सेनच्या बंडखोराने अर्ज मागे न घेतल्याने भाजपचीही बंडखोरी

कल्याण : कल्याण पूर्व आणि पश्चिम विधानसभेत शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात बंडखोरीत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यापैकी कोणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने कल्याणमध्ये शिवसेना भाजपाची बंडखोरी कायम राहिली आहे. तर सेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांनी पूर्वेतून माघार घेतली नाही म्हणून आपण माघार घेतली नसल्याचे … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

राहाता : शहरालगत भरलोकवस्तीत घुसून बिबट्याने शेळीचा फडशा पाडल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कार्ले वस्तीवर घडल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी गणेश कारखान्याचे अध्यक्ष नारायणराव कार्ले यांनी केली आहे. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास कार्ले वस्तीवर अरुण बाबुराव कार्ले यांच्या गोठ्यात घुसून शेळी ओढून … Read more

४० वर्षांत कोल्हे परिवाराने तालुक्याची माती केली !

कोपरगाव : समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या मसुद्याच्या वेळी कोण आमदार होते? कायद्याच्या मंजुरीच्या वेळी सरकार कोणाचे होते? तेव्हा कोल्हे यांनी विरोध का केला नाही? मी तर विरोधातील आमदार होतो.  मागील वर्षीच्या दुष्काळात पोलीस बंदोबस्तात आपल्या बंधाऱ्यातील पाणी खाली सोडण्यात आले. त्यावेळी राज्यात व देशात ज्यांच्या पक्षाचे सरकार आहे. त्या तालुक्याच्या आमदार मुग गिळून गप्प बसल्या. आपल्या … Read more

भूलथापांना बळी पडू नका- आमदार स्नेहलता कोल्हे

कोपरगाव : केंद्रात भाजप सरकार असल्याने राज्यातही भाजप सरकारला साथ द्या. पाणी, रस्ते, पथदिवे यांसह विविध नागरी सुविधा देण्याचा पूर्ण प्रयत्न करू.  ज्यांनी दहा वर्षांत विकास केला नाही त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तालुक्यातील अंजनापूर, रांजणगाव देशमुख, मनेगाव, काकडी, बहादरपूर, शहापूर, पोहेगाव व सोनेवाडी या भागात कार्यकर्त्यांसमवेत बैठकीत केले. … Read more

डेंग्यूचे थैमान ; दवाखाने हाऊसफुल्ल!

कर्जत : कर्जत शहरात डेंग्यूने थैमान घातले असताना नगरपंचायतचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील दवाखाने हाऊसफुल्ल आहेत.  नारिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नगरपंचायतनेे लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पावसाळयात साथ रोगांचे प्रमाण वाढत असते, त्यामुळे या काळात प्रशासनाने विशेष काळजी घेणे आवश्यक असते.  सध्या कर्जत शहरात सर्वत्र डेंग्यूचे … Read more

कट मारल्याच्या कारणावरून जबर मारहाण

अहमदनगर : गाडीला कट मारल्याच्या कारणावरून एकास १० ते १५ जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत फिर्यादीचे दोन हजार रूपये रोख व तीन मोबाईल असा एकूण १ लाख १० हजारांचा ऐवज गहाळ झाला आहे.  या मारहाणीत साकीन नौशाद सय्यद (रा.आलमगीर) हे जखमी झाले आहेत. ही घटना नगर तालुक्यातील कोल्हेवाडी कमानीजवळ घडली. सय्यद यांच्या … Read more

निवडणूक प्रशिक्षणात कर्मचाऱ्याचा दारू पिऊन धिंगाना!

नेवासा : विधानसभा निवडणूक प्रशिक्षणादरम्यान दारू पिऊन गोंधळ घालणारा कर्मचारी नंदकिशोर भीमराज नाबदे (रा. शिरसगाव, ता. नेवासा) याच्यावर नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  सदर व्यक्ती पाटबंधारे विभागाचा कर्मचारी असल्याचे समजते.. याबाबत पोलीस हवालदार अंकुश पोटे यांनी फिर्याद दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरातील ज्ञानोदय हायस्कूल येथे प्रशिक्षण आयोजित केले होते.  सकाळी दहाच्या सुमारास … Read more

भारत पेट्रोलियम हिस्सेदारी रिलायन्स इंडस्ट्रीजला विकणार ?

नवी दिल्ली : सरकारी तेल विपणन कंपनी भारत पेट्रोलियम यामधील आपली हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत मोदी सरकार असून ती खरेदी करण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका पाहणी संस्थेच्या माहितीनुसार इंडियन ऑईल कॉर्पोरेशनही यासाठी बोली लावण्यास तयार आहे.निर्गुंतवणुकीच्या बाबतीत सरकारच्या बीपीसीएलमधील ५३.२९ टक्के अशी पूर्ण हिस्सेदारी विकण्याची शिफारस … Read more

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी प्राचार्यावर गुन्हा दाखल

सोलापूर : आचारसंहिता कालावधीत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या उद्घाटनाची कोनशिला न झाकता उघडी ठेवून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्राचार्य विजय काकडे यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याप्रकरणी फिरते भरारी पथकाचे प्रमुख धनंजय पवार यांनी फिर्याद दिली आहे. शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास निवडणूक आयोगाचे फिरते भरारी … Read more

