शिर्डी परिसरातील गुलाबाला गुजरातमध्ये मोठी मागणी

राहाता : तालुक्यातील शिर्डी परिसरातील निमगाव कोऱ्हाळे, निमशेवडी, नांदुर्खी, सावळीविहीर, तिसगाव, चोळकेवाडी, अस्तगाव या सात गावांत मोठ्या प्रमाणावर गुलाब शेती केली जाते. या गुलाबाला जशी शिर्डी शहरात मागणी असते, तशी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातदेखील चांगली मागणी झाली आहे. शिर्डी शहरात काही शेतकरी जागेवर गुलाबाची फुले विकत आहेत. त्या व्यतिरिक्त सुमारे दोन लाख गुलाबाचे पॅकेट रोज बाहेरच्या … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार

पारनेर : तालुक्यातील लोणीमावळापासून तीन किमी असणाऱ्या नाईकवाडी मळयातील भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या गोठयातील शेळयांवर बिबट्याने हल्ला केल्याने दोन शेळया ठार झाल्या तर एक शेळी जखमी झाली. माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या डाळिंबाच्या शेताजवळ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बिबट्या दबा धरून बसला होता. घरातील मंडळी घराजवळ असणाऱ्या शेतामध्ये शेतीची कामे करत होती. याचवेळी … Read more

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अकोले : भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून, तालुक्यातील भंडारदरा धरणातून ३४ हजार १२५ क्यूसेक, तर निळवंडे धरणातून २८ हजार १९८ क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदीला पूर आला आहे. प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.अकोले तालुक्यात पावसाची संततधार सर्वदूर सुरूच असून मुळाखोरे, आढळा खोरे, प्रवरा खोऱ्यासह भंडारदरा पाणलोट क्षेत्रात … Read more

पबजी खेळू न दिल्याने वडिलांचे तुकडे करून हत्या !

बेळगाव : वडील आपल्याला पबजी खेळू देत नाहीत, याचा राग आल्याने चिडलेल्या एका निर्दयी मुलाने चक्क जन्मदात्या वडिलांवर हल्ला चढवत त्यांचे तुकडे करून हत्या केली आहे. ही घटना सोमवारी पहाटे कर्नाटकातील बेळगावधील काकती येथे घडली आहे. याप्रकरणी रघुवीर कुंभार नामक तरुणास अटक केली आहे.कर्नाटकातील बेळगावमधील काकती येथे असलेल्या सिध्देश्वरनगरात सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे. … Read more

मेळावा घेवून शक्ती प्रदर्शन तर केले मात्र नामदेव राऊतांची भूमिका गुलदस्त्यातच …

कर्जत -जामखेड तालुक्यातील महासंग्राम युवा मंचने घेतलेल्या संकल्प मेळाव्यात तालुक्यातील युवकांच्या मागे उभे राहण्याचा संकल्प जाहीर करताना कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी आपण निवडणूक लढवणार की नाही, हे मात्र गुलदस्त्याच ठेवले. कर्जत -जामखेड मतदारसंघातील भाजपातील बडे प्रस्थ समजले जाणारे कर्जतचे नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी आज महासंग्राम युवा मंचच्या वतीने संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. … Read more

कोपरगावात निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे !

कोपरगाव :- विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार याची खात्री पटल्याने सहकार सम्राट हादरले आहेत. प्रत्येक गावात, वाड्यावस्त्यांवरील सहकारी संस्थांमधील हक्काचे कर्मचारी हेरगिरी करण्यासाठी त्यांनी नेमले आहेत. गेल्या किमान तीन महिन्यांपासून तथाकथित लोकप्रिय नेत्यांनी सहकारातील कर्मचाऱ्यांना स्वतःचे गुलाम समजून राजकारणासाठी राबवणे चालू आहे, असा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या … Read more

