मानवी शरीर मृत्यूनंतरही वर्षभर करते हालचाल !

मानवी शरीर इहलोकीचा निरोप घेतल्यानंतरही जवळपास वर्षभर हालचाल करत असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या एका शास्त्रज्ञाने सप्रमाण सिद्ध केला आहे. हे संशोधन वैद्यकीय व कायदा अंमलबजावणी संस्थांसाठी मोलाचे ठरण्याची शक्यता आहे. एका प्रेताचे जवळपास १७ महिने सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर ॲलिसन विल्सन यांनी मानवी शरीर मृत्यूनंतरही चिरविश्रांती घेत नसल्याचे सिद्ध केले आहे. प्रस्तुत प्रकरणात मृतदेहाजवळ असणारे हात कालांतराने … Read more

साईभक्तांना गंडविणाऱ्या महिलेस पकडले !

शिर्डी : साईबाबांच्या उदी व तीर्थ सेवनाने तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होईल. सर्व दु:ख नाहीसे होईल, अशी भुरळ पाडून भाविकांना गंडा घालणाऱ्या महिलेस भाविकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश मिळाले आहे. भाविकांना फसविण्याच्या नाना तऱ्हेने शिर्डीत ठकसेन फसविताना आजवर अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.  आता हा नव्याने प्रकार पुढे आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.. साईबाबांची महती देश … Read more

कांदा @ ३२००

राहुरी शहर : कृषी उत्प्नन बाजार समितीच्या कांदा मोंडयावर काल २७,१०० गोण्यांची आवक होऊन कांद्यास ३२०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.  कांद्याच्या भावात ४०० ते ५०० रुपये वाढ झाली आहे. प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : एक नंबर कांद्यास २५०० ते ३२०० रुपये भाव मिळाला. तसेच दोन नंबर कांद्यास १६०० ते २४९५, तीन नंबर कांद्यास ५०० … Read more

मुळा धरणातून ३ हजार क्युसेकने पाणी सोडले

राहुरी शहर : मुळा धरणातून नदी पात्रात तीन हजार क्यूसेकने काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली. मुळा धरणाचा पाणी साठा २५ हजार ७३८ टीएमसी असून धरणात ३ हजार ४०० क्यूसेकने आवक सुरु असून धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरु आहे. धरण ९८ टक्के भरले आहे. मुळा उजवा … Read more

राज्यात पुन्हा युतीचे सरकार !

राहुरी : पाच वर्षात सत्तेवर असताना आम्ही केलेल्या विविध लोककल्याणकारी कामांमुळेच राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येणार असल्याचे महाजनादेश यात्रेनिमित्त लोकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे अधोरेखित झाले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात राहुरी फॅक्टरी येथे मुख्यमंत्री बोलत होते. राहुरी फॅक्टरी येथे देवळाली प्रवरा शहरवासियांच्या वतीने आमदार चंद्रशेखर कदम … Read more

सोशल मीडिया प्रोफाईल ‘आधार’शी जोडण आवश्यक

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एका प्रकरणात सुनावणी करताना फेसबुक, व्हॉट्सॲप, गुगल, यू-ट्यूब आदी समाज माध्यमांवरील सर्वच व्यक्तींचे प्रोफाईल ‘आधार’शी संलग्नित करण्याच्या मुद्यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. या प्रकरणी मद्रास, मुंबई व मध्य प्रदेश हायकोर्टांत ४ वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. तामिळनाडू सरकारने बोगस बातम्या व दहशतवादाशी संबंधित सामग्रीचा प्रसार रोखण्यासाठी सोशल … Read more

मुलीची छेडछाड करणाऱ्यास सक्तमजुरी

अहमदनगर : पिडीत मुलीच्या छेडछाड प्रकरणी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत एल.आणेकर यांनी आरोपी रोहन उर्फ राहुल दिगंबर फलके, रा.मठ पिंपरी, ता.जि. अहमदनगर यास सत्र खटल्याच्या निकालाविरूध्द न्यायालयात दाखल केलेल्या अपीलामध्ये भा.द.वि.का.क. ३५४ नुसार दोषी धरून त्यास १ महिना सक्त मजुरी व ५०हजार रू. दंडाची शिक्षा ठोठावली.  सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील ॲड. एम.व्हि दिवाणे यांनी काम … Read more

कर्जत – जामखेडमध्ये बारामतीचं अतिक्रमण होऊ देणार नाही !

जामखेड : ज्या बारामतीकरांनी कर्जत व जामखेड तालुक्यातील बळीराजाच्या हक्काचे पाणी येऊ दिले नाही ते पाणी ना.राम शिंदे यांनी आणले. ज्यांनी पाणी आवडले त्यांना थारा देऊ नका. जिल्ह्यासह कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात बाहेरचे उसनं नको, आमचं ते आमचचं असत.  कर्जत-जामखेड मतदार संघात बारामतीचं अतिक्रमण होऊ देणार नाही. पार्थ पवार पेक्षाही रोहित पवार यांची वाईट परिस्थिती … Read more

शरद पवार हाच माझा पक्ष,पण…

सातारा : काँग्रेस – राष्ट्रवादीसह अन्य पक्षातूनही अनेक दिग्गज नेते भाजपा, शिवसेना या सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी अक्षरश: रांगेत आहेत.  असे असताना  रामराजे व राजेगटाने बोलाविलेल्या मेळाव्यात ते पक्षांतर करणार अशी जोरदार चर्चा राज्यभर सुरु होती. तर चॅनल, वृत्तपत्रातूनही अंदाज आडाखे बांधले जात असताना रामराजे यांनी हा मेळावा कार्यकर्त्यांशी सुसंवाद आणि त्यांच्या अपेक्षा अडचणी जाणून घेण्यासाठी … Read more

मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांचा आयकर सरकारी खजिन्यातून !

