढील तपास हे.कॉ पवार हे करीत … Read more

ग्रामसेवकाने दोन ग्रामपंचायतीत तब्बल ९३ लाखांना चुना लावला!

संगमनेर – अकोले तालुक्यातील आंबेवंगण ग्रामपंचायत व शेणीत ग्रामपंचायत या दोन ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून काम करताना आरोपी भाऊसाहेब महादेव रणशिंग याने तब्बल ९३ लाखाहुन जादा रकमेचा अपहार केला. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.  पहिली फिर्याद काशीनाथ धोंडिराम सरोदे, धंदा नोकरी, रा. श्रद्धा कॉलनी, गुंजाळवाडी, संगमनेर यांनी राजूर पोलिसांत दिल्यावरुन आरोपी ग्रामसेवक भाऊसाहेब महादेव … Read more

दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आल्याने ट्रकला लागली आग

नगर : दुचाकीस्वार ट्रकला ओव्हरटेक करत होता. ट्रक आणि दुचाकीस्वाराचा वेग बरोबरच. यातच ट्रकच्या मागील चाकाखाली दुचाकी सापडली. या अपघातात दुचाकीस्वार दुचाकीवरून लांब फेकला गेला. त्यामुळे सुदैवाने वाचला. परंतु दुचाकी ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून त्या घर्षणाने ट्रकला आग लागली. क्षणात ट्रक आणि त्याखाली सापडलेली दुचाकी जळून खाक झाला. या प्रकाराने नगर-पुणे रोडवरील वाहतूक दोन तास … Read more

बिकट परिस्थितीत संघाला विजयी करू शकलो नाही

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. त्या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीपासूनच कर्णधार विराट कोहलीच्या संघाला विश्वचषक स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून अनेकांनी पसंती दिली होती. पण स्पर्धेच्या अंतिम टप्प्यावरच भारतीय संघाला मायदेशी परतावे लागल्यामुळे असंख्य भारतीय क्रीडा शौकिनांना दु:ख झाले. आपला संघ नेहमीच विजयी ठरावा, असे … Read more

वृद्ध महिलेस मारहाण करून गळ्यातील डोरले पळवले

अहमदनगर : एका ६० वर्षीय वृद्ध महिलेस हाताच्या चापटीने मारहाण करुन तिच्या गळ्यातील साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले बळजबरीने चोरुन नेले. ही घटना नगर तालुक्यातील बाराबाभळी परिसरातील मोरे वस्ती, कवड्याची खोरी येथे मंगळवार दि.२६ रोजी ७ वाजता घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बेबीबाई भानुदास … Read more

शरद पवारांमुळे माझा राजकीय पुनर्जन्म

पुणे : महात्मा फुले यांच्याबरोबर सर्व जाती-धर्माचे लोक काम करीत होते, कारण सत्य हीच त्यांची जात होती आणि सत्य हाच त्यांचा धर्म होता. खुद्द शरद पवार यांचे आई-वडीलदेखील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते आणि त्यामुळेच शरद पवार यांनीदेखील जातीधर्माचा भेद बाजूला सारून समाजकारण आणि राजकारण केले. त्यांच्यामुळेच माझा राजकीय पुनर्जन्म झाला, असे मत अखिल भारतीय महात्मा … Read more

कांद्याचे भाव कोसळले; शेतकऱ्यांनी पाडले लिलाव बंद

नगर : शेवगाव बाजार समितीत कांद्याला अत्यंत नीच्चांकी भाव मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना आवरण्यासाठी बाजार समितीने पोलिस संरक्षण मागवले. मात्र, पोलिस बळाचा वापर करत समितीने शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून काढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मळेगावचे माजी सरपंच शिवाजीराव भिसे यांनी केला. बाजार समितीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मायलेकीने विहिरीत उडी घेत संपविले जीवन !

अहमदनगर :- धनगरवाडी (ता. नगर) येथे मायलेकीची विहिरीत उडी घेऊन, आत्महत्या केल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना कशामुळे घडली, हे अद्यापही कळू शकलेले नाही. नीता उर्फ कविता सचिन कापडे (वय- २७) व मुलगी प्रणाली (वय- ४) यांनी विहिरीत उडी घेऊन, आत्महत्या केली. गुरुवारी (दि.२८) रात्री नीता कापडे … Read more

बाळासाहेब थोरात दोन महिन्यापूर्वी जे बोलले होते तेच खरे झाले !