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

कोपरगाव :- दहेगाव येथील वैशाली संदीप अनर्थे (वय ३२) हिस पती, सासू-सासरे यांनी घर बांधण्याकरिता माहेरून १५ हजार रुपये घेऊन ये, म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देत तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांवर सोमवारी गुन्हा दाखल झाला. या संदर्भात मृत वैशाली संदीप अनर्थे हिचा भाऊ नीलेश आनंदराव कांबळे (महादेवनगर) यांनी पती … Read more

बापूंना जाऊन एक वर्ष झाले, तरी त्यांच्या स्मृती आजही ताज्या आहेत…

श्रीगोंदे ;- बापूंनी आयुष्यभर पुण्याचे काम केले. त्यांच्या विचारांवर आणि कामांवर प्रेम करणारा समाज आज येथे उपस्थित आहे. बापूंचे कार्य आणि नाव सदैव तेवत राहील असे काम करूया, असे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी सांगितले. राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पाटील बोलत होते. बापूंना श्रद्धांजली अर्पण करताना ‘नागवडे’चे … Read more

पिचड यांंच्या विरोधात माकप लढणार : डॉ. अजित नवले

अकोले :- पराभवाची भीती आणि राजकीय लोभापायी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पिचड पिता-पुत्र भाजपवासी झाले. राष्ट्रवादीचे तालुक्यातील सर्व प्रमुख नेतेही पिचडांसोबत भाजपत गेले. अशा परिस्थितीत विरोधक म्हणून आता गावोगावी संघटन असलेला माकप हा एकमेव राजकीय पक्ष शिल्लक आहे. माकप संपूर्ण ताकदीने या विधानसभा निवडणुकीत हस्तक्षेप करून राजकीय तत्त्वनिष्ठता आणि पावित्र्याची जपवणूक करण्यात आघाडीवर राहील, असे … Read more

नगर-पुणे महामार्गावर अपघातात बापलेकासह तिघांचा मृत्यू

पारनेर :- नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव शिवारात झालेल्या अपघातात अपघातात बापलेकासह तिघांचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे सव्वाच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत अकरा जण जखमी झाले आहेत. लक्ष्मी वसंत दोमल (वय ६५, रा. सातभाई गल्ली, तोफखाना), विश्वनाथ बाळराम बिमन (वय ५०), ओंकार विश्वनाथ बिमन (वय १०, दोघेही रा. लोणार गल्ली, नगर) यांचा यात मृत्यू झाला. जखमींमध्ये किसन … Read more

आनंदाची बातमी : एसबीआयचे कर्ज पुन्हा स्वस्त…

दिल्ली :- देशातील स‌‌र्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) पुन्हा एकदा कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. बँकेने सर्व प्रकारच्या कर्जावरील मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस बेस्ट लेंडिंग रेट अर्थात एमसीएलआरमध्ये १० मूळ अंकांची (०.१० %) कपात केली आहे. बँकेने सलग पाचव्यांदा कर्जावरील व्याजदर घटवले आहेत. या कपातीमुळे बँकांच्या ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज मिळणार आहे. … Read more

पाच तासांपेक्षा जास्त टीव्ही पाहत असाल तर वेळीच व्हा सावध…

न्यूयॉर्क : काही लोक तासन्तास एकाच जागी बसून टीव्ही पाहत घालवतात. तुम्हालाही अशी सवय असेल, तर वेळीच सावध व्हा. कारण ही सवय अशा लोकांसाठी म्हातारणात हिंडण्याफिरण्याच्या समस्येचा धोका तिपटीने वाढवते, असे एका अध्ययनातून समोर आले आहे. या अध्ययनात ५० ते ७१ वयोगटातील निरोगी लोकांचा समावेश करण्यात आला होता. सुमारे दहा वर्षे त्यांच्या हालचालींची नोंद ठेवण्यात … Read more

