अहमदनगर गारठले, राज्यातील सर्वात कमी तापमान नगरमध्ये !

नगर जिल्ह्यातून पावसाने अखेर निरोप घेतला असून थंडीचे आगमन झाले आहे. सलग पाचव्या दिवशी महाबळेश्वरपेक्षा सर्वात थंड तापमान अहमदनगर मध्ये नोंदवले गेले.  रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नगरमध्ये 14.6 अंश सेल्सिअस होते. त्यात आणखी घट होत सोमवारी 14 अंश सेल्सिअसपर्यंत आले. सर्वात थंड समजल्या जाणार्‍या महाबळेश्वरमध्ये किमान तापमानाची नोंद 15.6 अंश सेल्सिअस झाली. जिल्ह्यात … Read more

सरकार पुन्हा येण्यासाठी हवे ते करू!

मुंबई :- महाशिवआघाडी स्थापन होण्याची चिन्हे दिसत असतानाच भाजपनेही सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली असून यासाठी मोठी जबाबदारी ही नारायण राणे यांच्यावर सोपवली आहे. स्वतः नारायण राणे यांनीच पत्रकारांना सांगितले की, ‘राज्यात लवकरच भाजपचे सरकार येईल.’ मंगळवारी सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. यात भाजपने वेट अँड वॉचची भूमिका … Read more

भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रयत्न व्हावेत : शालिनी विखे 

शिर्डी: आपल्याकडे अजूनही मुलांचा आग्रह धरला जातो. यातून स्त्रीभ्रूण हत्या होते. हे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांनी सांगितले. प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीन्स) अभिमत विद्यापीठ लोणी यांच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या वतीने बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रात महिलांच्या आरोग्याविषयी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी … Read more

‘अशोक’च्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी 

श्रीरामपूर :- अशोक साखर कारखान्याच्या गैरकारभाराची चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करावे, संबंधित पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी नगर येथील साखर संचालकांकडे केली. २३ महिन्यांपासून कारखान्यातील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी साखर संचालकाकडे करत आहोत. या अनुषंगाने विशेष लेखापरीक्षक अजित मुठे यांनी मागणी करूनही कारखान्याने तपासणीसाठी दप्तर उपलब्ध केले … Read more

अहमदनगर- पुणे महामार्गावर एकाचा मृत्यू

अहमदनगर- पुणे महामार्गावरील सर्वात धोकादायक ठिकाण असलेल्या सुपा बस स्थानक चौकात सोमवारी सकाळी 9 ते 9.30 दरम्यान एक जे. सी.बी. मशीन पारनेरकडून चौक ओलांडून पुण्याकडे वळत होता. तेवढ्यात अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने एक कंटेनर क्र. MH 20 DE 1553 हा जोरात येत होता. ऐन चौकात जे. सी. बी. व कंटेनर याची जोरात धडक होऊन दोन्ही वाहने … Read more

महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर

मुंबई :- राज्यातील 27 महानगरपालिका महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलीय. आज दुपारी ३ वाजता मंत्रालयात आरक्षणाची लॉटरी काढली गेली असून प्रधान सचिवांच्या उपस्थित झालेल्या या सोडतीसाठी विद्यमान महापौर, स्थायी समिती सभापती व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आल होत. अहमदनगर महापालिकेतील महापौरपद आरक्षित झाले असून, त्यामुळे नव्या चेहऱ्याला संधी की जुन्या-जाणत्यांची वर्णी लागणार ? याची … Read more

झटपट श्रीमंत होण्यासाठी बनावट नोटा तयार करण्याचा प्लॅन !

 श्रीगोंदा – बनावट नोटा तयार करून त्या वितरित करणाऱ्या टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव व तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक गावित यांनी ही कामगिरी केली आहे.  आतापर्यंत अतुल रघुनाथ आगरकर, श्रीकांत सदाशिव माने, अमित भीमराव शिंदे, युवराज लक्ष्‍मण कांबळे, सुमित भीमराव शिंदे, शिवाजी श्रीपती शिंदे … Read more

श्रीगोंद्यात वीस हजारांत ‘एक लाख रुपये’

श्रीगोंदा तालुक्यातील बनावट नोटांप्रकरणी सलीम चांद सय्यद व अण्णा ज्ञानदेव खोमणे (दोघेही रा. घारगाव, ता. श्रीगोंदा) या दोघांना मंगळवारी अटक करण्यात आली.  या प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट नोटा तयार करून त्या वितरित करणाऱ्या टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला. बनावट नोटाप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यात पकडण्यात आलेल्या आरोपींकडून दररोज नवनवीन माहिती उघडकीस … Read more

कडकनाथ कोंबडी प्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा

सांगली :- कडकनाथ कोंबडी पालनातून बर्ड अग्रो प्रायव्हेट कंपनीने सांगली जिल्ह्यातील १४० गुंतवणूकदारांना १ कोटी ५४ लाख ६६ हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.  या प्रकरणी कंपनीच्या अध्यक्षांसह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इसाक पठाण यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी ‘बर्ड’चे अध्यक्ष निंबाळकर, गणेश निंबाळकर यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल … Read more

गडचिरोली जिल्ह्यात तरुणाची गळा चिरून हत्या

नागपूर :- पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात एकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.    काशीराम असे मृताचे नाव आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुका सुरळीत पार पडल्यानंतरची ही पहिलीच घटना आहे. रविवारी रात्री नक्षलवादी धानोरा तालुक्यातील रानकट्टा या गावात आले. त्यांनी काशीरामला घरातून बाहेर काढून गावाबाहेर नेले व तेथे गळा चिरून त्याची … Read more

