देशावर ८८ लाख कोटींचे कर्ज असूनही सर्वकाही चांगले कसे?

नवी दिल्ली : भारताच्या डोक्यावर तब्बल ८८ लाख कोटी रुपयांचे डोंगराएवढे कर्ज आहे. तरीही सर्वकाही चांगले कसे आहे? असा परिस्थितिसापेक्ष सवाल काँग्रेसने शनिवारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करताना, भारतात सर्वकाही अलबेल असल्याचा दावा केला होता. त्यावर आर्थिक आकडेवारीचा हवाला देत काँग्रेसने तोंडसूख घेतले आहे. नवी दिल्ली येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना … Read more

अविनाश आदिकांच्या गाडीतून साडेसहा लाखांची रोकड हस्तगत !

नाशिक : राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूच्या वाहतुकीवर निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. २७) दोन ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत ६ लाख ६० हजार ६४० रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. यात त्र्यंबक तालुक्यातील अंबोली चेक पोस्टवर एका व्यापाऱ्याकडे २ लाख २ हजार ६४० रुपये मिळाले, … Read more

पालकमंत्री ना.राम शिंदेंकडून पवारांना जोरदार राजकिय धक्का

कर्जत: तालुक्यातील शेगूड येथे ना. प्रा राम शिंदे यांनी राज़कीय खेळी करून पाच दिवसांपूर्वी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांची घरवापसी करवून घेतली. शेगूड येथे ना. शिंदे यांच्या सभेत अनेकांची भाषणे झाली. त्यानंतर उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत हे अचानक जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांना घेऊन दाखल झाले. हे पाहून उपस्थितांना … Read more

मोबाईल टावर उभारण्याचे आमिष दाखवून डॉक्टरची तीस लाखांची फसवणूक

अहमदनगर : आपल्या जागेवर रिलायंन्स कंपनीचे मोबाईल टावर बांधण्याचे आहे. त्यासाठी तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे इन्सुरन्स करावयाचे असल्याचे सांगून, शिवाजी घोरपडे यांना विविध बँकांमध्ये वेळोवेळी पैसे भरायला लावून,३० लाख ३५ हजार ५३१ रूपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . याबाबत सविस्तर असे की, डॉ.शिवाजी … Read more

भीमानदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळला

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज येथील भीमानदीपात्रातील बेटावर अंदाजे३५वर्षीय अनोळखी पुरुषाचा वाहून आलेला मृतदेह पोलिसांना सापडला आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे पोलिसांनी स्पीडबोटीच्या मदतीने हा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढल.परंतु सदरचा मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजलेला असल्यामुळे जागेवरच पंचनामा करत पोलिसांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली. या मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत, त्यामुळे सदर इसमाचा मृत्यू पाण्यात … Read more

रेल्वे स्थानकांवर मिळणार मोफत वायफाय!

नवी दिल्ली : देशभरातील ५ हजार रेल्वे स्थानकांवर आतापर्यंत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील मिदनापूर रेल्वे स्थानक हे ५ हजारावे स्थानक ठरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. जानेवारी २०१६ साली मुंबई मध्य रेल्वे स्थानकापासून सुरू झालेल्या मोफत वायफायच्या प्रवासाने ५००० चा टप्पा पूर्ण केला आहे. ४४ महिन्यांमध्ये रेलटेलने यशस्वीरीत्या पाच हजार … Read more

राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनवणार हे बाळासाहेबांना दिलेले वचन

मुंबई  : भाजपासोबतच्या युतीचे ठरले आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात चांगली चर्चा सुरू आहे. एक-दोन दिवसांत त्याबाबत जाहीरही करू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पण त्याचवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या अखेरच्या दिवसांत राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनवणार, असे वचन मी दिले आहे. त्यांना दिलेले हे वचन मी पूर्ण … Read more

घुले बंधूंची भूमिका गुलदस्त्यात!

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या पक्षांतर्गत विरोधातील गटाने दि.३० रोजी भाजप व मित्र पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा शेवगाव येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यात काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांना भाजपची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी यापूर्वीही वरील कार्यकर्त्यांनी … Read more

पवार कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील !

अहमदनगर :- आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केली आहे. काही तासांपूर्वी केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे. गेल्या दोन दिवसातील राष्ट्रवादीत घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण राज्याच राजकारण … Read more

रोहित पवारांचे डिपाॅझिट जप्त करून बदला घेणार !

जामखेड :- बारामतीची शिकार हातातून जाते काय असे वाटते, परंतु ही शिकार आपल्या हातूनच व्हावी, अशी इच्छा आहे, असे मंत्री राम शिंदे यांनी सांगितले. बारामतीकरांनी गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला, त्याचा बदला मी पवार यांचे डिपाॅझिट जप्त करून घेणार आहे, असेही ते म्हणाले. सरपंच परिषद महामेळाव्यात शिंदे बोलत होते. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सारोळ्याचे … Read more

‘उचकी’ येण्यामागचं कारण जाणून घ्या… अन 5 च मिनिटात करा बाय-बाय

उचकी येणं ही एक साधारण बाब आहे. उचकी आल्यानंतर आपण अनेक उपाय करतो. काही वेळेस ही उचकी थांबते, तर काही वेळेस नाही. कित्येकदा उचकी लागल्यास आपण लगेचच पाणी पितो.  उचकी येण्याची अनेक कारणे असतात. लगोपाठ उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. उचकी लागल्यावर तुम्ही खूप अस्वस्थ होता. उचकी रोखणे खूप अवघड होऊन जाते. असे मानले … Read more