कार अपघातात एक जखमी

राजुरी : बाभळेश्वर-लोणी रोडवरील प्रवरा कारखान्याकडे जाणाऱ्या रोडजवळ असणाऱ्या म्हसोबा मंदिराजवळ रात्री वळणाचा अंदाज न आल्याने कार कठड्याला जाऊन आदळली. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. लोणीकडून बाभळेश्वरकडे जात असणाऱ्या कारमधील चालकाला म्हसोबा मंदिराजवळील वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे कार ओढ्याच्या कठड्याला जोरात धडकली. शेजारी असणाऱ्या रहिवाशांनी जखमी चालकाला प्रवरा हॉस्पिटलला नेण्यात आले आहे. इतर … Read more

उपवासाचे पदार्थ खाताना ही काळजी नक्की घ्या…

उपास (उपाशी राहणं) आणि दुसरा म्हणजे उपवास, ज्यामध्ये आपण उपवासाचे पदार्थ खातो. यामध्ये आपण भगवंताचं नामस्मरण करून मन स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. हे दोन्ही प्रकार जर एकत्र मनाशी आले तर तो खरा भगवंतापर्यंत पोहोचला, असं म्हणावं लागेल. म्हणजे फक्त उपवासाचे पदार्थ न खाता उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे सहवास, भगवंताच्या मनानं सहवासात राहणं, असा … Read more

अति घाईत खाल्ल्यामुळे गमवावा लागला जीव!

न्यूयॉर्क : काही लोक तासन्तास एकाच जागी बसून टीव्ही पाहत घालवतात. तुम्हालाही अशी सवय असेल, तर वेळीच सावध व्हा. कारण ही सवय अशा लोकांसाठी म्हातारणात हिंडण्याफिरण्याच्या समस्येचा धोका तिपटीने वाढवते, असे एका अध्ययनातून समोर आले आहे. या अध्ययनात ५० ते ७१ वयोगटातील निरोगी लोकांचा समावेश करण्यात आला होता. सुमारे दहा वर्षे त्यांच्या हालचालींची नोंद ठेवण्यात … Read more

‘बबनराव मी कायम रिचेबलच असतो’ हर्षवर्धन पाटील यांचे पाचपुते यांच्या वक्तव्यावर उत्तर

श्रीगोंदा : स्व.शिवाजीराव (बापू)नागवडे यांनी आयुष्यभर लोकांची सेवा केली.कारखान्याच्या माध्यमातून हजारो लोकांचे प्रपंच बापूंनी उभे केले. सहकारातही बापूंचे सिंहाच योगदान आहे. त्यामुळे त्यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात पसरवण्यासाठी मी प्रयत्न करेल, असे मत माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. राज्य सहकारी साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष तथा नागवडे कारखान्याचे संस्थापक श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार स्व.शिवाजीराव(बापू)नागवडे यांच्या प्रथम … Read more

सालकऱ्याच्या घरात जन्माला आल्याने गरिबी काय असते ते मी अनुभवलेले आहे – ना.प्रा.राम शिंदे

जामखेड : मला अतिशय आनंद होतोय की, आपल्या आपल्या अवर्षण प्रवण क्षेत्रातील गोरगरीब, वंचित, पीडित, शोषित लोकांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा हेतूने आजचा दिवसाचे विशेष महत्व आहे. कारण मी काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला माणूस नाही. सालकऱ्याच्या घरात जन्माला आल्याने गरिबी काय असते ते मी अनुभवलेले आहे. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध … Read more

कॉफी पित्ताशयातील खड्यांचा धोका कमी करते !

लंडन : शरीर व मनाला तरतरी देणाऱ्या कॉफी सेवनाचा आणखी मोठा लाभ समोर आला आहे. हल्लीच झालेल्या एका अध्ययनातून कॉफी आणि पित्ताशयात तयार होणारे खडे यांच्यात संबंध असल्याचे आढळून आले आहे. सुमारे एक लाख चार हजार लोकांवर करण्यात आलेल्या या अध्ययनामध्ये असे दिसून आले की, दररोज सहा कपांपेक्षा जास्त कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये कॉफी न पिणाऱ्यांच्या … Read more