यशवंतराव गडाख धृतराष्ट्र झालेत !

सोनई :- पुत्र प्रेमापोटी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख धृतराष्ट्र झाले आहेत.त्यांची ही धृतराष्ट्रनीती झुगारून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ द्या असे आवाहन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. सोनई येथील आदर्श विद्यालयाच्या मैदानावर मुरकुटे यांच्या विकास दिंडीची सांगता झाली.त्यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. शैनेश्‍वर देवस्थानाचे विश्‍वस्त बापूसाहेब शेटे अध्यक्षस्थानी होते. … Read more

विकासकामांच्या जोरावर जनादेश मागणार : आ. राहुल जगताप

ढवळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीत विकासकामांच्या जोरावर जनादेश मागणार आहोत, असे प्रतिपादन आ. राहुल ज़गताप पाटील यांनी केले. श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे येथे पाच लाख रुपये खर्चाच्या स्मशानभूमीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे कामाच्या उद्घाटनप्रसंगी आ. जगताप बोलत होते. आ. ज़गताप पुढे म्हणाले, आम्ही जनतेला जी आश्वासने दिली, ती पूर्ण करणार असून, ज़नतेने विकासकामे करणाऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिज़े. … Read more

आ. मोनिका राजळे यांना खंबीर साथ देऊन त्यांना मंत्री होण्याची संधी द्या !

पाथर्डी :- राज्यात या वेळी पुन्हा भाजप व मित्र पक्षांचे सरकार येणार असून, विरोधकांत अवमेळ सुरू असून, त्यांच्यात मेळ होईपर्यंत विधानसभेचा निकाल लागलेला असेल, त्यामुळे हातचे सोडून पळत्याच्या मागे जाऊ नका, शेवगाव -पाथर्डी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांना खंबीर साथ देऊन त्यांना मंत्री होण्याची संधी द्या, असे आवाहन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. तालुक्यात … Read more

आ. संग्राम जगताप यांच्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता !

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात चितळे रोडवर गळ्यात भगवा पंचा घालून मानाच्या विशाल गणपतीसमोर ढोलवर रिदम धरण्याबरोबरच ते भगवा ध्वज घेऊन देखील नाचले. आमदार जगताप यांचा हा भगवा रिदम नगर शहरातील आगामी विधानसभा निवडणुकीची वेगळी नांदी ठरू शकते. असे राजकीय धुरींचे बोलबाल आहे. आमदार जगताप यांच्या गळ्यातील भगवा पंचा आणि … Read more

मुलीची छेड काढणारा ‘तो’ तरुण पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपूर – शहरातील हॉटेल उदय पॅलेससमोर मुलीची छेड काढणाऱ्यास पोलिसांनी काकडी (ता. राहाता) येथून पकडून आणले. तरुण तालुक्यातील खानापूर येथील आहे. मात्र, ज्या मुलीची छेड काढली तिने तक्रार दिलेली नसल्याने पोलिसांना पुढील कारवाईस अडचणी येत आहे. त्यामुळे तक्रारीसाठी पुढे येण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे. ही घटना सिद्धीविनायक गणपती मंदिराजवळ घडली. यावेळी मुलीने हिमत दाखवित सदर … Read more

सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतर करणाऱ्या तरुणाला आयुष्यभरासाठी दिली हि सजा…

नवी दिल्ली : हिंदू तरुणीशी विवाह केल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी कुटुंबात स्विकार करावा यासाठी धर्मांतर करणाऱ्या तरुणाविषयी शंका घेत पित्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने समाज व्यवस्था आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाहाविरोधात नाही परंतू तरुणाने मनापासून तरुणीचा स्विकार केला असेल तर तरुणीच्या कुटुंबियांनीही त्याला स्विकारायला हवे असा सल्ला देत धर्मांतर करणाऱ्या तरुणाला आयुष्याभरासाठी सुयोग्य पती बन … Read more

डोकेदुखी थांबण्यासाठी तिने खाल्ल्या 15 गोळ्या पण झाले असे काही कि गमविला जीव…

बंगलूरु : डोकेदुखी असह्य झाल्याने ती शमवण्यासाठी १५ गोळ्या खाल्ल्याने गृहीणीचा मृत्यू झाल्याची घटना बंगलूरुत घडली आहे. या गोळ्यांमुळे तीने दोन दिवस मृत्यूशी झुंज देत होती. मुनाप्पा हा पत्नी सुमन्न्मा आणि मुलीसोबत अनेकल पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहातो. सुमन्न्माला डोकेदुखीचा त्रास आहे. तिच्यावर उपचार सुरु होेते. डोकेदुखी असल्यास वेदनाशमक गोळ्या तिला डॉक्टरने दिल्या होत्या. चार दिवसांपूर्वी … Read more

लॅण्डरशी संपर्क साधण्यासाठी इस्त्रोच्या हाती आता फक्त दहा दिवस…

वृत्तसंस्था ;- चांद्रयान-२ मोहिमेच्या अगदी अंतिम टप्प्याच्या घटनांची इस्त्रो अगदी बारकाईने माहिती घेत आहे. इस्त्रोने विक्रमशी संपर्क तुटला त्याच रात्री चांद्रभूमीपासून २.१ किलोमीटरवर असेपर्यंत इस्त्रोच्या नियंत्रणाखाली लॅण्डर होते. शनिवारी पहाटे १.४० ला लॅण्डरने ठरवून दिलेल्या मार्गाने क्रमाक्रमाने वेग कमी करत प्रवास सुरू ठेवला. चांद्रभूमीवर उतरण्यासाठी लॅण्डरने योग्य ती दिशाही पकडली. दक्षिण गोलार्धाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू … Read more

स्वयंभू युवा प्रतिष्ठानचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अहमदनगर :- स्वयंभू युवा प्रतिष्ठानचा वर्धापन दिन 11 सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले प्राथमिक व महात्मा फुले माध्यमिक निवासी शाळा घारगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी शालेय परिसरात श्रमदान केले तेथील विद्यार्थ्यांच्या समवेत आनंदाचा क्षण साजरा केला, यावेळी विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा शोध घेऊन त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.  … Read more

भाजपाला अँड प्रताप ढाकणे का चालत नाहीत?

