अकोलेत ‘श्रीगोंदा पॅटर्न’ राबविण्याची व्यूव्हरचना !

अकोले  – मला डॉक्‍टर सायबासनी शंभर रुपये द्यायचेत… असे म्हणत एका फाटक्‍या तुटक्‍या कपड्यात असणाऱ्या इसमाने आपली घड्या घातलेली नोट आघाडीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांच्या प्रचारनिधीसाठी दिले… आणि बघता बघता उपस्थित आघाडी प्रेमींनी आपला खिसा रिता केला… अवघ्या पाच मिनिटांत एक लाख रुपयांची मदत आघाडीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांच्या पदरात पडली. आपला उमेदवार गरीब … Read more

पालकमंत्री राम शिंदेंचा मतदारांशी थेट संवाद

जामखेड  – भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रचाराचा संपूर्ण भर मतदारांशी थेट संवाद साधण्यावर ठेवला आहे. प्रचार रॅलीतून फिरतानाही समस्या, सूचना आणि अडचणींचा थेट मागोवा घेण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात. पहाटे पाच वाजल्यापासून शिंदे यांचा दिनक्रम सुरू होत असला, तरी रात्री उशिरापर्यंत त्यांची कामे चालूच असतात. रॅली, चौकसभा, कार्यकर्त्यांशी भेटी, बैठका, अशा सगळ्याच माध्यमांद्वारे कार्यकर्त्यांशी … Read more

आ.कर्डिले यांच्या कडून खोटी माहिती देवून जनतेची दिशाभूल

राहुरी :- तालुक्यात आ. शिवाजी कर्डिले हे मी १२०० कोटींची कामे केल्याचे सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात अनेक कामे प्रलंबित असताना ते खोटी माहिती देवून जनतेची दिशाभूल करत आहे. आ. कर्डिले सांगत असलेल्या कामांची जनतेने पाहणी केल्यास दूध का दूध होईल, असा विश्वास युवानेते नंदकुमार गागरे यांनी व्यक्त केला आहे. गागरे म्हणाले, जनतेने कोणत्या पक्षाला मतदान … Read more

काँग्रेस उठली की ती दणकून उठते, हा इतिहास आहे !

संगमनेर :- आज प्रदेशाध्यक्ष कोठे दिसत नाही, असे विचारणाऱ्या काँग्रेसच्या तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी साडेचार वर्षे, जर प्रामाणिकपणे काम केले असते, तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती. लोकसभा निवडणुकीत आमदार भाऊसाहेब कांबळेंसाठी मी रात्रीचा दिवस केला. मात्र, तो गडी तिकडे गेला. सरड्याला हरवणारे आणि त्याच्यापेक्षा जास्त रंग बदलणारे लोक आता राज्यात दिसायला लागलेत, अशी टीका … Read more

साखर कारखाने बंद ठेवण्याची वेळ कोणामुळे आली ?

श्रीगोंदे :- कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याची माहिती काढायची, कोर्टात याचिका दाखल करायची आणि स्वार्थासाठी आर्थिक तडजोड करुन नेतेगिरी करणाऱ्याला कायमचे घरी बसवा, असे आवाहन तेली समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत यांनी मंगळवारी केले. काष्टी येथे भाजपचे बबनराव पाचपुते यांच्या प्रचारासाठी भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. विठ्ठलराव काकडे, सदाशिव पाचपुते, विजय भोईटे, बापूसाहेब हिरडे, काका रोडे, … Read more

राज्यात परिवर्तन घडवण्याचे आवाहन

पारनेर :- गेल्या पाच वर्षांत राज्याचा कारभार अशा लोकांच्या हाती आहे, ज्यांच्याकडून शेतकरी, कष्टकरी, कामगार, उद्योजक, दलित, ओबीसी, तसेच आया-बहिणींच्या हितासाठी सत्तेचा वापर केला गेला नाही. त्यामुळे या निवडणुकीस आम्ही विशेष महत्त्व दिले असून त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्यात परिवर्तन घडवण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केले. राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शहरातील … Read more

केडगाव हत्याकांडातील  ‘ते’ राडेबाज पुन्हा रडारवर !