मुलाने ‘ह्या’ कारणामुळे दवाखान्यातच बापाचा केला गळा दाबून खून

कोल्हापूर : वृद्ध वडिलांच्या जांघेत गाठ उठल्याने ते सतत आजारी पडतात. दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली; परंतु त्या अयशस्वी ठरल्या. उपचाराचा खर्च पेलवत नव्हता.  वडिलांना होणाऱ्या असह्य वेदना पाहून हतबल झालेल्या मुलाने धाडसी निर्णय घेत चुलत्याच्या मदतीने वडील नामदेव पांडुरंग भास्कर (वय ६३, रा. कुडित्रे, ता. करवीर) यांचा सीपीआर रुग्णालयातच गळा दाबून खून केला. मे … Read more

माकडाची गोळी झाडून हत्या केल्याप्रकरणी एकास अटक

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात एका माकडाची गोळी झाडून हत्या केल्याप्रकरणी बंदूक परवाना असलेल्या एका व्यक्तीला रविवारी पोलिसांनी अटक केली. झिंझाना पोलीस ठाणे हद्दीतील अबदान गावातील हाफिज अहमद नावाच्या व्यक्तीने शनिवारी एका माकडाची गोळी झाडून हत्या केली. संबंधित प्रकार निदर्शनास आल्यानंतर बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत निदर्शने केली. यानंतर पोलिसांनी … Read more

हत्याकांडाच्या तपासाला तब्बल १७ वर्षांनंतर यश,१४ वर्षांत कुटुंबातील ६ जणांची सायनाइड देऊन हत्या!

कोझिकोड : केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील एका कुटुंबातील ६ जणांच्या गूढ हत्याकांडाच्या पोलीस तपासाला तब्बल १७ वर्षांनंतर यश आले. एका महिलेने १४ वर्षांच्या कालावधीत अतिशय शांत डोक्याने घरातील ६ सदस्यांचा सायनाइड देऊन काटा काढला होता. एखाद्या रहस्यमयी चित्रपटातील कथानक वाटेल, असा या गूढ प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.. … Read more

विरोधी पक्षांचे राजकीय दिवाळे निघाले !

नवी दिल्ली : ‘विरोधी पक्षांचे राजकीय दिवाळे निघाले आहे. त्यांच्याकडे नरेंद्र मोदी सरकारवर टीका करण्यासाठी कोणतेच मुद्दे शिल्लक नाहीत’, अशा तिखट शब्दांत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी विरोधकांची, सरकार राजकीय सूड उगवत असल्याची टीका फेटाळून लावली. केंद्र सरकारविरोधी पक्षांच्या नेत्यांवर राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप काँग्रेस व अन्य राजकीय पक्षांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर … Read more

आठ कोटींचे रक्तचंदन जप्त,तिघांना अटक

भोपाळ : मध्य प्रदेशच्या राज्यस्तरीय ‘टायगर स्ट्राइक फोर्सच्या (एसटीएसएफ) सतर्कतेमुळे धार जिल्ह्यातील एका टोलनाक्याजवळ तब्बल ८ कोटी रुपयांचे १५,५०० किलो रक्तचंदन जप्त करण्यात आले. यावेळी तामिळनाडूतील दोघांसह ३ तस्करांना अटक केल्याचे रविवारी एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन आरोपी एका वाहनातून विदेशात मागणी असणारे रक्तचंदन चेन्नई येथून मुरादाबादकडे घेऊन जात असताना धामनोद येथील खलघाट टोलनाक्याजवळ एसटीएसएफच्या पथकाने … Read more

अयोध्या खटल्यात राममंदिराच्या बाजूनेच निकाल येईल !

गोरखपूर : अयोध्येतील वादग्रस्त भूखंडासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या नियमित सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राममंदिराच्या मुद्यावर लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचे सूचक विधान केले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते शनिवारी गोरखपूरस्थित चंपादेवी पार्कमध्ये मोरारी बापू यांच्या रामकथा वाचनाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील अयोध्या खटल्यात राममंदिराच्या बाजूनेच … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात होणार ‘इतक्या’ सभा

नवी दिल्ली : विजयादशमीच्या मुहूर्तानंतर महाराष्ट्र व हरयाणा विधानसभेच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात १० व हरयाणात ५ प्रचारसभा घेऊन प्रामुख्याने कलम ३७०, पारदर्शक प्रशासन, एनआरसी आदी राष्ट्रीय मुद्यांवर जोर देणार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह हेसुद्धा या राज्यांत मोदींहून दुप्पट सभा घेऊन भाजपची सत्ता राखण्याचा प्रयत्न करणार आहेत. … Read more

आमदार बाळासाहेब मुरकुटेंना धक्का, गडाख-घुलेंचे झाले मनोमिलन !

नेवासा :- राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असला तरी गडाख व घुले यांचे मनोमिलन होईल का? या राजकीय शंकेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आज सकाळी क्रांतिकारीचे उमेदवार शंकरराव गडाख व त्यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी भेंडा येथे त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी खंबीरपणे पाठीशी राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली . मागील निवडणुकीतील … Read more

‘हे’ आहेत नगर जिल्ह्यातील कोट्याधीश उमेदवार

नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या दिग्गज उमेदवारांपैकी सर्वाधिक संपत्ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवारांकडे आहे. रोहित यांच्याकडे तब्बल ५४ कोटी ७८ लाखाची तर त्याखालोखाल गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे २४ कोटी ७८ लाखाची संपत्ती आहे.  भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक १७ कोटी ४० लाखांची सपत्ती आहे. गुरुवारी जिल्ह्यातील … Read more