लखनौ : उत्तर प्रदेशात मागील ४० वर्षांपासून मंत्र्यांचा प्राप्तिकर सरकारी तिजोरीतून भरला जात असल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांचे सर्वच मंत्री या कायद्याचा लाभ घेताहेत; पण कोणताच मंत्री पुढे येऊन हे मान्य करायला तयार नाही. विरोधी बाकावरील सप व बसपनेही या कायद्याविषयी कानावर हात ठेवलेत, हे विशेष. तत्कालीन मुख्यमंत्री विश्वनाथ … Read more

पाऊस थांबावा म्हणून चक्क बेडकांचा घटस्फोट!

भोपाळ : चांगल्या पावसासाठी दुष्काळग्रस्त भागात बेडकांचा विवाह लावल्याचे तुम्ही ऐकले, पाहिले असेलच; परंतु अतिवृष्टीमुळे हवालदिल झाल्याने बेडकांचा कायदेशीर घटस्फोट करण्यात आल्याची विचित्र घटना बहुधा प्रथमच घडली आहे.   मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सुमारे दोन महिन्यांपूर्वी बेडकांचा विवाह करण्यात आला होता. इंद्रपुरी परिसरातील तुरंत महादेव मंदिरात ओम शिवशक्ती मंडळाच्या सदस्यांनी वरुणदेवतेला प्रसन्न करण्यासाठी मातीच्या बेडकाची जोडी … Read more

तरुणाच्या मृत्यूनंतर लावले सलाईन!

झासरगुडा : विष पिऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याला परिचारीकेने सलाईन लावल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. रुग्णालय प्रशासनाने सलाईन लावेपर्यंत तरुण जिवंत होता अशी सारवासारव केली आहे. आरोग्य मंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. झासरगुडा जिल्ह्यातील लाईखेरा ब्लॉकमध्ये मोडणाऱ्या जलीबहाल गावात रहाणारा खेत्रामणि किशन (३०) याने विष प्राशन केले. त्याला कुटुंबियांनी तातडीने … Read more

तेजस नौदलात सामील होण्यासाठी सज्ज

नवी दिल्ली : संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान तेजसच्या नौदलासाठीच्या आवृत्तीने अरेस्ट लँडिंगची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. अरेस्ट लँडिंगची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करणे, हे तेजसचे नौदलात सामील होण्याच्या दिशेने मोठे यश आहे.  जमिनीच्या तुलनेत विमानवाहू जहाजांवरील रनवे म्हणजेच धावपट्टी छोटी असते. या छोट्या धावपट्टीवर उतरल्यानंतर झटका टाळून विमानाचा वेग तत्काळ कमी करण्यासाठी विमानाच्या मागील … Read more

राधाकृष्ण विखे-पाटलांना दिलासा

मुंबई : राज्यात नव्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारणारे नवनिर्वाचित मंत्री काँग्रेसमधून बंडखोरी करत भाजपच्या गोटात सामील झालेले राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीतून शिवसेनेत डेरेदाखल झालेले जयदत्त क्षीरसागर आणि रिपाइंचे नेते अविनाश महातेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला.  त्याच्या मंत्रीपदाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. बहुचर्चित … Read more

शरद पवार मैदानात मंगळवारपासून मराठवाडा दौऱ्यावर

मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील जुने सहकारी, नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.  पक्षाला सावरण्याबरोबर बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यासाठी पवार १७ सप्टेंबरपासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. सहा दिवस मराठवाडा पिंजून काढून पक्षाला उभारी देऊन जनतेचा विश्वास याद्वारे संपादित करणार आहेत.  … Read more

उदयनराजेंनी केला भाजपमध्ये प्रवेश, पंतप्रधान मोदी अनुपस्थित !

दिल्ली :- खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र उपस्थित नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी, शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. पुण्यातील विमानतळावरून उदयनराजे … Read more

ही फक्त सुरूवात आहे : प्रशांत गडाख

नेवासे :- आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गेल्या पाच वर्षांत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना नागाची उपमा देऊन तोंड ठेचण्याची भाषा केली. गडाख तालुक्याला लागलेली कीड आहे, यशवंतरावानी ७५ वर्षांत नेवाशात एकही कुटुंब सोडल नाही, ज्यांना आऱ्या टोचल्या नाही, चिमटा काढला नाही असे अनेक गलिच्छ आरोप केले. मी फक्त त्यांची जी प्रकरणे त्यांच्याच जुन्या मित्रांना माहीत … Read more

पेटीएमला सहन करावा लागला इतक्या कोटींचा तोटा!

नवी दिल्ली : गेल्या आर्थिक वर्षामध्ये पेटीएमला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यांचा तोटा वाढून १६५ टक्के झाला होता. याचा अर्थ दररोज कंपनीला ११ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा स्वीकारावा लागला. या काळात कंपनीच्या उत्पन्नात वाढही झाली.डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात पेटीएमला गुगलपे व फोनपे यांच्याशी मोठा तीव्र संघर्ष करावा लागला. पेटीएमची पालक कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्सला … Read more