पाथर्डी – येथील काही ज्येष्ठ कार्यकर्ते भाजपच्या नेत्या व भावी मुख्यमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी ना.मुंडे यांच्या कडे अँड प्रताप ढाकणे यांना भाजपात घ्या असा आग्रह त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी धरला होता परंतु ढाकणे हे राष्ट्रवादीत आहेत, त्यांना भाजपात कसे घ्याचे असे उत्तर ना.मुंडे यांच्याकडून आले. हे उत्तर वंजारी समाजाच्या राजकीयदष्ट्या योग्य नव्हते. … Read more

तरुणीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

संगमनेर : शहरातील एका रस्त्यावर विजय अण्णासाहेब दिघे (वय २४, रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) याने एका एकवीस वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना सोमवार दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.  याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास विजय अण्णासाहेब दिघे याने तरुणीचे तोंड दाबून तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

कोपरगाव : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पुणतांबा चौफुली ते इगडेफाटा दरम्यान गुरसळ वस्ती, डाऊच खुर्द (ता. कोपरगाव) येथे शनिवारी (दि. ७) रात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  याबाबत अधिक माहिती अशी, रवींद्र सर्जेराव जानराव (वय ४२, रा. अंदरसूल, ता. येवला, जि. नाशिक) हे दुचाकी (क्र. एमएच १५, बीएस ८३८०) वरून जात … Read more

श्रीगोंदा तालुक्यात भरदिवसा घरफोडी

श्रीगोंदा : तालुक्यातील सुरोडी येथील रहिवासी संजय भाऊ वागस्कर यांच्या घरी दि.९रोजी दिवसा दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी डल्ला मारत, घराच्या कपाटातील दीड तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३५,०००रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घरफोडीबाबत वागस्कर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

लठ्ठपणा कमी करण्यासाठी हा आहे आजवरचा सर्वात सोपा उपाय

हल्लीच झालेल्या एका अध्ययनात शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, काही वेळ नुसते उभे राहूनही आपण लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांची जोखीम कमी करू शकतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, उभे राहून आपण दर सहा तास बसून वा झोपून राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत सुमारे ४५ कॅलरी घटवू शकतो.  जीवनशैलीत किरकोळ बदल करून व्यक्ती गतीहीन जीवनशैलीच्या दुष्परिणामांपासून स्वत:चा बचाव करू शकतो. … Read more

प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आपली जीवनयात्रा संपवतोय…

युद्घ-संघर्षापेक्षाही आत्महत्येमुळे मरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जगात प्रत्येक वर्षी जवळपास ८ लाख लोक मृत्यूला कवटाळत आहेत. अर्थात प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आपली जीवनयात्रा संपवीत असल्याची चिंताजनक माहिती जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने सोमवारी दिली आहे. प्रामुख्याने गळफास, विषप्राशन आणि गोळी झाडून लोक स्वत:चे जीवन संपवीत असल्याचे चित्र आहे. अशा … Read more

हे छोटेस रोपटे आहे विषापेक्षाही जास्त खतरनाक ! 

मानव सतत झाडे-रोपट्यांचा आपल्या सुखसुविधांसाठी वापर करत आला आहे. कागदनिर्मितीपासून फर्निचरपर्यंत सगळ्यांसाठी तो झाडांवर अवलंबून आहे. मात्र नेहमीच असे होत नाही. कधीकधी झाडेझुडपेच मानवाला नुकसान पोहोचवितात.  ‘होगहीड’ नावाचे गाजरगवत प्रजातीचे रोपटे असेच खतरनाक आहे. ते फारसे मोठे नसते, पण कोब्रा सापाएवढे घातक असते. होगवीड अतिशय विषारी रोपटे समजले जाते. ‘किलर ट्री’ नावानेही ते प्रसिद्ध आहे. … Read more

हे नक्की वाचा …अशा वेळी ग्रीन टी चे सेवन केले तरी काहीच फायदा नसतो…

ग्रीन टी एक उत्तम प्रकारचे अँटी-ऑक्सिडेंट समजले जाते. मात्र हल्लीच झालेल्या अध्ययनातून त्याच्याबाबत एक नवीन खुलासा झाला आहे. समजा आयर्न म्हणजे लोहयुक्त भोजनानंतर ग्रीन टीचे सेवन केले तर त्याचा प्रभाव कमी होतो, असे त्यात म्हटले आहे.  पालकासारख्या कगाही हिरव्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह असते. अमेरिकेतील पेन स्टेट युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यात एका … Read more

काम करत नसल्याने घरातून बाहेर काढले,अखेर रागातून त्याने केला आणि वहिनी, पुतण्याचा खून !

मुंबई : कामोठे सेक्टर ३४ येथे राहणाऱ्या विवाहितेची आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलाची मोठ्या दिराने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. सुरेश चव्हाण असे दिराचे नाव आहे. कामोठे पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.  चव्हाण हा काहीच काम करत नसल्याने त्याला कुटुंबीयांनी वर्षभरापूर्वी घरातून बाहेर काढले होते. या रागातून … Read more