भाजपच्या उमेदवारांची नावं निश्चित,पहिली यादी आज जाहीर होणार !

नवी दिल्ली : नवी दिल्लीत मोदी आणि शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली असून, या बैठकीत भाजपच्या उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती आहे. तसंच भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन दिवसात युतीची घोषणा होईल असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी सांगितलेले युतीचे अनेक मुहूर्त टळले आहेत. मात्र युतीची घोषणा काही झाली … Read more

तर मी खासदारकीचा राजीनामा देईन…

राहुरी ;- राहुरीच्या ऊस उत्पादक सभासदांनी मोठ्या विश्वासाने साखर कारखाना आमच्याकडे दिलेला असून गेली दोन वर्षे हा साखर कारखाना चालवत असताना कुणी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार दाखवून दिला, तर संचालक पदाबरोबरच खासदारकीचा देखील राजीनामा देईल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या रविवारी आयोजित ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत … Read more

हॉटेलमधील कूकचा तिक्ष्ण हत्याराने वार करून खून

श्रीरामपूर :- तालुक्यातील भेर्डापूर शिवारात भेर्डापूर-पाथरे रस्त्यावरील अजिंक्यतारा हॉटेलमधील कूक मोहमंद शेख याचा तिक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. या कूकचा मृतदेह रविवारी हॉटेलच्या मागेच पडलेला आढळला. पोलिसांनी याच हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या एकास संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. दुपारी उशिरा या दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाले. वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. त्यात मोहंमद … Read more

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासाठी प्रयत्न

संगमनेर :- मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्यात १२ विरुध्द ० असा निकाल लावण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. सर्व विरोधकांची एकत्र मोट बांधत थोरात यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. बदलती समीकरणे लक्षात घेता एकास एक उमेदवारीचा थोरात यांना फायदा होतो की … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या पक्षबदलाची चर्चा पुन्हा सुरू, मात्र…

अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा शहरात सुरू होती. जगताप धक्कातंत्र वापरून ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात होते. त्यातच जगताप यांनी सोमवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता शिल्पा गार्डन येथे पदाधिकारी व मोजक्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे जगताप यांच्या पक्षबदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, हा … Read more

तेच शिकारीसारख्या गोष्टी करू शकतात :रोहित पवार

जामखेड :- “काही दिवसांपुर्वी एका व्यक्तीला शिकारीची हौस आलेली. आपल्या घरचं जनावर मरायला लागलं तर त्याला पाहूण्याच्या दारात नेऊन दावणीला बांधायचा सल्ला देणारेच शिकारीसारख्या गोष्टी करू शकतात. असो, त्यांना कुणीतरी सांगा माणूस असो वा जनावर आम्ही जगवायच्या गोष्टी करतो.” अशी खोचक टीका रोहित पवार यांनी पालकमंत्री राम शिंदेंवर केली आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी केंद्रीय दुष्काळ पाहणी … Read more

अमित शाह यांचा राजीनामा

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपा नेते अमित शाह यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्यानंतर २०१४ साली अमित शाह यांनी हे पद सांभाळले होते. त्यांना गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवडण्यात आलेले होते. मोदींनी पंतप्रधानपदाचा पद्भार घेतल्यानंतर हे पद सोडले होते. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा राज्यसभा … Read more

देशावर ८८ लाख कोटींचे कर्ज असूनही सर्वकाही चांगले कसे?

नवी दिल्ली : भारताच्या डोक्यावर तब्बल ८८ लाख कोटी रुपयांचे डोंगराएवढे कर्ज आहे. तरीही सर्वकाही चांगले कसे आहे? असा परिस्थितिसापेक्ष सवाल काँग्रेसने शनिवारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करताना, भारतात सर्वकाही अलबेल असल्याचा दावा केला होता. त्यावर आर्थिक आकडेवारीचा हवाला देत काँग्रेसने तोंडसूख घेतले आहे. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना … Read more

अविनाश आदिकांच्या गाडीतून साडेसहा लाखांची रोकड हस्तगत !