अहमदनगर: राजकारणात कधी कुणाचे अच्छे दिन येतील आणि कधी कुणाची सत्ता जाईल हे सांगता येत नाही. याचाच अनुभव आता महाराष्ट्र घेतोय. फडणवीस यांनी आरशासमोर उभं राहावं त्यांना पुढचा विरोधीपक्ष नेता दिसेल अशी भविष्यवाणी दोन महिन्यापूर्वी थोरातांनी केली होती. देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्षात दिसत आहेत. असे ही थोरात म्हणाले होते. गेल्या महिन्याभरात राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष … Read more

ठाकरे सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करावे लागणार?

मुंबई – महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी थाटामाटात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या नवीन सरकारला बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी 3 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यापूर्वी नवीन सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.   आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. आजपासून महाराष्ट्र विकासआघाडीच्या कारभाराला सुरुवात होणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यासोबत शपथ घेतलेले मंत्रीही … Read more

पाण्याची समस्या घेऊन स्वीडनचे लोक आले राळेगणसिद्धीच्या वारीला

पारनेर :- पाण्याची समस्या भारताबरोबरच संपूर्ण जगभरात पाहायला मिळते. अशात जगभरातील अनेक देश पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. परंतु याच दरम्यान भारतात एक असे गाव आहे ज्याच्यावर संपूर्ण भारत गर्व करू शकतो. या गावाची पाणी वाचवण्याची पद्धती शिकण्यासाठी दुसऱ्या देशातून लोक येत आहेत.  ते गाव दुसरे तिसरे कोनतेही नसून महाराष्ट्रातील राळेगणसिद्धी हे आहे. राळेगण … Read more

भाजप ला संपवण्यासाठी संजय राऊत सरसावले ‘या’ राज्यात होणार राजकीय भूकंप

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेत किंग मेकर ची भूमिका बजावल्यानंतर आता संजय राऊत यांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे. भाजप ला संपवण्यासाठी संजय राऊत आता मैदानात उतरले आहेत. आता गोव्यात राजकीय भूकंप घडेल,  असा इशारा संजय राऊतयांनी भाजपला दिला आहे.  गोव्यात सध्या भाजपच्या नेतृत्त्वात प्रमोद सावंत यांचं सरकार आहे. हे सरकार उलथवून टाकणार असल्याचे  संजय … Read more

भीषण अपघातात ४ जण ठार, टँकरने स्वीफ्टला अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेले !

मुंबई-पुणे रोड – एचपी गॅस टँकरला स्वीफ्ट डिझायर कारनं मागून दिलेल्या जोरदार धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर झाले आहेत. 2 गंभीर जखमी असलेल्या महिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रिसवाडी रसायनी गावाजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पहाटे 4 च्या सुमारास लग्न … Read more

पती पत्नीला ट्रेनने चिरडले, सोळा वर्षांच्या प्रेमकहाणीचा दुर्दैवी अंत!

दिल्ली/ यमुना विहार – यमुना विहार कॉलनीत राहणाऱ्या नीरज कथुरिया आणि निशा कथुरिया यांच्या सोळा वर्षाच्या प्रेम कहाणीचा असा अंत होईल असं कोणालाही वाटलं नव्हत.  रात्री जवळजवळ अकरा वाजता दोघांमध्ये घरातील वाढत्या खर्चावरून वादविवाद झाला वाद इतका वाढला की निशा आपलं सामान घेऊन रेल्वे स्टेशनवर गेली. पत्नीची समजूत काढण्यासाठी पती सुद्धा आपल्या मित्राबरोबर तिच्यामागे रेल्वे … Read more

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

नवी दिल्ली : शासकीय विमानसेवा कंपनी एअर इंडियाचे खासगीकरण होणार नाही, अशी माहिती केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी नुकतीच राज्यसभेत दिली. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली जाणार नसल्याचेही ते म्हणाले. कंपनीचे खासगीकरण करण्यापेक्षा कंपनी बंद केली जाईल. एअर इंडिया कंपनीतील वैमानिक खासगीकरण केले जाणार असल्याने एअरलाइन्स सोडत आहे का?, असा प्रश्न हरदीप … Read more