नागवडे कुटुंब लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार !

श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी अचानक हजेरी लावली. यावरून नागवडे कुटुंब लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ढोकराई फाटा येथे प्रगती कार्यालयात नागवडे समर्थकांचा मेळावा झाला. नागवडे निवडणुकीत काय भूमिका घेतात, … Read more

31 कोटी संपत्ती असणाऱ्या विखेंकडे नाही एकही चारचाकी !

शिर्डी :- विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांच्याकडे 31 कोटी एवढी संपत्ती असून ते या मतदारसंघातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील जंगम संपत्ती चार कोटी 69 लाख 762 रुपये, स्थावर संपत्ती 51 लाख 13 हजार 200 रुपये एवढी आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम एक लाख 49 हजार 789 रुपये, बँक … Read more

नगरच्या दोन्ही माजी आमदारांनी शहर विकासाचे विद्रुपीकरण केले !

अहमदनगर :- एकाच घरात दोन आमदारकी असतानाही शासनाचा निधी शहरात आणता आला नाही. या दोघांनीही शहर विकासाचे विद्रुपीकरण केल्याचा हल्लाबोल बसपाचा उमेदवार श्रीपाद छिंदम याने केला.  तो म्हणाला, शहरातील सेनेचे उमेदवार 25 वर्षे आमदार होते, दुसरे राष्ट्रावादीचे उमेदवार मागील पाच वर्षांपासून आमदार आहेत. पण या दोघांनाही आमदार निधी सोडता शहर विकासासाठी सरकारकडून भरीव निधी आणता … Read more

आमदार मोनिका राजळे कोट्यधीश पण एकही चारचाकी वाहन नाही !

शेवगाव ; – आमदार मोनिका राजळे कोट्यधीश असून उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी त्यांनी आपल्या कुटुंबाकडे नऊ कोटी 28 लाख 86 हजार 178 रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी दीड कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे. आ. मोनिका राजळे यांच्या नावावर एकही चारचाकी वाहन नाही, तर त्यांचे पती स्व. राजीव … Read more

मंत्रिपदाचे दावेदार विजय औटी यांच्या पराभवासाठी खा.सुजय विखेंसह विरोधक एकत्र !

पारनेरमध्ये युतीला तिलाजंली देवून युतीचा धर्म न पाळता भाजपचे खासदार डॉ.विखे औटींच्या अडचणी भर पडण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे. अर्थात औटींबद्दल युतीच्या नेत्यांसह कार्यकर्ते व सर्वसामान्य नाराज आहेत. त्याबरोबर औटी हे विजय झाले तर ते पुढे मंत्रिपदाचे दावेदार राहतील. ते दावेदार होवू नये म्हणून आतापासून पाडापाडीचे राजकारण या निमित्त्याने सुरू झाले आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघात … Read more

आ.शिवाजीराव कर्डिले व विखे कुटुंबामध्ये भांडणे लावून देण्याचे काम

राहुरी : आ.शिवाजीराव कर्डिले व विखे कुटुंबामध्ये भांडणे लावून देण्याचे काम गेली काही दिवस करत होते.मात्र विखे कर्डिले समीकरण तोडण्याचे षडयंत्र आम्ही सामूहिकपणे हाणून पाडले.आमच्या दोन्ही कुटुंबांमधील वैचारिकता कायम राहणार आहे, असे प्रतिपादन खा. सुजय विखे यांनी केले.  राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातून भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी सभेत बोलतांना खा.विखे … Read more

संघर्ष टाळत विखे आणि थोरातांची एकमेकांना मदत करण्याची भूमिका !

जिल्ह्यातील दिग्गज नेते मानल्या जाणाऱ्या राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात या दोन्ही नेत्यांनी शिर्डी व संगमनेर या विधानसभा मतदारसंघांतील संभाव्य कौटुंबिक संघर्ष अखेर टाळला. संगमनेरात थोरातांविरोधात विखे कुटुंबातील कोणीही उभे राहिले नाही, तर तिकडे शिर्डीत विखेंविरोधात थोरातांच्या कुटुंबातील कोणीही अर्ज भरला नाही. यावरून विखे व थोरातांनी अनुक्रमे शिर्डी व संगमनेरमध्ये एकमेकांना ‘बाय’ दिल्याची चर्चा आहे.  … Read more

रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज बाद!

अहमदनगर :- राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत – जामखेड मतदार संघातील रोहित राजेंद्र पवार या अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान बाद झाला आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांचा अर्ज वैध ठरला आहे. मात्र, दोघांचीही नावे सारखीच असल्यामुळे रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या चर्चेने खळबळ उडविली आहे. कर्जत जामखेड … Read more

सुजित झावरेंचे बंड थंडावणार ?