नाशिक : राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूच्या वाहतुकीवर निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. २७) दोन ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत ६ लाख ६० हजार ६४० रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. यात त्र्यंबक तालुक्यातील अंबोली चेक पोस्टवर एका व्यापाऱ्याकडे २ लाख २ हजार ६४० रुपये मिळाले, … Read more

पालकमंत्री ना.राम शिंदेंकडून पवारांना जोरदार राजकिय धक्का

कर्जत: तालुक्यातील शेगूड येथे ना. प्रा राम शिंदे यांनी राज़कीय खेळी करून पाच दिवसांपूर्वी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांची घरवापसी करवून घेतली. शेगूड येथे ना. शिंदे यांच्या सभेत अनेकांची भाषणे झाली. त्यानंतर उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत हे अचानक जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांना घेऊन दाखल झाले. हे पाहून उपस्थितांना … Read more

मोबाईल टावर उभारण्याचे आमिष दाखवून डॉक्टरची तीस लाखांची फसवणूक

अहमदनगर : आपल्या जागेवर रिलायंन्स कंपनीचे मोबाईल टावर बांधण्याचे आहे. त्यासाठी तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे इन्सुरन्स करावयाचे असल्याचे सांगून, शिवाजी घोरपडे यांना विविध बँकांमध्ये वेळोवेळी पैसे भरायला लावून,३० लाख ३५ हजार ५३१ रूपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . याबाबत सविस्तर असे की, डॉ.शिवाजी … Read more

भीमानदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळला

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज येथील भीमानदीपात्रातील बेटावर अंदाजे३५वर्षीय अनोळखी पुरुषाचा वाहून आलेला मृतदेह पोलिसांना सापडला आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे पोलिसांनी स्पीडबोटीच्या मदतीने हा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढल.परंतु सदरचा मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजलेला असल्यामुळे जागेवरच पंचनामा करत पोलिसांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली. या मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत, त्यामुळे सदर इसमाचा मृत्यू पाण्यात … Read more

रेल्वे स्थानकांवर मिळणार मोफत वायफाय!

नवी दिल्ली : देशभरातील ५ हजार रेल्वे स्थानकांवर आतापर्यंत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील मिदनापूर रेल्वे स्थानक हे ५ हजारावे स्थानक ठरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. जानेवारी २०१६ साली मुंबई मध्य रेल्वे स्थानकापासून सुरू झालेल्या मोफत वायफायच्या प्रवासाने ५००० चा टप्पा पूर्ण केला आहे. ४४ महिन्यांमध्ये रेलटेलने यशस्वीरीत्या पाच हजार … Read more

राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनवणार हे बाळासाहेबांना दिलेले वचन

मुंबई  : भाजपासोबतच्या युतीचे ठरले आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात चांगली चर्चा सुरू आहे. एक-दोन दिवसांत त्याबाबत जाहीरही करू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पण त्याचवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या अखेरच्या दिवसांत राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनवणार, असे वचन मी दिले आहे. त्यांना दिलेले हे वचन मी पूर्ण … Read more

घुले बंधूंची भूमिका गुलदस्त्यात!

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या पक्षांतर्गत विरोधातील गटाने दि.३० रोजी भाजप व मित्र पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा शेवगाव येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यात काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांना भाजपची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी यापूर्वीही वरील कार्यकर्त्यांनी … Read more

पवार कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील !

अहमदनगर :- आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केली आहे. काही तासांपूर्वी केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे. गेल्या दोन दिवसातील राष्ट्रवादीत घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण राज्याच राजकारण … Read more

रोहित पवारांचे डिपाॅझिट जप्त करून बदला घेणार !

जामखेड :- बारामतीची शिकार हातातून जाते काय असे वाटते, परंतु ही शिकार आपल्या हातूनच व्हावी, अशी इच्छा आहे, असे मंत्री राम शिंदे यांनी सांगितले. बारामतीकरांनी गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला, त्याचा बदला मी पवार यांचे डिपाॅझिट जप्त करून घेणार आहे, असेही ते म्हणाले. सरपंच परिषद महामेळाव्यात शिंदे बोलत होते. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सारोळ्याचे … Read more

‘उचकी’ येण्यामागचं कारण जाणून घ्या… अन 5 च मिनिटात करा बाय-बाय

उचकी येणं ही एक साधारण बाब आहे. उचकी आल्यानंतर आपण अनेक उपाय करतो. काही वेळेस ही उचकी थांबते, तर काही वेळेस नाही. कित्येकदा उचकी लागल्यास आपण लगेचच पाणी पितो.  उचकी येण्याची अनेक कारणे असतात. लगोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. उचकी लागल्यावर तुम्ही खूप अस्वस्थ होता. उचकी रोखणे खूप अवघड होऊन जाते. असे मानले … Read more