ह्रद्याचा ठोका चुकवित मल्लखांबची प्रात्यक्षिके सादर

अहमदनगर (प्रतिनिधी)- दोरी व खांबावरच्या मल्लखांब स्पर्धेत खेळाडूंनी ह्रद्याचा ठोका चुकवित प्रात्यक्षिके सादर केली. अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशन आयोजित जिल्हा मल्लखांब अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा बुरुडगाव रोड येथील श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाऊंडेशन संचलित सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल आणि मोहनलाल रामावतार मानधना ज्युनिअर कॉलेजमध्ये उत्साहात पार पडली. या स्पर्धेस शहरासह जिल्ह्यातील शालेय खेळाडूंचा उत्सफुर्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कर्ज बाजारीपणाला कंटाळून तरुण शेतक-याची आत्महत्या !

राहाता :-  तालुक्यातील गोगलगांव  येथील तरुण शेतक-याने सततची नापिकीमुळे आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळून   गुरूवारी (दि.३१) मध्यरात्री घरातच गळफास घेत जीवनयात्रा संपविली. रवींद्र लक्ष्मण मगर (वय ३०) असे या शेतक-याचे नाव असून तो अविवाहित होता. वडिलाच्या निधनानंतर तो आपल्या वृध्द आईसोबत राहत होता.  रवींद्रला गोगलगांव येथे अवघी तीन एकर शेतजमीन आहे. वेळेत पाऊस झाला नाही म्हणून या शेत … Read more

कल्याण – अहमदनगर या एस.टी बसने चिमुकलीला चिरडले

अहमदनगर – नगर कल्याण महामार्गावर पारनेर तालुक्यातील काळेवाडी येथे भरधाव वेगात कल्याण कडून येत असलेली कल्याण – अहमदनगर या एस.टी बसने सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.  माधुरी बाबाजी भोसले असे या मृत चिमुकलीचे नाव असून. ही घटना घडल्यानंतर बसचालक तिथून पसार झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.  मिळालेल्या माहितीवरून … Read more

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा सकारात्मक विचार करावा !

अहमदनगर : शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचा सकारात्मक विचार करावा.असे साकडे या शिष्टमंडळाने ठाकरे यांना घातले.राठोड यांच्याबाबत आपण विचाराधीन असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. अशी माहिती सेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली. शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे व शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या नेतृत्वाखालील … Read more

कारमधून फिरून घरफोड्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाला अटक

नागपूर :- कारमधून फिरून घरफोड्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाला मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. उच्चशिक्षित असलेल्या या युगुलाने यूट्यूबवरून घरफोडीचे प्रशिक्षण घेऊन घरातच सराव केला. यात प्रशिक्षित झाल्यानंतर हे दोघे रात्री कारमधून बाहेर पडून घरफोडी करायचे. त्यांनी शहरात किमान पाच ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. शैलेश वसंता डुंभरे (वय २९) आणि प्रिया (वय २१) अशी … Read more

रोहित पवार यांच्या विजयात आहे ‘ह्या’ व्यक्तीची महत्त्वपूर्ण भूमिका

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी विजय मिळवत या मतदारसंघावरील २५ वर्षांपासून भाजपची सत्ता संपुष्टात आणली. या निवडणुकीमध्ये पवार यांनी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार राम शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला. पवार यांच्या प्रचारात आणि विजयात महाआघाडी तर अग्रेसर होतीच. मात्र, यामध्ये सर्वात पुढे होत्या त्यांच्या मातुश्री तथा बारामती … Read more

श्रीगोंद्यात रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

नगर : श्रीगोंदे तालु्क्यातील बेलवंडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली. शतक मच्छिंद्र यादव (वय २०, रा. दुर्गळवाडी, ता. कोरेगाव, सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हुतात्मा एक्सप्रेस रेल्वे बुधवारी सकाळी बेलवंडी स्थानकात थांबली होती. यादव प्लॅटफॉर्मवर उतरला होता. रेल्वेत बसल्यानंतर काही वेळानंतर तो … Read more

धक्कादायक : अहमदनगरमध्ये युवकाचा दगडाने ठेचून खून !

जामखेड :- चार वर्षांपूर्वी उसने दिलेले एक लाख रुपये मागितल्याच्या कारणावरून खर्डा येथे बाळु बजरंग पवार या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या प्रकरणी एकूण पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत गाव बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थ व नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. … Read more

महापौर वाकळे यांनाही पडला ह्या रस्त्याचा विसर !

अहमदनगर : नगर शहर विकास योजनेतील दिल्लीगेट रस्ता रुंदीकरणासाठी मनपाने प्रशासकीय सोपास्कर पूर्ण केले आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करून फोटोसेशन केले. तथापि, रस्ता रुंदीकरणाची अंमलबजावणी झालेली नाही. महापौरांनाही या रस्त्याचा विसर पडला आहे. आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे असताना त्यांनी दिल्लीगेट भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ता रुंदीकरणाकडे लक्ष केंद्रीत केले … Read more

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे पुन्हा मनपाचा पदभार !

