शिर्डी मतदारसंघात सेनेकडून चार जण इच्छुक

शिर्डी-: विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्याची चिन्हे दिसू लागल्याने पक्षांकडून मतदार संघनिहाय उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. शिवसेनेच्या वतीने नगर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत सेना भवनावर पार पडल्या. यावेळी शिर्डी मतदार संघातून विधानसभेसाठी शिवसेना नेते कमलाकर कोते, राहात्याचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, उपजिल्हा प्रमुख अनिल बांगरे, जिल्हा संघटक विजय काळे यांनी मुलाखती दिल्या आहेत. राज्यात शिवसेना व भाजप … Read more

एक हॉटेल असे ही : पोटभर खा अन् हवे तेवढेच पैसे द्या

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अलबामामध्ये एक अनोखे हॉटेल सुरू झाले असून तिथले ताजे पदार्थ खाण्यासाठी लोकांची रांग लागते. या हॉटेलची खासियत म्हणजे, तिथे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांंची निश्चित किंमत नाही. ज्याच्याकडे जेवढे पैसे आहेत, तेवढे देऊन तो तिथे जेवण करू शकतो. ज्या लोकांकडे काहीच पैसे नाहीत, ते जेवणाच्या बदल्यात लोकांना खाद्यपदार्थ वाढून भरपाई करू शकतात. ड्रेक्सेल अँड हनीबी … Read more

आदिवासींच्या आरोग्यविषयक संशोधना संदर्भात पहिल्या राष्ट्रीय परिषदचे उद्घाटन संपन्न

प्रवरानगर लोणी :- प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(अभिमत विद्यापीठ)च्या सेंटर फॉर सोशल मेडिसिन आणि सेंटर फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदेचा उद्घाटन सोहळा आज लोणी येथे पद्मश्री डॉक्टर अभय बंग , पद्मश्री डॉक्टर एच सुदर्शन, कुलगुरू डॉ वाय. एम. जयराज, प्र-कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे-पाटील यांच्या … Read more

सरकारने राष्ट्रीय आदिवासी आरोग्य मिशन आणि कृती आराखडा तयार करावा – डॉक्टर अभय बंग

अहमदनगर :- आदिवासींच्या आरोग्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधन अहवालाच्या आधारे सरकारने राष्ट्रीय आदिवासी आरोग्य मिशन आणि कृती आराखडा तयार करावा अशी अपेक्षा पद्मश्री डॉक्टर अभय बंग यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित ट्रायबेकॉन या परिषदेत ते बोलत होते. प्रवरा मेडिकल ट्रस्ट ने आदिवासी विकास मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटना आणि आदिवासी संशोधन व … Read more

आणि महिलेने झोपेत गिळली हिऱ्यांची अंगठी !

कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एक चक्रावणारे प्रकरण समोर आले आहे. तिथे एका महिलेने झोपेदरम्यान पडलेल्या स्वप्नामध्ये आपली साखरपुड्याची अंगठी चोरी होण्यापासून वाचविण्यासाठी चक्क गिळून टाकली. मात्र जेव्हा जाग आली तेव्हा आपण खरोखरच असे केले असल्याचे तिच्या लक्षात आले. जेना इवान्स असे या महिलेचे नाव असून या घटनेबाबत तिने फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. त्यात ती … Read more

इतक्या वेळा झाला आहे पृथ्वीवर सामूहिक विनाश

न्यूयॉर्क : आजपासून सुमारे २६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीला सामूहिक विनाशाला सामोरे जावे लागले होते. यादरम्यान संपूर्ण पृथ्वीवरून जीवजंतू गायब झाले होते आणि यासोबतच भूगर्भीय आणि बाह्य कारणांमुळे पृथ्वीवर सामूहिक विनाशाच्या घटनांची संख्या सहावर पोहोचली होती. एका ताज्या अध्ययनातून शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक मिशेल रेम्पिनो यांनी सांगितले की, सामूहिक विनाशाच्या कारणांचा … Read more

तरुणाला जिवंत जाळले !

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशात अगोदरच गुन्हेगारीने कळस गाठला असतानाच एका २० वर्षीय दलित तरुणाला जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उजेडात आली आहे. आंतरजातीय संबंध असल्याच्या संशयावरून वरील ऑनर किलिंगचा प्रकार घडला. पोटच्या गोळ्याला जिवंत जाळल्यामुळे जबर हादरा बसलेल्या आईनेसुद्धा प्राण त्यागला आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेवरून काँग्रेसने राज्यातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. … Read more

सासरच्या मंडळीकडून जावयास बेदम मारहाण

अहमदनगर : तु तुझ्या पत्नीला चांगले वागवत नाहीस. त्यामुळे आम्हाला आमची मुलगी घरी घेवून जायची आहे.त्यास पतीने विरोध केल्याने सासरच्या मंडळींनी लक्ष्मण रामचंद्र ताकवाले (रा. खेंडे, ता. पाथर्डी) यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने व लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. यावेळी भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी आई अलका या मध्ये आल्या असता त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगळ केली. तसेच जीवे मारण्याची … Read more

हिंदू विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू!