लाल टोमॅटोच नव्हे, तर हिरवा टोमॅटोचे ‘हे’ आहेत अचंबित करणारे फायदे, जाणून घ्या

एकेकाळी टोमॅटोला विषारी फळ समजून त्यापासून लोक दूर राहात होते, मात्र आता टोमॅटो जगभरातील लोकांच्या आहारात ठाण मांडून बसला आहे.  केवळ लाल टोमॅटोच नव्हे, तर हिरवा, कच्चा टोमॅटोही आवडीने खाल्ला जातो. या कच्च्या टोमॅटोमध्येही अनेक गुण असतात. त्याचमुळे स्नायू मजबूत होतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.  हिरव्या टोमॅटोमुळे स्नायूंचा विकास चांगला होतो. आयोवा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे … Read more

बैठे काम करणार्यांना मरण लवकर येते का?

बैठे काम हे आपल्यासाठी आवश्यकच झाले आहे, कारण कष्टाची कामे कमी झाली आहेत. पण, बैठी कामे करणारे लोक किती काळ एका जागेवर बसतात आणि बसून नेमके काय करतात, यावर त्यांच्या आयुष्याची जोखीम अवलंबून आहे. रामदास स्वामींनी म्हटले आहे, ”कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला.” आपण हा कायदा पाळत तर आहोतच, पण जरा … Read more

रोज पाचच मनुक्यांचे सेवन केल्यास काय होईल?

आयुर्वेदानुसार मनुक्यांमध्ये भरपूर मात्रेत औषधीय गुण असतात. आपल्याला रोज ४-५ मनुका खायलाच पाहिजेत. मनुक्यांना सर्दी-खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वांत उत्तम औषध मानले जाते.  त्याशिवायदेखील मनुक्यांचे बरेच फायदे असतात. त्यात स्थित न्यूट्रिएन्ट्स ब‍ऱ्याच आजारांमध्ये फायदेशीर ठरतात. तर, जाणून घेऊया रोज मनुका खाण्याचे काय फायदे आहे. मनुका खाल्ल्याने ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होते. यामुळे त्वचेची रंगत वाढते … Read more

पीरियड्समध्ये व्यायाम करणे योग्य की अयोग्य?

पीरियड्सदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक प्रकाराचे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. काही महिलांना खूप वेदना सहन कराव्या लागतात, तर काही महिलांसाठी हे दिवस इतर सामान्य दिवसांप्रमाणे असते..पीरियड्सदरम्यान व्यायाम करायचा की नाही, याबद्दल अनेक महिला गोंधळलेल्या असतात. एका बाजूला पोटदुखी तर दुस‍ऱ्या बाजूला व्यायाम सुटल्यामुळे होणारं नुकसान. अशात जाणून घ्या की, आपण स्वत:ला कशा प्रकारे फिट ठेवू शकता. … Read more

अबब! या कंपनीत कर्मचारी वर्षाला तब्बल २८ लाख रुपये कमावतो

नवे आर्थिक वर्ष सुरू होते, तेव्हा कंपन्यांमधली कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे वेध लागतात. यावेळी प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. मात्र अप्रायजल लेटर हाती येते तेव्हा अनेकांच्या वाट्याला अपेक्षाभंग येतो. परंतु, अमेरिकेतील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एवढी पगारवाढ दिली आहे की, तुम्ही त्याची कल्पनाही करणार नाही. या कंपनीचा पगारवाढीचा आकडा ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. अमेरिकेच्या इडाहोमध्ये ‘ग्रॅव्हिटी … Read more

गरोदरपणातली पाठदुखी कशी रोकता येईल?

सातव्या महिन्यादरम्यान ही पाठदुखी दिसून येत असल्याचे अस्थिविकारतज्ज्ञ आणि संशोधक  सांगतात.  यासाठी कारणीभूत असणारे घटक खालीलप्रमाणेे- शरीराचे गुरुत्व केंद्र बदलून ते पुढील बाजूस येते. यामुळे पाठीच्या खालच्या भागावरील दाब वाढतो आणि त्यामुळे कण्यावर अतिरिक्त भार येतो..पोट आणि कुल्ह्यांमधील स्नायू कमकुवत झाल्यामुळेसुद्धा कण्यावर भार पडतो. ज्यांची जीवनशैली कृतिशील आहे, त्यांच्या तुलनेत बैठी जीवनशैली असलेल्यांना पाठदुखी होण्याची … Read more

जाणून घ्या… वायुप्रदूषणामुळेच मुलांचा मेंदू धोक्यात!

न्यूयॉर्क : बालपणी वायू प्रदूषणाला तोंड देणाऱ्या मुलांमध्ये किशोरावस्थेत नैराश्य, आत्ममग्नता आणि अन्य मानसिक आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. तीन ताज्या अध्ययनांतून हा खुलाला झाला आहे. ‘एन्वायर्नमेंटल हेल्ष पर्सेपेक्टिव्स’ नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या या अध्ययनात असे दिसून आले की, कमी कालावधीसाठी वायू प्रदूषणाच्या विळख्यात येणाऱ्या मुलांमध्ये मुलांमध्ये मानसिक समस्या एक ते दोन दिवसांनंतर उद्भवू शकतात.  अमेरिकेतील सिनसिनाटी … Read more