गडाखांचे एकेकाळचे तीन खंदे समर्थक मुरकुटे यांचे स्टार प्रचारक!

नेवासे :- भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचाराची आघाडी गडाखांचे एकेकाळचे ३ खंदे समर्थक सांभाळत आहेत. युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक गायकवाड हे मुरकुटेंच्या व्यासपीठावर असतात. अनेक वर्षे गडाखांच्या सभा गाजवणारे गायकवाड फर्डे वक्ते आहेत. प्रत्येक गावांत आमदारांप्रमाणे त्यांचेही कार्यकर्ते आहेत. ते सध्या सांगत सभा गाजवत आहेत. सोनई कारखाना, तसेच शनिशिंगणापूर परिसरातील साहित्यिक एस. … Read more

परजणे, काळेंच्या विनापरवाना प्रचार करणाऱ्या गाड्यांवर गुन्हा

कोपरगाव :- आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे, अपक्ष उमेदवार राजेश परजणे यांचे पोस्टर चिकटवलेल्या अॅपेरिक्षा व टाटा छोटा हत्ती ही वाहने विनापरवाना प्रचार करताना आढळल्याने संबंधित गाड्यांच्या चालक-मालकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा गुरुवारी रात्री दाखल करण्यात आला. राष्ट्रवादीचे उमेदवार काळे यांचे पोस्टर लावलेली टाटा एस छोटा हत्तीचा (एमएच १७ बी वाय १९५७) चालक कैलास धनवटे व अपक्ष … Read more

पाणी आणण्यासाठी मी आमदारकी पणाला लावेन – प्रताप ढाकणे

पाथर्डी :- तुम्ही सर्वांना संधी दिली, एक वेळ मला संधी द्या. पाथर्डी-शेवगावच्या पूर्व भागात पाणी आणण्यासाठी मी आमदारकी पणाला लावेन. कारण ऊसतोड मजुरांच्या हातातील कोयता खाली ठेवायचा असेल, तर पाण्याशिवाय पर्याय नाही आणि पाणी आल्याशिवाय कोयता जाणार नाही, असे पाथर्डी-शेवगावमधील राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. प्रताप ढाकणे यांनी खरवंडी कासार येथे बोलताना सांगितले. भाऊ बाबा मंगल कार्यालयात … Read more

कारमधून रिव्हॉल्व्हर जप्त

नेवासे :- खडकेफाटा टोलनाक्यावर गुरुवारी रात्री फॉर्च्युनर कारमधून एक लाख रुपये व रिव्हॉल्व्हर आचारसंहिता कक्षाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने जप्त केले. औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या फॉर्चूनरची (एमएच ४३ एआय ००१३) तपासणी एस. डी. कराळे यांच्या पथकातील हेडकॉन्स्टेबल चांगदेव कांबळे, जी. एस. चव्हाण, नितीन भताने यांनी केली असता एक लाखाची रक्कम आढळली. एकाकडे रिव्हॉल्व्हर सापडले. पथकाने लगेच निवडणूक … Read more

विकासकामांत खोडा घालण्याचे पाप विरोधकांचे

नगर – महापौर असताना राज्य सरकारकडून सिना नदीच्या सुशोभिकरणासाठी मोठा निधी मंजूर करुन आणला. परंतु विरोधी उमेदवारांनी सुशोभिकरणाचा हा प्रकल्प बंद करण्याचे काम केले. त्यामुळे तो निधी परत शासनाकडे वर्ग झाला.  तपोवन रोडसाठी शासनाकडून 3.5 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर त्यांनी हाही रस्ता बंद पाडण्याचे काम केले. शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम मी करीत असतांना त्यांनी … Read more

रोहित पवारांनी साधला मंत्री राम शिंदेंवर निशाणा

जामखेड – मंत्री असुन शेतकऱ्यांना हक्काचे पाणी देऊ शकले नाहीत.कुकडीमधून कर्जतसाठी नमुद केले गेलेले पाणी आपल्याला आणायचे आहे.तुम्हाला जेवढी भूक लागली आहे तेवढीच विकासाची भूक मलाही लागलेली आहे.जनता अडचणीत असताना त्यांना ते आठवत नाहीत निवडणुक आली की लगेच आठवण होते. आता गावागावातील उत्तुंग प्रतिसाद पाहता माझी जबाबदारी वाढली आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी … Read more

अनिल राठोड यांच्या प्रचारातील सहभागाबाबत अद्याप निर्णय नाही

नगर – केंद्र व राज्य शासनाने प्रत्येक शहराला व जिल्ह्याला भरीव निधी दिला आहे. नगर शहरालाही तो दिला.मात्र येथील त्यावेळचे महानगरपालिकेचे सत्ताधारी अर्थात शिवसेना कमी पडली. शहराच्या उड्डाणपुलाच्या कामात तर शिवसेनेने अडथळे आणत मला वारंवार त्रास दिला असा आरोप भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचे नाव न घेता केला.  राठोड … Read more

राम शिंदे, रोहित पवारांसह सहा उमेदवारांच्या हिशेबात त्रुटी !

कर्जत – राशीन भाजपचे राम शिंदे, राष्ट्रवादीचे रोहित पवार, मनसेचे अप्पासाहेब पालवे यांच्यासह अपक्ष बजरंग सरडे, ज्ञानदेव सुपेकर यांच्या निवडणूक खर्चाच्या तपशिलात त्रुटी व अनियमितता आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी त्यांना नोटीस बजावली.  विहित नमुन्यात खर्चाचा सर्व हिशेब ठेवणे बंधनकारक आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्व उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी शुक्रवारी खर्च निरीक्षक नागेंद्र … Read more

पाचपुते आणि नागवडे आता एकाच पक्षात !