अहमदनगर :- मनपाचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग रजेवर गेल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे गुरूवारी पुन्हा एकदा महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाचा भार सोपवण्यात आला. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या बदलीनंतर मोठ्या कालावधीसाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी मनपाचा कारभार पाहिला होता. त्यानंतरही वेळोवेळी त्यांच्याकडे मनपाची धुरा सोपवण्यात आली. मोठ्या प्रतीक्षेनंतर आयुक्त भालसिंग यांची नियुक्ती झाली. भालसिंग रजेवर असल्याने ५ … Read more

मुख्याध्यापकाने शाळेला लावला चुना ! चक्क शिकवणी व बस फी च्या रकमेचा केला अपहार

पाथर्डी :- शहरातील श्रीतिलोक जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुमारे पावणे नऊ लाख भरलेली शिकवणी व बस फी घेऊन मुख्याध्यापकाने संस्थेला चुना लावला. मुख्याध्यापक पसार झाला असून त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुरूवारी अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. श्री तिलोक जैन इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत नर्सरीपासून चौथीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. संचालक … Read more

मुंबईकरांना आव्हान ‘खड्डे दाखवा ५०० रुपये मिळवा’

मुंबई :- सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे दाखवा, हजार रुपये मिळवा, अशी घोषणा केल्यानंतर ती हवेतच विरली होती. आता मात्र मुंबई महापालिकेने देखील ‘खड्डे दाखवा, पैसे मिळवा’ ही योजना सुरू केली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात शहरातील रस्त्यांवर फक्त ४१४ खड्डे असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला होता. मात्र नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विरोधी पक्षांनी … Read more

तक्षिला स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

अहमदनगर ;- तक्षिला स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडले. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक विश्‍व व अनेक गोष्टी या विषयावर बहारदार कार्यक्रम सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी विश्‍वनिर्मितीचे रहस्य उलगडले. यामध्ये अश्मयुगीनपुर्वीच्या डायनासोर युगाची झालेली निर्मिती व त्याचा नाश, विविध धर्माच्या धर्मगुरुंनी दिलेली शिकवण तर मनुष्याने स्वत:च्या स्वार्थासाठी प्रदुषण करुन ओढवलेल्या … Read more

जामखेड व सोलापूर रोड वरील जीवघेणे खड्डे बुजवा

नगर-जामखेड रोड वरील चांदणी चौक ते चिचोंडी पाटील तर नगर-सोलापूर रोड वरील सोलापूर नाका ते दहिगाव साकत पर्यंन्त पावसाने रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून, ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे रस्त्यावर पडले आहे. यामुळे रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात होत असून, तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीचे … Read more

रेल्वेत झाला गॅस सिलिंडरचा स्फोट ! ७३ जण ठार …

लाहोर : पाकिस्तानच्या लियाकतपूर भागात गुरुवारी रावळपिंडीला जात असलेल्या तेजगाम एक्स्प्रेस रेल्वेगाडीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत ७३ जण ठार झाले, तर ३० जण जखमी झाले. आगीमुळे रेल्वेचे तीन डबे पूर्णपणे खाक झाले. काही यात्रेकरू नाष्ट्याची तयारी करत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. रहीम यार खानचे जिल्हा पोलिस अधिकारी आमिर तैमूर खान … Read more

पोलिसांसमोरच आरोपी पतीची जमावाकडून हत्या !

लखनऊ :- पत्नीचा खून केल्याचा आरोप असलेल्या आरोपीचा जमावाने पोलिसांसमोरच खून केल्याची घटना उत्तर प्रदेशातील फत्तेपूरमधील सिमौर गावात घडली. फत्तेपूरचे पोलिस अधीक्षक रमेश यांनी सांगितले की, छत्तीसगडमधील विलासपूर येथील नासिर कुरेशी दोन दिवसांपूर्वी त्याची पत्नी अफसरी तथा सोनी हिला घेण्यासाठी तिच्या माहेरी सिमौर गावात आला होता. बुधवारी दुपारी पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादात नासिर याने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या थोडक्यात : 1 नोव्हेंबर 2019

अहमदनगर जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणीस सुरुवात; पंचनामे करण्याच्या सूचना. जिल्ह्यातील 11 प्रकल्पांमध्ये मिळून सध्याच्या स्थितीमध्ये 49 हजार 930 दशलक्ष घनफूट म्हणजेच जवळपास 50 टीएमसी पाणीसाठा. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील महायुतीच्या दारुण पराभवानंतर आता विखे पितापुत्रांविरोधात भारतीय जनता पक्षातच नाराजी, भाजपच्या नगर शहर जिल्हा उपाध्यक्षांनी विखे पिता-पुत्रांचा नामोल्लेख टाळून टीका करत नैतिक जबाबदारी … Read more

मित्राचा खून करणारे ते दोघे अटकेत !

अकोले :-  उसने पैसे परत न केल्याच्या रागातून अकोल्यातील दोन तरुणांना पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.  नवलेवाडी येथील प्रथमेश एकनाथ भोसले (१९) याचा खून केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या सुजाण एकनाथ भोसले (२०, माळीझाप) व उदय विजय गोरडे (१९, धामणगाव आवारी रोड) यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.