शरद पवार हाच माझा पक्ष,पण…

सातारा : काँग्रेस – राष्ट्रवादीसह अन्य पक्षातूनही अनेक दिग्गज नेते भाजपा, शिवसेना या सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी अक्षरश: रांगेत आहेत.  असे असताना  रामराजे व राजेगटाने बोलाविलेल्या मेळाव्यात ते पक्षांतर करणार अशी जोरदार चर्चा राज्यभर सुरु होती. तर चॅनल, वृत्तपत्रातूनही अंदाज आडाखे बांधले जात असताना रामराजे यांनी हा मेळावा कार्यकर्त्यांशी सुसंवाद आणि त्यांच्या अपेक्षा अडचणी जाणून घेण्यासाठी … Read more

मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांचा आयकर सरकारी खजिन्यातून !

लखनौ : उत्तर प्रदेशात मागील ४० वर्षांपासून मंत्र्यांचा प्राप्तिकर सरकारी तिजोरीतून भरला जात असल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांचे सर्वच मंत्री या कायद्याचा लाभ घेताहेत; पण कोणताच मंत्री पुढे येऊन हे मान्य करायला तयार नाही. विरोधी बाकावरील सप व बसपनेही या कायद्याविषयी कानावर हात ठेवलेत, हे विशेष. तत्कालीन मुख्यमंत्री विश्वनाथ … Read more

पाऊस थांबावा म्हणून चक्क बेडकांचा घटस्फोट!

भोपाळ : चांगल्या पावसासाठी दुष्काळग्रस्त भागात बेडकांचा विवाह लावल्याचे तुम्ही ऐकले, पाहिले असेलच; परंतु अतिवृष्टीमुळे हवालदिल झाल्याने बेडकांचा कायदेशीर घटस्फोट करण्यात आल्याची विचित्र घटना बहुधा प्रथमच घडली आहे.   मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सुमारे दोन महिन्यांपूर्वी बेडकांचा विवाह करण्यात आला होता. इंद्रपुरी परिसरातील तुरंत महादेव मंदिरात ओम शिवशक्ती मंडळाच्या सदस्यांनी वरुणदेवतेला प्रसन्न करण्यासाठी मातीच्या बेडकाची जोडी … Read more

तरुणाच्या मृत्यूनंतर लावले सलाईन!

झासरगुडा : विष पिऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याला परिचारीकेने सलाईन लावल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. रुग्णालय प्रशासनाने सलाईन लावेपर्यंत तरुण जिवंत होता अशी सारवासारव केली आहे. आरोग्य मंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. झासरगुडा जिल्ह्यातील लाईखेरा ब्लॉकमध्ये मोडणाऱ्या जलीबहाल गावात रहाणारा खेत्रामणि किशन (३०) याने विष प्राशन केले. त्याला कुटुंबियांनी तातडीने … Read more

तेजस नौदलात सामील होण्यासाठी सज्ज

नवी दिल्ली : संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान तेजसच्या नौदलासाठीच्या आवृत्तीने अरेस्ट लँडिंगची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. अरेस्ट लँडिंगची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करणे, हे तेजसचे नौदलात सामील होण्याच्या दिशेने मोठे यश आहे.  जमिनीच्या तुलनेत विमानवाहू जहाजांवरील रनवे म्हणजेच धावपट्टी छोटी असते. या छोट्या धावपट्टीवर उतरल्यानंतर झटका टाळून विमानाचा वेग तत्काळ कमी करण्यासाठी विमानाच्या मागील … Read more

राधाकृष्ण विखे-पाटलांना दिलासा

मुंबई : राज्यात नव्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारणारे नवनिर्वाचित मंत्री काँग्रेसमधून बंडखोरी करत भाजपच्या गोटात सामील झालेले राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादीतून शिवसेनेत डेरेदाखल झालेले जयदत्त क्षीरसागर आणि रिपाइंचे नेते अविनाश महातेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला.  त्याच्या मंत्रीपदाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. बहुचर्चित … Read more

शरद पवार मैदानात मंगळवारपासून मराठवाडा दौऱ्यावर

मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील जुने सहकारी, नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.  पक्षाला सावरण्याबरोबर बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यासाठी पवार १७ सप्टेंबरपासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. सहा दिवस मराठवाडा पिंजून काढून पक्षाला उभारी देऊन जनतेचा विश्वास याद्वारे संपादित करणार आहेत.  … Read more

उदयनराजेंनी केला भाजपमध्ये प्रवेश, पंतप्रधान मोदी अनुपस्थित !

दिल्ली :- खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र उपस्थित नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी, शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. पुण्यातील विमानतळावरून उदयनराजे … Read more

ही फक्त सुरूवात आहे : प्रशांत गडाख

नेवासे :- आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गेल्या पाच वर्षांत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना नागाची उपमा देऊन तोंड ठेचण्याची भाषा केली. गडाख तालुक्याला लागलेली कीड आहे, यशवंतरावानी ७५ वर्षांत नेवाशात एकही कुटुंब सोडल नाही, ज्यांना आऱ्या टोचल्या नाही, चिमटा काढला नाही असे अनेक गलिच्छ आरोप केले. मी फक्त त्यांची जी प्रकरणे त्यांच्याच जुन्या मित्रांना माहीत … Read more

पेटीएमला सहन करावा लागला इतक्या कोटींचा तोटा!

