चाराच उठला जनावरांच्या जिवावर!

पारनेर :- जनावरांचे खाद्य म्हणून पेरलेल्या हिरव्या चाऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जनावरे दगावत असल्याने पशुपालक हवालदिल झाल्याचे दिसत आहेत. हा हिरवा चाराच जनावरांच्या मुळावर उठला आहे. चालू खरीप हंगामात सोयाबीन, मूग व मका ही पिक पावसाअभावी आली नाहीत तर मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हाती आलेली पिके वाया गेली आहेत. किटकनाशकांची फवारणी करूनही परिणाम होत … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचे मला भाजप पक्षात प्रवेशासाठी दररोज फोन येतात !

अहमदनगर :- मागील पाच वर्षात सर्वाधिक विकासनिधी भाजप सरकारमुळे मिळाला. राज्यात पुन्हा सत्तेवर भाजप सेनेचे सरकार येणार असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचे मला भाजप पक्षात प्रवेशासाठी दररोज फोन येतात, असे प्रतिपादन आ. शिवाजी कर्डिले यांनी केले. पिंपळगाव माळवी ते मांजरसुंबा रस्ता दुरुस्ती, मांजरसुंबा अंतर्गत रस्ते, पिंपळगाव माळवी ते वांबोरी फाटा रस्ता दुरुस्ती, आढाववाडी अंतर्गत रस्ते, मेहेरबाबा … Read more

विकास प्रत्यक्षात करून दाखवणार

कर्जत: शेती दळणवळणासाठी चांगले रस्ते होणे गरजेचे आहेत. आरोग्य सुविधा, गुणवत्तापुर्ण शिक्षण या सर्व मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी पळुन जाणाऱ्यांमधला नसून फक्त फ्लेक्‍सवर विकास न करता प्रत्यक्षात करून दाखवणार असल्याचे मत राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी व्यक्त केले. कर्जत तालुक्‍यातील भांबोरा येथे गावभेट दौऱ्यात ते बोलत होते. तालुक्‍यातील जलालपुर, सिद्धटेक, दूधोडी, … Read more

आमदार संग्राम जगताप व राहुल जगताप राष्ट्रवादी सोडणार ?

अहमदनगर :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगर शहरातील विद्यमान आमदार संग्राम जगताप तसेच श्रीगोंदा – नगरचे विद्यमान आमदार राहुल जगताप पक्ष सोडण्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत पक्ष सोडण्यायाबाबत दोन्ही आमदारांनी स्पष्ट भाष्य अद्याप जरी केले नसले तरी त्यांचे निर्णय युती होणार कि नाही ह्या निर्णया नंतर हे दोघे आमदार त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बोलले जाते. … Read more

मुलं आमचंही ऐकत नाही, तुम्ही काय ते करा..!

अकोले :- ‘मुलं आमचंही ऐकत नाही, तुम्हीच काय करायचं ते करा’, असे उत्तर मुलींची छेडछाड करणाऱ्या टागरट मुलांच्या पाल्याने मुख्याध्यापकांना दिले. त्यामुळे टारगट मुलांच्या पालकांना समज देणाऱ्या या मुख्याध्यापकांना काय निर्णय घ्यावा, असा प्रश्न पडला आहे. प्रवरानगर परिसरात सुरू असलेल्या या प्रकारामुळे मुलींबरोबर त्यांचे पालक व आता शिक्षकही वैतागले असल्याचे चित्र असून, यावर पोलिसांनीच काय तो … Read more

ना. विजय औटी व अनिल राठोड यांना पक्षांतर्गत आव्हान

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मुलाखती आज घेण्यात आल्या दरम्यान नगर जिल्ह्यातील पारनेर आणि नगर शहरातून विजय औटी व अनिल राठोड यांना पक्षांतर्गत नेत्यांनीच आव्हान उभे केल्याने त्यांची वाटचाल बिकट ठरण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यातील बारा मतदार संघात शिवसेनेच्या आजी माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्या इच्छुकांच्या मुलाखती मुंबईत … Read more

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरोधात असंतोषाची लाट !

नेवासे :- आगामी विधानसभा निवडणुकीत नेवाशाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना भाजपची उमेदवारी दिल्यास ही जागा हातातून जाण्याचा स्पष्ट इशारा तालुक्यातील कार्यकर्त्यानी दिला आहे. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरोधात पक्षांतर्गत उठलेली असंतोषाची लाट काही थांबायला तयार नाही. त्यांच्या उमेदवारीविरोधात थेट वरिष्ठांकडे गा-हाणे करण्यात आले आहे. त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यास पक्षाची हक्काची जागा जाईल, असे भाजप … Read more

आमदार झाल्यापासून विकासाला चालना – आ.संग्राम जगताप

नगर – पहिल्यांदा आमदार झाल्यापासून नगर-कल्याण रस्ता परिसराच्या विकासाला चालना देण्याचे काम केले. पुढील दोन वर्षांत या परिसरातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे नियेाजन केले असल्याची माहिती आमदार अरुण जगताप यांनी दिली. कल्याण रस्ता परिसरातील अनसूयानगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते सुरुवात करण्यात … Read more

साथीच्या आजारांमध्ये वाढ, रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली

नगर : शहरातील खासगी, तसेच सरकारी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. हवामानात झालेला बदल, ढगाळ वातावरण व डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलांचे प्रमाण अधिक आहे. बहुतांश रुग्णांमध्ये विषाणूजन्य तापाचे प्रमाण आढळून येत आहे. डेंग्यू व मलेरियासह गोचिड तापाचेही रुग्ण आहेत. जिल्ह्यात मागील महिनाभरात डेंग्यूचे सुमारे ४९ रुग्ण आढळून आले आहेत. नगर … Read more

राष्ट्रवादीला धक्का, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष भाजपच्या वाटेवर !

अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत – जामखेड मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तिकीट मिळणार नसल्याची शक्यता असल्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड व त्यांचे पती माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड भाजपच्या वाटेवर आहेत.  रोहित पवारांबाबत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी भाजपची वाट धरल्याची … Read more

जानकर म्हणतील तोच कर्जत – जामखेडचा आमदार होणार !

कर्जत :- शिंदे साहेब तुम्ही रासपची वेळोवेळी अवहेलना केली. मात्र आता कर्जत – जामखेडचा आमदार हा महादेव जानकर ठरवतील तोच होईल, असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा शेळी – मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता मेळावा कर्जत येथील शिवपार्वती मंगल कार्यालयामध्ये उत्साहात पार पडला, यावेळी दोडतले बोलत … Read more

भर कार्यक्रमात आ.औटी आणि खा.विखेंतील वाद चव्हाट्यावर !

पारनेर :- भोयरे पठार येथे वन विभागाच्या वतीने गॅसवाटपासाठी आमदार आणि खासदार दोघांनाही आमंत्रित करण्यात आले होते. दीड तास वाट पाहूनही खासदार येत नसल्याचे पाहून आमदारांनी गॅसवाटप उरकून घेतले. उशिरा आलेल्या खासदार डॉ. सुजय विखे यांनीही त्याच लाभार्थींना तेथेच पुन्हा गॅस वितरण केले. यापुढे एका कार्यक्रमासाठी एकालाच बोलवत जा, असा खोचक सल्ला त्यांनी संयोजकांना दिला. … Read more

निळवंडे कालव्यांच्या कामाचे श्रेय मुख्यमंत्र्यांनाच

संगमनेर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाडशी निर्णयामुळेच निळवंडे कालव्यांच्या कामासा सुरुवात झाली. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या स्वप्नपूर्तीचा हा क्षण आहे. जिरायती भागातील शेतकऱ्यांना युती सरकारमुळेच न्याय मिळाला, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. पानोडी येथे निळवंडे उजव्या कालव्याच्या ५७ किमी लांबीच्या मातीकामाचा प्रारंभ विखे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती कैलास … Read more

मराठा सोयरीक म्हणजे खात्री व विश्‍वास – आ.संग्राम जगताप

अहमदनगर :- मराठा सोयरीक ग्रुपने गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करून समाजाचा विश्‍वास संपादन केला आहे. अशोक कुटे सरांनी या कार्यात सातत्य ठेवल्याने हा ग्रुप टिकून राहिला आहे, असे उदगार मराठा सोयरीक ग्रुपच्या 40 व्या मोफत राज्यस्तरीय मेळाव्याप्रसंगी आ. संग्राम जगताप यांनी काढले. अहमदनगर शहरात ’संजोग लॉनमध्ये मोफत अतिभव्य राज्यस्तरीय मराठा वधुवर थेटभेट मेळावा रविवार … Read more

नथुराम गोडसे हा देशभक्त होता की आतंकवादी होता ?

सातारा :- देशात रोजगार नाहीत त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. याकडे डोळेझाक करून भाजप सरकार काश्मीरमधील ३७० कलमासारखे भावनिक मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल करीत आहे. हे त्यांनी थांबवावे आणि नथुराम गोडसे हा देशभक्त होता की आतंकवादी होता हे जाहीर करावे, असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. … Read more

पितृ पंधरवडयामुळे भाज्यांना मागणी वाढली

पितृपक्षात आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी त्यांना श्रद्ध तर्पण करण्यात येते. लोक या पंधरवडयात आपल्या दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी श्राद्ध विधी करतात. हिंदू धर्मात त्यास विशेष महत्व देण्यात आले आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षास पितृपक्ष म्हणतात. पितरांच्या मृत्यू तिथीनुसार प्रतिपदा ते अमावस्या यादरम्यान श्राद्ध कर्म करण्यात येते. जर एखाद्या पितराची मृत्यू तिथी माहित नसेल तर … Read more

तुम्ही जर जनतेची कामे केली असती तर कर्डिलेंचा राहुरीत उदय झालाच नसता

राहुरी – तुम्ही जर जनतेची कामे केली असती तर कर्डिलेंचा राहुरीत उदय झालाच नसता, तूम्ही शिक्षण घेऊन येवढ्या पदव्या घेतल्या मग राहुरीतील संस्था कशा बंद पडल्या ते सांगा. शहरातील माता भगिनींना पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नव्हते, त्यामुळे वेळोवेळी पाठपुरावा करून आम्ही २९ कोटी रुपयांची पाणि योजना मंजूर करून आणली. असे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डीले … Read more

धक्कादायक: बाजरीच्या शेतात तरुणीवर बलात्कार

कर्जत :- तालुक्यातील राशिन भागात राहणाऱ्या एका २० वर्षाच्या ओळखीच्या तरुणीला आपण तुझ्या बहिणीला आणायला सिद्धटेकला जावू, असे सांगून दुचाकीवर बसवून करपरवाडी गावच्या शिवारातील बाजरीच्या शेतात नेवून आरोपीने बळजबरीने बलात्कार केला. यावेळी आरोपीला त्याच्याबरोबरील महिलेने साथ दिली. या प्रकरणी पिडीत तरुणीने काल कर्जत पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन सुरज मनचक्या भोसले, मोहिनी सूरज भोसले, दोघे रा. सिद्धटेक, … Read more