श्रीगोंदे ;- एकमेकांच्या विरोधात राजकीय लढत देणारे पाचपुते आणि नागवडे आता एकाच पक्षात म्हणजे भाजपत आले आहेत. सिद्धटेक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व त्यांचे बंधू दीपक यांनी कमळ हातात घेतले.  शिवाजीराव नागवडे विरुद्ध बबनराव पाचपुते असा संघर्ष तालुक्याने अनेक वर्षे पाहिला. घोड नदीकाठच्या गावांत नागवडे परिवाराला मानणारे … Read more

कर्जत-जामखेडमध्ये पवार-विखे सत्तासंघर्ष

कर्जत – जामखेड मतदारसंघात पालकमंत्री प्रा. राम शिंदे व रोहित पवार यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीतील विजयानंतर प्रा. शिंदे यांची हॅट्ट्रिक होणार तर पवार यांचा विजय राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे. या लढतीला विखे आणि पवार यांच्यातील सत्ता संघर्षाचीही झालर आहे. त्यामुळे भाजप तसेच राष्ट्रवादीसाठी हा … Read more

पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकता आल्या असत्या, तर टाटा-बिर्ला या पदांवर असते !

कर्जत :- सामान्य घरात जन्मलेल्या राम शिंदे यांना कर्जत-जामखेडच्या जनतेने नेता बनवले. ते लादलेले नेतृत्व नाही, तर घडवलेले आहे. समोरचा उमेदवार जरी धनधांडगा असला तरी लोकशाही धनधांडग्यांची नाही. पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकता आल्या असत्या, तर टाटा-बिर्ला या पदांवर असते.  मतदारांनी शिंदेंसारख्या सामान्य नेतृत्वाला संधी देऊन मावळच्या जनतेने जसे पार्थचे पार्सल परत पाठवले, तसे रोहितचे पार्सल … Read more

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दांडिया नाईट आणि फॅशन विक कार्यक्रमाचे आयोजन

नगर : रविवारी 13 ऑक्टोबरला संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत दांडिया नाईट आणि फॅशन वीक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर मनमाड रोड वरील बंधन लॉन्स येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे पासेस निल गरजे (96 04 97 42 75) आणि आकाश मुनफन (97 62 53 62 97) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन … Read more

पंकजा मुंडे व माझ्यात मतभेद नाहीत : आ. राजळे

पाथर्डी :- ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची मी बहीण आहे. पंकजा व माझ्यात मतभेद नाहीत. गोपीनाथ मुंडे यांचे आशीर्वाद व पंकजा मुंडे यांचे सहकार्य मी जन्मभर विसरू शकत नाही. पाथर्डी-शेवगाव दोन्ही तालुके मला कुटुंबाप्रमाणे वाटतात. फसवाफसवी हा आपला विषय नाही. लोकांना फसवल्यावर काय अवस्था होते त्याचा अनुभव विरोधकांनी घेतला आहे, अशा शब्दांत आमदार मोनिका राजळे यांनी … Read more

डॉ. प्रकाश आंबेडकर यांची उद्या जाहीर सभा

जामखेड | वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण जाधव यांच्या प्रचारार्थ आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा रविवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी ४ वाजता कर्जत येथील बाजारतळावर होणार असल्याची माहिती कर्जत तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांनी दिली. जाधव यांनी वंचित बहुजन जोडो अभियानाच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्व गावांतील कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला आहे. … Read more

डॉक्टर मुलीने केली पित्याची हत्या !

अकाेला :- बाप-लेकीच्या भावनिक नात्याला तडा देणारी घटना गुरुवारी रात्री उशिरा रिजनल वर्क शॉपच्या मागील परिसरात घडली. एका डाॅक्टर मुलीने पित्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने पित्याचा मृत्यू झाला. या घटनेला संपत्तीच्या वादाची किनार असल्याचे दिसून येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बाबुराव कंकाळ असे मृत पित्याचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी मुलगी रेश्मा बाविस्कर हिला ताब्यात … Read more

पबजी गेमच्या आहारी गेलेल्या तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

नागपूर :- मोबाइलवरील पबजी खेळाचे व्यसन लागल्यावर शैक्षणिक करिअर उध्वस्त होऊन नैराश्य आलेल्या नागपुरातील तरुणाने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. धाडीवाल लेआऊट परिसरातील अमन उर्फ बॉबी शंकर मानके (१९) गुरुवारी पहाटेच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडला. जवळ असलेल्या सुयोगनगर चौकाजवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. आत्महत्येच्या आदल्याच दिवशीच अमनने हातावर … Read more

विकास कामांचा डोंगर उभा केला होता तर स्वतः मैदानात का उतरले नाहीत ?

काष्टी : कुकडी साखर कारखान्यावर प्रशासक नेमावा असा आदेश निघाला होता. त्यावर कोणी कुणाचे पाय धरले आणि काय तडजोड केली याचा भांडाफोड विधानसभा निवडणुकीच्या विजयी सभेत करणार आहे, अशी टिका भाजपचे उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी विरोधकांवर केली. काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे भाजप बुध कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी … Read more

गेल्या पाच वर्षांत कधी नव्हे तो एवढा मोठा विकास झाला

जामखेड : ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आहे. येथील सर्वसामान्य जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी तुम्ही कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. गेल्या पाच वर्षांत कधी नव्हे तो एवढा मोठा विकास झाला आहे. असे मत माजी पं.स.सभापती आशाताई राम शिंदे यांनी … Read more