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सुमारे साडेचार हजार व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत या सर्व व्यक्तींकडून एका वर्षांसाठी बॉण्ड लिहून घेण्यात येत आहेत. आतापर्यंत तीन हजार व्यक्तींनी बॉण्ड लिहून दिले असून उर्वरित व्यक्तींकडून बॉण्ड लिहून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या … Read more

कर्जत-जामखेडसोबत माझे मागील जन्माचे काही तरी नाते असावे म्हणूनच मी येथून विधानसभेची निवडणूक लढवित आहे..

कर्जत : ‘मी राज्याचा भूमिपुत्र असून, कर्जत-जामखेडसोबत माझे मागील जन्माचे काही तरी नाते असावे. म्हणूनच मी येथून विधानसभेची निवडणूक लढवित आहे. जनतेच्या आशिर्वाद आणि प्रेमामुळे हमखास विजय मिळवणार असा विश्वास मला आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी केले. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पवार यांनी कर्जत शहरातून भव्य रॅली काढली. त्यात युवकांची मोठी संख्या … Read more

तीन महिन्यात सात बारा कोरा करू

सोलापूर : विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीने भाजपातून आलेले उत्तम जानकर यांना माळशिरस (राखीव) मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज माळशिरस येथील वेळापूरमधून प्रचाराला सुरुवात केली. वेळापूर हे उत्तम जानकर यांचे गाव असल्याने पहिल्याच सभेला मोठी गर्दी जमवत जानकर यांनी ही निवडणूक रंगतदार होणार याची चुणूक दाखवून दिली. … Read more

पवार कुटुंबाला मोठा धक्का,कर्जत – जामखेडमध्ये रोहित पवार अडचणीत !

कर्जत :- राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्वाचे स्थान असलेल्या बारामतीच्या पवार कुटूंबातील रोहित पवार हे नगरच्या कर्जत – जामखेड मतदार संघातून पालकमंत्री ना. राम शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. मात्र, काल – परवाच नगरमध्ये आलेल्या बारामतीच्या पाहुण्यांना नगकरकर स्वीकारणार का? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या निवडणुकीत स्थानिक विरोधकांनी बारामतीचे पार्सल परत … Read more

आमदार स्नेहलता कोल्हेंच्या वचनपूर्तीत खोटारडेपणा !

कोपरगाव :- विधानसभा निवडणुकीची छाननी पार पडली असून सध्या रणांगण टीका टिप्पणीने गाजण्यास सुरूवात झाली आहे. त्यात प्रमुख लढतीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून आशुतोष काळे व भाजप शिवसेना युतीच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे, नरेंद्र मोदी विचार मंचचे अपक्ष उमेदवार विद्यमान नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, ना. विखेंचे मेहुणे असलेले अपक्ष उमेदवार राजेश परजणे यांच्यात आहे. यामध्ये तीन संस्थानिक … Read more

प्राजक्त तनपुरेंना मिळालेल्या अनपेक्षित प्रतिसादाने विरोधक अवाक् !

राहरी :- मतदारसंघ आपला बालेकिल्ला आहे आणि येथे आपण प्रचंड मतांनी विजयी होऊ, असा प्रचार कर्डिले समर्थक करत असताना शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रॅलीला मिळालेला प्रचंड अशा प्रतिसादामुळे कर्डिले समर्थक अवाक् झाले आहेत. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरुषांबरोबरच महिलाही स्वयंस्फुर्तीने रॅलीत आल्याने आणि तरुणही मोठ्या प्रमाणावर रॅलीत … Read more

5 वर्षात विकासाचा पुनश्‍च हरिओम केला तीच गती पुढे ठेवू – आ.संगाम जगताप यांचे आश्‍वासन