नवी दिल्ली : गेल्या आर्थिक वर्षामध्ये पेटीएमला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यांचा तोटा वाढून १६५ टक्के झाला होता. याचा अर्थ दररोज कंपनीला ११ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा स्वीकारावा लागला. या काळात कंपनीच्या उत्पन्नात वाढही झाली.डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात पेटीएमला गुगलपे व फोनपे यांच्याशी मोठा तीव्र संघर्ष करावा लागला. पेटीएमची पालक कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्सला … Read more

आयफोन झाला २७ हजारांनी स्वस्त !

नवी दिल्ली : जगविख्यात स्मार्टफोन उत्पादक ॲपल कंपनीने बहुप्रतीक्षित आयफोन ११ सीरिजमधील आयफोन ११, आयफोन११प्रो आणि आयफोन ११ प्रो मॅक्स हे तीन फोन मंगळवारी सादर केले. नवीन आयफोन लाँच केल्यानंतर कंपनी त्यांच्या जुन्या आयफोनच्या किमतीत कपात करत असते. त्यानुसार गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोन एक्सआरची किंमत तब्बल २७ हजारांनी घटवण्यात आली आहे. आयफोन११ सीरिज लाँच … Read more

राजकीय उदासिनतेमुळे कोट्यवधी रुपये खर्च होवूनही रस्त्याची चाळण

साकुरी : अहमदनगर-मनमाड हा महामार्ग २ खासदार आणि ४ आमदारांच्या मतदारसंघातून जातो. तीन टोलनाक्यांवर रोज लाखो रुपये गोळा केले जात असताना कोपरगाव ते बाभळेश्वरपर्यंत दोन्ही बाजूंनी शेकडो खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. साईभक्त व प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. तिच परिस्थिती निमगाव ते निर्मळ पिंपरी बायपासची झालेली आहे. सरकार एकीकडे खड्डेमुक्त महाराष्ट्राचा … Read more

भारत दहशतवादाच्या समस्येचा कणखरपणे सामना करतोय – पंतप्रधान मोदी

मथुरा : दहशतवाद एक वैश्विक समस्या बनली असून तिने जणूकाही विचारसरणीचे रूप धारण केले आहे. अशातच आमचा शेजारी देश (पाकिस्तान) दहशतवादाला पोसत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली आहे. भारत दहशतवादाच्या समस्येचा कणखरपणे सामना करीत असून, भविष्यातही करणार असल्याचे त्यांनी ठणकाविले आहे. उत्तरप्रदेशातील पशुधन रोग निर्मूलन कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, … Read more

हर्षवर्धन पाटील यांना पंचावन्न वेळा फोन केले मात्र, त्यांनी फोन घेतले नाहीत, त्यांना भाजपात जायचेच होते – अजित पवार

पुणे : हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्षात जायचेच होते. त्यांनी इंदापुरात कार्यकर्ता मेळावा घेऊन आमच्यावर टीका केल्यानंतर मी त्यांना सुमारे पन्नास ते पंचावन्न वेळा फोन केले. मात्र, त्यांनी फोन घेतले नाहीत. त्यांच्या पुण्याच्या घरी भेटायलाही गेलो. मात्र, ते भेटले नाहीत. त्यांनी भाजपात जायचे ठरवलेच होते, तर बिल आमच्या नावावर फाडत आहेत? असा पलटवार माजी … Read more

गळीत हंगाम होणार उशिराने सुरू

पुणे : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी यामुळे उस उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. दरम्यान, पावसामुळे आलेल्या पुराचा फटका सर्वाधिक उसपीकाला बसला असून राज्यात सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक हेक्टरवरील उस पीक वाया गेले आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षात पावसाने दडी मारल्याने उसाची लागवड म्हणावी अशी झाली नाही. अद्यापही मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, … Read more

हर्षवर्धन पाटील यांचे भांडण राष्ट्रवादीशी होते. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात जाण्याचा प्रश्नच नव्हता !

औरंगाबाद : इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांचे भांडण राष्ट्रवादीशी होते. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात जाण्याचा प्रश्नच नव्हता. हा प्रकार म्हणजे ‘दिराशी भांडण अन् नवऱ्याला घटस्फोट’, असा असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केली. भाजपा प्रवेशानंतर पाटील यांनी केलेली राष्ट्रवादीवरील टीका अनाकलनीय असल्याचेही त्या म्हणाल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या … Read more

मुलाने गाडी चालवल्यास २५ हजाराचा दंड भरावा लागेल म्हणून दांम्पत्याने केले हे कृत्य

आग्रा: नवीन मोटार वाहन नियमाच्या दंडाच्या रक्कमेची नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. आग्रा शहरातील एका दांम्पत्याने अल्पवयीन मुलाने गाडी चालवल्यास २५ हजाराचा दंड भरावा लागेल म्हणून त्याला चक्क खोलीत कोंडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी घरी येऊन मुलाची सुटका केली आहे. आग्य्रातील एतमादुद्दौलाच्या शाहदरा परिसरातील धरम सिंह यांनी १२ ऑगस्टला एक नवीन गाडी खरेदी केली … Read more

संगमनेरची निवडणूक लक्षवेधी ठरणार आ.थोरांताविरोधात इंदुरीकर महाराज निवडणूक लढविणार ?

संगमनेर – येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात प्रसिद्ध समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज निवडणूक रिंगणात उतरणार अशी दबक्या आवाज चर्चा होती. मात्र आज शुक्रवारी संगमनेर येथील मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या सभेत इंदुरीकर महाराजांनी हजेरी लावल्याने इंदुरीकर महाराज थोरातांविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. थोरातांविरोधात इंदुरीकर महाराज रिंगणात उतरणार या दबक्या … Read more