घाटे का सौदा करू नका, त्यांचे घड्याळ बंद आहे – स्मृती इराणी

श्रीगोंदा – देशात भाजपचे सरकार आहे. ज्यांचे सरकार येणार नाही त्यांना मतदान करून घाटे का सौदा करू नका, त्यांचे घड्याळ बंद आहे.सत्तेच्या माध्यमातून तिजोरी भरली त्याच वेळी काँग्रेस, राष्ट्रवादीची वेळ संपली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी श्रीगोंदा येथे जाहीर सभेत बोलताना केले आहे. श्रीगोंदा येथे महायुतीचे उमेदवारच्या प्रचार सभेसाठी आयोजित सभेत इराणी बोलत होत्या. … Read more

निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये फक्त प्रदेशाध्यक्ष राहतील

राहाता : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही प्रायव्हेट लिमिटेड पार्टी आहे. काँग्रेस पक्षानेदेखील धोरणापासून फारकत घेतली आहे. मोठा राष्ट्रीय पक्ष राहिलेल्या काँग्रेस पक्षाला तीन महिने अध्यक्षच नव्हता. महाराष्ट्रात या पक्षाची मोठी पडझड झाली. चांगले बाहेर पडले. आता काँग्रेस पक्षाला दिशाच राहिली नसल्याने विधानसभा निवडणुकीनंतर फक्त प्रदेशाध्यक्षच काँग्रेस पक्षात राहतील, अशी टीका गृहनिर्माण मंत्री व महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण … Read more

पवार ८० वर्षांचे तरीही तरूणासारखा प्रचार

संगमनेर – राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाला चांगले वातावरण आहे. त्यामुळे या निवडणुकीत राज्यात आघाडीच्या १५० पेक्षा जास्त जागा निवडून येणार असून आघाडीची सत्ता स्थापन होणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.    संगमनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी आ. थोरात बोलत होते. यावेळी … Read more

कोपरगावात पतीची आत्महत्या…

कोपरगाव : पत्नीबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर शैक्षणिक व महत्वाची कागदपत्रे घेण्यासाठी पत्नीच्या फ्लॅटवर गेलेला पती गिरीश अशोक अभंग (वय ३०, रा. अन्नपूर्णानगर, कोपरगाव, ह. मु. शिवाजीनगर, गल्ली नं. ५, संगमनेर) याने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना अन्नपूर्णानगर येथे रविवारी (दि. १३) सकाळी दहा ते सायंकाळी पावणेसहा वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांत पत्नीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल … Read more

मुळाचे पाणी बीडला देण्याच्या हालचाली…

राहुरी शहर : मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यामुळे येथील शेती व शेतक­ऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून अद्यापही शेतकरी सावरलेला नसतानाच आता बीडला पाणी देण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, येथील शेती, उद्योग आणि व्यवसायास पूरक असलेले आपले हक्काचे पाणी कोणत्याही परिस्थितीत बीडला देऊ नये, यासाठी प्रसाद शुगर … Read more

आ. कोल्हेंचे काम २५ वर्षे आमदार असलेल्यांनाही सरस-ना. मुनगंटीवार

कोपरगाव : अर्थमंत्री म्हणून मी एकटाच आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठीशी नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच मंत्रिमहोदयांचे पाठबळ आहे. त्यांचे विधिमंडळातील गेल्या पाच वर्षाचे काम पंचवीस वर्षे आमदार असलेल्यांना सरस आहे. तेव्हा सर्वांचं चांगभलं करून विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. आमदार स्नेहलता कोल्हे यांना पुन्हा विधिमंडळात पाठवा. येथील सर्व … Read more

ही सत्ता, राज्य कशासाठी आणि कुणासाठी? शरद पवार

कोपरगाव : अटी आणि नियम यांच्याखाली ७० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून बाजूला ठेवले. राज्यातील सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एका ठिकाणी तर भाजपच्या शेतकरी कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दिवशीच आत्महत्या करून तुमचे स्वागत करतो, अशी चिठ्ठी लिहून ठेवली. असे होत असेल तर ही सत्ता, राज्य कशासाठी आणि कुणासाठी? असा उद्विग्न सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी … Read more

अफवांवर विश्वास न ठेवता युती धर्म पाळावा : खेवरे

तांदूळवाडी : शिवसेनेविषयी वावड्या उठविणारे फार झाले आहेत. मात्र, अफवांवर विश्­वास ठेवू नका. युतीचा धर्म पाळा, शिवसेना आणि शिवसैनिक संपूर्ण ताकदीने आ. शिवाजीराव कर्डिले यांच्याच पाठीशी उभी राहणार असल्याची स्पष्टोक्ती शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिली. दरम्यान आ. कर्डिले हे युतीच्या आगामी मंत्रिमंडळात मंत्रीच होणार असल्याचे खेवरे यांनी सांगताच शिवसैनिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. … Read more

सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले : भुजबळ

जामखेड : हे सरकार स्वता:ला ओबीसीचे कैवारी म्हणवून घेत आहे.मात्र या युती सरकारने गेल्या पाच वर्षात ओबीसी महामंडळाला एक रुपयाचाही निधी दिला नाही. शेतक­ऱ्यांच्या १६ हजार आत्महत्या झाल्या, बेरोजगारी वाढली, उद्योगधंदे बंद पडू लागले, अर्थव्यवस्था ढासळू लागली आहे. सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. राज्यातील फडणवीस सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. असा आरोप राज्याचे माजी मंत्री छगन … Read more