नगर – आमदारकीची माझी 5 वर्षाची कारकिर्द जनते समोर आहे. त्यापूर्वीच्या 25 वर्षाच्या काळात नगरचा विकास ठप्प झाला होता. त्याला चालना देण्याचे काम मी गत 5 वर्षात केले. रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आय.टी.पार्क सुरु केले. बालिकाश्रम रोड, केडगाव देवी रोड व कोठी ते सक्कर चौक या प्रशस्त रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले.  शहराच्या प्रत्येक प्रभागात सरासरी 20-25 विकास काम केली आहेत. विकासाचा वेग आता गतीने पुढे  नेऊ. मात्र, त्यासाठी गतवेळे प्रमाणे यंदाही बहुमताने मला विजयी करावे, असे अवाहन … Read more

या तरुणीला फेसबुकने दिले ८० लाखांचे पॅकेज

औरंगाबाद :- मराठवाड्यातील जालना येथील रश्मी देशपांडे या तरुणीने अटकेपार झेंडा फडकवला आहे. फेसबुकने तब्बल तिला ८० लाख रुपयांचे पॅकेज, शिवाय कंपनीचे २१ लाखांचे शेअर्सही दिले आहेत. नोव्हेंबर महिन्यात ती आयर्लंड येथे फेसबुकच्या कार्यालयात रुजू होणारआहे. ३१ वर्षीय रश्मीने जालन्याच्या नवयुवक गणेश विद्यालय, श्री. म. स्था. जैन विद्यालयातून दहावी तर जेईएस महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण घेतले. … Read more

या पद्धतीने करा तुमच्या गर्लफ्रेन्डला प्रपोज !

प्रेमात पडणे ही खुप सुखद भावना असते.प्रेमात पडल्यावर तुम्ही लगेच तिच्यासोबत लग्न करणार आहात की रिलेशनशिपमध्ये रहाणार आहात हा निर्णय महत्वाचा असतो.निर्णय पक्का झाला की तिला तुमच्या मनातल्या भावना सांगणे हे तुमच्यासाठी खुप मोठे आव्हान असू शकते.आता पूर्वीप्रमाणे गुडघ्यावर बसून प्रपोज करत तिच्या उत्तराची वाट बघण्याचा काळ कधीच मागे पडलाय.त्यामुळे प्रपोज करण्यासाठी तुम्हाला जरा हटके … Read more

जिल्ह्यातील 12 मतदारसंघातून 116 उमेदवार निवडणूक रिंगणात !

जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत निवडणूक रिंगणात असणार्‍या उमेदवारांमध्ये सर्वाधिक 17 उमेदवार नेवासा मतदारसंघात आहेत. त्या खालोखाल 14 कोपरगाव, नगर आणि कर्जत-जामखेड 12, श्रीरामपूर आणि श्रीगोंदा प्रत्येकी 11 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर सर्वात कमी 5 उमेदवार शिर्डी मतदारसंघात आहेत. जिल्ह्यात यंदा 53 अपक्ष निवडणूक रिंगणात असून यात अवघ्या दोन महिलांचा समावेश आहे. भाजप पक्षाने दोन महिलांना … Read more

या प्रमुख नेत्यांची निवडणुकीतून माघार  

अहमदनगर :- श्रीगोंद्यातून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे, पारनेरमधून सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे,आणि पाथर्डीतून हर्षदा काकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. युतीच्या जागा वाटपात श्रीगोंदा मतदारसंघ भाजपकडे आहे. भाजपाने माजीमंत्री बबन पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी अनुराधा नागवडे यांनी अपक्ष म्हणून … Read more

शेतकऱ्यांच्या मुलांकडून खासदार डॉ. सुजय विखे यांच्या वक्तव्याचा निषेध

संगमनेर :- कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारसभेत शुक्रवारी (४ ऑक्टोबर) सुजय विखे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘पालकमंत्री साहेब, त्यांच्या सभेला (विरोधी उमेदवाराच्या) जाणाऱ्या लोकांची यादी काढा. त्यांच्या खात्यातही मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत. मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको? तुम्हाला … Read more