वृद्धाला बेदम मारहाण 

नगर: तालुक्यातील बायजाबाई जेऊर येथील वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सुरेश दत्तात्रय तवले, किरण सुरेश तवले, श्रीकांत सुरेश तवले, मंगल दिलीप तवले, गौरव दिलीप तवले, बाबासाहेब पंढरीनाथ ससे, संजय बाबासाहेब ससे, वैशाली संजय ससे, शांताबाई ससे (जेऊर) यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.   बाबासाहेब मगर शेतात गेले होतेे. पाण्याचे पाइप काढल्याचे … Read more

संगमनेरच्या तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून नायजेरियन तरुणाकडून फसवणूक

तरुणीशी ऑनलाइन मैत्री करून तिला गिफ्ट पाठवत असल्याचे सांगून तिची फसवणूक केल्याप्रकरणी नगर पोलिसांनी नायजेरियन आरोपीस अटक केली आहे.  हा नायजेरियन तीन वर्षांपूर्वी भारतात मेडिकल व्हिसावर आला होता. त्यानंतर त्याने व्हिसाचे नूतनीकरण केले नाही. तो परत त्याच्या देशात गेला नाही. गेल्या अडीच वर्षांपासून तो दिल्लीमध्ये बेकायदा राहत होता. जिल्ह्यातील संगमनेर येथील उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीला … Read more

या कारणामुळे विधानसभा निवडणुकीत अपयश !  राधाकृष्ण विखे यांचे स्पष्टीकरण 

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये आता पक्षांतर्गत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत भाजप प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार आहे, तर नगर जिल्हाध्यक्षांसह बूथ अध्यक्षपदाच्या निवडणूक ३० नोव्हेंबरपर्यंत होणार आहे.   या निवडणुकीच्या निमित्त खासदार तथा पक्षनिरीक्षक गिरीश बापट यांनी मंगळवारी नगरमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.   विधानसभा … Read more

बेरोजगारीला कंटाळून डीएड झालेल्या तरुणाची विहिरीत उडी

जळगाव सपकाळ – उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे बेरोजगार असलेल्या तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे मंगळवारी उघडकीस आली. गणेश नामदेव सपकाळ (३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. जळगाव सपकाळ येथील गणेश सपकाळ यांचे शिक्षण डीएड पर्यत झालेले आहे. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने नोकरी मिळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न … Read more

कब्बडी खेळायला नकार दिल्याने, ब्लेडने वार करत मारहाण

खामगांव –  फुलंब्री तालुक्यातील जळगांव मेटे मित्राने कब्बडी खेळाण्यासाठी नकार मिळाल्यामुळे एकाने रागात येऊन ब्लेडने वार केल्याची घटना सोमवार (दि.११) रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.  जळगाव मेटे येथील रामेश्वर काळुबा मेटे(२३) दि. ११ रोजी रात्री ८ः३० सुमारास ग्रामपंचायत कार्यलयाजवळ मित्रासोबत होता. तेथे आरोपी नवनाथ प्रकाश मेटे हा आला व त्यांने रामेश्वर काळुबा मेटे यास कब्बडी … Read more

पंतप्रधान – राष्ट्रपतींच्या फोटोचा गैरवापर केल्यास सहा महिन्यांची शिक्षा होणार

नवी दिल्ली : पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या फोटोचा दुरुपयोग केल्यास आता सहा महिन्यांपर्यंत शिक्षा होऊ शकते. खाजगी कंपन्यांच्या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा वापर करण्यात आल्यानंतर  केंद्र सरकार सावध झाले आहे.  यामुळे  केंद्र सरकारने बोधचिन्ह आणि नावे अधिनियमन कायदा १९५० मध्ये पहिल्यांदाच शिक्षेची तरतूद आणण्यावर विचार केला आहे, तसेच दंडाची रक्कम देखील एक हजार पटीने … Read more

दारू पाजण्यास नकार दिल्याने, दारूच्या बाटलीनेच गळ्यावर वार

नागपूर : दारू पाजण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी दारूची शिशी फोडून युवकावर प्राणाघातक वार केल्याची घटना कोराडी भागात घडली.  पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. आसिफ रहमान खान (२३, रा. जयभिमनगर, महादुला, कोराडी), असे जखमी युवकाचे  नाव आहे. कातंश्वेर भुसाडे (३१) आणि गुलशन भुसाडे (२८, दोन्ही रा. जयभिमनगर, मजदूर चौक, कोराडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे … Read more

भारतासोबत व्यापार बंद केल्यानंतर पाकिस्तान संकटात!

नवी दिल्ली : भारतासोबतचे सर्व प्रकारचे व्यापार संबंध तडकाफडकी तोडणे पाकिस्तानला चांगलेच भोवले आहे. भारताने जम्मू-काश्मीरसंबंधित ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला होता. मात्र आधीच महागाई आणि आर्थिक कमजोरीच्या समस्यांमध्ये होरपळत असलेल्या पाकिस्तानसमोरील अडचणी अधिक वाढल्या आहेत. भारतासोबत व्यापार बंद केल्यामुळे कापसाची आयात करण्यासाठी पाकिस्तानला आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत. याशिवाय पाकिस्तानमध्ये … Read more