बीडला पाणी गेल्याचा पुरावा दिल्यास त्यांना पाठिंबा देऊ : आ. कर्डिले

तांदूळवाडी : विरोधी उमेदवारांना बोलायला कोणताच मुद्दा शिल्लक राहिला नसल्याने आता आपली अस्मिता जपण्याचे आवाहन करत आहेत. मात्र कै. रामदास पा. धुमाळ, कै. शिवाजीराजे गाडे यांना वेळोवेळी फसविले. डॉ. तनपुरे साखर कारखाना, सूतगिरणी बंद पडली तेव्हा आपली अस्मिता कोठे होती, असा सवाल उपस्थित करत बीडला पाणी गेल्याचा पुरावा दिल्यास त्यांना पाठिंबा देऊ, असे आव्हान आ. शिवाजीराव … Read more

पवारांचे डोके रुपयात तपासू…

उस्मानाबाद / बार्शी / करमाळा : ‘होय, मी नागरिकांना १० रुपयांत जेवण देण्याचे आश्वासन दिले आहे आणिते देणार. निश्चितच देणार. त्यात खडे टाकू नका. एक रुपयात आरोग्य तपासणीही करून देणार आहोत. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यावरही टीका करत आहेत. हवी असेल तर तुमचीसुध्दा एक रुपयात डोक्यापासून तळपायापर्यंत आरोग्य तपासणी करून देतो, असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख … Read more

‘शेतकऱ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना धडा शिकवा’…!

शेवगाव / हातगाव : शेतकऱ्यांचे वाटोळे केले, भूलथापा देऊन शेतकरी व जनतेच्या विरोधात निर्णय घेणाऱ्या महायुतीला आता धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वाCयांनी केले. खा. पवार यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर चौफेर टीका केली. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महाआघाडीचे उमेदवार ॲड.प्रतापराव ढाकणे यांचे प्रचारार्थ बोधेगाव (ता.शेवगाव) येथे आयोजित प्रचार सभेत … Read more

खोऱ्यातील मोबाईल ७२ दिवसांनी खणाणले

श्रीनगर : सरकारने सोमवारी तब्बल ७२ दिवसांनी काश्मीर खोऱ्यातील ४० लाखांहून अधिक पोस्टपेड मोबाईल ग्राहकांची सेवा सुरू केली. यामुळे जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाल्यानंतर प्रथमच येथील नागरिकांना आपले कुटुंबीय, मित्र परिवार व आप्तेष्टांशी संवाद साधता आला. सरकारने मोबाईल सेवा सुरूकेली असली तरी येथील ‘इंटरनेट’सेवेला अद्याप हिरवा कंदील दाखवला नाही. त्यामुळे तूर्तास तरी काश्मिरींना समाज माध्यमांद्वारे बाह्यजगताशी … Read more

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य…

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर जवळपास तीन महिने रिक्त असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर सोनिया गांधी यांची नियुक्ती झाली. सोनिया गांधींची निवड म्हणजे ‘खोदा पहाड और निकली चुहिया’आणि पुढे ‘वो भी मरी हुई’ असे वक्तव्य केल्याने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस संतापली असून, त्यांच्या टीकेतून भाजपाचे महिलांशी … Read more

मोदी ‘अदानी-अंबानी’चे लाऊडस्पीकर…

नूंह (हरियाणा) : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपती अदानी व अंबानींचे लाऊडस्पीकर आहेत. त्यांनी नेहमीच आपल्या श्रीमंत उद्योगपती मित्रांना फायदा पोहोचविण्याचे काम केले’, अशी तिखट टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केंद्र सरकारवर निशाणा साधताना केली. राहुल गांधी यांनी सोमवारी हरियाणाच्या नूंह येथील एका प्रचारसभेला संबोधित केले. त्यात त्यांनी अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

आदित्य माझ्या मुलाप्रमाणे:राज

मुंबई : आदित्य माझ्या मुलाप्रमाणेच आहे. त्यामुळे आदित्य असो किंवा अमित; जर त्यांना वाटत असेल निवडणूक लढवावी तर त्यांना नाही का म्हणायचे? बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. बाळासाहेबांनी कधीही त्यांचे म्हणणे उद्धव आणि माझ्यावर लादले नाही. आमच्यावर असे संस्कार असतील तर मुलांना वाटत असेल निवडणूक लढवावी तर त्यात गैर नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

राहुल गांधींना निवडणूक कुठली हेच माहीत नाही:मुख्यमंत्री

पुसद, आर्णी/दिग्रस/चांदूर रेल्वे (अमरावती) : महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या दोन सभा झाल्या; परंतु त्यांचे भाषण अद्याप लोकसभा निवडणुकीतलेच आहे.त्यामुळे त्यांना विधानसभेची निवडणूक आहे हेसुद्धा माहीत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावर चांदूर रेल्वे (अमरावती) येथे तोंडसुख घेतले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कुठलीच चुरस उरली नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच विधानसभेच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सध्या काँग्रेस पक्षाकडे … Read more

जगातील सर्वांत पहिले हॉटेल

टोकियो : शेकडो वर्षांची परंपरा असलेली अनेक हॉटेल जगामध्ये आहेत. अर्थात काळासोबत ती आपल्यामध्ये बदल करून घेत असतात. मात्र जपानमध्ये असे एक हॉटेल आह, ज्याने आजही आपला इतिहास कायम टिकवून ठेवला आहे. हे जगातील सर्वात प्राचीन हॉटेल असून त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमध्येही दाखल आहे. ‘निशियामा ओनसेन कियूनकन’ असे या हॉटेलचे नाव आहे. फुजिवारा … Read more