मोटारसायकलींचा अपघात; मुलीचा मृत्यू

अहमदनगर : दोन मोटारसायकलचा अपघात होवून यात प्रिती संतोष म्हस्के या १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू तर भानुदास केशव खराडे हे जखमी झाले आहेत. ही घटना दि.९ ऑक्टोबर रोजी कुळधरण गावच्या शिवारातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर घडला असून, याप्रकरणी महेश बबन कुलथे (रा.दुरगाव,ता.कर्जत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, भानुदास केशव खराडे हे … Read more

पोलिसास धक्काबुक्की

अहमदनगर : वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास सांगितल्याचा राग येवून त्यास शिवीगाळ केल्याची घटना जामखेडमध्ये घडली. याप्रकरणी नागेश अशोक गवळी, अशोक मारूती गवळी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, रॅलीमुळे झालेली वाहतूक कोंडी कमी करत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे सांगितल्याने नागेश अशोक गवळी व अशोक … Read more

मनपा आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरच बसवण्यात येणार

अहमदनगर : महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या व पुतळा परिसर सुशोभिकरणाच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. या पुतळ्यासाठीचा आराखडा आणि अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा ठराव महासभेत दोन वर्षापुर्वी झालेला आहे. मात्र त्यानंतर काहीही कार्यवाही झालेली नाही. … Read more

शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करणार?

मुंबई : सरकार स्थापन करण्यास जर भाजपा अपयशी ठरली तर राज्यातील जनतेच्या हितासाठी सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना स्वीकारेल, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा लोकशाही मानणाऱ्यांच्या तोंडी शोभत नाही. राष्ट्रपती कोणाच्या खिशात नसतात, असेही त्यांनी भाजपाला सुनावले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत … Read more

क्लासेस लावण्यासाठी पैसे नसल्याने विषप्राशन करून तरुणीची आत्महत्या

बीड: महाविद्यालयात शिकणाऱ्या सारिका दादासाहेब शिंदे (वय-18) या तरुणीने क्लासेस लावण्यासाठी पैसे नसल्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सारिकाने विषप्राशन केल्याचे समजताच तिला नातेवाईकांनी रुग्णालयात नेले. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतरही तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने तिचा उपचाराचाअभावी मृत्यू झाल्याचा आरोप सारिकाच्या नातेवाईकांनी केला आहे. गेवराई तालुक्यतील कोळगाव येथे ही घटना घडली. सारीका शिंदे ही चलकंबा … Read more

लग्नानंतर अवघ्या चार दिवसात नववधू प्रियकरासोबत फरार !

नवी दिल्ली : लग्नानंतर अवघ्या चार दिवसात नववधू प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत घडला. फोटोग्राफरच्या प्रेमात पडलेली तरुणी माहेरी येण्याच्या निमित्ताने प्रियकराचा हात धरुन फरार झाली. दिल्लीतील गोकुलपुरी भागात हे प्रेमाचं त्रांगडं घडलं. लग्नाच्या महिनाभर आधी संबंधित तरुणीचं एका तरुणावर प्रेम जडलं. लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने तिला लग्न मोडण्याचा धीर होईना. अखेर लग्नानंतर … Read more

लग्नाची वरात काढण्यावरुन झाले वाद, भर लग्नात वधु आणि वर पक्षात हाणामारी !

हैदराबाद : तेलंगणामध्ये भरलग्नातच वधू आणि वरपक्षामध्ये शाब्दिक वादानंतर पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. या राड्यात तिघे जण जखमी झाले आहेत. तेलंगणच्या सूर्यपेट जिल्ह्यातील लग्नसोहळ्यात हा राडा झालाय. कोदाद मंडलमध्ये राहणाऱ्या अजयचा विवाह आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील इंद्रजासोबत पार पडला. सुरुवातीला वधू आणि वर पक्षाची मंडळी खुशीत होती, मात्र गावात … Read more

आजपर्यंत ग्रीन टी आणि ब्लॅक टी चे आपण बरेच फायदे ऐकले,जाणून घ्या ब्लू टीचे अफाट फायदे !

सध्या लोकांमध्ये हर्बल टीची क्रेझ वाढताना दिसत आहे.बाजारामध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सचे हर्बल टी उपलब्ध असतात. या सर्व हर्बल टीमध्ये ग्रीन टी आणि ब्लॅक टी लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. परंतु चहा इतरही अनेक रंगांमध्ये असते. जशी व्हाइट आणि येलो टी. हे चहा वेगवेगळ्या फुलांच्या अर्कापासून तयार करण्यात येतात. यामध्ये एक निळा चहा असतो त्याला ‘ब्ल्यू टी’ म्हणून ओळखलं … Read more

हिवाळ्यात आरोग्यदायी राहायचं असेल तर हे 10 पदार्थ खाण्याचे विसरू नका…

हिवाळ्यात एरवी पचायला जड असलेले पदार्थ सेवन केले तरी ते पचायला सोपे जाते. कमी आहार घेणारी माणसे या दिवसांत अधिक जेवतात आणि ते अन्न चांगल्या रीतीने पचवितात. थंडीत शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीर जास्त ऊर्जा वापरते. यामुळे सतत भूक लागते. सतत भूक लागल्याने आपण गरजेपेक्षा जास्त खातो. म्हणूनच आहाराकडे जास्त लक्ष द्यायला हवे. तर पाहू … Read more

दहावी पास असणाऱ्याना नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल साडे तीन हजार पदांसाठी मेगाभरती !