पारनेर :-  जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी विधानसभा निवडणुकीत बंडाचा झेंडा फडकवत नगर जिल्हातील नेत्यांशी महाआघाडी करून विधानसभा निवडणुकीत उतरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर राहुन पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांना मदत करावी. अशी गळ राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी झावरे यांना घातली आहे. दुसरीकडे झावरे यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते … Read more

माझी शेवटची निवडणूक आहे सहकार्य करा – अनिल राठोड

अहमदनगर – विधानसभा निवडणकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रचाराला सुरुवात झाली असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झड़ लागल्या आहेत. उपनेते अनिल राठोड समर्थक माजी खासदार दिलीप गांधी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. शनिवारी राठोड यांनी भाजपाचे नेते वसंत लोढा याची भेट घेतली. ही माझी शेवटचीच निवडणक आहे, मला सहकार्य करा अशी भावनिक साद त्यांनी घातली. … Read more

दहावीच्या विद्यार्थिनीसह १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव:- दहावीच्या विद्यार्थिनीसह एका तरुणाचा पाळधी येथे खड्ड्यात मृतदेह आढळल्याने शुक्रवारी खळबळ उडाली आहे. तरुण तीन दिवसांपूर्वी घरातून निघून गेला हाेता, तर विद्यार्थिनीला पळवून नेल्याबाबत गुरुवारी रात्री १२ वाजता तिच्या वडिलांनी पाळधी पोलिसांत तक्रार केली होती. त्यामुळे दाेघांची हत्या करण्यात आल्याचा संशय तरुणाचे मित्र आणि तरुणीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. प्रिया ऊर्फ छकुली दत्तात्रय पाटील … Read more

मंत्र्याच्या घरी बाॅम्ब ठेवल्याची अफवा; एकास अटक

पुद्दुचेरी:- पुद्दुचेरीचे सार्वजनिक बांधकाममंत्री ए. नमासीवायम यांच्या निवासस्थानी बाॅम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने गुरुवारी रात्री पोलिस नियंत्रण कक्षात फोन करून नमासीवायम यांच्या निवासस्थानी बाॅम्ब ठेवला असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी निवासस्थानाची तपासणी केली, पण तेथे काहीही आढळले नाही. बाॅम्बची माहिती खोटी … Read more

गुंडाचे फ्लेक्स लावणाऱ्या आठ जणांंविरुद्ध गुन्हा

पुणे:- बेकायदेशीररीत्या जमाव जमवून तसेच महानगरपालिकेची परवानगी न घेता दिवंगत कुख्यात गुंड संदीप मोहोळच्या स्मृतिदिनानिमित्त फ्लेक्स लावणाऱ्या आठ जणांविरुद्ध पाेेलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रवीण चंद्रकांत जागडे, राहुल भगवान जागडे अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत, तर हेमंत दाभेकर, राजू चव्हाण, … Read more

विवाहित महिलेचे अपहरण करून बलात्कार

सांगोला:- तालुक्यातील कोळे येथे राहणारा पिंटू बापू मोहिते यास मंगळवेढा तालुक्यातील मारोळी येथील विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी पंढरपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यनके मोरे यांनी दाेषी मानून १४ वर्षे सक्तमजुरी व ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पीडित महिला ही मंगळवेढा तालुक्यातील मारोळी येथील राहणारी असून सणानिमित्त माहेरी हुलजंती … Read more

मला पाठबळ देवून राज्यात नवा इतिहास घडवा – राधाकृष्ण विखे पाटील

राहाता :- तीस वर्षाच्या राजकीय प्रवासात मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साधताना मी कुठेही कमी पडलो नाही. मतदार संघाचा चेहरामोहरा बदलतानाच सर्वसामान्य माणसाचे हित जोपासण्याचे काम केले. भविष्यात रोजगार निर्मिती बरोबरच पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेला वळविणे, निळवंडे धरणाचे पाणी जिरायती भागात उपलब्ध करून देणे आणि गोदावरी कालव्यांच्या कामाचा अजेंडाच आपल्या समोर आहे. हे काम करण्यासाठी मला पाठबळ … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच देशात आर्थिक मंदी

राहुरी – शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे जास्त गेले, तर भाजप सरकार महागाई वाढवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अशा चुकीच्या धोरणामुळेच देशात आर्थिक मंदी आली, असा घणाघाती आरोप माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केला. राहुरीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गाडगेबाबा व्यापारी संकुल रस्त्यावर आयोजित सभेत पाटील बोलत होते. ते … Read more

आ. राहुल जगताप यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर श्रीगोंद्यात उलटसुलट चर्चेला ऊत

श्रीगोंदे:- राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भावनिक होऊन आपले समर्थक व कार्यकर्त्यांची माफी मागितली. ‘मी आपली मनापासून माफी मागतो’ अशी पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर टाकली आहे. ही पोस्ट सध्या वेगाने व्हायरल होत आहे. भाजपचे उमेदवार म्हणून बबनराव पाचपुते यांचे नाव जाहीर होताच मतदारसंघातील राजकारण वेगाने बदलले. त्याआधी खुद्द आमदार … Read more

निवडणुकीतून आता माघार नाही, निर्णयाशी विखेंचा संबंध नाही !

कोपरगाव :- शहर पन्नास वर्षांत दोन कुटुंबांच्या ताब्यात सत्ता असताना पाणी प्यायला मिळत नसेल, तर शरम वाटली पाहिजे. मी कोणाच्या एका विरोधातला नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव व वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. व्यक्तीद्वेषाने निवडणूक लढवत नसून तालुक्यातील जनतेच्या मनातील स्वप्नपूर्तीसाठी निवडणूक लढवत आहे. निवडून दिलेला उमेदवार शासनाचा पैसा जनतेच्या विकासासाठी खर्च करत असेल, … Read more