कराची : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील दंतवैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका हिंदू तरुणीचा हॉस्टेलच्या खोलीत संशयास्पद मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे; परंतु आपल्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबाकडून लावण्यात आला आहे. लरकाना जिल्ह्यातील बीबी आसिफा दंतवैद्यकीय महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला असलेली नम्रता चांदनी सोमवारी आपल्या … Read more

भांडखोर नवऱ्याने छाटले पत्नीचे नाक

लाहोर : पाकिस्तानमध्ये भांडखोर नवऱ्याने रागाच्या भरात चाकूने पत्नीचे नाक आणि डोक्यावरील केस छाटल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून तिच्यावर कृत्रिम नाकाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाझियाचा नवरा सज्जाद अहमद हा तिला सातत्याने मारहाण करायचा. लोखंडाची सळई आणि मिळेल त्या वस्तूने तो … Read more

मुलींचे फोटो काढल्याची बतावणी करून चोरी

अहमदनगर :’तू मुलींचे फोटो काढले आहेत. राजाभाऊंनी बघितले आहे’, अशी बतावणी करून दोघांनी यश पॅलेस चौकात चल, असे म्हणून एकाला फसवून मोबाईल चोरून नेला. कायनेटीक चौकाजवळील इलाक्षी शोरूम समोर ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. . याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोरख दत्तात्रय चव्हाण (रा.राणी लक्ष्मीबाई चौक, … Read more

व्हिडिओ गेमच्या वादातून मुलाची हत्या

कराची : पाकिस्तानमध्ये व्हिडिओ गेमवरून झालेल्या भांडणामध्ये एका अल्पवयीन मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. मुहम्मदी कॉलनी जिल्ह्यात राजू आणि शाहझीब इक्बाल या १५ वर्षीय दोन मित्रांमध्ये व्हिडिओ गेमसाठीचे टोकन वापरण्यावरून वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर राजूने इक्बालला बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या इक्बालला तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात … Read more

भारतात मंदी येणार नाही

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था ही मंदीमध्ये फसण्याची भीती नसली तरी जागतिक अर्थव्यवस् थेला येत्या दोन वर्षांमध्ये आर्थिक मंदीचा फटका बसू शकतो, अशी ४० टक्के शक्यता आहे, असे मत जे. पी. मॉर्गनच्या एका प्रमुखाने मुलाखतीत व्यक्त केले आहे. अनेक विश्लेषकांचे मत आहे की, जागतिक आर्थिक मंदी येत असून २००८ च्या तुलनेत जगभरा तली शेअर बाजारांमध्ये … Read more

श्रीरामपूर विधानसभेसाठी कॉग्रेसकडून १९ जण इच्छुक

श्रीरामपूर : विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी राज्यभरात कॉँग्रेस पक्षाच्या मुलाखती सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल श्रीरामपुरात विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. यावेळी १९ उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली शहरातील संगमनेर रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहामध्ये या मुलाखती झाल्या. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा संघटक बाबासाहेब कोळसे, … Read more

बद्रीनाथ महाराजांच्या हस्ते आदर्श अभियंता व आदर्श कर्मचारी पुरस्काराचे वितरण

अहमदनगर : बांधकाम खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी सेवा संस्था, अहमदनगर यांच्यातर्फे आदर्श अभियंता व आदर्श कर्मचारी पूरसाकाराचे मा. बद्रीनाथ महाराज तनपुरे व जंगले महाराज यांच्या हस्ते नुकतेच  दि. १७/०९/२०१९ रोजी सावेडीतील माउली संकुलामध्ये  वितरण करण्यात आले. यावेळी आदर्श अभियंता म्हणून श्री. अंकुश अशोकराव पालवे व श्री श्रीनिवास वर्पे यांचेसह श्री अनिल लाटणे,  श्री. पी. जे. … Read more

शेतकरी महिलेने मागितले इच्छामरण !

नेवासा : खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने मिळावा यासाठी गेली अडीच ते तीन महिने राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, सबंधित मंत्रालय, जिल्हा व तालुका प्रशासनासह संबंधित महावितरण तालुका व जिल्हा कार्यालय यांच्याकडे एकूण आठ वेळा मेल, रजिस्टर्ड पत्रव्यवहार, प्रत्यक्ष कार्यालयात पाठपुरावा, विनंत्या केल्या. मात्र, अद्यापही वीजपुरठा सुरळीत न झाल्याने अखेर हताश होवून नेवासा बुद्रुक येथील प्रयोगशील … Read more

आ. कर्डिलेंनी विधानसभेत पाच वर्षांत फक्त दोन वेळा तोंड उघडले !

राहुरी, नगर व पाथर्डी ही तालुक्याची गावे मतदारसंघात असताना दहा वर्षांत एकही नवीन पाणी योजना कार्यान्वित करता आली नाही. पालिकेच्या सुधारित पाणी योजनेत व मंजुरीत ज्यांचे काडीचेही योगदान नाही, असे नि्क्रिरय आमदार शिवाजी कर्डिले शहरात फलकबाजी करून स्वत:चा सत्कार घडवून आणत आहेत. योजनेचे श्रेय घेण्याचा हास्यास्पद व केविलवाणा आटापिटा करीत आहेत. योजनेविषयी समोरासमोर चर्चा करण्याची … Read more

देशभरात ई-सिगारेटवर बंदी!

दिल्ली : आरोग्यास हानिकारक आहे की नाही याबाबत वाद असलेल्या ई-सिगारेटवर बंदी घालण्याचा निर्णय अखेर केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केला. त्यानुसार देशात ई-सिगारेटचे उत्पादन व विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बुधवरी पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली. तसेच धूम्रपानाची समस्या सोडवण्यात ई-सिगारेट अपयशी ठरले असून, शाळकरी मुलांमध्ये त्याचे वेड … Read more