मुंबई :- तब्बल ३६५० जागांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये भरती प्रक्रिया होत आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट केवळ १० वी पास इतकीच आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत जी तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि या पदांसाठी अर्ज करा. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना पोस्टात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलने तब्बल ३६५० … Read more

नगर शहराला महानगर बनवणार : आमदार संग्राम जगताप

अहमदनगर :- नगर शहर विकासाच्या संकल्पनेतून नगरकरांनी मला दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान केले. माझ्यावर आता शहर विकासाची मोठी जबाबदारी आहे. नागरिकांना बरोबर घेऊन मी शहर विकासाला चालना देणार आहे. उपनगरांच्या विकासाबरोबरच मध्यवर्ती शहराचे प्रश्न सोडवणार आहे.  विकासकामांबरोबर रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मुकुंदनगरच्या विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात कामे … Read more

फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेल्याने नैराश्यग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या

राहुरी :- कर्जाचा हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेत लिलाव केल्याने आलेल्या नैराश्यातून गडदे आखाडा येथील अविवाहित तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री राहुरीच्या गडदे आखाडा येथे ही घटना घडली. भारत बारकू गडदे (२४) याने दोन वर्षांपूर्वी फायनन्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला होता. भारतने दोन सहामाही हप्ते व्याजासह भरले होते. मात्र, … Read more

५ वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून महिलेची आत्महत्या

श्रीरामपूर ;- तालुक्यातील वडाळा महादेव शिवारात राहणाऱ्या अश्विनी दीपक सोनुले (वय २६) या विवाहितेने आपल्या ५ वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. नेवासे रस्त्यावरील साक्षी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे मारुती राऊत यांच्या विहिरीत या महिलेने शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास मुलीसह उडी घेतली. लोकांच्या ही गोष्ट लक्षात येताच शोधमोहीम सुरू केली. दुपारी महिलेचा मृतदेह सापडला. मुलीचा … Read more

मिरवणुकीवर टीका झाल्यानंतर रोहित पवार म्हणतात…

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाशिकमध्ये गेले होते. मात्र दुसरीकडे रोहित पवारांची त्यांच्या मतदारसंघात विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावरुन रोहित पवारांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. विजयी मिरवणुकीवरुन टीका झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणाले, … Read more

शरद पवार मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री ! राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तास्थापनेच्या हालचाली ?

मुंबई : विधानसभा निवडणूक निकाल लागून ९ दिवस होवूनही राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. मुख्यमंत्री पदावरून सेना- भाजप यांच्यात संघर्ष वाढला असून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीला सत्तास्थापनेत अपयश आल्यास, आघाडीकडून शरद पवार मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतील असे वृत्त Zee 24 तास या वृत्तवाहिनीने दिले आहे. शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाला … Read more

आयुक्तांच्या दालनाला चिकटवले निवेदन

नगर : संततधार पावसाने शहरातील रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत.  रस्त्याचे पॅचिंगचे काम मनपा प्रशासनाने लवकरात लवकर करावे अशी मागणी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना देण्यासाठी मागणीचे निवेदन देण्यासाठी गेले तेव्हा अधिकारी उपस्थित नसल्याने आयुक्तांच्या दालनाला निवेदन चिकटवून नगरसेवक योगीराज गाडे यांनी निषेध व्यक्त … Read more

आता कोण होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?

अहमदनगर :- विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता पालकमंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता चर्चेला सुरवात झाली आहे.पालकमंत्रिपदासाठी शहर-जिल्ह्यात इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. मंत्रीपदासाठी जिल्ह्यातील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यावर पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे ठरेल. शहर अथवा जिल्ह्यातील इच्छुकांना संधी मिळाली, तर पालकमंत्रिपद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. विधानसभेचा निवडणूक निकाल लागून आठ दिवस झाले तरी … Read more

जीवे मारण्याचा प्रयत्न,पाचपुते कुटुंबियांनमध्ये भितीचे वातावरण

अहमदनगर : डोक्यात तब्बल दगडाचे चार वार करुन जीवे मारण्याची घटना नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे दि.२१ऑक्टोंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर असे की, नगर जामखेड रोड वरील टाकळी काझी येथील पेट्रोलपंपासमोर सुनिल पाचपुते यांचे चहा व नाष्ट्याचे हॉटेल आहे. दि.२१ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ते रात्री दहाच्या सुमारास हॉटेल बंद करुन बाहेर पत्र्याच्या … Read more